आर् डी बर्मन फॅनक्लब

Submitted by सशल on 18 August, 2012 - 01:55

आर् डी बर्मन अर्थात पंचम ह्यांच्या उमद्या संगीताबद्दल, त्यातल्या चांगल्या-वाईट गोष्टींबद्दल चर्चा .. Happy

विशेषतः जुनं संगीत ऐकलंच नाही, आवडतच नाही असं म्हणणं असणार्‍यांसाठी .. Wink

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजून येऊ द्या.. ऐकून बघेन म्हणते Happy त्यानंतरही नाही आवडली तर तो अर्थातच माझा दोष. आरडी बर्मन ला कमी लेखण्याची लायकी तरी आहे का माझी?

>>काढाकी. एसडी बर्मन काढा, कुंदनलाल सैगल काढा- कोणाचाही काढा. आम्हाला लाज नाही. आम्ही येऊच. :स्मित:>>
हेच म्हणतो. प्रत्येक संगीतकार कधी न कधीतरी तूफान आवडलेला आहे त्यामुळे जवळ जवळ प्रत्येक फ्यानक्लबमध्ये आम्ही असणारच. हाडाच्या श्रवणभक्ताला लाज नसते. Happy

आता यावर खुन्नस द्यायची म्हणून कुणी अन्नू फ्यान क्लब काढला ('देखो बारिश हो रही है, इट्स रेनिंग, इट्स रेनिंग') तर गोष्ट वेगळी. Proud

आरडीबद्दल काय म्हणायचं हा मोठ्ठा प्रश्न आहे कारण जे लिहीणं शक्य आहे ते सगळं म्हणून झालय.

'ओ माझी रे' मधले अफलातून बीट्स आणि किशोर. 'जाने क्या सोचकर'चे शब्द अधिक चांगले की संगीत?

'मेरे नयना सावन भादो'मध्ये किशोरचा आवाज किती वर जावा याला काही मर्यादा? (याबद्दल वाचलेली कथा : सुरूवातीला किशोर गायलाच तयार नव्हता मग आरडीनं लताकडून गाणं गाऊन घेतलं आणि ते किशोरला पाठवलं. त्यानं आठ दिवस प्रॅक्टीस केली आणि सचिन जसा एक पाय पुढे टाकून मॅग्राच्या गुडलेंग्थला परफेक्ट स्ट्रेट ड्राइव्ह मारतो - इतका परफेक्ट की मारल्यानंतर दोन सेकंद तो तसाच फ्रीझ होतो, या शॉटनंतर धावायची गरजच नसते - तसं अफलातून गाणं रेकॉर्ड केलं.) याबद्दल एक अघोर पातक माझ्या हातून घडलं. हेच गाणं कुमार सानूच्या आवाजत ऐकलं. याची शिक्षा नरकात मिळेलच. (शिक्षा म्हणून बहुतेक परत तेच १०० वेळा ऐकवतील. तोच नरकवास. )

'हम कम किसीसे कम नही' मधल्या गाण्याच्या काँम्पिटीशनमध्ये काय खतरनाक कॉम्बो आहे. रफी-किशोर-आशा-आरडी, अहाहा! (ऋषी क्यूट दिसायचा त्या काळात.)

चांद मेरा दिल - आ, दिल क्या, महफिल है तेरे, कदमोंमे आ - तुम क्या जानो, मुहब्बत क्या है - मिल गया, हमको साथी मिल गया*

http://www.youtube.com/watch?v=5INCEEMc3MA

नंतर रॉकीमध्ये आरडीनं परत असाच प्रयत्न केला. 'ये लडका हाये अल्ला' ची गोडी अजूनही कमी होत नाही.

'आप की कसम'च्या टायटल साँगला ड्रीम लाइक क्वालिटी आहे. सुपर्ब. 'जिंदगी के सफर मे' तर मेंदूवर टॅटू झालय.

'येक चतुर नार'सारखं गाणं परत होणे नाही.
http://www.youtube.com/watch?v=9HwrMGpFaik

---

* हे शेवटचं अब्बाच्या 'मामामिया'वरून घेतलं आहे.

