Submitted by दक्षिणा on 23 January, 2013 - 02:53
या पुर्वीची फॅशनवरची चर्चा http://www.maayboli.com/node/39904 इथे सुरू झाली होती. पोस्ट्स एक हजाराच्या वर गेल्याने, हा नविन धागा उघडला आहे.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
माझ्या काळी मॅक्सी नावाचाही
माझ्या काळी मॅक्सी नावाचाही एक प्रकार होता. अगदी घोळदार, रस्त्याने चालताना सगळी धुळ झाडत जाणारा. मी अगदी आवडीने एक घेतलेला शिवुन...
सहावीला वगैरे असताना आई चप्प
सहावीला वगैरे असताना आई चप्प तेल घालायची केसांवर आणि मध्ये भांग पाडून केस विंचरुन द्यायची. महान कळकट्ट दिसायचे मी. नंतर नंतरही केस मोठे असल्याने आईच विंचरुन द्यायची. तेव्हाही तसंच. कॉलेजचं वारं लागल्यावर केस छाटले ते अजुनही वाढले नाहीतच.
मी पहिली-दुसरीत असताना होता
मी पहिली-दुसरीत असताना होता माझ्याकडे मॅक्सी. जाम आवडायचा मला.
फ्लिक्स मी शाळेत केलेल्या
फ्लिक्स मी शाळेत केलेल्या भयाण प्रकार होता तो...
आमच्या ज्यु कॉ च्या काळात
आमच्या ज्यु कॉ च्या काळात फ्लिक्स कापलेल्या हिरोंची लाट आली होती.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पहिला राहुल रॉय.
राहुल रॉय.>>>>>>सुरुवातीला
राहुल रॉय.>>>>>>सुरुवातीला चिकना होता नै....![Blush](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/blush.gif)
मॅक्सी म्हणजे काय?? गाऊन??
मॅक्सी म्हणजे काय?? गाऊन?? माझ्याकडे एक टुपीस होता कॉटनला. फुल्ल पकाव प्रकरण होतं ते. इकडुन तिकडुन फलकारत रहायचं नुसतं.
अकरावीत असताना स्वतःच्या
अकरावीत असताना स्वतःच्या हाताने अति कापलेल्या फ्लिक्स होत्या माझ्या काही काळ. माणसाने किती घाण दिसावे.. >>
चला हायसं वाटलं की अशी मी एकटीच नाही ते.. ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
सुरुवातीला चिकना होता नै
सुरुवातीला चिकना होता नै <<
कश्याच्या सुरूवातीला?
आशिकीमधे तरी तो यळम्या दिसायचा. ईईक्स!
70s maxi dresses असा गुगल
70s maxi dresses असा गुगल इमेज सर्च कर
इयत्ता ६वीतल्या बड्डेला 'तुला
इयत्ता ६वीतल्या बड्डेला 'तुला काय हवं?' असं विचारल्ल्यावर मी 'मॅक्सी" असं उत्तर दिलेलं. मग बाबांनी एक स्काय ब्लू कलरचा शर्टपीस आणून त्यातून मॅक्सी शिवून घेतलेली माझ्यासाठी.
नंतर मॅक्सी लोळून खाली खराब व्हायला लागल्यावर कापून त्याचा फराक केला.
\ शायनिंग ८०'ज
शायनिंग ८०'ज
अर्रर्र मॅक्सी मी पण. एका
अर्रर्र मॅक्सी मी पण. एका ताईची सिक्षफोर फोर साडी माग मागून आणली मग गाउन शिवला लाइट व्हायोलेट रंगाचा. वर पर्पल फुले लेसची.पॅच वर्क. असा तो गाउन घालून क्लासला मग थेट कमला नेहरू पार्कात. उतरत्या उन्हात मला मी जाम हिरॉइन आहे असेच वाटले होते. नीतू सिंग टाइप.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
राहुल रॉयचं इतर काही नाही पण
राहुल रॉयचं इतर काही नाही पण हेअर स्टाईल मला आवडायची.
चनिया चोली प्रकरण र्हायलं की
चनिया चोली प्रकरण र्हायलं की डिस्कसायचं..
काकूने वापरून कंटाळलेल्या साडीची चचो शिवायचो आम्ही.
