|| जय श्री गणेश ||
'मिठास'
असं म्हणतात की मिठाई खल्याने बोलण्या -,वागण्यातही एक मिठास येते म्हणुन आम्ही खास मिठाईभरलं तबकच वाढुन आणलय तुम्हां करता... आपल्या आवडीची मिठाई उचला अन गट्टम करा
श्री गणेशाच्या कृपेने 'मिठास' पुर्या माबोवर पसरू द्या
उपलब्ध मिठाई:
काजू कतली,
पिस्ता बर्फी,
रोझ फ्लेवर्ड बर्फी,
चॉकलेट मावा बर्फी,
तिरंगा बर्फी,
केशरी पेढे,
बासुंदी आणि
अंगुर मलाई
मिठाई बनवण्यासाठी वापरलेले जिन्नसः
हो, विविध प्रकारचे साबण
यात अंघोळीचा साबण हा मुख्य जिन्नस आहे. त्यासोबत हॅंड वॉश लिक्वीड्स, कपडे धुण्याची पावडर वापरली आहे. रंगांसाठी क्रेयॉन्स आणि पोस्टर कलर्स वापरले आहेत. केशर बनलय केशरी धागा आणि त्यावर थोडा लाल रंग लावुन. वर्ख सिल्वर फॉईल चा आहे. साधे प्लॅस्टिक चे डब्बे, मुदाळं आणि स्टील ची ताटली मोल्ड्स म्हणून वापरली आहेत.
कृती:
साबण आधी किसुन घेतला. त्यात थोडे पाणी घालुन मावेमधे गरम केला. मोल्ड मधे घातला आणि मोल्ड फ्रिझर मधे टाकला. रंगित साबणासाठी किसलेले क्रेयॉन्स / पोस्टर कलर्स साबण मावेमधे घालण्याआधी किसलेल्या साबणात मिसळले.
अश्याप्रकारे विविध मोल्ड्स बनवुन घेतले अणि मग त्याच्यावर सिल्वर फॉइल, क्रेयॉन्स चा चुरा वगैरे घालुन सजवले आहेत.
अंगुर मलाईकरता पांढर्या रंगाचा हॅंड वॉश आणि पांढरा रंग व पाणी मिसळुन दूध बनवले आहे आणि अंगुरी म्हणजे अंघोळीच्या साबणाचे गोळे आहेत
बासुंदी बनवण्याकरता पिवळसर रंगाचे हॅंड वॉश वापरले आहे. दाटपणा येण्यासाठी त्यात वॉशिंग पावडर मिसळली आहे. सर्व नीट फेटुन घेतले आणि वाटीत ओतले. त्यावर दोर्याचे केशर आणि क्रेयॉन्स ची पिस्ता पावडर घातली आहे.
यात वापरलेले सर्व जिन्नस साबण म्हणुन परत वापरता येतिल त्यामुळे नासाडी होणार नाही की फुकट जाणार नाहीत आणि अडगळीत पडुनही रहाणार नाहित.... तेव्हा रियुज & रिफ्रेश
तर मंडळी मिठाई खाऊन झाली की हात आणि भांडी धुण्याकरता साबणाची सोय केलेली आहे
शाब्बास.... अप्रतिम कलाकारी
शाब्बास.... अप्रतिम कलाकारी![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अगं बाई! तों.पा.सु. म्हणजे
अगं बाई! तों.पा.सु. म्हणजे लाजो, खरं असो किंवा खोटं, तू मास्टर शेफ!
फारच सुंदर!
फारच सुंदर!
जबरीच.. लाजो तू नेहमीचे
जबरीच..
लाजो तू नेहमीचे पदार्थ पण भन्नाट करतेस.. हे तर अजूनच भन्नाट झालय..
व्वा तों.पा.सु
व्वा तों.पा.सु![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर !!! पदार्थांबरोबर सजावट
सुंदर !!! पदार्थांबरोबर सजावट ही अप्रतिम दिसतेय !
अहाहा, भारी. कोणतीच मिठाई
अहाहा, भारी. कोणतीच मिठाई खोटी वाटत नाहीये.![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
एक प्रश्न विचारु? आता इथे फोटो टाकून झाल्यावर हीच मिठाई अंघोळीकरता वापरणार ना?