रोशनच्या 'रहे ना रहे हम महका करेंगे' वरून बर्मनदांनी 'ठंडी हवाएं लहराके आए' दिलं. नंतर आरडी नं सागर किनारे.

>>रहें ना रहें हम - ममता : साल १९६६
ठंडी हवाएं - नौजवान : साल १९५१>>

Happy माझा क्रम चुकला बहुतेक.

जुना म्हणा , नवा म्हणा , ओरिजनल म्हणा नाही तर अन्नू मलिक म्हणा , आपल्याला तर बाबा आर डी आवडत राहीलच . अगदी त्याच्या गाण्याचा अल्बम सुद्धा आम्ही थेटरात जाऊन पाहिलाय . (झंकार बीट्स ला चित्रपट म्हणण जीवावर येत :))

आत्ता पटकन आठवलेली काही.

१ रिमझिम गिरे सावन
२. सपना मेरा टूट गया
३. रोज रोज आँखोतले - आशाचा आवाज म्हणजे नुसता मध आहे ह्या गाण्यात!
४. जाने क्या बात हैं
५. दो लफ्जोंकी हैं दिल की कहानी
६. वादियाँ मेरा दामन
७. तुमसे मिलके, ऐसा लगा तुमसे मिलके
८. पन्ना की तमन्ना
९. दो नैना, इक कहानी
१०. धन्नो की आँखोंमें

रिमझीम गिरे सावन- आधी किशोरचे ऐका, ते महान आहे, व्हिंटेज किशोर वगैरे. पण मग लताचे व्हर्जन ऐका, ज्याला आरडीने संपूर्ण वेगळी ट्रिट्मेंट दिली आहे, इतकी की ते एक वेगळेच गाणे होऊन जाते.
फार क्वचित असे झाले आहे की एकाच गाण्याचे लता व्हर्जन त्याच्या पुरुष आवाजातील व्हर्जनइतके चांगले वाटते, इतरवेळी पुरुष गायक लताला नेहमीच मात देतात (एहसान तेरा होगा मुझपर, चंदन सा बदन, तुम कमसीन हो, अशी अनेक)- हे श्रेय अर्थात आरडीचे.

सिली हवा छू गई, सिला बदन छिल गया!! ... लिबास (अप्रकाशित चित्रपट) लताचा आवाज आणि गाण्याला जी ट्रीटमेंट दिलिये ना ... !!

हमे तुमसे प्यार कितना.... बेगम परवीन सुलताना आणि किशोरदा - दोन्ही गाण्यांची चाल वेगळी, दोन्ही गाण्यांचा ढंग वेगळा पण दोन्हीही आवडती.

"आंधी" बद्दल तर काही बोलुच नये. ऑल टाईम फेवरेट!

मी ह्या फॅन क्लबात माझ्या जन्मापासूनच! Happy आई, मामा, आजोबा ह्यांना आर डी , एस डी प्रचंड आवडत असल्याने घरात नेहमीच चर्चा होत असत. त्यामुळे ही गाणी फार लहानपणापासून ऐकत आलेय. मला स्वतःला लता आणि आर डी हे काँबो , आशा आणि आर डी एव्हढंच आवडतं. लताने आर डी साठी गायलेली बहुतेक गाणी क्लासिकल बेस्ड आहेत, ज्यात तिचा आवाज खुलून येतो. वर सगळ्यांनी लिहिलेली गाणी ऑल टाईम फेव्हरीट आहेतच, अजून काही -

१. हाये वो परदेसी - बरसात की एक रात
२. अपने प्यार के सपने सच हुए - बरसात की एक रात
३. तूने ओ रंगीले कैसा जादू किया - कुदरत
४. तेरे बिना जिया जाये ना - घर
५. सावन के झूले पडे - जुर्माना
६. ए री पवन - बेमिसाल
७. कितनी खूबसूरत ये तस्वीर है - बेमिसाल
८. पन्ना की तमन्ना है के - हिरा पन्ना
९. बंगले के पीछे - समाधी
१०. ए सागर की लहरों - समुंदर
११. सिली हवा छू गयी - लिबास
१२. खामोश सा अफसाना - लिबास

धन्यवाद आगाऊ, चूक दुरुस्त केलीये Happy

मी पण हजेरी लावते Happy
वर बर्‍याच जणांनी बरीच आवडती गाणी दिलीच आहेत. मला 'कारवाँ' आणि 'अनामिका'ची गाणीही प्रचंड आवडतात.

