निसर्गाच्या गप्पांचा १० वा भाग सुरु होत आहे हो$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$$
(मधला हार गुंफलेला फोटो शोभा कडून साभार)
मूलं भुजङ्गै:, शिखरं प्लवङ्गै:
शाखा विहंगै:, कुसुमानि भृङ्गै: |
नास्त्येव तच्चन्दनपादपस्य
यन्नाश्रितं सत्वभरै: समन्तात ||
हे आहे सुगंधी चंदनवृक्षाचं लेकुरवाळं चित्र; त्याच्या मुळांना सर्पाचं वेटोळं आढळतं. खोडाच्या टोकाकडे मर्कटवर्गीयांच्या लीला, पानापानात दडलेले पक्षीगण आणि फुलांवर रुंजी घालणारे भुंगे.
- डॉ. हेमा साने (वृक्ष - एक आधारवड, निसर्गायन, ऑक्टो. २०११)
(शशांक पुरंदरे यांच्याकडून)
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग ९) http://www.maayboli.com/node/35557?page=35
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर 31) द सिक्रेट कोड- प्रिया हेमेन्वे ३२) फुकुओकांचे पुस्तक http://www.arvindguptatoys.com/arvindgupta//onestraw.pdf
मासे देणारे कोण दिव्य डॉक्टर
मासे देणारे कोण दिव्य डॉक्टर >>>> हा हा हा हा - जागूला सांगू नको हां, नाहीतर मासळी बाजारात जायच्या ऐवजी याच डॉककडे जाईल मग......
रच्याकने कुठल्या भागात आला म्हणे हा डॉ गायकवाडांचा दवाखाना ??
तो एका किड्याचा कोष आहे. या
तो एका किड्याचा कोष आहे. या कोषासकटच तो झाडाला लटकत असतो. हो ना ?
गप्पी मासे पाळा. हिवताप
गप्पी मासे पाळा. हिवताप टाळा !
शशांक त्या डॉ. बरोबर आम्ही
शशांक त्या डॉ. बरोबर आम्ही प्रोजेक्ट केला मागील वर्षी महिलांसाठी इनरव्हिल तर्फे. मी पण त्यांच्या क्लिनिकमध्ये गेले होते सहकुटूंब त्या मावशी आणि तिथली टिमही माझ्या आता ओळखिची झाली आहे. तेंव्हाही मावशींच्या हातचा चहा प्यायले होते. डॉ. पण माझ्या घरी आले होते. हल्लीच ते संपर्कात नाहीत कारण त्यांच्या फोनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. आणि शशांक ते डॉ. माझ्यासारखेच मच्छीखाऊ अहेत. त्यांच्या घरी पण वेगवेळे मासे बनवतात आणि त्यांच्या एरीयात आमच्यासारखेच मासे मिळतात
आणि शशांक ते डॉ. माझ्यासारखेच
आणि शशांक ते डॉ. माझ्यासारखेच मच्छीखाऊ अहेत. त्यांच्या घरी पण वेगवेळे मासे बनवतात आणि त्यांच्या एरीयात आमच्यासारखेच मासे मिळतात हाहा >>>>> वा वा मज्जा आहे बुवा तुझी..... "सागर माझा देश आहे, सारे मच्छीखाऊ माझे बांधव आहेत -" याच चालीवर वाचत होतो मी हे सर्व....
यू ट्यूबवर ANTS नावाचा लघुपट
यू ट्यूबवर ANTS नावाचा लघुपट आहे. मुंग्यांची अनोखी दुनिया त्यात दाखवलीय. त्यासाठी प्रत्यक्ष वारुळाचेच नव्हे तर प्रयोगशाळेत वारुळ तयार करुन चित्रीकरण केलेय.
काही गोष्टी तर आपल्या कल्पनेच्याही पलिकडच्या आहेत.
१) मूंगी काचेला उलटी लटकून, आपल्या वजनाच्या कित्येक पट वजन उचलू शकते. (उंदिरही असा लटकू शकत नाही, आणि या प्रमाणात वजन उचलणे, ऑलिंपिक पदक विजेत्यालाही शक्य नाही.)
