रात्रभर

Submitted by मिल्या on 26 November, 2012 - 01:59

मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर

केवढी वादळे कोंडली ह्या उरी
पण दिवाही तिथे तेवतो रात्रभर

सोबतीला सुनी शांतता घेउनी
आतल्याआत मी भटकतो रात्रभर

मी पहाटे पहाटे हरू लागतो
वेदनांशी लढा चालतो रात्रभर

काय केलीस माझी अवस्था सखे
स्वप्न जागेपणी पाहतो रात्रभर

आंधळी रात्र पण फक्त स्पर्शातुनी
तू मला, मी तुला, वाचतो रात्रभर

ठेवली सर्व स्वप्ने तिजोरीमधे
मी सुखाने अता झोपतो रात्रभर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लोकहो क्षमस्व... मी आभार मानायचे विसरूनच गेलेलो... Sad

सर्व प्रतिसादकांचे आभार

टुनटुन : आभार हो अलिकडे बरेच दिवसात विडंबन केले नाही हे खरे आहे...

योग : अरे मला गझल लिहायला लागूनही आता बरीच वर्षे झाली की... उलट शेवटचे विडंबन कधी लिहिले हेच लक्षात नाही आता... तरी पण माझी विडंबने तुम्हाला अजून आठवतात हे ऐकून छान वाटले

देवा : विडंबन पूर्ण कर Happy

मिल्याजी! अभिनंदन! नखशिखांत सुंदर, अलौकिक लावण्याने मढलेली गोटीबंद गझल! अप्रतिम मतला!
शेरांची स्वर्गीय व्यामिश्रता, सोपे प्रासादिक शब्द व बोलके खणखणीत शेर जे काळजास हात घालतात!
एकाही शब्दाच्या फेरबदलाची आवश्यकता नसलेली बिनतोड व तरल गझल!
या गझलेसाठी आपणास या वृद्ध प्राध्यापकाचे लवून वंदन! शेरांतील प्रत्ययांचा प्रामाणिकपणा ठायीठायी जाणवतो!
मास्तर आहे म्हणून गुण देण्याचा मोह होत आहे!
या आपल्या गझलेस हा मार्कास खडूस असलेला प्राध्यापक १००पैकी १००गुण देत आहे!
आमदकी गझल वाटली!
अशीच आपली गझल उत्तरोत्तर बहरू देत हीच पांडुरंगाला प्रार्थना!

...........प्रा.सतीश देवपूरकर

सुंदर!

मीच माझ्या झळा सोसतो रात्रभर
सूर्य माझ्यामधे तळपतो रात्रभर

काय केलीस माझी अवस्था सखे
स्वप्न जागेपणी पाहतो रात्रभर

हे अधिक आवडले.

Pages