Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53
एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
नाटकातले उरलेले दोन मोहरे--
नाटकातले उरलेले दोन मोहरे-- प्राचीआत्या, राधाचे पपा असं वाटतय
मला आधी वाटत होते पण आता नाही वाटत कारण काल दोघे एकटे असताना बोलले असते प्लॅनबद्दल. पण असे काहीच झाले नाही. प्रेक्षकांना प्लॅनमधले दोघे माहित आहेत, हे दोघे असते तर काल कळले अस्ते.
आजीच्या कटात घनाची आत्या
आजीच्या कटात घनाची आत्या सामील असावी का? घनाचे बाबा?
हो कुहु म.लो मधे कोळीणी च्या
हो कुहु म.लो मधे कोळीणी च्या वेशात..
मस्त...
कारण काल दोघे एकटे असताना
कारण काल दोघे एकटे असताना बोलले असते >> काल आत्याने एक हिंट दिली की 'तू खूप भोळा / साधा आहेस' आत्या असेलच त्या दोन्हीपैकी एक. पपा नाहीत हा माझा कयास मागेच लिहिलाय.
होय..मला अजूनही वाटतं की
होय..मला अजूनही वाटतं की राधाचे पपा नसावेत..ते साधे-सरळ आहेत आणि कटात सामील करून घेतलं आणि त्यांच्या चेहरा/चेहर्यावरचे भाव चुकुन-माकून बोलून गेला/गेले तर प्रोब्लेम होईल म्हणून त्यांना अनभिज्ञ ठेवलंय आणि दोन्ही आत्या, विनोद काका, दिग्याकाका आणि अगदी झालंच तर घनाचे बाबा एवढीच लोकं असतील असा वाटतंय.
रच्याकने..लोकसंगीताला उचलून धरण्यासाठीच बहुतेक म.लो.मधे सगळे कलाकार एकत्र आले असावेत..चांगला प्रयत्न आहे..
म. लो. खरच अत्यंत स्तुत्य
म. लो. खरच अत्यंत स्तुत्य कार्यक्रम आहे. पण ती मूळ गाणी मनावर कोरली गेली आहेत. अगदी मोजक्या वाद्यांवर रांगड्या आवाजातील ती गाणी जादूभरा परीणाम करून जातात. त्यामुळे सिंथेसायजरवर गायलेली ही नवीन गाणी नाहीच पचनी पडत. तिच गोष्ट नृत्याची पण. मागच्या आठवड्यात नुसत्या एका वाद्यावर एक आदिवासी नृत्य सादर झाले होते. साध्याच स्टेप्स असतील पण इतके अप्रतिम वाट्ले ते बघायला. त्या तोडीचे सादरीकरण परत नाही झाले.
ह्म्म..अनुमोदन. म्हणूनच
ह्म्म..अनुमोदन. म्हणूनच म्हटले मी की चांगला प्रयत्न आहे..
>>आता त्याला डायरेक्ट न्यू
>>आता त्याला डायरेक्ट न्यू यॉर्क मध्येच ब्रेक मिळणार आहे. ब्रूकलिन ब्रिज खाली टपरीमध्ये लॅप्टॉप ते मेन फ्रेम रिपेअर करणार वाट्>>>>
अश्विनी मामी
बायला मांज्या नांद
बायला मांज्या नांद पान्याचा... छान दिसत होती कुहु
स्पॄहाची मुलाखत..
स्पॄहाची मुलाखत..
वाचली मुलाखत . स्पृहा ही
वाचली मुलाखत .
स्पृहा ही स्वप्नील ची चुलत बहीण आहे असे ऐकले होते ....ते खरं नाहीये तर......
आजचा भाग पाहीला....घना परत
आजचा भाग पाहीला....घना परत dual personality disorder सारखा राधाशी अलिप्त वागायला लागलाय....त्या राधा सारख आता आम्हालासुद्धा डायलॉग बोलायला लावाणार अस वाटताय...."आम्हाला फार...फार त्रास होतोय या सगळ्याचा"
घना सारखा टोचुन बोलुन रडवतोय राधाला....अशामुळे बहुतेक अबीर चान्स मारुन जाणारसा दिसतोय 

काहीच पुढे सरकत नाहीय....आता रोज एपिसोड बघण्यापेक्षा फक्त रविवारीच एकदम आठवड्याचे सगळे एपिसोड बघावे...निदान काहीतरी स्टोरी पुढे सरकलेली वाटेल...
घना एकदा अमेरिकेला जाणर हे
घना एकदा अमेरिकेला जाणर हे मला वाटतय पहिल्या पासूनच.. अमेरिएक्ला गेला कि राधाच्या आठवणीने येइलच पण तसाही आळशी गोळा आपोआप परत येइल स्वतःची कामं स्वतःला करावी लागतात बघून
किंवा मग ते आशिकि-जाने तू या जाने ना स्टाइल एअर पोर्ट पर्यंत जाऊन 'आय लव्ह यु' क्लायमॅक्स तरी !
