Submitted by मी नताशा on 13 December, 2012 - 05:48
सकाळमधील बातमी
उल्का वर्षावानी अवकाशात होणार रंगांची उधळण
- उल्का वर्षाव पाहण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ १४ डिसेंबर पहाटे पाच
- पूर्व दिशेला ही रंगांची किमया दिसणार
- कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणे शक्य
http://online3.esakal.com/esakal/20121213/5576900825325253597.htm
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आज पासुनच दिसणार आहे
आज पासुनच दिसणार आहे ते.......३ दिवस दिसतील
बघायला पाहिजे. मला वाटतं
बघायला पाहिजे. मला वाटतं रात्रभर होईल. ( भारतीय ५ म्हणजे आमची मध्यरात्र !)
हो दिनेश दा........आज रात्री
हो दिनेश दा........आज रात्री पासुन सुरुवात होईल...बहुदा.........ते परवा रात्री पर्यंत असणार आहे........ उद्या जरा जास्त प्रमाणात दिसेल.....
आभार उदय. सगळ्या
आभार उदय. सगळ्या कॅमेरावाल्यांना सांगायला पाहिजे !
आमच्याकडे सध्या मृग नक्षत्र दिसतेय पूर्वेला. त्यातच दिसेल.
माहिती बद्दल धन्यवाद
माहिती बद्दल धन्यवाद
आमच्याकडे कडक धुकं आहे.
आमच्याकडे कडक धुकं आहे. रात्री पण असणारे!
आमच्याकडे थोडंसं धुकं आहे आणि
आमच्याकडे थोडंसं धुकं आहे आणि ढगाळ आहे. उद्या तर धुवाँधार पाऊस आहे
हे फक्त भारतातूनच दिसणार आहे
हे फक्त भारतातूनच दिसणार आहे क?
ढ प्रश्नाबद्दल आधीच माफस करून टाका प्लीज
नाही सगळ्या जगातुन दिसणार आहे
नाही सगळ्या जगातुन दिसणार आहे
धन्यवाद उदयन...
धन्यवाद उदयन...
माहितीबद्दल धन्यवाद. वा, वा,
माहितीबद्दल धन्यवाद. वा, वा, माझ्या घरातून बसल्याबसल्या दिसतील (दिसू देत.). उद्या लवकर उठलंच पाहिजे.
दिनेशदा, आमच्या इथेही पूर्वेला काही वेळापूर्वी मृगनक्षत्र उगवलंय. आता बाहेर जाऊन पाहिलं आणि धीर खचला. इमारतींमुळे इतका झगमगाट आहे की कसं दिसणार? सध्या आकाशाकडे पाहिलं की शेजारच्या 'शंग्रिला' ची भलीमोठी पिवळ्या दिव्यांनी चमकणारी अक्षरं दिसताहेत.
मामी तु ३ वाजता उठ.....तरच
मामी तु ३ वाजता उठ.....तरच दिसेल
मामी तु ३ वाजता उठ.....तरच
मामी तु ३ वाजता उठ.....तरच दिसेल >>>
बरं रात्रीच्या कोणत्याही
बरं रात्रीच्या कोणत्याही प्रहरी पाहिलं तरी पूर्वेलाच दिसणार ना? (माझ्याही ढ प्रश्नाला माफ करा.)
हो कधी ही पहा......... पुर्वे
हो कधी ही पहा......... पुर्वे कडुन सुरुवाट होईल..........ते मध्यावर येउन ठांबेल
अखिल भारतीय ज्योतिर्विद्या
अखिल भारतीय ज्योतिर्विद्या महामंडळाचे पदाधिकारी आजपासूनच देव पाण्यात घालून बसले असतील. गेल्या वेळी उल्कावर्षाव न दिसल्याने विज्ञानाचा पराभव झाला म्हणून यज्ञदेखील केला होता. आजच्याच मटाला बातमी आहे कि दादांचं मंत्रीपद सिंचनघोटाळ्यामुळे नाही तर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी विधेयकाला समर्थन केल्यामुळं गेलं असा त्यांच्या एका पदाधिका-याने पत्रकार परिषद घेऊन दावा केला आहे.