२) एक अस्वल वारुळावर हल्ला करते. तीव्र रसायनांचा मारा करुन मुंग्या त्याला पळवून लावतात. मग ते अस्वल मधाच्या पोळ्यावर हल्ला करते, त्याही त्याला पळवतात.. मग मुंग्या पोळ्यावर हल्ला करतात आणि, यशस्ची होतात.
३) इतर किटकांना तीव्र रसायनात बुडवून किटकभक्षी वनस्पती त्यांचे शोषण करतात, त्याच रसायनात मुंग्या
आरामात पोहतात.
४) जसे आपले पाळीव प्राणी असतात तसे मुंग्यांचेही पाळीव किटक असतात. त्यांना जास्त झालेले साखरपाणी त्या खातात आणि त्या बदल्यात किटकांचे पावसापासून संरक्षण तर करतातच पण झाडाच्या जास्त गोड असलेल्या भागाकडेही उचलून नेतात.
५) संकटकाळात काय करायचे, याचे पूर्ण ज्ञान त्यांना असते आणि त्या कार्यक्रमानुसारच त्या वागतात.
६) मिलनानंतर नर मरून जातो, हे आपल्याला माहीत आहेच, पण त्यांच्यापासून मिळालेले शुक्रजंतू, राणीमुंगी
आपल्या शरीरात साठवून ठेवते, किती काळ ! तब्बल १० ते २० वर्षे. मानवाला हे तंत्र अवगत नाही.
कुठल्या टप्प्यावर मुंग्यांना हि गरज निर्माण झाली असेल आणि त्यावर त्यांनी उपाय कसा शोधला असेल !
७) आणि त्यांच्या वारुळात कुणी एकटा नेता नसतो, त्यांची संपर्कव्यवस्था अप्रतिम असते, त्यासाठी त्या
रसायनांचा वापर करतात..
हे सगळे त्या तासाभराच्या लघुपटात, अप्रतिमरित्या दाखवलेय.
शशांक दिनेशदा मुंग्यांवर
शशांक
दिनेशदा मुंग्यांवर मस्त माहीती.
मी सध्या राणी बंग यांचे गोईण हे पुस्तक वाचायला घेतले आहे. वेगवेगळ्या झाडांची त्यात माहीती आहे.
हे काल आमच्या पुस्तकाच्या रॅकवर होत.
रच्याकने कुठल्या भागात आला
रच्याकने कुठल्या भागात आला म्हणे हा डॉ गायकवाडांचा दवाखाना ??
बेलापुर नवी मुंबई. डॉक्टर नवि मुंबई महानगर पालिकेत डॉक्टर आहेत. बराच मोठा भाग (माझ्या कॉलनीसकट) त्यांच्या अधिपत्याखाली आहे. आणि त्यांच्या भागावर त्यांचे अगदी बारिक लक्ष असते. माझ्या कॉलनीत डासांनीही कॉलनी केलीय आणि ह्या कॉलनीपुढे त्यांनी अगदी हात टेकलेत, बाकी सगळीकडून त्यांनी शक्य तितके डास घालवलेत आणि त्या भागातुन डेंग्युचे पुर्णपणे निर्मुलन केलेय असे त्यांनी अगदी अभिमानाने सांगितले.
जागू, गोईणमधे चित्रं नसल्याने
जागू, गोईणमधे चित्रं नसल्याने बर्याच वनस्पति ओळखता येत नाहीत. तूला माहित असल्या तर अवश्य फोटो टाक.
हो दिनेशदा मलाही तेच जाणवत.
हो दिनेशदा मलाही तेच जाणवत. पण मला जितक्या कळतील तितक्या मी पाहते फोटो मिळतात का ते अर्थात तुम्हाला कळल्या नाहीत तर मला काय कळणार ?
शोभा मला तरी हा प्राणी
शोभा मला तरी हा प्राणी सांडग्या मिर्चीचा अवतार वाटतोय. फक्त देठ नाहीय.
डॉ. पण माझ्या घरी आले होते.
डॉ. पण माझ्या घरी आले होते. हल्लीच ते संपर्कात नाहीत
तुझी आठवण काढलेली गं. ते गेल्या महिन्यात दोनदा उरणला गेले होते पण तुझ्याकडे यायला वेळ झाला नाही म्हणुन हळहळत होते.
