Submitted by पूनम on 8 October, 2012 - 05:41
स्वयंपाकघरातील युक्ती सांगण्यासाठी आणि सुचवण्यासाठी हा तिसरा बाफ.
नवीन प्रश्न विचारण्याआधी ह्याआधीचे दोन धागे पहायला विसरू नका :
युक्ती सांगा- http://www.maayboli.com/node/6359
युक्ती सांगा- २: http://www.maayboli.com/node/26595
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
खुप सार्या कुल्फ्या घरात
खुप सार्या कुल्फ्या घरात उरल्यात , त्याच काय कराव?
फ्रीझरमधे ठेवून खाव्यात.
फ्रीझरमधे ठेवून खाव्यात. कुल्फी हा प्रकार उरलाच कसा हा पडलेला प्रश्न आहे.
इब्लिस (तुम्ही मामींना उद्देशून लिहिले असले तरी) आपणांला नक्की काय म्हणायचे आहे ते लक्षात आलय.
मी घरी कधीच यीस्ट बनवले नाही. त्यामुळे त्याचा वास अथवा रंग यावरून ते चांगले आहे का खराब हे समजणार नाही, तसेच चेन्नईच्या हवेचा देखील मला अंदाज नाही. त्यामुळे मी घरी यीस्ट बनवणारच नव्हते. मला यीस्ट शिवाय पिझ्झाबेस बनवायचा आहे. ते शक्य होइलसे दिसत नाही. 
नंदिनी, बुरशी आलीच तर ती
नंदिनी, बुरशी आलीच तर ती काळ्या रंगाची किंवा हिरवट पांढर्या रंगाची असते, आणि तिचा विचित्र वास येतो. खर्या यीस्टचा वास, साधरण बेकरीच्या बाहेर असतो, तसाच म्हणजे चांगला असतो.
रच्याकने, आपण भारतात खातो ते पिझ्झाचे अमेरिकन रुपडे, मूळ इतालियन रुपात बेस जाडही नसतो आणि तो फुगवलेलाही नसतो. त्याचे स्वरुप आपल्याकडच्या बिस्किटसारखेच असते. तो खरेच छान लागतो.
कुल्फी हा प्रकार उरलाच कसा हा
कुल्फी हा प्रकार उरलाच कसा हा पडलेला प्रश्न आहे. >>>>> खूप च जास्त आण्ल्या गेल्या होत्या..
अवनी मी येऊ का खायला?
अवनी मी येऊ का खायला?
कुल्फी पातळ करून त्यांचं दूध
कुल्फी पातळ करून त्यांचं दूध कोल्ड्रिंक करून प्यावं!
अवनी मी येऊ का खायला >>
अवनी मी येऊ का खायला >> लग्गेच ये ग्ग..
कुल्फी पातळ करून त्यांचं दूध
कुल्फी पातळ करून त्यांचं दूध कोल्ड्रिंक करून प्यावं! >> थंदीच असलं काही नको वाततय ग्ग..
१५-२० कुल्फ्या आहेत जवळ्पास
१. कुल्फी फालुदा करावा -
१. कुल्फी फालुदा करावा
- फालुदाचे सर्व साहित्य फक्त दूध नाही. शेवया + सबजा/तुळशीचे बी + कुल्फीचे तुकडे आणि वरतुन रोझ सिरप 
२. आयस्क्रिम केक सारखाच कुल्फी केक करावा - प्लेन केक चे स्लायसेस करावे ते केक च्या (प्लॅस्टिक रॅप लावलेल्या) भांड्याच्या तळाशी रचावे. त्यावर कुल्फी थोडी नरम करुन पसरावी.. . मग परत केक्चा थर .. मग कुल्फी चा थर असे रचावे शेवटचा थर कुल्फीचा आणि त्यावर आवडीचे ड्राय्फ्रुट्स घालावे. फ्रिझ करावा आयत्यावेळेस केक्च्या भांड्याच्या तळाला बाहेरुन गरम पाण्यात १० सेकंद बुडवावे आणि अलगद प्लॅक्स्ट्क रॅप सकट तयार कुल्फी केक काढावा आणि तुकडे कापुन फस्त करावा
कुल्फी ट्रायफल पुडिंग करावे
- केक, कुल्फी, फ्रुट्स, जेली यांचे लेयर्स प्रत्येक बोल मधे रचावेत.. वरतुन किसलेले चॉकलेट / जॅम / सिरप ड्रिझल करावे.
कुल्फी फ्रुट सॅलड करावे
गुलाबजाम + कुल्फी खावे
मालपुवा + कुल्फी खावे :
कुल्फी सँडविच करावे
- प्लेन / बदाम पिस्ता काजु कुकी वर कुल्फीचा अर्धा पाऊण इंचाचा स्लाईस ठेवावा त्यावर दुसरी कुकी ठेवावी. हे सँडविच प्लॅस्टिक रॅप मधे गुंडाळावे आणि फ्रिझ करावे... आवडेल तेव्हा एक्/दोन काढुन खावी 
आणि एव्हढे करुन कुल्फ्या संपल्या नाहित तर माबो खादाडांना बोलवुन कुल्फी खतम गटग करावे
दान करा... ट्रीट द्या
दान करा...
