एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे ही काय घनचक्करगिरी आहे. एखादी मालिका/सिनेमा ह्यातलं सगळच आवडलं पाहिजे आणि फक्त गुणगानच करायला इथे आलं पाहिजे असं थोडीच आहे?
एकंदरित मालिका चांगली आहे आणि वाईट गोष्टींपेक्षा चांगल्या गोष्टी जास्त आहेत म्हणूनच लोकं बघतात आणी इथे येऊन चर्चा करतात.
दररोज काय चांगलं किंवा वाईट खाललं ह्याची मायबोलीवर चर्चा करुन खरं तर इतर वाचकांना सुखद किंवा करपट ढेकर येत नाहीत तरी आपण करतोच की चर्चा? Proud

दररोज काय चांगलं किंवा वाईट खाललं ह्याची मायबोलीवर चर्चा करुन खरं तर इतर वाचकांना सुखद किंवा करपट ढेकर येत नाहीत तरी आपण करतोच की चर्चा?>> येकदम बरोबर वैद्यबुवा !!!

कालचा भाग मस्तच! मुक्ताचा अभिनय खुप छान!
घनाची राधा येणार म्हणून चाललेली स्वागताची तयारी तर झक्कास..एका वर्षात सुटलाय म्हणजे स्वप्निलला (खर) लग्न चांगलच मानवलय अस दिसतय.

मी पण मैनेसारखा खोली आवरायचा/कार्ड इथे ठेवू की तिथे चा भाग पळवत पाहिला Happy
पण ते डोक्यावर फुलांचा पाउस आवडला हा मला . एकटीने बरेच दिवस माहेरी जायला हव आता. Wink
मला त्या माईआज्जीच्या नाटकात राधाच सामील आहे असं वाटतय Uhoh

मला त्या माईआज्जीच्या नाटकात राधाच सामील आहे असं वाटतय >>> मला ही तसं वाटलं होतं. पण जेव्हा अबीर माईआजींना सांगतो की राधाला माझ्या बाजूला वळवायला वेळ लागतोय / घनाच्या घरी येण्यामुळे अवघड जातय -- तेव्हा ते तसं नसणार असं पण वाटलं.
नाटकातले उरलेले दोन मोहरे-- प्राचीआत्या, राधाचे पपा असं वाटतय.

मालिका न आवडणारेसुद्धा त्या घना-राधा सारखे ह्या मालिकेच्या प्रेमात पडलेयत फक्त तस उघड उघड बोलुन दाखवत नाहीयत
अनुमोदन. माझं तसच झालय. फक्त एवढच की या मालिकेनं वेड लावलं नाहिये.
खरंतर एलदुगो आणि उंच माझा झोका याआधी मी एकही मराठी (किंवा हिंदी) मालिका पाहिली नव्हती. मी शाळेत असताना संध्याकाळी विक्रम गोखल्यांची 'द्विधाता' की अश्याच नावाची मालिका लागायची तिचे तीन ते चार भाग झाल्यावर मी टीव्हि पाहणे सोडूनच दिले होते.
डेस्परेट हाऊसवाईव्हज ही मालिका ३ भाग कधितरी पाहिले होते ते रेकॉर्ड एलदुगो आणि उंमाझो ने मोडले त्यामुळे सध्या मालिका बघणे हे माझ्यासाठी थ्रिलींग आहे.

चिल पिल घेतोच दररोज सकाळी कॉफीसोबत. तुम्ही सुद्धा "बघा किंवा न बघा पण बघू द्या आणि चर्चा करु द्या" पिल घ्या. Proud

बुवा तुमच्या पिलचं नाव फार लांबलचक आहे ल़क्षात रहाणार नाही. चिल पिलच बरी Happy
पण राधा ला पण सगळ नाटक माहितीच नसेल फक्त तिचा प्रवेश माहित असेल अबीर सारखाच ?

बिल्वा, असं आमच्या भावनांशी खेळू नकोस. चर्चा आणि चेष्टेत फरक आहे. Proud असो, आता पेढे खाललयामुळे आणखिन वाद घालू शकत नाही. धन्यवाद. Proud
मला नाही वाटत राधाला माहित असेल. राधाचे वडिल आणि घनाचे वडिल असु शकतात. घनाची आई काँट्रॅक्ट मॅरेजचा क ऐकला तर बेशुद्ध पडेल अशा क्याटेगरीतली दाखवल्यामुळे तिला माहित आहे असं त्यांनी दाखवू पण नये!
आजकाल आज्ज्या किंवा पणज्या एकदम फॉर्वर्ड थिकींग, प्रॅक्टिकल, कूल वगैरे दाखवायचा ट्रेंड आलाय वाटतं. विक्की डोनर मध्ये त्याची आजी सुद्धा अशीच भन्नाट घेतलीये. Happy

अरेरे आज रोमँटिक गुलाबाच्या वर्षावाची पार वाट लागली Proud
आज प्रथमच त्या दिग्या काकाचं अ‍ॅक्टिंग पण आवडलं, कसला क्युट थरकाप उडाला होता सुप्रिया पुढे !