साधना सांडगी मिरची
साधना
सांडगी मिरची
शोभा मला तरी हा प्राणी
शोभा मला तरी हा प्राणी सांडग्या मिर्चीचा अवतार वाटतोय. फक्त देठ नाहीय. >>>> हे वर्षुतैच्या तोंडी शोभेल फक्त ...
हे मॉथ आहे, फुलपाखरु नाही (आमच्या घरात याला गिधाड, घार वगैरे काहीही समजतात व प्रचंड किंचाळा किंचाळी करुन बिचार्याला घाबरवून सोडतात....)
वाह ! सगळी फुले खुप सुंदर
वाह ! सगळी फुले खुप सुंदर आहेत.
जागू मस्त फुलपाखरू पूर्वी
जागू मस्त फुलपाखरू
पूर्वी दूरर्दर्शनवर "वर्ल्ड ऑफ सर्वाईवल" असा प्रोग्राम लागायचा त्यात एकदा मुंग्यांवर फिल्म दाखवली होती. आणि त्यात वारूळाच्या आतलं शुटींग होतं.
वारूळातले विभाग.
त्या अंडी कशी एका ठिकाणाहून दुसरी कडे नेतात.
अन्न कसं साठवतात.
अंड्यातून जेव्हा पिल्लू बाहेर येते तेव्हा बाहेरची मुगी अंड्याचे टरफल कापते. व तिची नांगी आतल्या जिवापासून काही मायक्रॉनवरून फिरते.
याचं शुटींग कसं केलं असेल कोण जाणे.
मॉथ हे फुलपाखरासारखेच दिसते
मॉथ हे फुलपाखरासारखेच दिसते पण ते फुलपाखरु नाही.
फुलपाखरु - याच्या अँटेना (आपल्याला ज्या लांब मिशा वाटतात ) खूप तलम व नाजुक असतात, या अँटेनाच्या टोकाला थोडा गोलसर भाग असतो. दुसरे असे की फुलपाखरु बसताना त्याचे पंख उभारलेले असतात.
मॉथ - याच्या अँटेना फेदरी (केसाळ) असतात व बसताना पंख खाली झुकलेले असतात. सर्वसाधारणतः हे निशाचर (रात्री भटकणारे) असते.
खालील आकृत्यांवरुन सगळे स्पष्ट होईल.
फुलपाखरु
मॉथ
मॉथ
शशांक, आता पतंग पण रंगीबेरंगी
शशांक, आता पतंग पण रंगीबेरंगी दिसू लागले आहेत. मिशीतला फरक खासच !
जो, आता कॅमेरात प्रचंड प्रगती झालीय आणि एखादे दृष्य टिपण्यासाठी, ते लोक प्रचंड मेहनत घेतात. कित्येकदा तर वर्षभर कॅमेरा लावून ठेवलेला असतो. त्यामूळे आपल्याला एका झाडाचे सर्व ऋतू पाहता येतात.
फ्लॉवर पॉवर हि ३डी सिडी कधी येतेय त्याची वाट बघतोय. ( आली पण असेल बाजारात. )
वावावावॉव!!!!!!!!!! काय काय
वावावावॉव!!!!!!!!!!
काय काय माहिती मिळतीये..
मुंग्या तर निसर्गातील अजूबा आहेत...
सुदुपार मंडळी
सुदुपार मंडळी ..................हे पहाल का?
http://www.maayboli.com/node/38357
त्याच लघुपटात त्यांनी एका
त्याच लघुपटात त्यांनी एका वारुळाचा, सिमेंटने मोल्ड घेतला, तर १० टन सिमेंट लागले. आणि मग तो मोल्ड बाहेर काढला. खुप कॉम्प्लेक्स रचना असते आत.
मुंग्या, बुरशीची शेती करतात हे आपण जाणतोच. त्या शेतीत हवा खुप गरम होते आणि कचराही निर्माण होतो. तो कचरा त्या एका ठिकाणी साठवतात, त्यातून गरम हवा बाहेर जायला वाट ठेवतात आणि मग थंड हवा
आत यायलाही वाटा करतात.