उल्कावर्षाव पाहण्याआधी या बुवांची परवानगी घेणं मस्ट आहे. नाहीतर लवकर उठा, थंडीत कुडकुडत गच्चीवर जा आणि वाट बघत बसा हे सगळे परिश्रम वाया जाण्याची शक्यता आहे.
नालायक्स आहेस किरण
नालायक्स आहेस किरण
फक्त मामीला ३ वाजता दिसणार आण
फक्त मामीला ३ वाजता दिसणार आण बाकीच्यांना ५ वाजता. असं का?
सायो, माझं घर बर्याच वरच्या
सायो, माझं घर बर्याच वरच्या मजल्यावर आहे म्हणून लिहिलंय.
मस्करीत विचारलं होतं
मस्करीत विचारलं होतं
मामी पॉइण्ट आहे. वरून लवकर
मामी पॉइण्ट आहे.
वरून लवकर दिसणार... दॅट्स इट !
मस्करीत विचारलं होतं >>> मी
मस्करीत विचारलं होतं
>>> मी ही मस्करीत सांगितलंय.
मामी ३ वाजता उठायचंय तर आता
मामी ३ वाजता उठायचंय तर आता आधी झोप बरं. ही लोकं तुला मुद्दाम जागं ठेवताहेत
मी आत्ताच एक उल्का पडताना
मी आत्ताच एक उल्का पडताना पाहिली. मृगनक्षत्राच्या खालच्या बाजूला जो ठळक तारा दिसत आहे त्याच्या जरा वरून पडली. पडताना उजवीकडे गेली. वॉव!!!!!
सो, लोक्स शक्य असेल तर जरा जाऊन पहा. दिसू शकेल.
पुन्हा इतकावेळ बघून बघून मान दुखायला लागली पण एक काही उल्का दिसली नाही. आता झोपते. उद्या पहाटे उठायचंय.
श्या प्रचंड धुक्यामुळे
श्या प्रचंड धुक्यामुळे खगोलप्रेमींची घोर निराशा. एवढे दाट धुके पहिल्यांदाच बघितले. सकाळ पर्यंत कमी होइल असे वाटत नाही. परत गुड नाईट .
जबरदस्त धुकं आहे. सकाळी
जबरदस्त धुकं आहे. सकाळी पाचपासून बघतोय. उद्या तरी आकाश निरभ्र असेल का ? ज्योतिषाला विचारायला हवं.
आमच्याकडे आकाश क्लिअर असलं
आमच्याकडे आकाश क्लिअर असलं तरी विशेष काही दिसलं नाही. दोन तीनदा बाहेर जाऊन पाहिलं.
ते ६० रंग कुठुन आले कुणास
ते ६० रंग कुठुन आले कुणास ठाऊक?
या वर्षी नेहमी पेक्षा जास्त उल्का दिसतील असे काही नाही (पण म्हणून पाहणे टाळु नका).
अमेरीकेतून किती वाजता व
अमेरीकेतून किती वाजता व कोणत्या दिवशी? भारतीय वेळे नुसार ५ वाजून गेले सकाळचे १४ डिसें. जरा सांगा मग बघता येइल.
नताशा.....निषेध निषेध तुमचा
नताशा.....निषेध निषेध तुमचा !
साडेचार वाजल्यापासून जागा होतो....पण नेमके आजच आमच्या कोल्हापूरला धुक्याच्या चादरीने जाम लपेटून टाकले आणि मग उल्काताई, अल्काताई, बिल्काताई कुछ भी नही !
डोळे आणि मान दोन्हीही दुखत आहेत.....अमृतांजन बाटलीचा खर्च तुमच्याकडून वसूल केला पाहिजे.
अशोक पाटील
Pages