सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडाओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये चुकीच्या पद्धतीने राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.
'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...
शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"
****************************************************************************************************************************
मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.
रवाना छ २ जिल्काद.
****************************************************************************************************************************
तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का???
मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
बदअमलाबद्दल कड़क शासन...
विषय बरोबर मान्डला आहे
विषय बरोबर मान्डला आहे
तुम्ही कृष्णाजी भास्कराचा उल्लेख केलात. त्यासंबन्धात.....
शिवाजीराजे व अफजलखान दोघान्चेही वकिल ब्राह्मणच होते, किम्बहुना साक्षरतेच्या/बहुश्रुततेच्या आधारे वकिल ब्राह्मण असणे नविन नाही. अफजलखान जावळी खोर्यात आतवर सैन्यासह येऊन पोचण्यास या "दोघाही" वकिलान्ची "कामगिरी" कारणीभूत होती असे मानावयास प्रचण्ड जागा आहे. अन्यथा, आज एकवीसाव्या शतकात देखिल प्रतापगड परिसराच्या जन्गलात, खोर्यात रात्री बेरात्री जाणे अवघड आहे तिथे त्याकाळी जाणकार अफजलखान आलाच कसा काय? त्याला काय काय आमिषे या दोघाही वकिलान्नी पढवली असतील याचा केवळ अन्दाजच घेता येतो.
कृष्णाजी भास्करचाही सहभाग खानास इथवर आणण्यामधे असल्यानेच, खानापाठोपाठ एकतर त्याचा "मृत्यु" होणे वा तो "परागन्दा" होणे अपरिहार्य होते अन्यथा, पुन्हा अशीच वेळ कधी आल्यास, परकियान्चा वकिल बनलेल्या/असलेल्या कुणाचाच वापर स्वराज्याकरता करुन घेणे अशक्य व्हावे!
जिथे राजान्नी स्वतःच्या मुलाच्या मृत्युची भुमका उठवली तिथे कृष्णाजीच्या मृत्युची भुमका उठवुन त्याचे पुनर्वसन केले असण्याची शक्यता देखिल अधिक आहे.
पण न पेक्षा, त्याचे स्वराज्याप्रती खानास आतवर घेऊन येण्याचे दैवी कार्य सम्पल्याने, त्याचा अवतार सम्पवुन त्या विषयास तेथेच समाप्ती करणे इष्ट होते हे देखिल दुर्लक्षून चालणार नाही व पक्षी त्याचा मृत्यु घडला/घडवुन आणला असल्यास नवल नाही.
हे माझे मत आहे, जे आम्ही परम्परागत शिकलो आहोत.
जाता जाता, मला दादोजीचा पुतळा हलविल्याबद्दल फारसे काही वाटले नाही, पण एका वास्तवाची जाणिव होऊन कुणाची कीव आली ते सान्गतो, ऐका.
शास्त्राप्रमाणे, सर्वप्रथम गुरु हे वडिलान्ना मानले जाते व मौन्जी बन्धनावेळेस (जे पूर्वी प्रत्येक हिन्दूचे व्हायचे) गुरू अर्थात वडिलान्द्वारेच उपदेश करवुन घेतला जातो. बारा बलूत्यातल्या प्रत्येक व्यवसायाचे शिक्षण तेव्हा तर नक्कीच, पण आजही बर्याच ठिकाणी बापाकडूनच मुलाला परम्परागत मिळत जायचे/जाते, अर्थात त्या त्या काळाप्रमाणे, प्रत्यक्ष बाप, गुरुकुल अथवा आजकालच्या बिगार्या-प्राथमिक-माध्यमिक शाळा येतात, अर्थात शाळातील प्रत्येक शिक्षक गुरूस्थानिच मानला जातो, किमान आम्हि तरी हेच शिकलो आहोत. झेडपीच्या शाळातील शिक्षक देखिल या नियमातुन अपवाद नाहीत, हे सान्गणे न लगे. तर मुद्दा असा कि दादोजीसारख्या माणसास गुरू न मानण्यामागे "केवळ ब्राह्मणद्वेषच" आहे असेच नाही तर एकन्दरीतच वैचारिक माजाच्या अडाणीपणातून आलेला शिक्षकी पेशाबद्दल असलेला कमालिचा दुस्वास, अनास्था व दुर्लक्ष करण्याची वृत्ती यास कारणीभूत आहे असे मला वाटते.
