स्पर्धेचे नियम व अटी :-
१. या स्पर्धेत भाग घेण्याकरीता मायबोलीचे सभासदत्व अनिवार्य आहे.
२. प्रवेशिका पाठवण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१२' ह्या गृपचे सदस्यत्व घ्यावे लागेल त्याकरता या पानाच्या उजवीकडे दिसणार्या 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या निळ्या शब्दांवर टिचकी मारा नंतर 'सामील व्हा' या शब्दांवर टिचकी मारा. आता आपण 'मायबोली गणेशोत्सव २०१२' या गृपचे सभासद झाला आहात.
३. वरील प्रकाशचित्रावर स्वरचित चारोळी पाठवायची आहे. काव्य कुठल्याही वृत्तात, कुठल्याही छंदात चालेल, मात्र फक्त चारच ओळी.
४. एक सदस्य एका प्रकाशचित्राकरता एकच प्रवेशिका पाठवू शकतो.
५. प्रत्येक प्रकाशचित्राच्या खाली प्रतिसादात, त्या त्या चित्रावरच्या चारोळ्या लिहावयाच्या आहेत.
६. प्रवेशिका दि. २९ सप्टेंबर २०१२, अनंत चतुर्दशीपर्यंत (अमेरिकेच्या पश्चिम किनार्याची प्रमाणवेळ) पाठवू शकता
७. या स्पर्धेकरता परीक्षक मंडळ नेमण्यात येईल.
८. स्पर्धेचा अंतिम निकाल अनंत चतुर्दशीनंतर काही दिवसात जाहीर करण्यात येईल.
भुंग्या नाही रे,
भुंग्या


नाही रे, किनार्यावरची वाळू भुसभुशीत नाहीये, तो प्रियकर प्रेयसीला उचलून घेतल्यामुळे पडला बिडला तर फारतर हाडं मोडतील त्याची दोनचार, पण गाडला बिडला जाणार नाही
फोटोतली प्रेयसीही तशी नाजूक दिसतेय आणि किनार्यावर कोणी चिटपाखरूही नाहीये
शांत संध्या, सोबतीला सागराची
शांत संध्या, सोबतीला सागराची गाज
जोडीने चालावे तुझ्यासवे आज
वाटते असावी साथ जन्मभराची
हृदयी सतत हाच नि:शब्द आवाज
पहिल्यांदा दोघे इथे आलो
पहिल्यांदा दोघे इथे आलो तेव्हा
वाळूत रुतलेली पाऊले होती आसक्त,
आज मला कळतच नाही...
मी तृप्त आहे की विरक्त.
पुढे धावणार्या काळाला हवं
पुढे धावणार्या काळाला हवं तेंव्हा मागे खेचून,
थोड निवांत जगायचं आहे...म्हणुनच
वाळूत उमटलेल्या आपल्या पावलांच्या ठशांना,
मला वेचून बरोबर न्यायचं आहे.
वाळूवर उमटलेल्या पाउल
वाळूवर उमटलेल्या पाउल खुणा
लाटांसह अलगद वाहूनही जातील...
पण सागराच्या साक्षीने टाकलेली पावले
सदैव अशीच सोबत रहातील...
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका
मुदत संपल्यामुळे प्रवेशिका स्वीकारणे बंद करत आहोत. आपल्या भरघोस प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!!!
Pages