चित्र बोलते गुज मनीचे - (काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा) - प्रकाशचित्र क. ३ (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 7 September, 2012 - 11:59

Zabbu_007.jpg

स्पर्धेचे नियम व अटी :-

१. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता मायबोलीचे सभासदत्व अनिवार्य आहे.
२. प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३. वरील प्रकाशचित्रावर स्वरचित चारोळी पाठवायची आहे. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
४. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
५. प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
६. प्रवेशिका दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशीपर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) पाठवू शकता
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंग्या Proud
बर तर बर
कुण्या भवानी सोबत चाललाय योगेश जगताप असे नाही म्हटले Proud

भुंगा, हे खरं गूज चित्राने सांगितलेलं. प्रचिमधली प्रत्येक बारीकसारीक वस्तू महत्वाची असते. मग वॉटरमार्क विसरून कसं चालेल? Proud

नाही होडी, दिसतही नाही घोडागाडी
चालणार किती? दुखून आले पाय
असशील जर खरा प्रियकर माझा
मला खांद्यावर उचलून घेशील काय?

मृण्मयी , भुंगा व मंजूडी यांच्यामधे १ला नं विभागून द्यायला काहीच हरकत नसावी.....

आता बाकींच्यामधे ठरवा - २रा व तिसरा.....

हाईला!! ही स्पर्धा आहे???
मला वाटलं की हा खेळ आहे.
वर वाचलं पुन्हा एकदा.
असो.
आता जरा शिरेस व्हावे लागेल. Wink

ही चारोळी बदलणार नाही मामी,
सवाल माझ्या प्रतिभेचा आहे
फक्त जरा शु.ले. सुधारलं
कारण ही स्पर्धा आहे Proud

किनारी पून्हा पून्हा भेटताना,
क्षितीज कॅन्व्हास होऊ पाहतो,
तूझी पावले चालत राहतात,
अन मी गप्पा नव्याने रंगवत बसतो..

वाळूत कोरले, ते नाव आठवणींचे
चालता किनारी, वेचिले शिंपले प्रेमाचे
ओलांडूनी लाट, लागले वेध क्षितीजाचे
असतील सांजवेळी, हातात-हात एकमेकांचे

तुझ्यासवे पावले ती हलकीच ठेवताना

भावनांचे ठसे खोल रुताया लागले..

कसा रंग बदलला अशांत सागराचा

कि डोळ्यातील मोती आज हसाया लागले.

अथांग सागराची सदैव प्रीत किनार्याशी
निखळ असती नाते त्यांचे काळनिरपेक्षी
होईन मी किनारा होशील का तू लाट
आपुल्या प्रीतीची मग निनादत राहील गाज

तुझ्या त्या लाटावर लाटा ,दाखविति मला जीवनातल्या वाटा
तुझे ते दूरदूर पसरणे आणि माझ्याजवळ राहणे
आहे विशाल मन तुझे
केले मी तुला माझे.

"असे कसे सांग राजा शुभ्र सागराचे पाणी?
आकाशाचा निळा रंग चोरला रे सांग कोणी?"

"तुला पाहून भुलले आणि धावले जिंकाया.
दोघांनीही दिला रंग, तुझ्या वस्त्रालाच राणी."

असशील जर खरा प्रियकर माझा
मला खांद्यावर उचलून घेशील काय?
>>>>>>

मंजुडी Rofl

हा म्हणजे पार प्रियकराला वाळूत गाडण्याचा प्लान आहे Biggrin

मी एक पसरट भांड्यातील राजकुमार,
जो दूर क्षितिजाकडे पाहतो..
जशी किनार्‍याची साथ सागराला,
तसा तुझ्यासोबत राहतो..!

Pages

Back to top