दादोजीचा पुतळा कालपरवा हलविला हो, २०१० मधे, झेड्प्या स्थापन झाल्यापासुन आजवर गेली पन्नाससाठ वर्षे सरकारी नोकरीत असलेल्या शिक्षकान्ची जी कुत्तरओढ या सत्ताधिशान्नी चालवली आहे ती पहाता त्यापुढे दादोजीचे असे सत्राशेसाठ पुतळे हलवले तरी ते कृत्य फिक्के पडावे. थोडक्यात काय? गेली कित्येक वर्षे आडामधे जे शिजत होते, तेच दादोजीपुतळ्यानिमित्ताने समोर आले इतकेच.
पण यात कीव कशाची वाटते? सान्गतो, या सर्व महाराष्ट्रभरातल्या अन्गणवाड्या ते माध्यमिक ते उच्चमाध्यमिक शिक्षक अर्थात "गुरु" वर्गाची सन्ख्या कितीक आहे माहित नाही, पण गेली पाचपन्चवीस वर्षे तरी झाली असतील, यातुन ब्राह्मण समाज हद्दपार झाला आहे/केला गेला आहे, अर्थातच ब्राह्मणेतर सर्व जातीन्चे शिक्षक/गुरु या वर्गात आहेत, अन कीव त्यान्ची येत्ये की गुरुचा आदर वा अनादर राहुदेच, गुरुस्थानीच कुणास न मानणारी जी माजोरी परधर्मिय वृत्ती दादोजीचा पुतळा हलविण्यास कारणीभूत ठरली तीच वृत्ती गेली कित्येक वर्षे या समस्त शिक्षक/गुरु वर्गाच्या मानहानीस जबाबदार आहे. मग कुठे गाढवे मोजा, कुठे जनगणनेस हक्काचे बैल म्हणून जुम्पा, कधी कुटुम्बनियोजनास तर कधी अजुन कशास कामास लावा, थोडक्यात शिकवणे सोडून बाकी हलकीसलकी कामे करवुन घ्या हाच प्रकार कायम चालत आलेला आहे. अन यास कारण गुरुचा आदर करण्याची शिकवणच या लोकान्ना मिळालेली नाहीये, जे दादोजीबद्दल केल, तेच ते आख्ख्या महाराश्ट्रातल्या शिक्षकीपेशाबद्दल करताहेत.
पटतय का बघा विचार करुन!
लिंब्याचे म्हणणेही पटले
लिंब्याचे म्हणणेही पटले (चक्क!)
जिथे राजान्नी स्वतःच्या
जिथे राजान्नी स्वतःच्या मुलाच्या मृत्युची भुमका उठवली तिथे कृष्णाजीच्या मृत्युची भुमका उठवुन त्याचे पुनर्वसन केले असण्याची शक्यता देखिल अधिक आहे.
>>> हीच शंका मला आहे.. कारण माझ्याकडे असलेल्या अजून एका पत्रात कृष्णाजी भास्करचा उल्लेख येतो. ते पत्र १६७१ चे आहे. (इथे टाकतो लवकरच) तेंव्हा तो चौल - अलिबाग भागाचा सुभेदार असल्याचे म्हटले आहे. आता हा कृशाजी तोच की वेगळा हे समजायला अजून पुरावे हवेत असे वाटतंय...
बाकी तुमच्या लिखाणातील सर्व मुद्दे पटले. माझी आई स्वतः शिक्षिका असल्याने जे लिहिलेत ते थोडेफार अनुभवले आहेच...