ज्यूरासिक पार्क मूळे आपल्याला अंबर ( झाडाचा गोंद) माहित आहे. त्यात अनेक किटक ट्रॅप होतात. हा अंबर सुकला कि खुप कठीण बनतो. इतका कठीण कि प्राचीनकाळी त्याचे दागिने बनवत असत. पण मूळात ते झाड, अंबर तयार करते ते किटकांपासून स्वतःचा बचाव व्हावा म्हणून.
बुरशी ही तशी नाजूक, तिला इतर बॅक्टेरिया आणि इतर प्रकारच्या बुरशीपासून धोका असतोच. हा धोका दूर करण्यासाठी, जीवावर उदार होऊन, मुंग्या अंबरचे खडे गोळा करुन वारुळात ठेवतात आणि प्रत्येक मुंगी, त्यावरुन
चालत जाते... असे केल्याने त्यांच्या पायाचे तळवे (!) निर्जंतूक होतात.
कसली मेजवानी आहे इथे माहितीची
कसली मेजवानी आहे इथे माहितीची ... मुंग्या, अंबर, पतंग !
शांकली, पुढच्या वेळी पुण्यात झाडं बघायला जातांना इथे आधी सांगणार का? जमलं तर मला सोबत यायला खूप आवडेल.
पाणी - पाण्यातील झाडे - डास
पाणी - पाण्यातील झाडे - डास आणि गप्पी मासे.
आमच्याकडे एक कासव आहे. त्याच्या टबातील पाण्यात डास अंडी घालतात. पाणी स्वच्छ केले की नक्कीच घालतात. मग कासव बाहेर काढले जाते. त्याच्या टबात दुसरया टबातले गप्पी मासे सोडले जातात. ७०-८०% साफ-सफाई झाली कि पाणी फिल्टर केले जाते. पुन्हा कासव पाण्यात सोडले जाते. हे गप्पी सोसायटी आवारातील विहीरीतले आहेत. त्यांची संख्या फारच वाढली कि बरेचसे गप्पी विहीरीत सोडून देतो. कासव असताना मासे सोडले तर कासवच मासे खाते. कधी कधी कासवाला खुराक म्हणून मासे देतो. ---- हे सर्व करणारा माझा मुलगा - मल्हार, आम्ही इतर फक्त "मम" म्हणण्यापुरते.
२९-३० सप्टेंबर २०१२ - अचानक
२९-३० सप्टेंबर २०१२ - अचानक वाढलेला उन्हाळा.
पुढच्या आणि मागच्या खिडक्यांमधे पक्षांसाठी पाणी ठेवते. २९-३० सप्टेंबरला दुपारी काहीली होत होती. दुपारी ३-३.३० च्या सुमारास पाणी प्यायला सगळे आले - दयाळ, बुलबुल, चिमण्या, कावळे, पारवे.
दयाळ आणि बुलबुल तर चक्क डुबकी मारत होते. कितीतरी वर्षे पक्षांसाठी पाणी ठेवते पण दयाळ आणि बुलबुल आलेले प्रथमच पाहीले. समाधान वाटले.
काल २ ऑक्टोबरला हळद्या दिसला, थंडी लवकर येणार असे दिसते. पण आधी ऑक्टोबर-हिट सहन करावी लागेल.
मस्तच गं मधुरा.. ह्या अंघोळी
मस्तच गं मधुरा.. ह्या अंघोळी बघताना खूप मज्जा आली असेल ना?
सांडगी मिरची..:हहगलो:
गौरी, नक्की सांगेन.
दिनेशदा नेहेमीप्रमाणेच मुंग्यांची माहिती एकदम रंजक!!
उन्हाळा पक्ष्यांना आणि
उन्हाळा पक्ष्यांना आणि प्राण्यांनाही असह्य होत चाललाय. या दिवसात त्यांना पाणी लागणारच...
पण मजा म्हणजे बहुतेक सापांना पाणी प्यायची गरज पडत नाही, भक्ष्यातूनच त्यांची पाण्याची गरज भागते.
