Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20
या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल
इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्यास सोपे पडेल.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मी विविध हाटेलांमधे पां र
मी विविध हाटेलांमधे पां र खाल्लाय (प्यायलाय हे जास्त योग्य!) त्यात कधी चिकनचे/ भाज्यांचे तुकडे नव्हते. शाकाहारी आणि मांसाहारी दोन्हीमधे. मला नॉनव्हेज ब्रॉथचं वावडं नाही पण घरी करणे जमण्यासारखे नाही. आणि भाजीला पुरणार नाही एवढा पण सूप होईल इतका दुधी उरलाय
नी, आईच्या रेसेपीमध्ये पण
नी, आईच्या रेसेपीमध्ये पण नारळाचं दुध असतं.
नी नारळ /खोबरं न घालता पण दुधीचं सोप्पं सुप करता येईल की. विपुमध्ये लिहिते मी कसं करते ते.
लालूची रेसिपी मांसाहारी
लालूची रेसिपी मांसाहारी पांढरा रस्सा आहे >>> पुढे प्रतिसादही वाचा
दहीबुत्तीची रेस्पी द्या
दहीबुत्तीची रेस्पी द्या कुणीतरी..
http://www.maayboli.com/hitgu
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/92733.html?1154761258 ईथे आहे.
मामीचा अख्खा बाफ आहे ना योडे,
मामीचा अख्खा बाफ आहे ना योडे, दहीबुत्तीवर. विविध प्रकार सापडतील तुला त्यात.
कच्च्या टोमेटो चे काय काय
कच्च्या टोमेटो चे काय काय करता येईल? इथे फक्त कच्च्या टोमेटोची चटणी हा प्रकार सापडला. भाजीची रेसिपी द्या ना कुणीतरी.
कांदा, बटाटा, कच्चा टोमॅटो,
कांदा, बटाटा, कच्चा टोमॅटो, लसूण, तिखट, मीठ, चिंच/आमसूल, गूळ (ऑप्शनल), दाणकूट, गोडा किंवा गरम मसाला असा रस्सा मस्त होतो. कांदा-बटाटा-टोमॅटो यांच्या मोठ्या फोडी करायच्या.
रेसिपी अशी देत नसल्याने इथेच लिहीत आहे.
धन्यवाद, स्वाती कच्चा टोमॅटो
धन्यवाद, स्वाती
कच्चा टोमॅटो मूळात आंबटच असतो ना? मग पुन्हा चिंच/आमसूल घातले तर अजून आंबट होईल का? मी आधी कधीच कच्च्या टोमॅटो ची भाजी केलेली नाहीये.
निंबुडा, कच्चा करकरीत असतो
निंबुडा, कच्चा करकरीत असतो त्यामुळे फोडी घातल्या तर रश्शात फार आंबटपणा उतरत नाही. तरीही चव बघून मग त्याप्रमाणे चिंचगूळ घाल.
निंबुडा आमच्या घरी कच्चा
निंबुडा आमच्या घरी कच्चा टोमॅटो बारिक चिरून, हिरव्या मिरचीवर फोडणीला देतात. यावेळी फोडणीत भरपूर तीळ किंवा खसखस घालतात. वाफेवरच भाजी शिजवतात हि. थोडी साखर चवीला आणि वरुन कोथिंबीर घालायची.
कोशिंबीर पण करतात. लाल आणि हिरवा टोमॅटो एकत्र करुन.
धन्यवाद इतक्या पटापट
धन्यवाद