धन्यवाद! हे पत्र आणि हा
धन्यवाद!
हे पत्र आणि हा मुद्दा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे.
लिंबुटिंबूंचे म्हणणे ही १००% पटते.
पण बराच ब्राह्मणवर्ग आजकाल ह्या सगळ्याला कंटाळून देशच सोडून परदेशात स्थाईक होतोय, हे दुर्दैवच.
असेच जालावर एके ठिकाणी वाचले,
ब्राह्मणांचा द्वेष करणारे हे सगळे ब्रिगेडी लोक गुज्जु-मारवाड्यांपुढे मात्र गोंडा घोळतात.
म्हणून ब्राह्मणांनीही अधिकाधिक श्रीमंत व्हावे हा एक उपाय तिथे लिहिला होता.
तोही काही अंशी पटतो.
पण ह्या ब्रिगेडी लोकांना ही अक्कल नाही, की त्यांचाही राजकारणात फक्त वापर होतोय.
जे राजकारणी त्यांना वापरतायत, त्यांचा कार्यभाग साधला की ते त्याच ब्रिगेडला संपवण्यात मागे-पुढे पाहणार नाहीत. आणि उलट पक्षी, ब्रिगेड त्याच राजकारण्यांविरुद्धही जाऊ शकेल.
मला महत्वाचा वाटणारा मुद्दा असा आहे की आता, सद्यस्थितीत ब्राह्मणांनी कसं वागायला पाहिजे हा आहे.
हुशारी ब्राह्मणांकडे आली त्याला कारण अनेक पिढ्या शिकलेल्या असल्यामुळे. त्यामुळे त्या हुशारीचा कुठेही 'ब्राह्मणी' माज न करता, ती आपल्या फायद्यात जितकी वापरता येईल तितकी वापरावी, पैसा कमवावा आणि स्वत:चं मोठं नाव निर्माण करावं. दुस्वास करणार्यांना दुस्वासाशिवाय काही मिळू शकेल असे वाटत नाही.
आणि हे असे पुरावे आपणही जमतील तितके लोकांपर्यंत पोहोचवणे हे काम आपले आहे.
लिंबुटिंबू यांचा प्रत्येक
लिंबुटिंबू यांचा प्रत्येक मुद्दा पटला पण मला खरे तर तो मूळ विषयाशी कसा रिलेट झाला हे लक्षात आले नाही.
दादोजींचा पुतळा कचर्याच्या गाडीतून का हलवण्यात आला हा प्रश्नही कुणी विचारत नाही आहे हे विस्मयजनक आहे. ते जर अशा पातळीचेच असते तर महाराजांनीच त्यांना हाकलून दिले असते. गोब्राह्मणप्रतिपालक हे बिरुद सिद्ध करते की महाराजांना जातीयवाद अभिप्रेत असूच शकत नव्हता.
(दादोजी गुरू असले काय अन नसले काय, शिवाजी महाराजांचे थोर कर्तृत्व वादातीत आहेच.) पण त्यात हा वाद आणून जे हीन राजकारण केले जात आहे त्यावरून हे सरळ सिद्ध होते की अनेकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा इतर कोणताही पर्याय उपलब्ध नसल्यामुळे ते आपले आयुष्य या बिनडोकपणात व्यतीत करत असावेत व असे लोक राजकारण्यांकडून हेरले जाऊन या कामी वापरले जात असावेत.
-'बेफिकीर'!
वरील सर्व प्रतिक्रीयांना
वरील सर्व प्रतिक्रीयांना अनुमोदन
ह्या विषया वरील झी २४ तास मधे श्री कोकाटे - सन्भाजी ब्रिगेड यांची वक्तव्ये ऐकण्यासारखी होती.
