मला चुकीची ऐकू आलेली गाणी

Submitted by परदेसाई on 15 July, 2008 - 02:53

काही वेळा असं होतं की एकादं गाणं डोक्यात बसतं पण त्याचे काही शब्द कळतच नाहीत. किंवा ऐकू येतात पण वेगळेच येतात आणि ते तसेच आहेत असा आपला समज होतो. इथे आपले गैरसमज लिहावेत.

या आधीची गाणी ईथे पहा.

जिहाले-मस्तीची माहीती...
नवीन चर्चा
जूनी मायबोली

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>परवा कुठल्या मूड मधे होतो आठवत नाही

अहो, झोपेच्या मूडमध्ये असाल Happy

परवा एका बा.फ.वर एका सिग्नेचरमध्ये रेखा भारद्वाजच्या "ससुराल गेंदा फूल" गाण्याची ओळ वाचली. हे गाणं मी प्रथम "ससुराल गेंडा फूल" असं ऐकलं होतं. सासर्याला गेंडा आणि मूर्ख वगैरे म्हणतेय की काय असं वाटलं कारण आजकाल काय गाणी ऐकावी लागतील माहित नाही. परवा असंच एक गाणं ऐकलं, पिक्चर वगैरे माहित नाही. 'राणाजी मारी सौतन लाये" असं काहीतरी होतं. पण लिरिक्स मस्त होती. उदा. "जैसे दूरदेशके टॉवर मे घुस जाये एरोप्लेन", ""जैसे सरे आम इराकमे जाकर बस गये अंकल सैम" असं काहीतरी.

असो. तर ह्या गेंदा (म्हणजे झेंडू ना?) फुलाचा सासरशी काय संबंध आहे कोणाला माहित आहे का?

"ससुराल गेन्दा फूल " हे छत्तिसगढी लोकगीत आहे. गेन्दा फूल म्हणजे भरगच्च परिवार. म्हणजे "माझं सासर झेन्डु च्या फूलाच्या पाकळ्यांसारखं लोकांनी गजबजलेलं आहे. त्यात एकी आहे, प्रेम आहे, थोडा त्रास आहे पण झेन्डु फूला सारखेच माझ्या घरात बोचतील असे कुठले ही काटे नाहित." त्यात पूढे खूप सुंदर शब्दात घरातील सगळ्या लोकांच्या सदस्यांच्या स्वभावाचं वर्णन आहे.

माझ्या कडे ह्या गाण्याची केसेट आहे. हे प्रसून जोशी ने अगदी चाली सकट शब्दशः चोरलेलं गाणं आहे.

========================
कुछ पढके सो ...कुछ लिखके सो
आज जागा जहां, उससे कुछ बढके सो

अय्या कित्ती मज्जा आहे ईथे..
मला एक गाणे आटवते . मला ते असे चुकिचे ए॑कु यायचे :
राजसा जवळि जरा बसा जीव हापुसा (आम्ब्यावाणी...) तुम्हाविण बाइ.
कोणता करु शिणगार सान्गा तरि काहि..राजसा.. आ आ आ

माझा दादा सगळे गाणि मुद्दामुन अशी म्ह्ननायचा..
घनश्याम उन्दरा मूशका अरूणोदय झाला
उटी लवकरी भजा पळवी पळवी .

कित्ती टान्गु मि टान्गु कुणाला ? आज आनन्दि आनन्द झाला.

शु कर तारा मन्दा घालिल वारा.