इतक्या पटापट रेस्प्या दिल्याबद्दल
कच्च्या टोमॅटोचे बाकर भरून
कच्च्या टोमॅटोचे बाकर भरून केलेली भाजी, पनीर भरलेले टोमॅटो, इटालियन स्पायसेस्+चीज भरून ग्रिल्/बेक करणं असे प्रकार होऊ शकतात. नॉन्व्हेज चालत असेल तर खीमा भरून.
मी कुठेतरी टोमॅटोचे भरीत हा
मी कुठेतरी टोमॅटोचे भरीत हा प्रकार वाचला होता. पण ते कच्च्या की रेग्युलर टोमेटोंचे आठवत नाही. भरताचे वांगे जसे भाजून घेतो तसे टोमॅटो भाजून स्मॅश करून पुढे काहीतरी कृती होती. कुणाला येते का?
साखर, मीठ, मिरची, दही.
साखर, मीठ, मिरची, दही.
खुप वर्षांपुर्वी अभिनेत्री
खुप वर्षांपुर्वी अभिनेत्री सुहास जोशी यांनी पालक कोफ्ता करी लिहिली होती. त्यात हिरव्या ग्रेव्हीसाठी कच्चे टोमॅटो वाटून ते परतून घेतले होते. सोबत हिरवी मिरची, कोथिंबीर, आले, लसूण वाटायचे होते. कोफ्त्यासाठी पालक आणि बेसन वापरले होते.
स्मॅश नव्हे मॅश.
स्मॅश नव्हे मॅश.
कोणाला ओल्या हळदीची भाजी
कोणाला ओल्या हळदीची भाजी (लोणचं नाही) कशी करतात माहित आहे का?
शेजारीण आत्ताच विचारून गेली. ह्याची भाजी करतात हे माहितच नाही.
नुसत्या ओल्या हळदीची भाजी मला
नुसत्या ओल्या हळदीची भाजी मला अशक्य वाटतेय. त्याच्या चवीची कल्पना करता, ती "खाणेबल" चवीची असेल असे वाटत नाही.
गाजर, पिवळा मका, रंगीत सिमला मिरच्या आदींबरोबर संयोग करुन बघता येईल. तरीपण या भाज्यांच्या प्रमाणात ओल्या हळदीचे प्रमाण खुपच कमी ठेवावे लागेल. असो, कुणी लिहिली तर मला वाचायला आवडेल.
आंबेहळदीच्या भाजीची ही कृती
आंबेहळदीच्या भाजीची ही कृती तरला दलालच्या साईटवर आहे.
thanks, arundhati
thanks, arundhati
वेगळीच आहे ती कृती ! १५
वेगळीच आहे ती कृती ! १५ मिनिटे परतायची आहे.
दिनेशदा, माझ्या आईच पण हेच
दिनेशदा, माझ्या आईच पण हेच म्हणन आहे चवी बाबतीत.
My mom makes it. Once cooked
My mom makes it. Once cooked add curd. Still this becomes additional veg u can't it as much as other vegs during meal.
स्मॅश नव्हे मॅश. >>> आताच
स्मॅश नव्हे मॅश. >>>
आताच गूगलून पाहिलं:
mash - Verb: Reduce (a food or other substance) to a uniform mass by crushing it.
smash - Verb: Violently break (something)
अर्थ साधारण एकच होतात. पण फूड साठी स्मॅश वापरतच नाहीत का मग?
निंबुडा - वरवर पहाता अर्थ एकच
निंबुडा - वरवर पहाता अर्थ एकच आहे, पण स्वयंपाकात स्मॅश नाही.

उकडलेला बटाटा, पावभाजीच्या भाज्या, भरीत करण्यासाठी वांगं इ गोष्टी मॅश करतात. म्हणजे हळुवारपणे लगदा करणे. स्मॅश म्हणजे अगदी चक्काचुर करणे. तुला तो स्मॅश म्हणुन एक ब्रँड आठवतो आहे. धडक द्यायला धावणारा बैल असा लोगो होता.
धन्यवाद, मनिम्याव! म्याव
धन्यवाद, मनिम्याव!

म्याव म्याव!
निंबे, कच्चे टो.ची सांबार
निंबे, कच्चे टो.ची सांबार मसाला घालून पण छान होते भाजी. कांदा बटाटा लाल टो. जशी करतो तशीच पण लाल तिखट, ओलं खोबरं आणि सांबार मसाला घालायचा
क.टो. च्या रेसिपीज साठी
क.टो. च्या रेसिपीज साठी सर्वांना ध्यन्यवाद.
आजच क. टो. ची भाजी केली.
आजच क. टो. ची भाजी केली. कांदा, गूळ घालून. दाण्याचे कूट वगळले. कवी म्हणाली त्याप्रमाणे थोडा सांबार मसालाही घातला. छान झाली होती. सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद.
मला एक सांगा! डोसा, घावन, आंबोळ्या, धिरडं हे सर्व प्रकार वेगवेगळे की एकच?
माझा असा समज आहे की:
उडीद, तांदूळ इ. जिन्नस भिजत घालून फुगवलेल्या पीठाचे ते डोसे,
मिक्स डाळी भिजवून, वाळवून बारीक दळून आणायचे. ते पीठ भिजवून, फुगवून करायच्या त्या आंबोळ्या.
तांदूळ पीठी, बेसन इ. वापरून इन्स्टंट डोसे घालायचे ते घावन.
धिरडं माहीत नाही.
बरोबर आहे का?
Pages