आणि समुद्रसापाला तर आणखी एक शक्ती लाभलीय, समुद्राचे पाणी पिऊन तो त्यातले मीठ वेगळे करुन, बाहेर टाकू शकतो. ( संदर्भ - "साप" प्रा. ज्ञानेश्वर म्हात्रे )
पण मजा म्हणजे बहुतेक सापांना
पण मजा म्हणजे बहुतेक सापांना पाणी प्यायची गरज पडत नाही, भक्ष्यातूनच त्यांची पाण्याची गरज भागते.>>>>दिनेशदा, माझ्या मित्राने येऊरच्या जंगलात साप पाणी पिताना केलेले शूट.
https://www.facebook.com/photo.php?v=332632746759546&set=t.1000009459439...
दिनेशदा, माझ्या मित्राने
दिनेशदा, माझ्या मित्राने येऊरच्या जंगलात साप पाणी पिताना केलेले शूट
अरेच्च्या.... ह्या लोकांनाच कसे काय सापडते हे सगळे... मी अर्धे येऊर पालथे घातले पण कावळ्यांशिवाय कोणी दिसले नाही.....
सुप्रभात!!! उन्हाळा
सुप्रभात!!!
उन्हाळा पक्ष्यांना आणि प्राण्यांनाही असह्य होत चाललाय. या दिवसात त्यांना पाणी लागणारच... >>>> दिनेशदा, अगदी बरोबर.
फेंगशुई बांबूचे झाड, पाण्यात लावलेले, स्वंपाकघराच्या खिडकीत ठेवले आहे. संध्याकाळनंतर खिडकी बंद करते. रात्री ९-९.३० ला एक मोठी जाड पाल तिथे पाणी पिताना पाहीली आहे. खरेतर मला पालीची फार भिती वाटते, पण खिडकी बंद असल्यामुळे शूरपणे बघत होते. माझी चाहूल तिलाही लागली असेल, तिने जराही आवाज न करता काढता पाय घेतला.
साधारण २०-२२ दिवसांपूर्वी, दुपारी, मनी प्लाँटच्या कुंडीत हालचाल दिसली. नीट पाहीले तर पानांच्या द्रोणात साठलेले पाणी कुणीतरी पित होते. मला वाटले सरड्याचे पिलू आहे. भरभर खिडकी बंद केली. मल्हारने पुन्हा उघडली, नीट पाहीले आणि म्हणाला, "अग, हा गेको आहे." 'गेको' : पाल, सरडा सद्रुष प्राणी... इति मल्हार.
ह्या अंघोळी बघताना खूप मज्जा आली असेल ना? >>>> शांकली, खरेच मज्जा आली. अगदी शांत उभी होते, अंतर राखून. पावसाळा सोडून इतरवेळी पक्षांसाठी ज्वारी-बाजरीचे दाणेही ठेवते. ठराविक वेळी चिमण्या येतात. खारुताई मात्र दिवसभर येतात. बाकीच्यांना मात्र हा मेनु आवडत नसावा.
रात्री ९-९.३० ला एक मोठी जाड
रात्री ९-९.३० ला एक मोठी जाड पाल तिथे पाणी पिताना पाहीली आहे. >>> कॉलेजात मलाही असंच शिकवलं गेलं की पाली वगैरे प्राणी पाणी पीत नाहीत, त्यांच्या भक्ष्यातूनच त्यांची पाण्याची तहान भागवली जाते. पण ही जी निरीक्षणे आहेत येथील मंडळींची त्यावरुन असे वाटते की ज्या भागात (वाळवंट) पाण्याचे दुर्भिक्ष्य असते तेथील सरपटणारे प्राणी भक्ष्यातूनच पाण्याची तहान भागवत असावेत याउलट जिथे पाणी मिळते आहे तिथे त्यांनी स्वतःला अॅडॅप्ट केले असावे - पाणी प्यायला.
आपल्या घरात आपण कोणी पालीची विष्ठा पाहिली असेल तर त्या काळसर लेंडीसारख्या असतात व टोकाला एक पांढरा भाग असतो. तो पांढरा भाग म्हणजे युरिक अॅसिड. आपण मूत्रातून ते विसर्जन करतो, पण पालीसारखा प्राणी पाण्याअभावी त्या युरिक अॅसिडचा क्षार करुन बाहेर टाकतो.
कोणी जाणकार झूलॉजिस्ट सांगू शकेल याविषयी अजून काही .....
Pages