धमयंतीनी षटकाराचीही हॅटट्रीक केली :हाहा::हाहा::हाहा::हाहा::हाहा::हाहा::हाहा:
~~~~~~~~~~~~~~~~~~
की घेतलें व्रत न हे अम्ही अंधतेने
लब्ध-प्रकाश इतिहास-निसर्ग मानें
जें दिव्य, दाहक म्हणुनि असावयाचें
बुद्ध्याचि वाण धरीलें करिं हे सतींचे .

आंबुआ के डालीपर गाये मतवाली, कोयला काली निराली....

हे गाणे एकून गाय आंब्याच्या झाडावर कसी गेली? असा बालसुलब मनाला प्रस्न पडायचा.... Happy
मी हे सर्व वाचून प्रचन्ड हसले...

मराटी लिहिताना काही चुका झाल्या आहेत.. क्षमस्व...

अपर्णा.

'दिल से' च्या "जिया जले" मधल्या तामिळ ओळींची सुरुवात मी "उंदिर मारे, कुत्तर मारे" अशीच ऐकत आलोय...

विष्णू तुम्हाला अनुमोदन. मागे मायबोलीवर एका सदस्याने त्याचे लिरिक्स देवनागरीत टाकले होते...

वा वा कार्यबाहुल्यामुळे मागच्या वेळेस तू टाळल्याचे आठवते आहे.धन्यवाद

अजून एक आटवले बघा ..

जादूगर भैय्या तोडो मोरी बैय्या हो गयि आधि रात अब मर जाने दो.

गम्मत गडे.

"हो गयि आधि रात अब मर जाने दो" दमयंती खासच!!

नको देवराया या गाण्यात एक ओळ आहे:

'हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियले'

मी ही ओळ 'हरिणीचे पाडस व्याघ्रे घरी गेले' अशी गुणगुणत असे.

काल सारेगम पाहताना जेव्हा या ओळीवर चर्चा झाली तेव्हा कळले खरे शब्द Happy

अमि Lol

मी ही ओळ 'हरिणीचे पाडस व्याघ्रे घरी गेले' अशी गुणगुणत असे.


>>>
हो ना वाघाच्या घरी मेजवानी होती अन तिला पाडसाची उपस्थिती अनिवार्य होती Proud

हुड!
दमे!
अमि!

काय रे हे? Happy

ते "जिया जले" आहे ना ते मला "खंजीर मारी....... है(हे हॅच्या स्टाईलने)... क्यो?" असं ऐकू यायचे.. कारण खान साहेबांनी नाच पण तसा साजेसा केला होता. आज अ‍ॅन्क्योमूळे मी मूळ शब्द वाचले.

आता मला प्रश्ण पडलाय की एवढ्या रोमँटिक ओळी अश्या का बसवल्या आहेत?

हे गाणे मला चुकी चे ऐकू जातय असे वाटतय की खरच चुकीचे ऐकू येतय हे माहित नाही पण...
"लगजा गलेसे मेनू "ठा" करके"...
यातले ठा मला आजीबात कळत नाही... तिथे नक्की "ठा"च आहे का???

हो..
तसंच आहे..
आजा लग जा गले से मेरे ठां कर के
हां ठां कर के हां ठां कर के
सारी दुनियां से इष्क बयाँ कर के
हां ठां कर के हां ठां कर के...
_______
सपनोंसे भरे नैना, तो नींद है ना चैना...

यातले ठा मला आजीबात कळत नाही... तिथे नक्की "ठा"च आहे का??? >>>

अहो ते गाणे पाहिले असेल ना तुम्ही... त्यात प्रत्येक जण टिकल्या उडविल्यासारखं बंदुकीच्या गोळ्या उडवत असतो.. मराठीत जसं बंदुकीने गोळी मारण्याला ठो ठो म्हणतात तसं हिंदीत ठा ठा म्हणत असावेत... म्हणून ठा ठा आहे ते.. Proud

म्हणून ठा ठा आहे ते>>> Happy

बाकीच्या गमती वाचून अजुन एक गम्मत आठवली..
जवळपास गाण्यांचा चॉईस सारखाच असणार्या आम्ही दोघी मैत्रीणी...
'भिगे होठ तेरे..' हे गाणे दोघिनाही सुरुवातीला तितकेच आवडले... पण जसे 'गाणे अख्खे ऐकायला मिळणे - ते पुनः पुनः ऐकायला मिळणे - ते पुनः पुनः ऐकणे - आणि ते पाठ होणे' हे घडत गेले तशी तिची त्या गाण्याबद्द्ल - "काहिहि इल-लोजिकल का ग लिहितात हे" अशी प्रतिक्रिया मला जेपेना...
वर म्हणे "एखादी ओळ नाही ना सुचली नीट तर मग यमक जुळवायला काहीही काय ना...
काला जादू करे - लंबे बाल तेरे याला काय अर्थ आहे..."
आता तर मला साफ काही कळेना... म्हणजे बाकी कोणत्याही ओळीला काही एक आक्षेप नाही अन यात काये???
त्यात तिचे पुढ्चे वाक्य - अन मला हसुन हसुन वेड लागल...
"आणि त्यातला हिरो हि छान नसला तरी काळा नाहिये... हे म्हणजे अगदी बाजीगर मधल्या काजोल ला- ये गोरे गोरे गाल गायल्या सारखे आहे पण तिथे बरे की पुढ्च्या ओळीला त्याचा संबंध तरी होता-इथे हे ही नाही"
---
आणि तिचे इतके संभाषण ऐकून माझी पेट्ली...
मॅडम ना - "(काला जादू) करे" ऐवजी "(काला) जादू करे" वाटत होते....

दोन दिवसांपूर्वीच माझा एक मित्र गाण गुणगुणत होता..
सहज सख्या एकदाच येई गच्चीवरी..
त्याला सांगीतलं.. गच्चीवरी नाही, सांजवेळी.
तर म्हणतो 'अरे शब्दांपेक्षा भाव महत्वाचा'. Uhoh

ये क्या बोलती तु..... .. ..
आती क्या खंडाला.

हे गाण जेंव्हा पहिल्यांदा ऐकले ... ते असे ..

ये क्या बोलती तु..... .. ..
हाथी का अंडा ला. Happy

माझे बाबा 'सखी मन्द झाल्या तारका' हे गाणे गमतीने 'मतीमन्द झाल्या बायका' असे म्हणत.

मीच तो...
हे घ्या परत एकदा....

http://www.bollywhat.com/lyrics/dilse_lyr.html

अर्थ पण दिलाय गाण्याचा....

अन्क्या, ते लिरिक्स पूर्वी अस्सल देवनागरीत होते. तू दिलेल्या लिन्कमद्ये ते इन्ग्रजीतच आहे.

akshree, धन्यवाद माहितीबद्दल! Happy
दमयंती.....अफलातून Happy

robeenhood, छैया छैया च्या अर्थामध्ये काही गडबड झाली आहे का हो? उदा. गुलपोश कभी इतराये कही, महके तो नजर आ जाये कही ह्याचा अर्थ असा दिला आहे.

Sometimes (my beloved) flirts like a flower
so fragrantly that you may see her scent.

पण मला वाटतं त्याचा अर्थ असा असावा....फुलं कधी आपल्या सौदर्याच टेंभा मिरवत नाहीत्....त्यांचा सुवास त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करुन देतो.

तसंच (vo yaar hai jo imaam ki tarah) मला वाटतं हे "इमाम" नसून "इमान" आहे. म्हणजे इमानाइतकाच प्रिय....

बाकी जिया जले मधल्या त्या दाक्षिणात्य भाषेतल्या ओळींचा अर्थ मात्र सुरेख आहे. त्या ओळी ऐकून वाटलं नव्हतं.....

चुराके दिल मेरा गोरीया चली.. मला गोरील्ला वाटायचं, कदाचित सुनील शेट्टीमूळे असेल.

*************************************************
मला शत्रूंची गरज नाही. माझे मित्रच त्यासाठी पूरेसे आहेत.

Pages