|| जय श्री गणेश ||
'मिठास'
असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा
श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्या माबोवर पसरू द्या
उपलब्ध मिठाई:
काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
तिरंगा बर्फी,
केशरी पेढे,
बासुंदी आणि
अंगुर मलाई
मिठाई बनवण्यासाठी वापरलेले जिन्नसः
हो, विविध प्रकारचे साबण
यात अंघोळीचा साबण हा मुख्य जिन्नस आहे. त्यासोबत हॅंड वॉश लिक्वीड्स, कपडे धुण्याची पावडर वापरली आहे. रंगांसाठी क्रेयॉन्स आणि पोस्टर कलर्स वापरले आहेत. केशर बनलय केशरी धागा आणि त्यावर थोडा लाल रंग लावुन. वर्ख सिल्वर फॉईल चा आहे. साधे प्लॅस्टिक चे डब्बे, मुदाळं आणि स्टील ची ताटली मोल्ड्स म्हणून वापरली आहेत.
कृती:
साबण आधी किसुन घेतला. त्यात थोडे पाणी घालुन मावेमधे गरम केला. मोल्ड मधे घातला आणि मोल्ड फ्रिझर मधे टाकला. रंगित साबणासाठी किसलेले क्रेयॉन्स / पोस्टर कलर्स साबण मावेमधे घालण्याआधी किसलेल्या साबणात मिसळले.
अश्याप्रकारे विविध मोल्ड्स बनवुन घेतले अणि मग त्याच्यावर सिल्वर फॉइल, क्रेयॉन्स चा चुरा वगैरे घालुन सजवले आहेत.
अंगुर मलाईकरता पांढर्या रंगाचा हॅंड वॉश आणि पांढरा रंग व पाणी मिसळुन दूध बनवले आहे आणि अंगुरी म्हणजे अंघोळीच्या साबणाचे गोळे आहेत
बासुंदी बनवण्याकरता पिवळसर रंगाचे हॅंड वॉश वापरले आहे. दाटपणा येण्यासाठी त्यात वॉशिंग पावडर मिसळली आहे. सर्व नीट फेटुन घेतले आणि वाटीत ओतले. त्यावर दोर्याचे केशर आणि क्रेयॉन्स ची पिस्ता पावडर घातली आहे.
यात वापरलेले सर्व जिन्नस साबण म्हणुन परत वापरता येतिल त्यामुळे नासाडी होणार नाही की फुकट जाणार नाहीत आणि अडगळीत पडुनही रहाणार नाहित.... तेव्हा रियुज & रिफ्रेश
तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे
Jabarahat!!!! Far kalpak
Jabarahat!!!!
Far kalpak aahes tu lajo!!!
जबर्या !!!
जबर्या !!!
लाजो' द मास्टर शेफ मान गये
लाजो' द मास्टर शेफ मान गये आपको.. आप विनर हैं!!!
अगो...,' संयोजक, आता खरे पदार्थ बघितल्यावर टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, हँड वॉश, साबण, क्ले हेच डोळ्यांसमोर येतंय त्याचं काय करायचं ते सांगा !'.....

मग खरे पदार्थ आधी हुंगून
मग खरे पदार्थ आधी हुंगून साबणाचा, मातीचा वास येतोय का ते पहायचं. ढोकळा म्हणून स्पंज खाऊ घालतात लोक, त्यामुळे कुणी ढोकळा वाढला तर ओढून पहायचा आधी. नाहीतर कागद, मण्यांसकट स्पंज खाऊ आपण.

