फॅशनचे नवनवीन ट्रेन्ड्स!

Submitted by माधवी. on 27 December, 2012 - 02:28

खुप दिवसापासुन मला असा धागा असावा असे वाटत होते.
हल्ली बाजारात रोज कपड्यांच्या, चप्पल्/सॅंडलच्या, अ‍ॅक्सेसरीजच्या निरनिराळ्या फॅशन बघायला मिळतात.
पण ते आपण घ्यावं की नाही असा प्रश्न पडतो बरेचदा. किंवा कुठल्या समारंभाला जाताना बरेचदा असे नवीन काही घालावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होते. बर्‍याच नवीन कुर्तीज, जॅकेटच्या ज्या फॅशन येतात त्यांना काही नावं असतात, ती देखिल आपल्याला माहित नसतात. मग दुकानात गेल्यावर दुकानदाराला समजावत बसावे लागते :).
शिवाय सिल्कच्या साड्या आणि त्यांचे प्रकार हा तर मोठाच टॉपिक होऊ शकतो.
तर ह्याची चर्चा आपण इथे करु शकतो का? एखादी छोटी इमेजही शेअर करु शकतो समजत नसेल तर.
तसेच अशा नवीन गोष्टी आपल्या गावात कुठे चांगल्या मिळतील हे देखिल सांगु शकतो.
तर मैत्रिणींनो, जरा स्वयंपाकघरातुन बाहेर येऊन ह्या गप्पाही मारूया का? Wink
आणि हो, मित्रांचे देखिल स्वागत आहे हो!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी आयुष्यात एकदा तरी स्वत: डिझाइन करून हवा तसा प्लॅटिनमचा दागिना बनवून घेणारे. >>>>>>>>>>>.. मी पण......

इथे कुणी साइझ २६ जीन्स वापरतं का? कुठल्या ब्रँडला हमखास चांगलं फिटींग मिळतं? नॉर्थ्-इस्टवाल्या मुलींना किती परफेक्ट जीन्स मिळतात. तशा मला कुठेही मिळत नाहीत Sad

आत्तापण बहुतेक सगळीकडे एण्ड ऑफ सीझन सेल्स चालू आहेत.
दिवाळी आणि नाताळाचा स्टॉक काढून टाकतायत. हे सेल्स फेब-मार्चपर्यंत असतात.

पेपे, लिव्हाइस नाही जमत पोरींनो.. ली कुपर च आहेत सगळ्या सध्या. त्यातल्या त्यात बर्‍या. पण त्या नॉ.इ. मुलींसारख्या नाहीच फिटींग.. त्यांच्या अगदी टेलरमेड असल्यासारख्या नीट असतात.

नी कळला पत्ता...
मेकपचे संपूर्ण टेक्निक हे ग्रेस्केल आणि शॅडो-हायलाइटच्या खेळावर आधारित आहे. >> हे काही कळलं नाही, तुला माहिती असेल तर शेअर करू शकशील का वेळ असेल तेव्हा?

अनिश्का - ५ इंचाचं हे घालून जरा कमी ढगाला टेकशील.

असं काही नाही.....मी पण कधी तरी ली वपरते.....फिटिंग मस्त असते......तु लो वेस्ट घालतेस ना??? मग तुला मिळायला काही प्रॉब नाही.....

मी वर्कशॉप घेते डिक्लेअर केलं तेव्हा फारश्या कोणी इंटरेस्ट नाही दाखवला. आता इथे एवढं लिहित बसण्यात मी नाही वेळ घालवणार.

नताशा अनुमोदन ली कुपर बेस्ट
आणि डेनिझेन पण बघ ट्राय करून फिटींग अप्रतिम असतं त्याचं, पुर्वी हाच ब्रँड सिग्नेचर नावाने आला होता बाजारात.

अनिश्का - ५ इंचाचं हे घालून जरा कमी ढगाला टेकशील>>>>>>> इन्च ५ हा ब्रॅन्ड आहे मेट्रो सारखाच.....माझे हाय हिल्स ३ " च असतात...मला पण चालायला जमायला हव ना.....३" उंचीचे पर्फेक्ट.........

वॉव! काय मस्त गप्पा मारताय सगळ्याजणी! मला का एवढे काम आहे Sad
एव्हढा धागा काढूनही मला अजुन माझे प्रश्न विचारायला वेळच मिळत नाहिये.. Sad
तुमचं चालूद्या! मी आपली रोमात असणार सध्या!

त्या किंमतीत सोन्याची २ मंसु होतिल के ग आपली.>> नाही हा गैरसमज आहे.

खाली बघा.
Platinum per gram Rate in India = Rs.3,398.00.
Gold per gram = Rs. 3252.10

सराफाकडे थोडेफार वरखाली.

ओह...असं आहे???? मग आपण का नाही बनवत ते दागिने???? ऑसम दिसतात नै???? मी रवीवारी जाइन सोनाराकडे...वामन हरी पेठे कडे असं मिळु शकेल का????

वॉव! काय मस्त गप्पा मारताय सगळ्याजणी! मला का एवढे काम आहे अरेरे
एव्हढा धागा काढूनही मला अजुन माझे प्रश्न विचारायला वेळच मिळत नाहिये.. अरेरे
तुमचं चालूद्या! मी आपली रोमात असणार सध्या!>>>>>>>>>>>>>.. माधवी......इतकं टाइपत बसलीस त्यातच एखादा प्रश्न विचारुन टाकायचास ना....

मी वर्कशॉप घेते डिक्लेअर केलं तेव्हा फारश्या कोणी इंटरेस्ट नाही दाखवला

हे प्लिज मला नको सांगूस......... Happy

शायर पैलवान, धन्यवाद सुचनेबद्दल! Happy इथेही तुम्ही डोकावताय म्हणजे! Wink
बादवे, अ‍ॅमवेच्या कॉस्मेटिक्सची नवीन रेंज निघाली आहे ना, 'अ‍ॅटिट्युड'. छान असतील असं वाटतयं
मी कालच 'अ‍ॅटिट्युड'चा डिओ घेतला! एकदम भारी आहे!

>> मी वर्कशॉप घेते डिक्लेअर केलं तेव्हा फारश्या कोणी इंटरेस्ट नाही दाखवला
wow कसलं वर्कशॉप?
>> बादवे, अ‍ॅमवेच्या कॉस्मेटिक्सची नवीन रेंज निघाली आहे ना, 'अ‍ॅटिट्युड'.
आधी पण होती की. छान असतात. मी लिपस्टिक्स वापरलेत.

अग घालायला सुरु केलं की दिसतात अपोआप चांगले...पाय तसे नसतील तर पेडी मेनी केल की दिसतील छान....जरुरी नाही लाल पेंट असावं नॉरमल पिंक नेल्पेंट पण छान दिसेल.......हे जिन्स शॉर्ट वर मस्त दिसतं...

>> मी वर्कशॉप घेते डिक्लेअर केलं तेव्हा फारश्या कोणी इंटरेस्ट नाही दाखवला
wow कसलं वर्कशॉप?
>>> हो.. कसलं वर्कशॉप???

मला हे कॉस्मेटिक्स वापरले की खाज सुटते..लिपस्टिक , रुज, आय शॅडो , फाउंडेशन , आय लायनर काही लावलं तरी इचिंग चालु होते.. Sad म्हणुन मी नाही वापरु शकत....अगदी रेव्लॉन, लॅक्मे पण....

Pages