सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडाओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये चुकीच्या पद्धतीने राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...
शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"
****************************************************************************************************************************
मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
****************************************************************************************************************************
तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का???
मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
बदअमलाबद्दल कड़क शासन...
खुद्द राजाशी अशी मुजोरी तर
खुद्द राजाशी अशी मुजोरी तर सामांन्यांचे काय?
पत्राबद्दल सोडुन इतर सर्व
पत्राबद्दल सोडुन इतर सर्व बोला... चालु दे...
छान, या धाग्यावरही 'ब्राम्हण
छान, या धाग्यावरही 'ब्राम्हण विरुध्द इतर' हा वाद नेहमीच्या कलाकारांनी सुरु केलाय तर.
लगे रहो.!
अगदि बरोबर, वेताळ्या
अगदि बरोबर, वेताळ्या
सेनापती | 14 June, 2012 -
सेनापती | 14 June, 2012 - 18:08
पत्राबद्दल सोडुन इतर सर्व बोला... चालु दे...
जाऊ द्या हो!
लेख आवडला.
तुम्ही एवढं सत्य समोर ठेवल्यावर बोलायला दुसरं काही उरल नाही म्हणून लोक स्वतःची करमणूक करून घेतायत.
अरे वा! वरती काही पोष्टीही
अरे वा! वरती काही पोष्टीही मूळ विषयाशी संबंधीत नाहीत त्या मात्र १००% पटल्या आणि....
चुकलेच माझे. कुठे ह्या ढोलक्यांशी बोलतेय. सत्य अवांतराबद्दल क्षमस्व. चालु द्या तुमचे अहो ध्वनीम्, अहो रुपम्.
अजुनही वेळ गेलेली नाही. आत्मपरिक्षण करा, अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही.
>>त्यामुळे उशीराने का होईना
>>त्यामुळे उशीराने का होईना ही जमात कालबाह्य झाली. समाजाने बामनान्चे नेत्रुत्व अमान्य केले व आज बामन्नानाच मुख्य प्रवाहातून बाजुला फेकले आहे.
हे विधान नव्हे ही पुर्ण पोस्ट अतिशय दुराग्रहावर हे आधारित आहे. मुळात ब्राह्मण निट बोलायला शिका आधी. जातीवरून बोलले तर शिक्षा होऊ शकते, हे सर्व जातींना लागू होत असावे.
एकतर तुम्ही लोक (म्हणजे जे अशा प्रकारचे विरोधी आणि उपरोधिक लिहित असतात), पुर्वी घडलेल्या त्या काळात लोकांनी केलेल्या चुका आत्ताच्या लोकांवर लादत आहेत आणि आरोप करत आहेत. जरा बाहेर या कोषातुन. म्हणे कालबाह्य झाली.
अजुनही सांगतो की "फोडा आणि राज्य करा" हे धोरण राज्यकर्ते त्यांच्या फायद्यासाठी वापरत असतात. त्याला बळी पडू नका.
चला सर्वांनी हे घाणेरडे भेदभाव मिटवून एकत्र येऊन भारताची अजुन प्रगती कशी होईल त्याचा विचार करू.
आणि अगदीच राग जातच नसेल तर बाह्य आक्रमणांमुळे देश हळू हळू पोखरला जात आहे तो एकमेकात लढून लवकर रसातळाला नेऊ.
>>चालु द्या तुमचे अहो
>>चालु द्या तुमचे अहो ध्वनीम्, अहो रुपम्. अजुनही वेळ गेलेली नाही. आत्मपरिक्षण करा, अन्यथा काळ तुम्हाला माफ करणार नाही.
एवढा अहंकार, दुराग्रह, दुराभिमान चांगला नाही. जरा योग्य विचार करायला सुरूवात करा बाकीच्यांना उपदेश करण्यापेक्षा.
