तों पा सु- फॅन्सी डायनिंग- सायो

Submitted by सायो on 26 September, 2012 - 12:49

sayuri clay art 1.jpgsayuri clay art 2.jpgsayuri clay art 4.jpg

साहित्यः

प्लेटमधील खाद्य पदार्थांकरता: पॉलिमर क्ले, लिक्विड पॉलिमर क्ले, क्लिअर ग्लू, कलर्ड चॉक्स
बाटलीतल्या रेड वाईनकरता: क्लिअर ग्लू आणि कलर्ड चॉक्स.

प्लेटमधील पदार्थः
बेक्ड ब्रेड, मेल्टेड बटर, फ्रूट टार्ट ( चेरीज, किविज, स्ट्रॉबेरीज), टर्की स्ट्रिप्स विथ ग्रेव्ही, मॅश पटेटोज विथ ग्रेव्ही, वेजिटेबल्स

हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत. ह्या आधीही तिने आवड म्हणून क्लेपासून खाद्यपदार्थ बनवलेले असल्याने ह्या वेळेला गणेशोत्सवाकरता करतानाही तिला मजा आली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सह्ही!!! हे पाहून मलाही काहीतरी करायची इच्छा होतेय Happy पण क्ले आणण्यापासून तयारी लागेल्...

यातला एकही पदार्थ खोटा वाटत नाहीये Happy
खुप सार्‍या शाबासक्या तिला Happy
पुन्हा पुन्हा न्याहाळले मी पदार्थ की काही तरी खरं असेलच नक्की म्हणत Happy

वॉव काय अमेझिंग दिसतीय प्लेट.. डिटेल्स भारी दाखवले आहेत. खूप आवड्या!!
लेकीला कौतुक कळव नक्की! Happy

सशल, एवढ्या कॅलरीज ऑलरेडी जाणारच आहेत तर बटर स्टिकनेच काय घोडं मारलंय हा विचार असावा त्यामागे Happy
शाबासकी कळवली.

अप्रतिम सुंदर दिसतायत! शाब्बासकी नक्कीच. शिवाय सगळ्यात लहान स्पर्धक म्हणून एक स्पेशल बक्षीस हवंच. Happy

हायला मला वाटलं ती बाटलीतली वाईनतरी खरी असेल Wink

सहीच जॉब आहे बाबा...मस्तच..खूप सारं कौतुक लेकीचं....

>> जेवणाबरोबर अख्खी बटर स्टीक
हे ठेवण्यासाठी तरी प्री टीएनेज व्हावसं वाटतंय मला... Wink

हे पदार्थ मी केलेले नसून माझ्या १२ वर्षाच्या मुलीने केलेले आहेत>>> ग्रेट!! मोठी शाबासकी तिला
मो +१

Pages

Back to top