उल्का वर्षावानी अवकाशात होणार रंगांची उधळण

Submitted by मी नताशा on 13 December, 2012 - 05:48

सकाळमधील बातमी

उल्का वर्षावानी अवकाशात होणार रंगांची उधळण
- उल्का वर्षाव पाहण्यासाठी सगळ्यात योग्य वेळ १४ डिसेंबर पहाटे पाच
- पूर्व दिशेला ही रंगांची किमया दिसणार
- कोणत्याही उपकरणाशिवाय उघड्या डोळ्यांनीही पाहता येणे शक्य

http://online3.esakal.com/esakal/20121213/5576900825325253597.htm

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो दिनेश दा........आज रात्री पासुन सुरुवात होईल...बहुदा.........ते परवा रात्री पर्यंत असणार आहे........ उद्या जरा जास्त प्रमाणात दिसेल.....

आभार उदय. सगळ्या कॅमेरावाल्यांना सांगायला पाहिजे !
आमच्याकडे सध्या मृग नक्षत्र दिसतेय पूर्वेला. त्यातच दिसेल.

माहितीबद्दल धन्यवाद. वा, वा, माझ्या घरातून बसल्याबसल्या दिसतील (दिसू देत.). उद्या लवकर उठलंच पाहिजे.

दिनेशदा, आमच्या इथेही पूर्वेला काही वेळापूर्वी मृगनक्षत्र उगवलंय. आता बाहेर जाऊन पाहिलं आणि धीर खचला. इमारतींमुळे इतका झगमगाट आहे की कसं दिसणार? सध्या आकाशाकडे पाहिलं की शेजारच्या 'शंग्रिला' ची भलीमोठी पिवळ्या दिव्यांनी चमकणारी अक्षरं दिसताहेत. Sad

बरं रात्रीच्या कोणत्याही प्रहरी पाहिलं तरी पूर्वेलाच दिसणार ना? (माझ्याही ढ प्रश्नाला माफ करा.)

अखिल भारतीय ज्योतिर्विद्या महामंडळाचे पदाधिकारी आजपासूनच देव पाण्यात घालून बसले असतील. गेल्या वेळी उल्कावर्षाव न दिसल्याने विज्ञानाचा पराभव झाला म्हणून यज्ञदेखील केला होता. आजच्याच मटाला बातमी आहे कि दादांचं मंत्रीपद सिंचनघोटाळ्यामुळे नाही तर अंधश्रद्धा आणि जादूटोणा विरोधी विधेयकाला समर्थन केल्यामुळं गेलं असा त्यांच्या एका पदाधिका-याने पत्रकार परिषद घेऊन दावा केला आहे.

उल्कावर्षाव पाहण्याआधी या बुवांची परवानगी घेणं मस्ट आहे. नाहीतर लवकर उठा, थंडीत कुडकुडत गच्चीवर जा आणि वाट बघत बसा हे सगळे परिश्रम वाया जाण्याची शक्यता आहे.

मी आत्ताच एक उल्का पडताना पाहिली. मृगनक्षत्राच्या खालच्या बाजूला जो ठळक तारा दिसत आहे त्याच्या जरा वरून पडली. पडताना उजवीकडे गेली. वॉव!!!!! Happy

सो, लोक्स शक्य असेल तर जरा जाऊन पहा. दिसू शकेल.

पुन्हा इतकावेळ बघून बघून मान दुखायला लागली पण एक काही उल्का दिसली नाही. आता झोपते. उद्या पहाटे उठायचंय. Happy

श्या प्रचंड धुक्यामुळे खगोलप्रेमींची घोर निराशा. Sad एवढे दाट धुके पहिल्यांदाच बघितले. सकाळ पर्यंत कमी होइल असे वाटत नाही. परत गुड नाईट .

जबरदस्त धुकं आहे. सकाळी पाचपासून बघतोय. उद्या तरी आकाश निरभ्र असेल का ? ज्योतिषाला विचारायला हवं.

ते ६० रंग कुठुन आले कुणास ठाऊक?
या वर्षी नेहमी पेक्षा जास्त उल्का दिसतील असे काही नाही (पण म्हणून पाहणे टाळु नका).

अमेरीकेतून किती वाजता व कोणत्या दिवशी? भारतीय वेळे नुसार ५ वाजून गेले सकाळचे १४ डिसें. जरा सांगा मग बघता येइल.

नताशा.....निषेध निषेध तुमचा !

साडेचार वाजल्यापासून जागा होतो....पण नेमके आजच आमच्या कोल्हापूरला धुक्याच्या चादरीने जाम लपेटून टाकले आणि मग उल्काताई, अल्काताई, बिल्काताई कुछ भी नही !

डोळे आणि मान दोन्हीही दुखत आहेत.....अमृतांजन बाटलीचा खर्च तुमच्याकडून वसूल केला पाहिजे.

अशोक पाटील

Pages