|| जय श्री गणेश ||
'मिठास'
असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा
श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्या माबोवर पसरू द्या
उपलब्ध मिठाई:
काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
तिरंगा बर्फी,
केशरी पेढे,
बासुंदी आणि
अंगुर मलाई
मिठाई बनवण्यासाठी वापरलेले जिन्नसः
हो, विविध प्रकारचे साबण
यात अंघोळीचा साबण हा मुख्य जिन्नस आहे. त्यासोबत हॅंड वॉश लिक्वीड्स, कपडे धुण्याची पावडर वापरली आहे. रंगांसाठी क्रेयॉन्स आणि पोस्टर कलर्स वापरले आहेत. केशर बनलय केशरी धागा आणि त्यावर थोडा लाल रंग लावुन. वर्ख सिल्वर फॉईल चा आहे. साधे प्लॅस्टिक चे डब्बे, मुदाळं आणि स्टील ची ताटली मोल्ड्स म्हणून वापरली आहेत.
कृती:
साबण आधी किसुन घेतला. त्यात थोडे पाणी घालुन मावेमधे गरम केला. मोल्ड मधे घातला आणि मोल्ड फ्रिझर मधे टाकला. रंगित साबणासाठी किसलेले क्रेयॉन्स / पोस्टर कलर्स साबण मावेमधे घालण्याआधी किसलेल्या साबणात मिसळले.
अश्याप्रकारे विविध मोल्ड्स बनवुन घेतले अणि मग त्याच्यावर सिल्वर फॉइल, क्रेयॉन्स चा चुरा वगैरे घालुन सजवले आहेत.
अंगुर मलाईकरता पांढर्या रंगाचा हॅंड वॉश आणि पांढरा रंग व पाणी मिसळुन दूध बनवले आहे आणि अंगुरी म्हणजे अंघोळीच्या साबणाचे गोळे आहेत
बासुंदी बनवण्याकरता पिवळसर रंगाचे हॅंड वॉश वापरले आहे. दाटपणा येण्यासाठी त्यात वॉशिंग पावडर मिसळली आहे. सर्व नीट फेटुन घेतले आणि वाटीत ओतले. त्यावर दोर्याचे केशर आणि क्रेयॉन्स ची पिस्ता पावडर घातली आहे.
यात वापरलेले सर्व जिन्नस साबण म्हणुन परत वापरता येतिल त्यामुळे नासाडी होणार नाही की फुकट जाणार नाहीत आणि अडगळीत पडुनही रहाणार नाहित.... तेव्हा रियुज & रिफ्रेश
तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे
मिठाई मस्त दिसतेय. यम्मी!
मिठाई मस्त दिसतेय. यम्मी!
_/\_
_/\_
लाजो, ते साबणाचे फोटो
लाजो, ते साबणाचे फोटो पाहिल्यावर पुन्हा एकदा दचकुन धाग्याचे नाव पाहिले आणि मग कळले कि हे खरे खाण्याचे पदार्थ नाहीत. ग्रेट.
साबण मावे मधे वितळेल हा विचार कसा काय केलास तु?
पहिलं मिठाईचं ताट एकदम खर्रेखुर्रे!
रच्याकने, पाहुणे घरी आले असतील तेव्हा हात आणि भांडी धुवायला हे साबण ठेऊ नकोस. घाबरतील बिचारे![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
मस्त!!!!!!!!!!!!! अंगुर मलाई
मस्त!!!!!!!!!!!!! अंगुर मलाई आणि बासुंदी ची कल्पना एकदम हटके!!!!!!!!!!
बापरे__________/\__________ ह
बापरे__________/\__________![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हे खरे नाही? कसा विश्वास ठेवायचा? बासुंदी, रसमालाई, बर्फ्या, पेढे, छे हे अगदी अशक्य सुंदर आहे. अगदी बाप्पासुद्धा फसेल
हे अगदी सर्वोत्तम !
