एका लग्नाची दुसरी गोष्ट - पुढे चालू

Submitted by मंजूडी on 19 June, 2012 - 02:53

एका लग्नाची दुसरी गोष्ट या धाग्याने दोन हजार पोस्टींची मर्यादा ओलांडलेली आहे. त्यामुळे त्या मालिकेविषयीच्या पुढील गप्पा आपण या धाग्यावर मारूयात Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे घ्या ज्यांनी आयटेम साँग(!) प्रकार मिस केलं त्यांच्या साठी फेमस लाल साडीचा शर्ट आणि 'कुली' गेट अप !!! Proud
sm.jpg

(घना 'पोटेरी' दिसणार नाही असा फोटो टाकलाय मुद्दाम, मुक्ताला मार्क्स 'स्वप्नील चं' पोट लपवल्या बद्दल !)

पूर्वा, संपदा आपण समै. मलाही ह्या सिरियलमध्येच 'कुछ कम' गाणं नोटीस झालं. आधी पुसट ऐकल्याचं आठवत होतं पण आता भलतंच आवडायला लागलंय Happy

कसला ढिंग्चॅक फोटो आहे...:) गाणं स्वप्नातलं आहे का?
मी नेट्वर बघते त्यामुळे महिनाभर मागे आहे Happy

डिज्जे, दिलास का परत पोटावर पाय.. आपलं टोमणा ! Lol
चांगला अभिनय करते तेवढच पुष्कळ नाही का?
आपल्या गल्ल्या, कॉलन्यांमध्ये असलेल्या जोड्या, जोडप्यांमधल्या मुली काय एकदम साईज झिरो थोडीच असतात? Happy रोलला साजेशी तब्येत आहे.

बुवा,
ते 'पोटेरी' मुक्ता बद्दल नाही, स्वप्नील च्या पोटा बद्दल आहे Proud , वाक्य रचना केली दुरुस्तं !
(Btw , आवडतो तरी पण स्वप्नील या सिरियल मधे , मुक्ता पेक्षा जास्त :). )

आजच्या एपिसोड मधे फार टीपी होता , राधाच्या रुम मधल्या स्वागताने सुरवात होइल एपिसोड ची असं वाटलं पण शेवट त्या सीन नी झाला... स्लो होता आजचा एपिसोड ( पण घनाची आई आणि लाडोब्या घना मधला सीन क्युट होता :). )

हत्तेरेकी!!!! Lol मी ते घ घनाचा बघितलच नाही. तोही तसं बरं काम करतो पण कधी कधी ओढून ताणून भाव आणतो असं वाटतं.
बरं आता तू इथे आहेस म्हणून महत्वाचा प्रश्न विचारतो. स्वप्नील जोशीचा विग आहे का? Proud मला तर खात्री आहे तो विग आहे ह्याची.

काल एलदुगो बघायचं विसरूनच गेले.
फार ताणतायत असं वाटतय. मालिकेत गाणी कुठं मधेच?
वाईटातून चांगलं एवढच की 'कुछ कम' हे गाणं माहितच नव्हतं ते समजलं. आजचा भागही बघायचा विसरले होते पण वेळेत आठवलं. Wink
खोली आवरणे आणि ग्रीटींगकार्ड ठेवणे (इथं ठेवू की तिथे) जो टाईमपास चालला होता त्यामुळे हा भाग पळवत पळवत दहा मिनिटात पाहिला. अशाने वेळ वाचतो........आणि विश्वास ठेवा, पुढच्या भागात काही मिस केल्याचे जाणवतही नाही. या गोष्टी खर्‍या आयुष्यात होत असतीलही पण सिरियलमध्ये पाहताना कमी वेळात दाखवल्या तरी चालते. Wink

स्वप्नील जोशीला कायम शेंड्या काय आलेल्या असतात असा विचार मी करतच होते! Happy बहुतेक विगच असणार तो!
राधाचे एक्स्टेन्शन्स तर रोज खुपतात मला. पुढे छोटे नीट कापलेले केस, व भसकन लांब केस सुरू होतात. जरा तरी लेअर्स नीट पाहिजे होते. जाऊदे! Happy
स्वप्नील जोशीच्या फेसबुक पेजवर वर्षभरापूर्वीच्या बारिक स्व.जो चे फोटो होते. एव्हढ्यात इतका ढेरपोट्या झाला की, व्यायाम करून बारीक झालेला स्वजो दाखवणार आहेत एलदुगोमध्ये?(तसंही काल सायकलिंग , जॉगिंगला गेलेला दाखवलाच आहे!) Happy