महेश, तुम्ही इथे लिहिता, अन
महेश,
तुम्ही इथे लिहिता, अन मग तिकडे हेडमास्तरांकडे गुपचूप जाऊन 'इकडे लक्ष असू द्या' असेही लिहून येता. असे का करता हो?
गुपचूप वगैरे काही नाही,
गुपचूप वगैरे काही नाही, अॅडमिन यांनी ती सोय सर्वांसाठी खुलेआम ठेवलेली आहे. आणि मी त्यामधे तक्रार केली की तो धागा सर्वात वर येतो खाली जात नाही.
जाती धर्म भेदावर आधारित वाद चालू असतील तर तक्रार करण्याची सोय आहे ती. जिथे जिथे अतिरेकी आणि वाद निर्माण करणारे प्रतिसाद येत असतील (जाती धर्म विषयक) आणि जर ते माझ्या नजरेस आले तर मैं अपने आप को रोक नही सकता
असो, माझा (किंवा येथल्या कोणाचाही) कोणावरही वैयक्तिक आकस नाही, तसा तो नसावाही. चर्चा ही त्या विषयाच्या मतभेदांपुरतीच मर्यादित असावी. उद्या तुम्ही जर एखादी चांगली कथा, कविता, पाककृती लिहिलीत तर तिथे कोणी तक्रार करणार नाही किंवा येऊन वाद घालणार नाहीत.
विरोधी विचार असणे मान्य आहे पण ते अतिरेकी टोकाचे नसावेत. हिंसेने (अगदी हिंसक विचारांनी देखील) हिंसाच वाढते हे लक्षात ठेवले पाहिजे (सर्वांनीच). सामंजस्याने प्रश्न सुटतील वैराने नाही.
हिंसेने (अगदी हिंसक विचारांनी
हिंसेने (अगदी हिंसक विचारांनी देखील) हिंसाच वाढते हे लक्षात ठेवले पाहिजे (सर्वांनीच). सामंजस्याने प्रश्न सुटतील वैराने नाही.
आता लोक तुम्हाला गांधीवादी असे संबोधुन तुम्हाला वाळीत टाकतिल.
एक्झॅक्टली! वेल्कम टू गँढीझम!
एक्झॅक्टली!
वेल्कम टू गँढीझम! @ महेश
आता मांजराचा वेष घेऊन हे कोण
आता मांजराचा वेष घेऊन हे कोण आले ?
असो, खरेतर माझा कोणत्याही अतिरेकी विचाराला विरोध आहे. त्यामुळे माझ्या विचारांमधे जरासा गांधीवाद पण दडलेला आहे.
सर्व वादांमधले जे जे उत्तम आहे ते घ्यावे, मिळमिळीत अवघे टाकोन द्यावे.
वटवटपौर्णिमा, कमला सोनटक्के
वटवटपौर्णिमा, कमला सोनटक्के यांचे आय डी का बंद झाले?
सेनापती लेख छान आहे..
सेनापती लेख छान आहे..
छत्रपतींच्या स्वराज्य निर्मीतीच्या कार्यामध्ये काही ब्राम्हणानी विरोध केला तर काही ब्राम्हण स्वराज्यासाठी जिवावर उदार होऊन लढले होते.. राजांनी कृष्णाजी भास्कर ला मारले ते तो केवळ ब्राम्हण जातीचा होता म्हणुन नाही तर तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन. राजांनी मराठा, ब्राम्हण , शुद्र असा जातीभेद न करता फक्त स्वराज्याचा जो शत्रु त्या सर्वाना एकच न्याय लावला... त्यामुळे या गोष्टीचा संभाजी बिग्रेडने केलेला इश्यु जेवढा वाईट तेवढाच ईतीहासाला वेगळे वळण देउन कृष्णाजीला मारलेच नाही त्याचे पुनर्वसन केले वगैरे सांगणे सुद्धा चुक.. इतीहास हा फक्त सत्य घटना सांगतो.. त्याचे आपापल्या सोयीने अर्थ लावुन समाजात तेढ निर्माण होईल असे समज पसरवणे अत्यंत घातक आहे..
