टी२० विश्वचषक स्पर्धा २०१२

Submitted by उदयन.. on 14 August, 2012 - 04:30

ह्या वर्षी श्रीलंकेमधे होणार्‍या टी२० विश्वचषक स्पर्धेबद्दल हा धागा....
.
t20.jpg
.
१८ सप्टेंबर पासुन चालु होणार्‍या स्पर्धेत यावेळी १२ संघाचा समावेश आहे. त्यांची ४ गटात विभागणी केली आहे.
.
(अ) गट : England-Cricket-team-logo.jpg इंग्लंड , India-Cricket-team-logo.jpg भारत, Afghanistan-Cricket-team-logo.jpg अफगाणीस्तान
.
(ब) गट : Australia-Cricket-team-logo.jpg ऑस्ट्रेलिया, West-Indies-Cricket-team-logo.jpg वेस्ट इंडिज, Ireland-Cricket-team-logo.jpg आयर्लंड
.
(क) गट : shrilanka.jpg श्रीलंका, South-Africa-Cricket-team-logo.jpg दक्षिण आफ्रिका, Zimbabwe.jpg झिंबांब्वे
.
(ड) गट : Pakistan-Cricket-team-logo.jpg पाकिस्तान, New Zealand-Cricket-team-logo.jpg न्युझिलंड, Bangladesh-Cricket-team-logo.jpg बांग्लादेश

.
सुपर ८ मधे जाणारे संघ
.
गट १ : अ१ , ब२, क१, ड२
गट २ : अ२, ब१, क२, ड१
.
वेळापत्रक :

१८ सप्टें. .................. गट क : १ ली मॅच : श्रीलंका / झिंबांव्बे......:.. हंबाटा.= श्रीलंका
१९ सप्टें. .................. गट ब : २ री मॅच : ऑस्ट्रेलिया / आयर्लंड....:..कोलंबो = ऑस्ट्रेलिया
१९ सप्टें. .................. गट अ : ३ री मॅच : भारत / अफगाणिस्तान..:.कोलंबो = भारत
२० सप्टें .................. गट क : ४ थी मॅच : द आफ्रिका / झिंबांव्बे....: हंबाटा = द. आफ्रिका
२१ सप्टें ................... गट ड : ५ वी मॅच : न्युझिलंड / बांग्लादेश..: कँडी = न्युझिलंड
२१ सप्टें ................... गट अ : ६ वी मॅच : इंग्लंड / अफगाणिस्तान..: कोलंबो = इंग्लंड
२२ सप्टें ................... गट क : ७ वी मॅच : श्रीलंका / द आफ्रीका ......: हंबाटा = द आफ्रिका
२२ सप्टें .................... गट ब : ८ वी मॅच : ऑस्ट्रेलिया / वेस्ट इंडीज .: कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२३ सप्टें .................... गट ड : ९ वी मॅच : न्युझीलंड / पाकिस्तान ....: कँडी = पाकिस्तान
२३ सप्टें .................... गट अ : १०वी मॅच : भारत / इंग्लंड ...........: कोलंबो = भारत
२४ सप्टें .................... गट ब : ११वी मॅच : वेस्ट इंडीज / आयर्लंड.......: कोलंबो = वे. इंडीज
२५ सप्टें .................... गट ड : १२वी मॅच : बांग्लादेश / पाकिस्तान.....: कँडी = पाकिस्तान
.
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १३वी मॅच : श्रीलंका / न्युझीलंड : कँडी =श्रीलंका
२७ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १४वी मॅच : इंग्लंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १५वी मॅच :पाकिस्तान / द आफ्रिका : कोलंबो = पाकिस्तान
२८ सप्टें ................... सुपर८ : गट २ : १६वी मॅच : भारत / ऑस्ट्रेलिया : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १७वी मॅच : इंग्लंड / न्युझिलंड : कँडी = इंग्लंड
२९ सप्टें ................... सुपर८ : गट १ : १८वी मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज : कँडी = श्रीलंका
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : १९वी मॅच : ऑस्ट्रेलिया / द आफ्रिका : कोलंबो = ऑस्ट्रेलिया
३० सप्टें ................... सुपर८ : गट २ : २०वी मॅच : भारत / पाकिस्तान : कोलंबो = भारत
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २१वी मॅच : न्युझीलंड / वेस्ट इंडीज : कँडी = वे. इंडीज
०१ ऑक्टो ................. सुपर८ : गट १ : २२वी मॅच : श्रीलंका / इंग्लंड : कँडी = श्रीलंका
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २३वी मॅच : ऑस्ट्रेलिया / पाकिस्तान : कोलंबो = पाकिस्तान
०२ ऑक्टो .................सुपर८ : गट २ : २४वी मॅच : भारत / द आफ्रिका : कोलंबो = भारत Sad
.
०४ ऑक्टो ................. १ ली सेमीफायनल मॅच : श्रीलंका / पाकिस्तान : कोलंबो = श्रीलंका Lol
०५ ऑक्टो ................. २ री सेमीफायनल मॅच : वेस्ट इंडीज / ऑस्ट्रेलिया : कोलंबो
= वे. इंडीज Lol

