रांगोळी पोर्ट्रेट्स

Submitted by अश्विनी के on 27 August, 2012 - 11:48

रांगोळी पोर्ट्रेट्स काढायला लागले तेव्हाच्या सुरुवातीच्याच पहिल्या दोन रांगोळ्या.

१) बाबा आले.....

हे पोर्ट्रेट माझे रांगोळी प्रकारातील पहिले पोर्ट्रेट आहे (कळतंच आहे ते Proud ) टेक्निकल बाबी काहिच माहित नसल्याने डायरेक्ट जमिनीवर आणि तेही चौरस न आखता काढलं होतं साध्या फळ्यावरच्या खडूने काढून मग रंगवलं होतं. प्रोफेशनल कलर्स वापरले नव्हते. फोटो काढेपर्यंत रांगोळी हलली गेली आहे. तरी गोड मानून घ्या Happy जुन्या मायबोलीवर काही दिवस टाकली होती.

BABA AALE.JPG

२) स्वामी विवेकानंद -

यातही प्रोफेशनल कलर्स वापरलेले नाहीत. यावेळी खाली ब्राऊन पेपर चिकटवला असल्याने रांगोळी जास्त हलली नाही. चौरस काढून पेन्सिलीने स्केच काढून मग त्यावर रांगोळी घातली आहे.

SWAMI VIVEKANAND.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वॉव!

खूप सुन्दर आहे अश्विनी, पहिला-दुसरा प्रयत्न अजिबात वाटत नाही, व्यावसायिक प्रशिक्षण मिळाले तर नक्की घ्या, कुठल्या कुठे जाल Happy

अभिप्रा, तुमच्याकडून ही दाद! धन्य झाले Happy या दिवाळीच्या आधी ठाण्यात जिथे प्रदर्शन भरते तिथे रांगोळी काढणं चालू असताना बघायला ठिय्या देऊन बसायचा विचार आहे.

अतिशय सुंदर, 'ही रांगोळी आहे' हे लिहिलं नसतं तर कळलच नसतं.
हातात अप्रतिम कला आहे, थांबवू नका.

हे कसे काय मिसले होते मी. Uhoh

सुंदरच!!! कसल्या सुरेख काढल्या आहेस रांगोळ्या.
मला साधी सरळ रेघ नाही काढता येत रांगोळीने. Sad

Pages