जाताजाता... दादोजी कोंडदेव हेच शिवाजी महाराजांचे गुरु होते असेच गेल्या कित्येक पिढ्यानी शिकले वाचले आहे.. पण जेम्स लेन प्रकरणापासुन काही ठरावीक तथाकतीत इतीहास संशोधकांमुळे हा वाद निर्माण झाला.. मुळात दादोजी गुरु असतील अथवा नसतील त्यामुळे शिवाजीराजांच्या मोठ्ठेपणात तसुभर सुद्धा फरक पडत नाही हेच दोन्ही बाजुना कळत नाही..
ब्रिगेडीनां इतर काही विधायक
ब्रिगेडीनां इतर काही विधायक दिसतच नाही... थोडं विषयाम्तर होइल तरीही लिहितो, ज्या राजानं जातीभेदाल थारा दिला नाही १८ पगड समाज एकत्र केला त्याच्या स्म्रुती नवीन पिढीला देण्याचे अनेक विधायक मार्ग आहेत... आहेत ते पुतळे उखड्त बसण्यापरीस पड्क्या तट-बुरुजांकडे कोणी पहायच ...
मगे राजगड्च्या ट्रेक्ला पद्मावतीच्या देवळातच दारु पिउन पडलेल्याना चोप दिल्याचं मी एकलं होतं यांना वर कस येउ दिल ? याच उत्तरही स्थानीकांनी फार सहज दिलं म्हणे दादा ही नेहेमीचं येतात,शिवज्योत घेउन जातात, पर्वतीपायथ्याच कुठलसं मंडळ आहे अर्थात मंडळ नाव मात्र संभाजीच लावतात....
आणी यांना कुणी फटकारावं तर बेळगावहुन राजाचा गड बघायला आलेल्या शाळेच्यामुलांनी आणी शिक्षकांनी...
ब्रीगेड म्हनजे पुतळे
ब्रीगेड म्हनजे पुतळे काढनारांची टोळीच
रायगडावरील वाघ्याचा पुतळा काढायला गेले अन सपाटुन मार खाल्ला
कृष्णाजी भास्कर नावाचे ३-४
कृष्णाजी भास्कर नावाचे ३-४ गृहस्थ तत्कालीन इतिहासात होते....एक मोगल चाकरीत,एक आदिलशाहीत आणि एक शिवरायांच्या चाकरीत,चौथा शिवकालीन कि शिवोत्तर कालीन अजून स्पष्ट नाही.त्यापैकी आदिलशाही चाकरीत होता तो अफझलखान युद्ध प्रसंगी मारला गेला, आणि जो शिवरायांच्या चाकरीत होता त्याचा उल्लेख Voyage Des Indes या प्रवासवर्णनात abe Carre नावाच्या प्रवाश्याने केला आहे.कृष्णाजी भास्कर त्यास कोकणात भेटला होता.
.त्यापैकी आदिलशाही चाकरीत
.त्यापैकी आदिलशाही चाकरीत होता तो अफझलखान युद्ध प्रसंगी मारला गेला,
छान माहिति. चौथीच्या इतिहास पुस्तकातही हाच उल्लेख आहे
रवाना छ २ जिल्काद....म्हणजे
रवाना छ २ जिल्काद....म्हणजे काय कुणास माहिती आहे काय? त्या काळचे ' पोस्टpost' करायच्या बाबतीत काही दिसते.
सेनापती कुठे गायब आहेत सध्या
सेनापती कुठे गायब आहेत सध्या ?
एक सिरीज होती त्यांची माबोवर. चांगली माहीती देत होते.
सातारचे पटवर्धन आणि भोरच्या राजवाड्याबद्दल माहीती द्यावी ही विनंती.
Pages