लाजोजी, मानलं ग बाई तुला
जबरदस्त कलाकार, निर्माती आहेस तू
माझा साष्टांग दंडवत स्विकारावा माते
लाजोजी, आपके चरणकमल कहां
लाजोजी, आपके चरणकमल कहां हैं??? दंडवत घालना चाहती हुं.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
खरंच हे सगळे पदार्थ खरेच वाटतायेत. अप्रतिम कलाकृती!!!
लाजो भन्नाट आयडिया आणि सगळ्या
लाजो भन्नाट आयडिया आणि सगळ्या मिठाया खर्या वाटतायत अगदि! महान आहेस तु.
अप्रतिम!
अप्रतिम!
अगं कसली भन्नाट आहेस तू जबरीच
अगं कसली भन्नाट आहेस तू
जबरीच बनलीये सगळी मिठाई... अंगूर मलईचा फोटो मी परत परत बघतेय खोटी अजिबात वाटत नाहीये.
सुपरहिट आयटम मस्त आहेत..
सुपरहिट आयटम
मस्त आहेत..
साबण? व्याआआआअ मला वाटलं नवीन
साबण? व्याआआआअ
मला वाटलं नवीन रेस्पिच आली....
गेला बार (साबणाचा नाय स्पर्धेचा) आणखी वर वर गेला![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
१ नंबर!
१ नंबर!
क्या बात है! अप्रतिम!
क्या बात है! अप्रतिम!
लाजोताई, साष्टांग नमस्कार,
लाजोताई, साष्टांग नमस्कार, तुमच्या चिकाटीला. एवढे कष्ट तर मी खरेखुरे खाण्याचे पदार्थ करण्याकरीता सुद्धा घेत नाही![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजोजी, आपके चरणकमल कहां
लाजोजी, आपके चरणकमल कहां हैं??? दंडवत घालना चाहती हुं >>>> +१०००
वॉव काय मस्त आहे. बासुंदीवरचं
वॉव काय मस्त आहे.
बासुंदीवरचं केशर पिस्ता पावडर अप्रतीम. आणि चांदीच्या भांड्यांत ठेवून काढलेले फोटो ....! भारी भारी!
__/\__
__/\__
टू गुड!!
टू गुड!!
छान
छान
महान !!! एकच लंबर ! लाजो तु
महान !!! एकच लंबर !
____/\____
लाजो तु खरच माबो ची मास्टर शेफ आहेस
तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे >>> नशीब आंघोळीची सोय नाही ते... नाहीतर अश्या मिठास ने मुंग्या यायच्या![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
टू गुड! माझ्या आवडत्या
टू गुड! माझ्या आवडत्या पहिल्या पाचात!
लाजो, खरंच अगदी साष्टांग
लाजो, खरंच अगदी साष्टांग नमस्कार! काय तुझी कलाकारी. अ..प्र्..ति..म...! साबणातुन मिठाई सुचणे म्हणजे आयडियाची कमाल आहे अगदी.
खूप छान.
खूप छान.
लाजो धन्य आहेस. तुला साष्टांग
लाजो धन्य आहेस. तुला साष्टांग नमस्कार. खुप छान कल्पना आणि बघुन तर तोपासु.
भाsssssरी एकदम
भाsssssरी एकदम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तोंपासु स्पर्धा असती तर
तोंपासु स्पर्धा असती तर बक्षिस तुलाच मिळालं असतं असं माझ्या लेकीने सांगायला सांगितलंय.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सह्ही , बासुंदी आणि अंगुर
सह्ही , बासुंदी आणि अंगुर मलाई तर निव्वळ अप्रतिम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सायो, तोंपासु स्पर्धाच आहे ना
सायो, तोंपासु स्पर्धाच आहे ना ? मतदान पद्धतीने विजेते निवडायचे आहेत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगो, हो का? मी नियम वाचलेले
अगो, हो का? मी नियम वाचलेले नाहीत याचा अर्थ![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
महान...खूप आवडलं......
महान...खूप आवडलं......
Pages