फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

delicate-mangalsutra.jpg

mangalsutra2.jpg

नीधपः मी वर्कशॉप घेते डिक्लेअर केलं तेव्हा फारश्या कोणी इंटरेस्ट नाही दाखवला.>>>> घे ना गं वर्कशॉप..मी एक-दोन लोकं नक्की जमा करते!

मी अनिश्का
अगं बहुतेक पहिल्यांदा वापरताना होतं कदाचित पण नंतर नाही.

lastet-fashion.jpg

साधना आणि मामी हे सन्माननीय अपवाद. पण ते झालंय कुठे?

अगं मग कर ना.............आता माझ्याकडुन मी धरुन ३ कँडिडेट आहेत. मार्च २४ नंतर ठेव. पार्ल्याला पण चालेल.

अगं बहुतेक पहिल्यांदा वापरताना होतं कदाचित पण नंतर नाही.>>>>>>>>. नाही माधवी अन्फॉर्चुनेटली तसं नाहिये......प्रत्येक वेळेला होत हे....

अ‍ॅटिट्युड चंच म्हणतेय. बहुतेक Uhoh ग्रे सिल्वर होती लिप्स्टिक्स. ६ शेड्स.

पार्ल्याला पण चालेल.>>>>>>>>>>> दादर ला वगैरे जमु शकेल का???? मला लांब पडेल ते...

नाही ठुशी आहे. गळ्यालगत बसते. सगळ्या साड्यांवर विशेषतः नऊवारी नथ खोपा वगैरे... तर उच्च! रमाबाई घालतात बघा बर्‍याचदा... वेगवेगळे पॅटर्न्स

वामन हरी ची जि लिंक तु पाठवलीस ना ड्रीमगर्ल त्यात एक सुरुवातीलाच ठुशी सारखा दागिना दिसतो त्याचं नाव काय आहे?? जबराट आहे तो

पारीजाता अ‍ॅटीट्यूड मध्ये सिल्व्हर शेड आहे ६ च्या पॅकमध्ये? गुगलल्यावर हे खालील मिळालं.

attitude.jpg

लॅक्मे lakme absolute lipstick range पण मस्त आहे. सॉफ्ट आणि रिच!

हा तो नेकलेस सेट मध्ये आहे त्यांच्या ठुशीचंच व्हर्जन आहे ते. कानातले विशेष नाही आवडले त्यावरचे.

ड्रिमगर्लला अनुमोदन मला ही लॅक्मेची प्रॉडक्ट्स आवडतात. खास करून आयलायनर. माझ्या मैत्रिणीने मला अ‍ॅबसोल्यूटचं आय लायनर दिलंय. क्विक ड्राईंग आहे, शिवाय फक्त पाण्याने धुतलं तरिही चेहरा काळामिचकुट होत नाही.
काही आयलायनरचे पोपडे निघतात, ती बहुतेक ऑईल बेस्ड असतात. ती आवडत नाहीत मला Sad

दक्षु.. ती पांढरी आय पेंसिल तर स्टेपल पार्ट आहे माझ्या मेकपबॉक्स मधे..

NARS , MAKEUPFOREVER या BRANDS मला बेश्ट वाटतात. NARS ब्रँड मधे सिल्वर आणी लाईट गोल्ड रंगाच्या पेंसिली खरंच आय ओपनर आहेत Wink . MAKEUPFOREVER ब्रँड मधे पांढरी, सिल्वर्-ग्रे या शेड्स मस्त आहेत.

दक्षिणा
ते अ‍ॅबसोल्यूटचं आयलायनर लावायला सोप्पं आहे का? मला काही केल्या जमत नाही

Pages