०७ ऑक्टो ................. फायनल टी २० मॅच : श्रीलंका / वेस्ट इंडीज: कोलंबो = वे. इंडीज
.
.
चला आपापली मते येउ द्यात..:)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ... ऑसी कंपनी मैदानावर झालेले तिथेच ठेवून बाहेर गळ्यात गळा घालून बसते ना ? >> असामीजी, पण आम्हाला फक्त मैदानावरचंच बघायचं असतं- व दाखवलं जातं - व तेंच आमच्या डो़क्यात बसतं ना !! Wink

<< ... ऑसी कंपनी मैदानावर झालेले तिथेच ठेवून बाहेर गळ्यात गळा घालून बसते ना ? >> असामीजी, पण आम्हाला फक्त मैदानावरचंच बघायचं असतं- व दाखवलं जातं - व तेंच आमच्या डो़क्यात बसतं ना !! Wink

जयवर्धनेने जुगार खेळला........हेरथ च्या ऐवजी धनंजय ला घेतला .......अनुभवी खेळाडु ऐवजी अननुभवी वर विश्वास दाखवला

चला..............गेल गेला..............६ ओवर्स मधे अवघे १४.......रन्स..:(

गेल काल नको ते पचकला....
आणि
आज साध्या चेंडूवर चकला......

सॅमुयल काय क्लास खेळतोय. काय ते मिस्टरी स्पिनर्स करताहेत ? मेंडिस काय पहिली मॅच खेळतोय काय ? मेंडीसची बॉलिंग मिस्टरी आहे हे आधीच ठरवून ठेवल्यासारखे खेळताहेत.

गेल फ्लॉप झाला- स्वरुपजींच्या 'सिक्स्थ सेन्स'नुसार ! पण माझी दोन 'एक्सपर्ट' [?] भाकीतं खरीं ठरलीं - १]<< मला तरी मलिंगापेक्षां मेंडीस हाच त्याच्या फसव्या फेकीमुळे वे. इंडीजच्या वाटेतला मुख्य अडथळा ठरण्याची शक्यता वाटते >> [मेन्डिस १२धावांत ४ महत्वाचे बळी, मलिन्गा ५० धांवा देवून एकही बळी नाही ! ] ] व २]. <<दोन्ही बाजूच्या फिरकी वर्चस्वामुळे सामना मोठ्या धांवसंख्येचा न होण्याचीच शक्यता अधिक >>. Wink

१३७ स्कोअरमुळे सामना अजूनही ५०: ५० अवस्थेत समजायला हवा कारण ह्या विकेटवर फिरकी हें दोन्ही संघांचं बलस्थान आहे .

या खेळपट्टीवर लंकेला १५० धावांचा पाठलाग नक्कीच भारी पडला असता..

खरे तर विंडीज ची सुरुवात पहाता १३८ झाल्या हेच खूप आहे.. पण अजून १० धावा नक्की निर्णायक ठरू शकल्या असत्या. तूर्तास माहेला व संगा पैकी एखादी विकेट गेली तरी सामना फिरू शकतो..

या खेळपट्टीवर माहेला संगा सराखे अनुभवीच लंकेला विजयी करू शकतील अन्यथा अवघड आहे.

अरे लंकन्स इतके वेडे कसे...विकेट फालतूमध्ये फेकल्या.. मज्जाय.. कमॉन गंगाम स्टाईलचा डान्स बघायचाय वेस्ट इंडिजकडून... अजुन ५ हवेत

सहीये... गो विंडीज.. ६१/५. लंका. माझा संपूर्ण सपोर्ट विंडीज ला .. Happy
जयवर्धनेच बेजबाब्दार फटका.. ओअण या खेळपट्टीवर धोका पत्करल्याशिवाय धावा मिळणे मुश्कील आहे.

now this game is for windies to lose.. cause all remaining lanaks batsmen are bit inexperienced.

>>...विकेट फालतूमध्ये फेकल्या

काहीही काय... अप्रतीम गोलंदाजी, क्षेत्ररक्षण याचे श्रेय विंडीज ला द्यावेच लागेल... अक्षरशः प्रत्त्येक धावेसाठि त्यांनी लंकेला झुंजवले आहे.

ओअण या खेळपट्टीवर धोका पत्करल्याशिवाय धावा मिळणे मुश्कील आहे. >> अगदी.. पण संयम हवा होता..

मी तर ज्याम खूष झालोय.. आता गंगम स्टाईल होणारच... फक्त तीन बाकी

जयवर्धनेच बेजबाब्दार फटका.. ओअण या खेळपट्टीवर धोका पत्करल्याशिवाय धावा मिळणे मुश्कील आहे >> मला वाटले कि पावसामूळे D-L विचारत घेऊन तो रिस्क घ्यायला गेला असावा.

