Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
भुंग्या निशाणा बदल
भुंग्या निशाणा बदल का?
>>>>>>>>>
अजिबात नाही........
ताजमहाल आहेच पण म्हणून काय बिबी का मकबर्याची तारीफ करू नये की काय
![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
भुंग्या महानेस
भुंग्या
महानेस ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कोण लीना भागवत??
कोण लीना भागवत??
कोण लीना
कोण लीना भागवत??
>>>>>>>>
मंजेतै......
अरे ये लीना भागवत को नही जानती
(पीएस्पीओ नही जानता स्टाईल
)
कोण लीना भागवत??>> गालाला खळी
कोण लीना भागवत??>> गालाला खळी पडणारी लिसन काकु का??![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
क्युट आहे ती.
हो झकोबा .. तीच ए लिस्सन ना
हो झकोबा .. तीच ए लिस्सन ना वाली..
ताजमहाल आहेच पण म्हणून काय
ताजमहाल आहेच पण म्हणून काय बिबी का मकबर्याची तारीफ करू नये की काय >> भुंग्या
थांब सांगते कमळीला किती टारगेट आहेत तुझे ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
काल खुप दिवसांनी मालिका
काल खुप दिवसांनी मालिका पाहीली![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
कुहु मस्त...एकच नंबर....लोक्स तुम्ही काहीही बोला ..कुहु रॉक्स
काल राव बहिण -भावाच्या संवादाने माझ्या डोळ्यात पण पाणी आल
आता घनाचा बॉस आनि आत्या अस अजुन एक गोष्ट सुरु होते की काय
आता घनाचा बॉस आनि आत्या
आता घनाचा बॉस आनि आत्या <<<
ते संभाषण कसलं जाम ऑब्व्हियस होतं. एकदम घडवून आणायच्चच्च टाइप्स....
आता घनाचा बॉस आनि
आता घनाचा बॉस आनि आत्या![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
>>>>>>>>>>>>>
कश्यपांचा बोका आणि काळ्यांची मनी
<<< ते संभाषण कसलं जाम
<<< ते संभाषण कसलं जाम ऑब्व्हियस होतं. एकदम घडवून आणायच्चच्च टाइप्स
अगदीच.
घनाचा बॉस म्हणून एखादा बरा
घनाचा बॉस म्हणून एखादा बरा माणूस सापडू नये यांना? आत्याला शोभला पाहिजे की! आत्या घनाच्या बॉसला निवडणार की राधाच्या पपांना हे अजून लक्षात येत नाहिये.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
अरे खरच उल्की आणि अंगदचे
अरे खरच उल्की आणि अंगदचे जमणार की काय? विनोद अगदीच अरसिक होता म्हणावा लागेल कारण मिशा वगैरे कारण असतं तर सुग्रीव... आपलं अंगदाच्या पण दणदणीत आहेत.
कुहु-ज्ञानाचा संवाद छान जमला काल.
ज्ञाना पहिल्यांदाच काहीतरी
ज्ञाना पहिल्यांदाच काहीतरी नॉर्मल वागत बोलत होता काल
अंगद्कश्शप. काय पण नाव आहे.
अंगद्कश्शप.
काय पण नाव आहे.![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तीन लग्नाची एक गोष्ट अस नाव
तीन लग्नाची एक गोष्ट अस नाव हवं होत
एवढ्या मोठ्या MNC कंपनीतल्या
एवढ्या मोठ्या MNC कंपनीतल्या manager च्या समोर एक जुनाट LCD आणि १९८५ सालचा सरकारी ब्यान्केतला जुनाट पिवळा पडलेला कीबोर्ड पाहून वारल्या गेलो आहे
पुनर्जन्मात पुढील प्रतिक्रिया देईन
एवढ्या मोठ्या MNC कंपनीतल्या
एवढ्या मोठ्या MNC कंपनीतल्या manager च्या
एमेन्सी सोडा बँक सोडुन इतरत्र नावाची पाटी टेबलावर ठेवलेली आजवर पाहिली नाहीय.. एमेन्सीत तर शक्यच नाही...
स्वप्ना +१ अरे पण लोकहो
स्वप्ना +१
तेव्हा न्युयॉर्क नावाची बिल्डींग असु शकते..कैच्याकै लॉजिक पण आहे खरं असं.
अरे पण लोकहो आमच्या कंपनीच्या पॅरिस ऑफिसमध्ये एका बिल्डिंगचं नाव चेन्नै आहे म्हणे
बायदवे, उल्का आत्याला तो अंगद अजिब्ब्बात सुट होणार नाही. ती मस्त स्मार्ट, गुडलुकिंग आणि हा कसला आहे. शेवटी हाच निवडायचा तर विनोद काय वाईट होता?![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विनोद आणि उल्का आत्याचं पटलं
विनोद आणि उल्का आत्याचं पटलं नसेल असं वाटत नाही त्यांच्या आत्ताच्या वागण्याबोलण्यावरून.
घनाच्या कंपनीत बाकी दुसरे कोणीच दिसत नाही.