_____/\_____
_____/\_____
भारीच्चे ही आयडिया! एकदम
भारीच्चे ही आयडिया! एकदम खर्रीखुर्री मिठाई दिसतेय. अंगुरी मलाई विशेष आवडली.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो, हटकी कल्पना..छान झालेत
लाजो, हटकी कल्पना..छान झालेत सगळे पदार्थ.
सुवासिक मिठाइ चक्क सही दिसते
सुवासिक मिठाइ चक्क
सही दिसते आहे प्रत्येक गोष्ट.
वा पुन्हा एकदा सिक्सर!!!
वा पुन्हा एकदा सिक्सर!!! सुंदर कल्पनांचा कल्पकतेने वापर.
साष्टांग ______/\______ सगळे
साष्टांग ______/\______![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळे फोटो बघत असताना लाळ टपकत होती, सहावा/सातवा फोटो उगाचच टाकला.
कोणतीच मिठाई खोटी वाटत नाहीये.>>>>>>सायो +१
लाजो, __/\__ ! महान आहेस तू.
लाजो, __/\__ ! महान आहेस तू. वरुन दुसरा मिठाई भरलेल्या ताटाचा फोटो आहे ना तो खरंच एखाद्या मिठाईच्या दुकानाची जाहिरात म्हणून शोभेल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
संयोजक, आता खरे पदार्थ बघितल्यावर टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, हँड वॉश, साबण, क्ले हेच डोळ्यांसमोर येतंय त्याचं काय करायचं ते सांगा !![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळ्या मिठाया खर्या वाटतायत
सगळ्या मिठाया खर्या वाटतायत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
लाजो भन्नाट आयडिया आणि मिठाई.
लाजो भन्नाट आयडिया आणि मिठाई.
Bhareeeeee!!! No 1!!!
Bhareeeeee!!! No 1!!!
लै भारी!
लै भारी!
संयोजक, आता खरे पदार्थ
संयोजक, आता खरे पदार्थ बघितल्यावर टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, हँड वॉश, साबण, क्ले हेच डोळ्यांसमोर येतंय त्याचं काय करायचं ते सांगा !
>>
+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
लाजो साष्टांग _/\_.. आधी मी
लाजो साष्टांग _/\_.. आधी मी बघितलं नव्हत की तोंपासु साठी आहे हे! एकदम खरी खरी मिठाइ वाट्तेय..![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
सगळे फोटो बघत असताना लाळ टपकत होती, सहावा/सातवा फोटो उगाचच टाकला >> +१
तोंपासु लाजो !
तोंपासु लाजो ! -----------/\---------------
ऊफ्फ ! काय म्हणावं तुझ्या
ऊफ्फ ! काय म्हणावं तुझ्या कल्पनाशक्तीला!!! हॅट्स ऑफ.
नेहेमी तुझ्या सगळ्या पाककृती
नेहेमी तुझ्या सगळ्या पाककृती "बघते",वाचते,सांगायचं रहातंय,अतिशय निगुतिनी आणि आकर्षक करतेस्,तुझं मनापासून कौतुक!,वरचं ताटही अप्रतिम.नेहेमी अशीच उत्साही रहा,ही गणपतीला प्रार्थना!
_/\_ अफलातून. इतर प्रवेशिका
_/\_ अफलातून. इतर प्रवेशिका बघून कोणाला मत द्यावे हा संभ्रम होता..तुम्ही तो संभ्रम दूर केलात, अभिनंदन!
लाजो. आयडीयाची कल्पना लय
लाजो.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
आयडीयाची कल्पना लय भारी!
तू तर हे फोटोज् मिठाईच्या रेसिपी धाग्यात घालू शकशील
झक्कासच!
ओह माय गॉड !! कमालीच्या सुंदर
ओह माय गॉड !!
कमालीच्या सुंदर दिसतायत मिठाया!! मानलं तुला!!
माझ्यासमोर असे ताट आले असते
माझ्यासमोर असे ताट आले असते तर मी हे सगळे पदार्थ खाल्लेच असते !
लाजोतै, साष्टांग नमन...... म
लाजोतै, साष्टांग नमन......![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
म हा न ! एकही मिठाई खोटी वाटत नाहीये.
<< संयोजक, आता खरे पदार्थ बघितल्यावर टूथपेस्ट, शेव्हिंग क्रीम, हँड वॉश, साबण, क्ले हेच डोळ्यांसमोर येतंय त्याचं काय करायचं ते सांगा ! >> +१००००००००
महान!
महान!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव.
वॉव.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
Pages