क्या जानु सजन..होती है क्या गम की शाम
जल उठे सौ दिये..जब लिया तेरा नाम..

आयो कहा असे घनश्याम,,,
रैना बितायी किस धाम..

..जियो पंचम..जियो..

आरडी च्या प्रत्येक गाण्याचा इंट्रो मोठा असतो किमान १ मिनिट तरी सुरुवातीचे संगीत वाजत असते.. त्या नंतर गाण्याचे बोल सुरु होतात............. हरजाई मधले ..........तुझसा हसीन देखा ना कभी ......या गाण्यात इंट्रो झक्कास वाजवला गेला आहे..
.
http://www.youtube.com/watch?v=TqJS87M55Rg
.
इतक्या चांगल्या गाण्याची रणधीर कपुर नामक जोकर ने आचरट नाच करुन पार वाट लावुन टाकली आहे.. Sad

चांद मेरा दिल - आ, दिल क्या, महफिल है तेरे, कदमोंमे आ - तुम क्या जानो, मुहब्बत क्या है - मिल गया, हमको साथी मिल गया*

>> मी अगदी हेच लिहायला आले होते. एकाच गाण्यात ४ सुपर्हिट चाली! ते ऐकवून रावसाहेबांच्या "तसलं एक तान घेऊन दाखिव तू, मूळव्याध होतं का नाही बघ " असं काहीसं आताच्या अन्नू मलिक इ. भुतावळीला म्हणावेसे वाटते!! Happy

"अपने अपने" या चित्रपटात "अपने अपने से लगे हमे" हे एक सुंदर गाणं पंचमने दिलं होतं. लता आणि सुरेश वाडकरच्या आवाजातलं माझं एक आवडतं 'पंचमगीत'.

"जवानी" या एका चित्रपटात आशा आणि अमितकुमारचं "तू रुठा तो मै रो दुंगी सनम" हे त्याकाळी हिट ठरलेलं गाणं. टाळ्यांचा मस्त वापर केलाय यात पंचमनं.

"सनी मधलं "और क्या अह्दे वफा होते है" हे लता आणि सुरेश वाडकरच्या आवाजातली गजल देखिल मस्त जमली होती.

पंचमने "क्लासिकल" चाली दिलेल्या गाण्यांची एक यादी करुन टाकायला हवी. अगदी "घर आजा घिर आये बदरा" पासुन ते "पिया बावरी" पर्यंत. म्हणेज शास्त्रीय ते पाश्चिमात्य या रेंजमध्ये पंचम किती versatile होता याची जाणिव होते.

एखादं गाणं गाजलं की ते गाणार्‍या गायक/गायिकेला आणि संगीतकाराला आपण चटकन श्रेय देऊन मोकळे होतो....पण पडद्यामागे बरेच काही घडत असते....चाल तयार करण्यापासून अगदी तालवाद्य कोणती वापरायची, मधे मधे कोणते वाद्यतुकडे टाकायचे....वगैरे सगळं काही एक संगीतकारच करत नसतो.....तर त्यासाठी संगीत संयोजक, निष्णात वादक अशा सगळ्यांचा ताफा लागतो....
माझ्या माहीतीप्रमाणे एखाद दुसरा संगीतकार सोडला तर बहुसंख्य संगीतकार चाल देण्यापलीकडे फारसे काही करत नसतात...गाणं आपल्यासमोर जे नटून सजून येतं त्यात संगीत संयोजकाचा...काही लोक ह्याला सहाय्यक संगीतकारही म्हणू शकतात,,खूप मोठा हात असतो.

