Submitted by मिल्या on 26 November, 2012 - 01:59
मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर
केवढी वादळे कोंडली ह्या उरी
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर
सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर
मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर
काय केलीस माझी अवस्था सखे
स्वप्न जागेपणी पाहतो रात्रभर
आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर
ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कित्ती महिन्यान्नी दिसता आहात
कित्ती महिन्यान्नी दिसता आहात !!
मला ओळखलत का मी वैभव वसंतराव कुलकर्णी.......... तुम्ही माबोवर दिसायचे कमी झाला होतात तेन्व्हा मी इथे दाखल झालो होतो
गझल सॉल्लीड!! सर्व शेर आवडले
सर्वात जास्त लय आवडली .गालगा गालगा गालगा गालगा ..मी अशीच गालगा चार वेळा तोडुन (चार यति योजून) वाचली मस्त मजा आली
पुनरागमनाबद्दल धन्यवाद
सोबतीला सुनी शांतता
सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर
मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर
ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर<<<
हे विशेष आवडले शेर, गझल आवडली.
धन्यवाद
आंधळी रात्र पण फक्त
आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर>> वाह..
ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर>> सुंदर!
मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर>> हा ही आवडलाय
गझल आवडली. वेदनांशी लढा हा
गझल आवडली.
वेदनांशी लढा हा शेर फार आवडला.
"पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर" - मी "पण तिथेही दिवा तेवतो रात्रभर" असे वाचले.
बेफी, वैभव, बागेश्री, विजय
बेफी, वैभव, बागेश्री, विजय धन्यवाद
अरे वैभव ओळखतो की मी तुम्हाला... तुमच्या गझल वाचल्या आहेत की. पुनरागमनाची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद
विजय : तसा'ही' विचार केलाच होता... दिवाही ची अर्थछटा मला जास्त भावली...
सुंदर गझल. दुसरा शेर सोडून
सुंदर गझल. दुसरा शेर सोडून सगळे आवडले...
सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर
हा तर फारच आवडला.
फार सुंदर गझल..! मीच माझ्या
फार सुंदर गझल..!
मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर
केवढी वादळे कोंडली ह्या उरी
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर
सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर
आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर
ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर
>>>> हे सर्व शेर विशेष आवडले.
मस्त गझल !
मस्त गझल !
ठेवली सर्व स्वप्ने
ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर
>>>
शेवटचा शेर खासच आहे!
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर
>>>
मलाही हे वाचायला अवघड झाले जरा.
डॉक नी सुचविलेला "पण तिथेही दिवा तेवतो रात्रभर" हा बदल आवडला.
व्वाह ..सुरेख गझल. मी पहाटे
व्वाह ..सुरेख गझल.
मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर
ह फार्फार आवडला.
लाजवाब......
लाजवाब......
वा! वा! निव्वळ अप्रतिम.
वा! वा! निव्वळ अप्रतिम.
गझल आवडली. वा !
गझल आवडली.
वा !
मिल्याजी गझल लाजवाब.
मिल्याजी गझल लाजवाब. विडंबनाचा प्रांत सोडुन दिलात का? तुम्ही तिथले सर्वेसर्वा होता.
तुमची विडंबने वाचायला गुलमोहरात डोकावणे वाढले आणी माझ्या परिचयातले अनेक मित्र मैत्रिणी पण तुमच्यामुळे मायबोलीप्रेमी बनले.
अफाट गझल मीच माझ्या झळा सोसतो
अफाट गझल
मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर......लाजवाब मतला
केवढी वादळे कोंडली ह्या उरी
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर.....लयीत वाचता नाही आला हा मिसरा
शेर मस्तच!
सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर....व्व्व्वा!
मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर...हासिले गझल
आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर...क्या बात!
आवडली गझल.
झकास.... मीच माझ्या गळा ढोसतो
झकास....
मीच माझ्या गळा ढोसतो रात्रभर.... करणार का ?
मस्तच...
मस्तच...
मीच माझ्या गळा ढोसतो
मीच माझ्या गळा ढोसतो रात्रभर.... करणार का ?>>>>>
गरज काय ? उगाचच इतक्या चान्गल्या गझलेत फालतू शेर करायचा का ?
गरज काय ? उगाचच इतक्या
गरज काय ? उगाचच इतक्या चान्गल्या गझलेत फालतू शेर करायचा का ?<<<
'त्यांना' दुसरी ओळ अधिक चांगली जमते, त्यांनी मतल्याचा उला मिसरा सुचवलेला आहे.
बा.बु.राव ग्रेटच आहेत
बा.बु.राव ग्रेटच आहेत !!
मोहिनी पवार या आय्डीची ...(खरेतर बाबुरावान्च्या त्या ड्यू आय्डीची ) आठवण येते आहे
मिल्या, वरच्या ओळीतून मी
मिल्या, वरच्या ओळीतून मी विडंबन सुचवित होतो.
भन्नाट !
भन्नाट !
अहा......मजा आ गया दोस्त
अहा......मजा आ गया दोस्त ....खूप दिवसांनी तुझी गझल वाचली. एकदम झकास
व्वा मिल्या ! मी पहाटे पहाटे
व्वा मिल्या !
मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर
काय केलीस माझी अवस्था सखे
स्वप्न जागेपणी पाहतो रात्रभर
अरे वा... अनेक दिवसांनी ते पण
अरे वा... अनेक दिवसांनी ते पण विडंबन नाही...!
योग | 28 November, 2012 -
योग | 28 November, 2012 - 00:42 नवीन
अरे वा... अनेक दिवसांनी ते पण विडंबन नाही...!<<<
काय प्रतिक्रिया आहे राव ही!
मिल्या या नावाकडून अपेक्षा
मिल्या या नावाकडून अपेक्षा आहेतच. छान गझल आहे.
मस्त रे मिल्या .. सहज काही
मस्त रे मिल्या ..:)
सहज काही शेरांचे विडंबन सुचले म्हणून..
मीच माझ्या कळा सोसतो रात्रभर
गॅस माझ्यामधे विहरतो रात्रभर
एवढ्या स्मायली टाकल्या मी जरी
पण दिवाही इथे लागतो रात्रभर
सोबतीला जुनी बाटली घेउनी
बारच्या आत मी भटकतो रात्रभर
अस्थानी वाटल्यास उडवतो
झकास..... बर्याच दिवसांनी
झकास..... बर्याच दिवसांनी दर्शन झालं.
देर आये लेकिन क्या आये!
देर आये लेकिन क्या आये! निखालस सुंदर!
जियो
जयन्ता५२
Pages