जवळजवळ प्रत्येक गडावर माजलेले ऊरुसाचे स्तोम, गडावरील मद्यप्राशन, गडांची दुरावस्था हे आणि इतर महत्वाचे विषय प्रश्नकर्त्यांनी घेतल्यावर सन्भाजी ब्रिगेड गप्प
रात्री २ वाजता पुतळा हलवण्याची तत्परता दाखवणारे शासन -- ही तत्परता
- गडांवरील देवतांना किमान छप्पर देणे.
- गडांवरील अनधिकृत बांधकामे पाडणे.
- गडांवरील वास्तुंचे जतन करणे.
- गडांवरील स्वच्छ्ता
- गडांवरील ढासळलेल्या वास्तुंचे पुनरुज्जीवन
अश्या सारख्या गोष्टींसाठी का दाखवत नाही????
असा मुर्खासारखा अपप्रचार करुन, हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच करत आहेत. ह्याचा निषेध नक्कीच केला पाहीजे आणि अश्या संघटनांना थारा न देणे योग्य ???
ब्राह्मणांचा द्वेष करणारे हे
ब्राह्मणांचा द्वेष करणारे हे सगळे ब्रिगेडी लोक गुज्जु-मारवाड्यांपुढे मात्र गोंडा घोळतात.
म्हणून ब्राह्मणांनीही अधिकाधिक श्रीमंत व्हावे हा एक उपाय तिथे लिहिला होता.
हा मुद्दा - की ब्राम्हणानी श्रीमंत व्हावे हाच मुद्दा मी अनेक वर्षे माझ्या सर्व मित्र परिवाराला सांगत आलो आहे. कारण संपत्ती पुढे सारेजण लोटांगण घालतात हा माझा अनुभव आहे. गुज्जु,मारवाड्यापुढेच काय साधा लुंगीवाला मद्रासी आपल्या सोसायटीत आडवे पार्किंग करीत असेल तर शेपट्या घालणारे हे.. हे काय राज्य करणार? आज राजकारणात अबु आझमी ठाकर्यांना गद्दार म्हणतो, क्रूपाशंकरसिंह बिहार्याना आमंत्रण देतो,आणि हिरवे झेंडे लागले की आपली बोलती बंद होते तेव्हा हे लोक कुठे लपून बसतात? तेव्हा त्यांना काय करायचे ते करू देत आपण आपली हालचाल एक विशिष्ठ हेतू ठेवून पुढे सुरू ठेवली पाहिजे.
>>> हुशारी ब्राह्मणांकडे आली
>>> हुशारी ब्राह्मणांकडे आली त्याला कारण अनेक पिढ्या शिकलेल्या असल्यामुळे.
तुमचि बाकी पोस्ट बरोबर, पण या वाक्याबद्दल थोडे वेगळे विचार मान्डतो, बघा पटले तर!
वरील माझ्या पोस्ट मधे मी बारा बलुते व त्या आधारीत अन्य अनेक व्यवसाय याबद्दल लिहीले आहे. यान्चे शिक्षण देण्याकरता आधीच्या काळात व आजही कुठेही ब्राह्मणवर्ग अन्तर्भुत नाही. परम्परागतरित्या ते बापाकडूनच मुलाला मिळत जायचे व आजही मिळते. ब्राह्मण फक्त वेदाध्ययन व धार्मिक कृत्यान्चे शिक्षण घ्यायचे जे तेव्हाही व आजही दैनन्दिन जगण्याचे "अत्यावश्यक अन्ग" म्हणून मानले जायचे नाही व ते शिक्षण तेव्हाही व आत्ताही "न घेतल्याने" कुणाचेच जगणे अडलेले नाही. सबब, ब्राह्मणान्नी "विद्या" अडवुन धरल्या या ब्रिगेडी आक्षेपालाच काही अर्थ नाही.
किम्बहुना, आजही गावाकडे, एखादी माळी समाजातील व्यक्ती बागायतीचे, अथवा जातिवन्त शेतकरी शेतकामाचे अथवा एखादा सुतार्/लोहार त्या त्या कामाचे, - तुम्हांस काय कळतय बामणान्नो, वाईच बाजुला सरा, करुद्यात आमास्नि, असे म्हणतो तेव्हा गम्मतच वाटते.