ट्रीट द्या लोकांना...
ब्रम्हदेव लोकांना कल्पकता आणी
ब्रम्हदेव लोकांना कल्पकता आणी नाविन्यपूर्णतेचे दान वाटत होता, तेव्हा लाजो बहुतेक पहिल्याच रांगेत असेल्.:फिदी: आणी आम्ही शेवटच्या.:अरेरे:
साधारण ८५० ग्रॅम इतका मँगो
साधारण ८५० ग्रॅम इतका मँगो पल्पचा टिन चा डब्बा काल भेट म्हणून मिळाला आहे. तो वापरून काय काय करता येईल? त्या डब्यावर असे लिहिले आहे की जो पर्यंत डबा उघडत नाही तोपर्यंत पॅकिंग च्या तारखेपासून पुढील १८ महिने पर्यंत फ्रीज मध्ये न ठेवताही पल्प नीट राहिल. पण एकदा का डबा फोडला की काचेच्या बरणीत किंवा स्टीलच्या डब्यात ठेवून फ्रीज मध्ये साठवावे लागेल (अर्थात पॅकिंग च्या तारखेपासून पुढील १८ महिने पर्यंतच वापरता येईल.)
खाली काही आयटम्स सुचले आहेत.
मँगो आईसक्रीम - पण हे वेळखाऊ काम आहे.
मँगो बर्फी - एकदा करून पाहीन म्हणते. कृपया लिंक्स द्या. पण घरात मावे नाही. त्यामुळे मावे न वापरता बनवता येईल का?
मँगो च्या स्वादाचा शिरा (इथे कुणीतरी ह्याची पाकृ टाकली होती. माझ्या आईच्या हातचा शिरा असे काहीसे नाव होते. कुणी लिंक शोधून देणार का?)
मँगो मिल्कशेक - जे जमेल.
मँगो जॅम - ह्याची पण पाकृ द्या.
मॅंगो फ्लेवर चे लाडू करता येतील का? पण बेसिक पदार्थ काय वापरायचा? नारळाचा चव वगैरे??
अजून काही आयडीयाज द्या प्लीज.
मी गव्हाचे पिठ सैल भिजवून
मी गव्हाचे पिठ सैल भिजवून त्यात गूळ आणि आंब्याचा रस घालून धिरड्यासारखे करते अनेकदा.
एरवी तुझी धिरडी वगैरे नीट होत असतील तर एकदम सोपं आहे.
माझ्या आईच्या हातचा शिरा असे काहीसे नाव होते. कुणी लिंक शोधून देणार का? <<<
तूच शोध. खाली सर्चची पट्टी आहे.
मी गव्हाचे पिठ सैल भिजवून
मी गव्हाचे पिठ सैल भिजवून त्यात गूळ आणि आंब्याचा रस घालून धिरड्यासारखे करते अनेकदा.
एरवी तुझी धिरडी वगैरे नीट होत असतील तर एकदम सोपं आहे.
>>>
नाही ग गव्हाच्या पीठाची धिरडी एकदा गूळ घालून ट्राय केली होती. घट्ट-चिकट गोळा झाला.
टुनटुन +१. निंबुडा मॅंगो
टुनटुन +१.
निंबुडा मॅंगो मिल्क शेक.
पल्प, दिड / दुप्पट दूध, वेलची पावडर, पल्पच्या गोडीप्रमाणे साखर. सगळे ब्लेंडरमधून फिरवणे. ५ मिनिटात होते.
एकदा हे केल्यावर पिल्लू खास यासाठी पल्प आणायला लावते.
नीधप, धीरडी अजून सविस्तर
नीधप, धीरडी अजून सविस्तर लिहिणार का? म्हणजे कणिक, गूळ आणि पल्प सोडून अजून काही?
ब्रम्हदेव लोकांना कल्पकता आणी
ब्रम्हदेव लोकांना कल्पकता आणी नाविन्यपूर्णतेचे दान वाटत होता, तेव्हा लाजो बहुतेक पहिल्याच रांगेत असेल्.फिदीफिदी आणी आम्ही शेवटच्या >> +६३२
थँक्स लाजो..
केक करुन बघेन.. 
आम्र खंड करता येइल. मँगो मूस.
आम्र खंड करता येइल. मँगो मूस. मँगो मार्टिनी. मँगो लस्सी. साधी खोबर्याची बर्फी करतो त्यातही घातले व कमी साखर घातली तर छान बर्फी होते.