आज राधाने घनाला जरा सुनावलं ते बरंच झालं
थांब सांगते कमळीला किती
थांब सांगते कमळीला किती टारगेट आहेत तुझे>>
भ्रमर कोई कुमुदिनीपर फिसल बैठा तो हंगामा???![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
विनोद आणि उल्का आत्याचं पटलं
विनोद आणि उल्का आत्याचं पटलं नसेल असं वाटत नाही त्यांच्या आत्ताच्या वागण्याबोलण्यावरून
त्यांचे वैचारिक मतभेद होते, नवराबायको म्हणौन एकत्र राहणे त्यांना कठिण जात होते, मित्र म्हणुन त्यांना राहण्यात त्यांना काहीच त्रास नव्हता..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
तसेही त्या दोघांसारखी कित्येक जोडपी समाजात दिसतात की.. नवराबायको म्हणुन जे भावनिक नाते असते ते संपलेय पण अगदीच तोंड बघाय्चे नाहीय व.व. इतका कडवटपणा कधी नव्हताच.
साधना>> अनुमोदन..
साधना>> अनुमोदन..
पण त्या विनोदचे ही पोट जरा
पण त्या विनोदचे ही पोट जरा सुटले आहे नाही का? आणि तो कधीच नीट ग्रूम होउन येत नाही.
पण त्या विनोदचे ही पोट जरा
पण त्या विनोदचे ही पोट जरा सुटले आहे नाही का? आणि तो कधीच नीट ग्रूम होउन येत नाही.
माणसे जशी लिहिलीत तशीच ती दाखवताहेत.. कदाचित अगदी टापटिप राहणा-या उल्केला विनोदमध्ये हेही खटकले असावे.. आणि अशा अनेक गोष्टी असतील ज्याचे परिवर्तन शेवटी घटस्फोटात झाले.
>>एमेन्सी सोडा बँक सोडुन
>>एमेन्सी सोडा बँक सोडुन इतरत्र नावाची पाटी टेबलावर ठेवलेली आजवर पाहिली नाहीय.. एमेन्सीत तर शक्यच नाही...
अगदी अगदी....हेच लिहायला आले होते.
घनाचा प्रोसेसर किती स्लो आहे. त्या बॉसने सिमला-मुंबईचा किस्सा सांगितला तरी हा येडपटासारखा हसत होता. शेवटी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला. त्याचं ते 'पॅशन' पुराण ऐकून कान किटले. 'कामाची पॅशन' म्हणजे काय हे एकदा आम्हा पामरांना समजावून सांगा राव. अमेरिकेत करतात ते काम आणि आम्हाला हिंदुस्थानात काय कंपनीला पैसे जास्त झालेत म्हणून एक तारखेला पगार मिळतो काय? अमिरोंका खून खून और गरिबोंका खून पानी?
घनाला काय घरी एकच काम असते
घनाला काय घरी एकच काम असते का.. त्याच टेबलावर लपटॉप घ्यायचा , २-३ बटणं बडवायची, आणि खट्याकण्न बंद करायचं..![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
घनाचा प्रोसेसर किती स्लो आहे.
घनाचा प्रोसेसर किती स्लो आहे. त्या बॉसने सिमला-मुंबईचा किस्सा सांगितला तरी हा येडपटासारखा हसत होता. शेवटी त्याच्या डोक्यात प्रकाश पडला
घनाकडे बघवत नाही. नाक डोळे तोंड सगळे एकत्र लहानशा जागेत कोंबलेत, बाकीची जागा रिकामी आणि पार टोकाला दोन बाजुला दोन कान...
चाचरत बोलणे, वाक्याच्या शेवटी शक्य तितका दीर्घ पॉज घेऊन मग राधा, आयडी, सर इ.इ. जे काही संबोधन आहे ते उच्चारणे, प्रत्येकजण हल्ली त्याला काहीतरी सुचक बोलतच असतो, त्या सुचक बोलण्यावर आधी जोक समजुन हसणे आणि मग ट्युबलाईट पेटली की गंभीर होणे, राधाशी काही कारण नसताना तुटक बोलणे. तीला ना जवळ करणे ना दुर जाऊ देणे, ती जवळ येतेय तर दुर लोटणे आणि दुर जाऊ इच्छिते तर मुद्दाम वेळ काढुपणा करणे....... श्या... किती ते दोष एका माणसात.. सगळी सिरीयल ह्या एकामुळे थबकलीय. एकदाचा शहाणा झाला की सिरीयलही संपली आणि आपणही सुटलो..![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
स्वप्निल जोशीची नवी सिरीयल
स्वप्निल जोशीची नवी सिरीयल येतेय सब टीव्हीवर १३ कि १२ ऑगस्ट पासुन ..
साधना अनुमोदन एके काळी
साधना अनुमोदन
एके काळी आवडणारा स्वप्निल जोशी आता डोक्यात जायला लागला आहे.
अवांतर - सचिन आणि मृणाल कुलकर्णीचेही असेच झाले होते. सचिन महागुरू आणि मृणाल अवंतिका झाल्यावर (आणि वेळेत न संपल्यावर)
Pages