चित्र बोलते गुज मनीचे - (काव्य-प्रकाशचित्र स्पर्धा) - प्रकाशचित्र क. ३ (मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत)

Submitted by संयोजक on 7 September, 2012 - 11:59

Zabbu_007.jpg

स्पर्धेचे नियम व अटी :-

१. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता मायबोलीचे सभासदत्व अनिवार्य आहे.
२. प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्‍या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३. वरील प्रकाशचित्रावर स्वरचित चारोळी पाठवायची आहे. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
४. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
५. प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
६. प्रवेशिका दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशीपर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍याची प्रमाणवेळ) पाठवू शकता
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

किनाऱ्याने चालताना रात्र सरली दिवस आला
खळाळत्या लाटांचाही क्रोध अग्नी शांत झाला
मी म्हणालो, चल प्रिये घरी काळजीत असतील सारे
पण तिने मजपुढे मांडले ओंजळितले चंद्र तारे

चारोळी
----------------------------------------------------
हा किनारा संपला तरी, तू सोबत चालत रहावेस
मन भरून येणार्‍या लाटेस, तू सहज कवेत घ्यावेस
हा जन्मही मी दिला तुला तू तुझेही रंग भरावेस
एकाकी या आयुष्यास तू सुखाचा किनारा व्हावेस.

मला काय हवंय ? खरंच देशील ?
एक शब्दं प्रेमाचा
तुझं एक हळुवार स्पर्श
जो देईल आधार मला जगण्याचा

उचंबळूनी नभाकडे लहर झेपावता
वाटले दोघांतले मिटले अंतर
आहेस बरोबर की आभास नुसता?
की, साथ आपुली क्षितिज समांतर?

मृण्मयी, Rofl

एक भो.भा.प्र. : टीपी म्हणजे काय? Wink

आ.न.,
-गा.पै.

वि.सू. : चपला म्हणजे काय हा भोभाप्र कोणी विचारू नये. एकाने गाय मारली म्हणून दुसर्‍याने वासरू मारायचं की काय! Biggrin

गर्जणार्‍या लाटा अन मउमउ रेती
जादुई निळाई दाटली सभोवती
मी तुला अन तू मला सोबती
वाट ही प्रेमाची दे हात हाती

मृ Lol

ते उंच खुले आकाश, भवतीने पाणी
देशील अशी तू साथ,मलाही राणी
उमटवू आज वाळूत ठशांची नक्षी
चल उचल पावले,घरास गेले पक्षी..!

हा सागर किनारा अन तुझी साथ!
उमटतात पाऊले आपली रेतीवर आज
कातर-क्षण हा असाच गोठावा
मी तुझी अन तू माझा उभा जन्म सरावा!!!

अथांग सागराच्या अथांग लाटा
माझ्या जीवनात तुझाही वाटा
आयुष्यभर ठेऊ एकमेकाची संगत
एकमेका हेच तर नाही ना सांगत....

चालताना सागरतीरी,गती घेतली पाउलांनी
किनाऱ्यास भिजवती लाटा, गतस्मृतींच्या आठवांनी
साथ तुझी असता, प्रत्येक नक्षत्र होईल स्वाती
भटकू असेच युगान्तापर्यंत,शोधण्या शिंपल्यातील मोती

वाळूवरून चालताना चिकटते ती पायांना, धरू पहाते
काहीच नाही तर पाउलखुणा उमटवून घेते
चालता चालता तळपायांसारखीच मने होतात निबर, जशी उलटतात वर्ष
वाळू मात्र जपून ठेवते, खोल कुठेतरी, ती पदचिन्हे, तो स्पर्श.

या सांजवेळी समुद्राच्या साथीनं,करुया प्रवास भविष्याचा
लाटा उसळ्ती समुद्राच्या,अधिकच मनाच्या..
पण प्रवास हा क्षितीजापलीकडील ध्येयाचा..
नित्य नव्याने स्वतःला शोधण्याचा.

फोटोत दिसणार्‍या "योगेशच्या (जिप्सी) वॉटरमार्कला स्मरून" एक चारोळी :

सागरतीरी दोघे आपण,
विसरून सारे व्याप-ताप
वाळूवरती लोळत पडलाय........
फोटोग्राफर योगेश जगताप Proud Wink Light 1

Pages