गेल्या १-२ वर्षांमधे मलिंगा बहुतेक फायनलमधे (किंवा crunch games मधे) घात करतो असे निरिक्षण आहे.

खरे तर सांगाकारा, जयवर्धने हे फक्त उभे राहीले असते तरी विंडीजला घाम फुटला असता... पण ते झाले नाही.. ..लंकेने दडपण स्वतःवर घेतले..त्यात झेल सोडूनही फायदा उठवला गेला नाही..

>>मला वाटले कि पावसामूळे D-L विचारत घेऊन तो रिस्क घ्यायला गेला असावा.

अरे काहीही काय... अजीबातच फोरकास्ट नव्हते पावसाचे.. विंडीज च्या गोलंदाजी व क्षेत्ररक्षणामूळे लंका निव्वळ "आवळले" गेले

<< त्याच्यात मलिंगा शिरला असेल... >> असल्या विकेटवर धोका पत्करून धांवा करायला वेगवान गोलंदाजच उपयोगी ठरतात. म्हणून मलिन्गा व रामपपॉल यांची एकच हालत !!!५०-१ असा श्रीलंकेचा स्कोअर असताना वे. इंडीजचे दोन्ही हुकमी फिरकी गोलंदाज आले व चित्रच पालटले ! Wink

अप्रतीम गोलंदाजी, क्षेत्ररक्षण याचे श्रेय विंडीज ला द्यावेच लागेल... अक्षरशः प्रत्त्येक धावेसाठि त्यांनी लंकेला झुंजवले आहे. >>> +१००
त्याचबरोबर लंकन बॅट्समनही फायनल च्या प्रेशर खाली खेळले. त्यांचा भारताविरूद्ध खेळणारा पाक झाला Happy

क्षेत्ररक्षणामूळे >> मला नाही वाटत.. धावा अडवल्या.. पण झेल सोडले ते महत्त्वाचे होते.. ते फलंदाज खेळले असते तर ब्रावोचे काय खरे नव्हते.. रसेल ने सोडलेला थोडा अवघड होता.. असो..

गंगम डान्स बघायला धमाल आली.. कॅरेबियन रॉक्स

स्वतःपेक्षा क्रिकेटला मोठे समजणार्‍या लोकांत फायनल झाली आणि क्रिकेटकडे खेळ आणि एंजॉयमेन्ट म्हणून पाहणार्‍या उमद्या लोकांचा विजय झाला ही प्रचंड आनन्ददायक घटना....

त्यापूर्वी घडलेली आणखी एक छोटी आनंदाची घटना ! स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठ्या समजणार्‍या आणि क्रिकेटला खोर्‍याने पैसा ओढण्याचे आणि राजकारणाची खुमखुमी जिरवण्याचे साधन समजणार्‍या अ‍ॅडवर्टाईज मॉडेल-११ चा माजोरडा संघ टूर्नामेन्टबाहेर पडून टूर्नामेन्ट स्वच्छ व निर्मळ झाल्याचा क्षण !!

अजीबातच फोरकास्ट नव्हते पावसाचे >> अरे तसे नाही रे. tactical captain असल्यामूळे जर-तरचा विचार करत खेळला असेल असे म्हणतोय.

samuels ची inning once if lifetime types होती. कोह्लीने मलिंगाला जसा फोडला होता त्याची आठवण झाली. (It's sad that such a marvelous player had to give away an year due to non sportsmanlike reasons) badree चा ह्या विजयातले contribution विसरू नका. semi and final in both matches he was main factor to get things tilting.

विंडीजच जिंकल्याचे बरे वाटले ते दोघांसाठी - Sammy and Richardson. Sammy had taken lot of flak for not being worthy player in this team. But alas he was the type of player needed to get big guns together. always wearing that smile. At least they started competing and finally ended up winning something worth.
Richardson because he deserved to be associated with one World Championship after he was robbed of final in 1996 by selfish play by west indian players in semi final against Aus (where they ended up losing from almost improbable position).

अर्थात ह्या विजयाने टिनो बेस्टने जिंकून दिलेल्या champions trophy प्रमाणेच काही फार मोठा फरक पडेल असे मला वाटत नाही.

RSA पेक्षा लंकनला chokers tag नीट बसेल असे म्हणायला हवे. ४ फायनल्स आणी nothing to show back.

"स्वतःपेक्षा क्रिकेटला मोठे समजणार्‍या लोकांत फायनल झाली" नि " स्वतःला क्रिकेटपेक्षा मोठ्या समजणार्‍या " ह्यामधे काय फरक हो बाजो Lol

असामी यात मला तरी काही कन्फ्यूजन दिसत नाही वाक्य रचनेत. अर्थात लेबलिंग मध्ये मतान्तर होऊ शकते.

Pages