कणिक, गूळ किंवा साखर, पल्प,
कणिक, गूळ किंवा साखर, पल्प, दालचिनी पूड, पाणी
मिक्सिट मिक्सिट मिक्सिट
तव्यावर किंचित तेल... तवा तापला... पीठ त्यावर ओतिंग.... पातळ उत्तप्पा कन्सिस्टन्सीची धिरडी करींग.
मी हे असंच करते. जमतात बरी. छोटी करते. व्यास फार मोठा नको. गॅस खूप मोठा नको.
मँगो मार्टिनी. <<< व्हर्जिन
मँगो मार्टिनी. <<<
व्हर्जिन कशी करतात?
मी मँगो-कैरी मार्गारिटा केली होती एकदा. अफलातून जमली होती.
टेम्प्टिंग. धन्यवाद
टेम्प्टिंग.

धन्यवाद नीधप.
आता घरी पल्प आहेच. करून बघेन. कधी अगदिच उत्साह आला तर ब्रेकफास्टलापण करता येतील.
आंब्याचा रस तसाच खा की
आंब्याचा रस तसाच खा की निंबुडा... उगाच कशाला रेसिप्या विचारत बसली आहेस...
हो मी ब्रेफालाच
हो मी ब्रेफालाच करते.
एकावेळेला दोन तवे. एका तव्यावर तांदळाची, ताकातली मीठ-मिरची वाली धिरडी आणि एकावर ही.
दोन तां धि आणि एक ग धि. एकदम मस्त दमदमीत ब्रेफा.
आंब्याचा रस तसाच खा की
आंब्याचा रस तसाच खा की निंबुडा... उगाच कशाला रेसिप्या विचारत बसली आहेस...
>>>
थोडा आंबट असेल असे ज्यांच्याकडून मिळाले त्यांनी सांगितलेय! त्यामुळे पोळीला लावून तसाच खाण्यापेक्षा कशाच्या तरी स्वरुपात बरा असे मला वाटते. डबा फोडून चव बघेन म्हणजे नक्की अंदाज येईल.
निंबुडा अगं चकलीचा ब्लॉग बघ
निंबुडा अगं चकलीचा ब्लॉग बघ आणी स्वीट्स मध्ये सर्च मार. तिने आंबा मोदक झकास लिहीलेत. जुन्या माबोवर पण जयश्रीने आंबा मोदक लिहीलेत.
http://chakali.blogspot.in/2012/08/amba-modak.html
अजून काही कृती गुगलवर सापडतीलच.
http://www.maayboli.com/node/
http://www.maayboli.com/node/35562
सुलेखाताईंचे आंबा लाडु आहेत वर. टिनमधल्या रसाविषयी विचार त्यांना.
आमरसाची खांडवी आहे, विचार दिनेशना इथे.
http://www.maayboli.com/node/32792
सुलेखाताईंचे आंबा लाडु
सुलेखाताईंचे आंबा लाडु >>
खूप टेंप्टिंग वाटताहेत लाडू.
आता करून पाहते.
टुनटुन, धन्यवाद!
थोडा आंबट असेल असे
थोडा आंबट असेल असे ज्यांच्याकडून मिळाले त्यांनी सांगितलेय>>थोडी साखर घाला आणि खा.
आमरसाचे जितके पदार्थ करता येतात ते सर्व या पल्पचे करता येतील. ८५० ग्रॅमचा डबा केव्हा संपला ते कळणारसुद्धा नाही. तरी करायचेच असेल तर मँगोकेक, शिरा आणि मिल्कशेक हे पदार्थ सहज जमण्यासारखे आहेत.
आमच्याकडे दाराच्या आंब्याला आंबे लागल्यापासून आम्ही आंबे उतरवले की एका ओळखीच्या कॅनिंगवाल्याकडून पल्प करून आणून ठेवतो. मेमधे केलेला पल्प जेमतेम डीसेंबरपर्यंत पुरतो. मागच्या वर्षी साधारण तीनेक किलोचा पल्प करून घेतला होता (सर्वच आंबे घरचे नव्हते, काही विकतचे पण होते)
जायका इंडिया का च्या कालच्या
जायका इंडिया का च्या कालच्या एपिसोड मध्ये कॅलिफोर्नियातील एका रॉयल इंडिया कि काय श्या रेस्टॉरेंट मधे विनोद दुवाजी गेले होते तिथे त्यांनी मँगो मार्टिनी घेतलेली. ndtvgood times.com वर रेशिपी असेल.
मँगो पाय पण करतात. निंब्ज,
मँगो पाय पण करतात. निंब्ज, तुला देशात पाय बेस मिळेल का? असेल तर मैत्रीणीची रेस्पि तुझ्या विपुत टाकू शकेन.अल्टिमेट होती. आमच्या तिच्याकडच्या पार्टीजच माझं फेवरिट डेझर्ट
Pages