चला हायसं वाटलं की अशी मी
चला हायसं वाटलं की अशी मी एकटीच नाही ते>>>>... मी सुद्धा ....कापली फ्लिक्स आणि लपवुन ठेवली......फेकुन द्यावे असा विचार केलाच नाही....मम्मी कामावरुन परत आल्यावर तिने माझा पाठीच्या फ्लिक्स काढल्या त्या वेगळ्या...![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
राहुल रॉयचं इतर काही नाही >>
राहुल रॉयचं इतर काही नाही
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
>>
मी फ्लिक्स कापल्या होत्या आणि
मी फ्लिक्स कापल्या होत्या आणि डस्टबीनमध्ये टाकल्या तर आईला दिसतील म्हणुन टॉयलेटमध्ये टाकल्या होत्या.
भाग्यश्री ची होती नं मैने
भाग्यश्री ची होती नं मैने प्यार किया तशी माझा कडे होती......लाल हिरवी
बडोदा प्रिंट्स हे
बडोदा प्रिंट्स हे अत्युत्कृष्ट कॉटन मिळण्याचं बडोद्यातलं दुकान आहे. ह्या कॉटनला तोड नाही कशाचीच.
योडे तु टॉयलेट मधे
योडे तु टॉयलेट मधे टाकल्यास...मी लपवुन ठेवल्या बावळटासारख्या
अरे पण ज्या डोक्यावर
अरे पण ज्या डोक्यावर दिसायच्या त्या दिसणारच ना?
मला आईची भिती अशी वाटली नव्हती. मी जोरात शूरपणा केल्यासारखे आई कॉलेजातून आल्या आल्या आईला दाखवल्या होत्या कापलेल्या फ्लिक्स. त्याकाळी सगळ्या फ्याशनीवर आई एकच प्रश्न विचारायची "हे चांगलं दिसतं असं तुला वाटतं का?'. तसंही अॅन्टीब्युटी ८०ज संपत होतं तेव्हा त्यामुळे अॅन्टीब्युटी इफेक्ट गेलेला नव्हता.
मी पण कित्येक वेळा फ्लिक्स
मी पण कित्येक वेळा फ्लिक्स गपचुप कापायची![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मी फ्लिक्स कापल्या होत्या आणि
मी फ्लिक्स कापल्या होत्या आणि डस्टबीनमध्ये टाकल्या तर आईला दिसतील म्हणुन टॉयलेटमध्ये टाकल्या होत्या.>>>>
![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
केसावरून आठ्वलं. बंजारा ड्रेस
केसावरून आठ्वलं. बंजारा ड्रेस घालून मी लग्नाला गेले होते तो किस्सा वाचलाच असेल तुम्ही. त्या लग्नाच्या आदल्या दिवशी.. मी आमच्या शेजारच्या लहान मुलाची खेळण्यातली मोटार घुईंघुईं फिरवली आणि कानापाशी नेली (त्याचे टायर फिरत होते) ते टायर्स इतके जवळ होते कानाच्या की केसाची एक बट त्यात गुंडाळली गेली..
मग काय केस कापण्याशिवाय पर्याय नव्हता..
मी लग्नाला तशीच शकुंतला बुचडा घालून ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
मॅक्सी तर मी पण घालायचे. मी ६
मॅक्सी तर मी पण घालायचे. मी ६ वीत असताना दिल्ली आग्रा असे फिरायला गेलो होतो. त्या फोटोत मी उडत्या बाह्यांची ( बेल शेप ना देसी नाव) काळी मॅक्सी घालुन ताजमहाल समोर फोटो काढलेला आहे.... आणि केसांचे दोन बो.... कसली क्युट दिसते आहे....
हाय!!! काय नॉस्टॅल्जिक झाल्या सारखं वाटतय.....
अरे पण ज्या डोक्यावर
अरे पण ज्या डोक्यावर दिसायच्या त्या दिसणारच ना?>>>>>>>. हो पण मी पिना लावुन लपवायची...... शी आता आठवलं तरी हसायला येते...
(No subject)
खेळण्यातली मोटार घुईंघुईं
खेळण्यातली मोटार घुईंघुईं फिरवली>>>>>>>>>>>![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
मी पिना लावुन लपवायची >> मी
मी पिना लावुन लपवायची
>>
मी पण तेच करायचे. एकदा केस हायलाईट करायला एकाच साईडच्या बटेला ब्लीच लावलं होतं. इतकं भयाण दिसत होतं ते. लपवुनही लपत नव्हतं. शेवटी बाबांनी बघितलच आणि शिव्या पडायच्या त्या पडल्याच.
Pages