पण ते डोक्यावर फुलांचा पाउस आवडला हा मला . एकटीने बरेच दिवस माहेरी जायला हव आता.
>>>>>>>>>

शूम्पी, तुमच्या नवर्‍याला पण एखादा दिग्या काका आहे का???? भलभलत्या आयडिया द्यायला Wink

गेले २-३ भागात राधा एकदम रोखठोक वागतेय घनाबरोबर....आवडल आपल्याला....घना एकदम बालीशपणे वागतोय....राधाच्या प्रेमात पडलाय-नाही पडलाय, राधा आवडते का नाही आवडत, परत अबीरवरुन तीला बोलण आणि पुढच्या भागात परत ते अमेरीकेच खुळ....त्याच त्यालाच कळत नाहीय काय करायचय ते......आणि हो अमेरीकेत जायचय पण अस घरात लोळत पडुन.... software profession बद्दल काही शब्दच काढत नाही, नेहमी ते hard-disc formatting, games, अमेरीका ही passion असच बोलत असतो....निदान त्या College campus interview प्रमाणे algorithm pseudo-code explain करा तसे २-४ technical शब्द वापरले बोलण्यातुन तरी जरा हायस वाटेल Happy

>>>राधा जिथे तिथे सगळ्यावर एकच चपला का घालून फिरते? >>>>>हो हो तिच्या चपला मला पण बोचल्या होत्या. आणि सासरी माहेरी एकच जोड आहे बहुतेक. Happy
निदान त्या आयटम साँगला तरी वेगळ्या चपला घालायच्या.

आजचा एपिसोड यथा-तथाच होता. गुलाबाच्या फुलांनी आलेल्या शिंका बर्‍यापैकी खर्‍या वाटत होत्या ना!!
उद्या पुन्हा अमेरिकेची भुणभुण आहेच.

>>गुलाबाच्या फुलांनी आलेल्या शिंका बर्‍यापैकी खर्‍या वाटत होत्या ना!!>> +अनुमोदन
हो शिंका एकदम खर्‍याखुर्‍या वाटल्या. शिंकताना राधाने आपल्या मनातल सांगुनही टाकल घनाला "पण तु माझ ह्रुदय already बंद पाडलयस घनःश्याम" हे वाक्य बोलताना मुक्ताचे romantic expressions आवडले......

मालिका न आवडणारेसुद्धा त्या घना-राधा सारखे ह्या मालिकेच्या प्रेमात पडलेयत फक्त तस उघड उघड बोलुन दाखवत नाहीयत>>
नाही हं..माझ्यासाठी तरी ही अशी रीफ्रेशिंगली रोमँटिक हलकी-फुलकी मालिका स्वागतार्ह आहे!! मी वेळेत घरी येऊन ती बघायला मिळावी म्हणून धडपडत असते..
त्या सास-बहु मालिकांपेक्षा मुक्ता, स्वजो, विनय आपटे इ. ह्यांना हाताशी धरून प्रत्येक घरात जवळ-जवळ रोज घडणाऱ्या छोट्या-छोट्या गोष्टी जो आनंद देऊन जातात त्यांचा सारांश आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न बऱ्यापैकी जमलाय राजवाड्यांना. अधे-मधे पाणी घातलं गेलय ते कबूल आहे, पण तरी ही मालिका मात्र आवडीची ह्यात शंका नाही.. Happy

नाटकातले उरलेले दोन मोहरे-- प्राचीआत्या, राधाचे पपा असं वाटतय.>>>>>

मला वाटतय प्राची आत्या आणि दिग्या काका ..........

घना सोफ्टवेअरमध्ये नाहीये. तो हार्डवेअर सप्लाय करतो. परवा फोनवर बोलत होता ना कुणाशीतरी. Uhoh

कुहूच्या पंख्यांनी परवा झालेला महाराष्ट्राची लोकधारा पहा (कोळी गीतांचा भाग).

काल बहुतेक पटकथा लेखकाला कंटाळा आला असावा. त्यामुळे गोष्ट कुठेच सरकली नाही.

"तुमच्या हार्ड डिस्कला प्रॉब्लेम आहे, फोर्म्याट करावी लागेल " इतपत ज्ञान असलेले लोक हल्ली झुमरीतल्लैया ला पण असतात, आणि तालुक्याच्या गावापलीकडे महत्वाकांक्षा ठेवत नाहीत. तो एकूण जे बोलतो त्यावरून त्याची महत्वाकांक्षा म्हणजे उगाच जमत नसताना उंटाच्या शेपटीच्या बुडख्याचा मुका घेण्याचा प्रकार वाटतो.

आकर्षण, आणि स्वत:च्या भावना काबुल नं करणं, हे मात्र फार छान दाखवताहेत.

मंदार Happy आमचं घरातलं पात्र पण काल मोठी होउन मला राधासारखंच दिसायचंय बनायचंय म्हटलं.
दिग्या-सुप्रिया गोड. ए तुझ्या विना गाण्याचे शब्द टाका ना कोणी तरी. गाणे छान आहे पण टेक्निकली पर्फेक्ट नव्हते. अर्धे शब्द कळले नाहीत. शिवाय पांढरा ड्रेस जास्त लक्ष घेउन गेला.
पूर्वी इंग्रजी गाण्यांचे शब्द कळत नसत आता मराठी गाण्यांचे पण ? वय झालं ग बाई. Happy

'पुढील भागात' दाखवलेलं घनाच्या डोक्यावरचं अमेरिकेचं भूत परत डोकं वर काढायला लागलंय, आणि कालच्या एपिसोड मधे अबीरला माई आजी सांगते की अरे तू राधाला किंवा मला भेटायला कधीही बिनधास्त येऊ शकतोस या दोन गोष्टी 'कहानी मे ट्वीस्ट' आणण्यासाठी पुरेशा आहेत, आणि शिवाय माईआजीच्या प्लॉट मधले अजून दोन हमराज...... त्यामुळे 'सिरियल अभी बाकी है मेरे दोsssस्त' असं म्हणायला वाव आहे.

आता त्याला डायरेक्ट न्यू यॉर्क मध्येच ब्रेक मिळणार आहे. ब्रूकलिन ब्रिज खाली टपरीमध्ये लॅप्टॉप ते मेन फ्रेम रिपेअर करणार वाट्ते. ( दिवे घ्या. प्लीज)

Pages