<<खोली आवरणे आणि ग्रीटींगकार्ड ठेवणे (इथं ठेवू की तिथे) जो टाईमपास चालला होता त्यामुळे हा भाग पळवत पळवत दहा मिनिटात पाहिला. अशाने वेळ वाचतो........आणि विश्वास ठेवा, पुढच्या भागात काही मिस केल्याचे जाणवतही नाही. या गोष्टी खर्‍या आयुष्यात होत असतीलही पण सिरियलमध्ये पाहताना कमी वेळात दाखवल्या तरी चालते>>
या न्यायाने '४०५ आनंदवन','प्रपंच', किंवा स्वयंसिद्धा या मालिकांचे तर अख्खेच्या अख्खे भागच अनावश्यक ठरतात.(वेळ वाचवण्यासाठी आइसक्रीम पूर्ण मेल्ट करून स्ट्रॉने पिणार का?) मला तरी घनाने खोली आवरण्याचा प्रसंग आवडला.कधीही आपली खोली न आवरणारा, आपले फक्त काँट्रॅक्ट मॅरेज आहे असे सांगणारा नवरा बायको परत येतेय म्हटल्यावर तिच्या स्वागतासाठी धडपडतोय या फीलिंगला एवढे फूटेज हवेच. फक्त त्यातला फिल्मीपणा कमी करायला हवा होता. (घना आणि राधा यांच्यतले घनाने कल्पिलेले संवाद) स्वप्नीलला मुक्ता समोर नसताना आपला अभिनय दाखवायला तेवढाच वाव. त्याच्या आईने ग्रीटिंगकार्ड पहिल्यांदा पाहून व्यवस्थित न पाहिल्यासारखे केले; मग त्यानेच ते लपवायची धडपड केल्यावर त्याला चिडवायला सुरुवात केली.

या न्यायाने '४०५ आनंदवन','प्रपंच', किंवा स्वयंसिद्धा या मालिकांचे तर अख्खेच्या अख्खे भागच अनावश्यक ठरतात. >>+१

बाप रे! ह्या धाग्यावर फोटो वगैरे यायला लागले का आजकाल? ऑफिसमध्ये अ‍ॅक्सेस करणं कठिण होईल अश्यानं Sad

मला कालच्या एपिसोडमधलं घनाचं 'मी आहे. थांबतो, तुला भेटून मगच ऑफिसला जातो' हे वाक्य सॉल्लिड आवडलं. घनाशी बोलून फोन ठेवताना मुक्ताचा एका क्षणापुरताचा 'रिलिव्ह्ड' झाल्याचा अभिनय मस्त (म्हणजे माझ्या मते हं. मला ह्यातलं फारसं कळत नाही). राधा आणि तिचे बाबा ह्यांच्यातला संवाद मस्तच.

कालचा एपिसोड एकदम मस्त...फर्मास....आवडलाच.
राधाच्या स्वागतासाठी घनाने केलेली तयारी मस्त दाखवली आहे. Happy आणि असं स्वागत झाल्यावर राधाच्या चेहर्‍यावरचे भाव तर लाजवाबच होते. Happy

मलाही कालचा भाग आवडला, आधी जरा स्लो वाटल्याने फॉर्वर्ड करत बघितला पण मग पुन्हा पहिल्यापासून बघितला. स्वप्निल झक्कासच आहे पण मुक्ता क्यूट Happy , स्वप्निलशी फोनवर बोलणं सुरू झाल्यापासून फोन संपेपर्यंत तिने दाखवलेल्या विविध छटा मस्तच!!!

मला कालचे अबीर चे आई-बाबा लग्नाच्या वादी विषयी चे सगळे डायलॉग आवडले Happy
आनि घना ला पांढरा रंगाचा शर्ट जास्त शोभुन दिसला अस्ता..वरच्या फोटो मधे

घना!!! Happy Happy गोऽऽऽऽड आहे एकदम.
राधाही. मला ती कोरा चेहरा ठेवून वदवल्यासारखी 'आता आपल्यातलं सगळं संपलंय' आणि एक पॉज घेऊन 'ना?' किंवा 'असं तुझं म्हणणं आहे' म्हणते ते फार आवडतं. असं बोलून ती घनाकडून प्रेमाची कबूली घेणार नक्कीच Happy

पण अबीर आणि राधाचा अजून तडका हवा होता. झटपट झाली दिलजमाई.

घना!!! गोऽऽऽऽड आहे एकदम>>>>>> अगदी Happy
आणि लाल शर्टातपण किती मस्त दिसत होता. Wink बाकि त्याचा चौकड्यांचा लाल शर्ट पाहिला का, पोटावरचं बटण आता तुटेल कि नंतर अश्या अवस्थेत होतं Proud

<< पण अबीर आणि राधाचा अजून तडका हवा होता

होय होय Wink मला तर तो देवदास झालेला स्वप्निल जास्त आवडला Proud
काल राधाने घरी परत जातेय सांगितल्यावर अबीरला सुद्धा आश्चर्य वाटलेलं दिसलं Happy

वरच्या पोस्टस पाहुन अस वाटतय की ही मालिका न आवडणारेसुद्धा त्या घना-राधा सारखे ह्या मालिकेच्या प्रेमात पडलेयत फक्त तस उघड उघड बोलुन दाखवत नाहीयत.......माई आज्जीला सांगीतल पाहीजे हे..... Happy

वरच्या पोस्टस पाहुन अस वाटतय की ही मालिका न आवडणारेसुद्धा त्या घना-राधा सारखे ह्या मालिकेच्या प्रेमात पडलेयत फक्त तस उघड उघड बोलुन दाखवत नाहीयत.>>> अगदी अगदी. Lol

नावं ठेवत ठेवत रोज बघतात मात्र. Proud

दोन दिवस मी ऑफिसात उशीरापर्यंत. दोन दिवस मालिका बघितली नाही. याssssssssssssहू!!

स्वप्ना Wink Proud

Pages