अरे पण तसं काही घडलं तर
अरे पण तसं काही घडलं तर मालिका संपेल ना? प्रश्न असा आहे की राजवाडे किंवा म्यानेजमेंट पबलीकचा अंत बघणार आहेत की नीट कथेचा शेवटही करणार आहेत? इतका जोरदार प्रतिसाद मिळाला की दिग्दर्शक आणि म्यानेजमेंटचे डोके ठिकाणावर नाही ना राहत.
म.लोकधारा कुठे बघायला मिळेल?
म.लोकधारा कुठे बघायला मिळेल?
नीट कथेचा शेवटही करणार आहेत?
नीट कथेचा शेवटही करणार आहेत? >>>बुवा, ही पहिलीच वेळ वाटतं तुमची?
(राजवाडेंची मालिका बघण्याची )
घना अमेरीकेला गेला तर त्या
घना अमेरीकेला गेला तर त्या रामसरण भैय्याला पण त्याचा पाणीपुरीचा ठेला घेउन न्यु यॉर्कच्या रस्तावर लावावा लागेल.
>>म.लोकधारा कुठे बघायला
>>म.लोकधारा कुठे बघायला मिळेल?>> आपलीमराठी.कॉम apalimarathi वर सगळे एपिसोड आहेत.
आधी बघितल्या असतील पण माहित
आधी बघितल्या असतील पण माहित नव्हतं की राजवाडे डायरेक्टर आहेत ते. कोणत्या मालिका?
राजवाडेंच्या झी मराठीवरच्या
राजवाडेंच्या झी मराठीवरच्या मालिका - असंभव, गुंतता हॄदय हे
स्टारप्रवाह वरची अग्निहोत्र
>>घना अमेरीकेला गेला तर त्या
>>घना अमेरीकेला गेला तर त्या रामसरण भैय्याला पण त्याचा पाणीपुरीचा ठेला घेउन न्यु यॉर्कच्या रस्तावर लावावा लागेल>> हा हा अस असेल तर घनाला लवकर न्यु यॉर्कला नोकरी लागुदेत...त्या निमित्त रामसरण भैयाला बघुन बरेच भैय्ये अमेरीकेत येतील आणि निदान त्या निमीत्त तरी आपल्या मुंबईतले भैय्ये कमी होतील
घना अमेरीकेला गेला तर त्या
घना अमेरीकेला गेला तर त्या रामसरण भैय्याला पण त्याचा पाणीपुरीचा ठेला घेउन न्यु यॉर्कच्या रस्तावर लावावा लागेल>> गरज नाही - हे पहा
http://www.thelewalanyc.com/
अग्नीहोत्र , असंभव संपूर्ण
अग्नीहोत्र , असंभव संपूर्ण मालिका कुठे बघायला मिळतील ?
घनाला अमेरिकेला जायची संधी
घनाला अमेरिकेला जायची संधी येण्यामागे माईआजींचा हात असावा असे त्यांच्या प्रतिक्रियेतून वाटले. माईआजी के हाथ बहुत दूर तक पहुंचे है|
घनाला अमेरिकेला जायची संधी
घनाला अमेरिकेला जायची संधी येण्यामागे माईआजींचा हात असावा असे त्यांच्या प्रतिक्रियेतून वाटले. माईआजी के हाथ बहुत दूर तक पहुंचे है|
नाहीतर कदाचित हाही प्लॅनचा भाग असावा...
कालच्या एपिसोडमधे
कालच्या एपिसोडमधे 'लिम्बूटिम्बू ' शब्द १५ वाक्यात २० वेळा होता.
बरं , ही कार्यक्रमाची जाहीरात म्हणावी तर तो दुसर्याच कुठल्या चॅनेलचा आहे..
अवनी मलाही नेमक हेच म्हणायच
अवनी मलाही नेमक हेच म्हणायच होतं.. लिंबुटिंबु हा मायबोली वर एक आयडी आहे .. कदाचित मालिकांवाल्यानी पाहिला असेल म्हणुन वापरला असेल.. तसही मला पहिल्यापासुन शंका आहे कि मायबोली आणि एलदुगो मधे काहितरी कनेक्शन आहे.
घनाला अमेरिकेला जायची संधी
घनाला अमेरिकेला जायची संधी येण्यामागे माईआजींचा हात असावा असे त्यांच्या प्रतिक्रियेतून वाटले. माईआजी के हाथ बहुत दूर तक पहुंचे है|>>>>>>
मला वाटतं माई आजींना सामील जे इतर दोघे आहेत ते म्हणजे "प्राची आत्या " आणि घनाचा ऑफीस मधला कलीग. नाहीतर माईंना धक्का बसला नाही असे कसे झाले असते. ये तो माई आजी का प्लॅन है......
दिग्दर्शक सुद्धा मानवच्या
दिग्दर्शक सुद्धा मानवच्या शारुक स्टाईल बोलण्याला कंटाळले असावेत म्हणुन मागच्या काही भागातुन गायब केले आहे
ते वल्लीकाका किती लिपस्टीक
ते वल्लीकाका किती लिपस्टीक थापतात...
Pages