जब्बरदस्त !!!!! "नकली " असली
जब्बरदस्त !!!!! "नकली " असली पेक्षा जास्त सुंदर दिसतं . लाजो,तू लाजवाब आहेस !
लाजोजी..............तुस्सी
लाजोजी..............तुस्सी महान हो!
>>संयोजक, आता खरे पदार्थ
>>संयोजक, आता खरे पदार्थ बघितल्यावर टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, हँड वॉश, साबण, क्ले हेच डोळ्यांसमोर येतंय त्याचं काय करायचं ते सांगा > +१००००००००>> +१०००००००० अगदी
कल्पक!!!
सही!!!! तो किसलेला साबण
सही!!!!
तो किसलेला साबण पास्त्यासारखा दिसतोय

अजून चोवीस तास शिल्लक आहेत. ह्या आयडियेचा वापर करा बघू कोणीतरी
पान उघडल्यावर मला वाटलच नाही
पान उघडल्यावर मला वाटलच नाही हे मिठाईच ताट सगळं खोटं आहे... इतकी छान दिसतेय मिठाई
मस्त
मस्त
अमेझिंग. खरेतर या सदरातल्या
अमेझिंग. खरेतर या सदरातल्या सगळ्या पाकृ अमेझिंग आहेत... कुणाकुणाला हात जोडावेत हा प्रश्न पडलाय...
मस्तच !
मस्तच !
लाजो अमेझिंग....साधना +१०००
लाजो अमेझिंग....साधना +१०००
निव्वळ अप्रतिम........!!!!!!
निव्वळ अप्रतिम........!!!!!! अंगुर मलाई आणि बासुंदी विशेष आवडली......
अप्रतिम कसलं कल्पक डोकं आहे
अप्रतिम
कसलं कल्पक डोकं आहे ग तुझं.
लाजो मावशी मस्त आहे मिठाई -
लाजो मावशी मस्त आहे मिठाई - असा सानिकाचा रि आहे. तिला खरच वाटत नाहिये ही खायची मिठाई नाहीये ते
लाजो नुसती केकचीच नाही तर
लाजो नुसती केकचीच नाही तर क्रिएटीव्हिटीची सुपर ड्युपर क्वीन आहे, कल्पनेची परी आहे आणी उत्साहाची मुर्ती आहे. संयोजकांच्या डोक्यात नुसता कल्पनेचा क येण्या आधीच लाजोच्या कल्पनेची कल्पकता सादर झालेली असते.
लाजो माझी लहान मुलगी सुद्धा तशी कल्पक आहे, त्यामुळे तुझाच आदर्श मी तिच्या समोर ठेवणार. तिला ही मिठाई नकली वाटलीच नाही.:फिदी:
सगळ्या मिठाया खर्या वाटतायत
सगळ्या मिठाया खर्या वाटतायत !!! कल्पना जबरी.............
भन्नाट!!......... यातली
भन्नाट!!......... यातली कुठलीच मिठाई खोटी वाटत नाहीये......
तुला __/\__
अप्रतिम!!!!!
अप्रतिम!!!!!
सह्ही केलीये
सह्ही केलीये मिठास............ कुठलीच मिठाई खोटी वाटतच नाहीये>>>+१०००० अप्रतिम!!
लाजो सगळच खुप छान आहे..... कस
लाजो सगळच खुप छान आहे..... कस बाई तुला एवढ छान छान सुचत.....
साबणाने फेस येतो...पण या
साबणाने फेस येतो...पण या साबणाने तोंडाला पाणी सुटले.
अप्रतिम कलाकारी.
धन्यवाद मंडळी खुप खुप आभार्स
धन्यवाद मंडळी
खुप खुप आभार्स
अशक्य आहेस तू !!
अशक्य आहेस तू !!
देवा$$$$ फसलास ना तू पण.. आता
देवा$$$$ फसलास ना तू पण..
आता या जोला शिक्षा कर.. हे सगळे पदार्थ खरे-खुरे करुन आम्हाला खिलवायला लाव
ग्रेट!
लाजो, खरच खुप सुरेख
लाजो, खरच खुप सुरेख
ग्रेट वर्क. मस्तच. बासुंदी,
ग्रेट वर्क. मस्तच. बासुंदी, अंगुर रबडी विशेष छान.

लाजो मस्तच
लाजो मस्तच
मस्त!
मस्त!
Pages