|| जय श्री गणेश ||
'मिठास'
असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा
श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्या माबोवर पसरू द्या
उपलब्ध मिठाई:
काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
तिरंगा बर्फी,
केशरी पेढे,
बासुंदी आणि
अंगुर मलाई
मिठाई बनवण्यासाठी वापरलेले जिन्नसः
हो, विविध प्रकारचे साबण
यात अंघोळीचा साबण हा मुख्य जिन्नस आहे. त्यासोबत हॅंड वॉश लिक्वीड्स, कपडे धुण्याची पावडर वापरली आहे. रंगांसाठी क्रेयॉन्स आणि पोस्टर कलर्स वापरले आहेत. केशर बनलय केशरी धागा आणि त्यावर थोडा लाल रंग लावुन. वर्ख सिल्वर फॉईल चा आहे. साधे प्लॅस्टिक चे डब्बे, मुदाळं आणि स्टील ची ताटली मोल्ड्स म्हणून वापरली आहेत.
कृती:
साबण आधी किसुन घेतला. त्यात थोडे पाणी घालुन मावेमधे गरम केला. मोल्ड मधे घातला आणि मोल्ड फ्रिझर मधे टाकला. रंगित साबणासाठी किसलेले क्रेयॉन्स / पोस्टर कलर्स साबण मावेमधे घालण्याआधी किसलेल्या साबणात मिसळले.
अश्याप्रकारे विविध मोल्ड्स बनवुन घेतले अणि मग त्याच्यावर सिल्वर फॉइल, क्रेयॉन्स चा चुरा वगैरे घालुन सजवले आहेत.
अंगुर मलाईकरता पांढर्या रंगाचा हॅंड वॉश आणि पांढरा रंग व पाणी मिसळुन दूध बनवले आहे आणि अंगुरी म्हणजे अंघोळीच्या साबणाचे गोळे आहेत
बासुंदी बनवण्याकरता पिवळसर रंगाचे हॅंड वॉश वापरले आहे. दाटपणा येण्यासाठी त्यात वॉशिंग पावडर मिसळली आहे. सर्व नीट फेटुन घेतले आणि वाटीत ओतले. त्यावर दोर्याचे केशर आणि क्रेयॉन्स ची पिस्ता पावडर घातली आहे.
यात वापरलेले सर्व जिन्नस साबण म्हणुन परत वापरता येतिल त्यामुळे नासाडी होणार नाही की फुकट जाणार नाहीत आणि अडगळीत पडुनही रहाणार नाहित.... तेव्हा रियुज & रिफ्रेश
तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे
आता लाजो दिसली की फक्त _/\_
आता लाजो दिसली की फक्त _/\_
लाजो ......म्हणजे नक्किच
लाजो ......म्हणजे नक्किच काहि तरि नविन ....असनार ... ़खरच.... हॅट्स ऑफ...............^.........
_/\_.
_/\_.
एकच नंबर... बोले तो... प्रथम
एकच नंबर... बोले तो... प्रथम क्रमांक..!!
आहा! केवळ अशक्य! मेहनतीला आणि
आहा! केवळ अशक्य! मेहनतीला आणि कल्पकतेला सलाम!
_/\_
_/\_
निव्वळ अप्रतिम...
निव्वळ अप्रतिम...
Pages