पडोसन मधील.. एक चतुर नार, कहना है, सावरिया सावरिया (मन्नाडे), शर्म आती है, मेरी प्यारी बिंदू

अमरप्रेम.. रैना बीति जाए, चिंगारी कोई भडके, ये क्या हुआ, कुछ तो लोग कहेंगे

मनोरंजन.. ओ मेरे दिलके चैन, आओ ना गले लगाओ ना, दिवाना करके छोडोगे, कितने सपने कितने अरमाँ

बाँबे टु गोवा.. देखा ना हाय रे सोचा ना, ओ महकी महकी ठंडी हवा

तीसरी मंझील.. तुमने मुझे देखा, ओ हसीना, देखीए साहेबो, आ जा आ जा

बुढ्ढा मिल गया.. रात कली एक ख्वाबमे, आयो कहाँसे घनश्याम, भली भलीसी एक सूरत

सध्या एव्हढीच! Happy

मी पण आरडी फ्यान !
अरे नुसती नावं देऊ नका , त्याला लि़ंक पण द्या की , आमच्यासारख्या आळश्यांची सोय होईल. Proud

गेल्या आठवड्यात इप्रसारण वर, आर्डी च्या संगीतातल्या शास्त्रीय रागांवर आधारीत, गाण्यांवर चांगला
कार्यक्रम झाला.

पुण्यातील आरडी पंख्यांसाठी खास माहिती:- आरडीवर अतीशय प्रेम करण्यार्‍या काही पंख्यांनी एकत्र येऊन बनविलेला www.panchammagic.org हा ग्रुप गेली १२ वर्षे आरडीच्या जयंती (२७ जून)आणि पुण्यतिथीला (४ जानेवारी )टिळकस्मारकमध्ये एक खास कार्यक्रम आयोजित करत असतो. यात आरडीबरोबर काम केलेले वादक,गायक,गीतकार,कलाकार,दिग्दर्शक,निर्माते येऊन आरडीच्या आणि त्याच्याबरोबर काम करतानाच्या आठवणी प्रेक्षकांबरोबर शेअर करतात. आत्तापर्यंत चित्रपट क्षेत्रातले अनेक चांगले लोक या कार्यक्रमाला येऊन गेले आहेत. शम्मीकपूर, गुलझार,भुपेंद्रसिंग,गुलशन बावरा,राज सिप्पी,उषा उत्थुप,उत्तमसिंग याशिवाय आरडीच्या टीममधले दिग्गज मारुतीराव कीर, मनोहारी सिंघ,होमी मुल्लाह्,फ्रांको वाझ,बासु चक्रवर्ती,कर्सी लॉर्ड,रमेश अय्यर,टोनी वाझ अश्या अनेक दिग्गज्जांनी या कार्यक्रमाला आत्तापर्यंत हजेरी लावली आहे. हे सगळेजण आरडीवर भरभरून प्रेम करणारे आहेत. आरडीविषयी बोलताना त्यांना किती बोलू आणि किती नको होते. त्यांच्या आठवणी ऐकल्यावर जाणवते की पंचम संगीतकार म्हणुन तर महान आहेच पण तो एक माणुस म्हणुनही किती साधा आणि महान आहे.हे लोक पंचम गेला असे मानतच नाहीत तो अजुनही आपल्या आजुबाजुला आहे या भावनेनेच त्याच्याविषयी बोलत असतात.यातच आरडीचे मोठेपण दिसुन येते.

रहे ना रहे हम वरून सागर किनारे घेतलेले आहे हे टीव्हीवरील मुलाखत पाहताना मी ऐकलेले आहे

प्रचंड अनुमोदन मयुरेश!!!
अप्रतिम कार्यक्रम सादर करतात त्या दिवशी.

माझी थोडी भर
१. मेरे जीवन साथी
२. लाखो मे एक : चंदा ओ चंदा (किशोर कुमार), तेच गाणे लता मंगेशकर
३. कटी पतंग
४. यादों की बारात
५. समाधी
६. जवानी दिवानी
७. अपना देश
८. नमक हराम

असे ऐकून आहे की एस डी बर्मनची अनेक गाणी आरडी नेच निर्देशित केली होती. विशेषतः ७० च्या दशकातील.

Pages