मात्र, ज्यास "खरा ब्राह्मण" व "गुरुस्थानी" बसावयाचे असेल त्यास चौसष्ट कला-विद्यान्चे ज्ञान असावयास हवे व तो अष्टावधानी हवा असा एक निकष असायचा. केवळ मेन्दुजन्य हुषारी नव्हे तर स्वतःच्या प्राप्त शरिराच्या सर्वान्गाचा सर्वार्थाने उपयोग करुन घेता येणारा असावा असे असायचे, अन यामुळेच, तेव्हाही जसे अनेक वेदाध्यायी दशग्रन्थी ब्राह्मण होते, तसेच अनेक ब्राह्मण योद्धे/तलवारबाज वीर होते, इन्ग्रजी अंमलात ते अगदी रामोशान्च्या जोडीने क्रान्तीकारक बनले, तर स्वातन्त्र्योत्तर काळात परिस्थितीच्या रेट्यापुढे चाम्भारकाम ते आधुनिक म्यानेजमेण्टा इथवर सर्व क्षेत्रात त्यान्चा वावर दिसतो.
मात्र हे करताना, त्या त्या व्यक्तिन्नी त्यान्च्या त्यान्च्या गुरुस्थानी असलेल्या ज्या कोणी व्यक्ति होत्या त्यान्चा मनापासून "आदरच" केला आहे. व म्हणून ते गुरुच्या कृपाशिर्वादामुळे पुढे आहेत. गुरू कोण असावा यास जातीचे बन्धन तेव्हाही तितकेसे नव्हते, आजही नाही.
माझे मूर्तिशास्त्रातले गुरु मेस्त्री (सुतार) समाजातील होते व माझ्या एकन्दरीत जडणघडणीत त्यान्चाही बहुमोलाचा वाटा आहे. असेच अन्य विषयातील एकेक गुरु "देवदयेने" भेटत गेले व मी घडत गेलो.
पण ही वृत्तीच ज्यान्चे ठाई नसेल, ते दादोजीस गुरु मानणे शक्यच नाही. शिवाय तत्कालिक फायद्याकरता कम्युनिझम ते नक्षलवाद यान्चे हस्तक बनले असणेही अशक्य नाही.
तुमच्या वाक्यातील "शिक्षण" हे कोणते? इन्ग्रजान्च्या अधिपत्याखालिल कारकुनी शिक्षण? की अठराव्या शतका अखेरीस जिद्दीने तेव्हान्च्या अमेरिकेस आपल्या पत्निस एकट्याने पाठवुन वैद्यकीय शिक्षण दिले ते आनन्दिबाई जोशीचे शिक्षण? की धोन्डो केशव कर्व्यान्च्या मुलाने रघुनाथाने स्वतः आजमावुन दिलेले कुटुम्बनियोजनाचे शिक्षण? अशी असन्ख्य वक्तिमत्वे ब्राह्मण समाजात त्या काळी होऊन गेली, ज्यान्नी त्यान्चे अनुसरण केले ते तुम्हाला आज "अनेक पिढ्या शिकलेले" असे भासतय. प्रत्यक्षात यातिल प्रत्येकाने अविरत कष्टाद्वारे आत्यन्तिक निष्ठेने हे मिळवलेले होते हे मात्र सोईस्कररित्या विसरुन बाकी समाजास केवळ रिझर्वेशनच्या नादी लावण्यात त्यान्चे त्यान्चे पुढारी यशस्वी झालेत व त्यान्च्या स्वार्थी, स्वतःची तुम्बडी भरुन पुढील सात नव्हे तर सत्राशे पिढ्यान्चे कोटकल्याण करणार्या राजकारणापाई जनतेच्या होणार्या फरफटीवरुन जनतेचेच लक्ष दुसरी कडे वेधण्यास, केवळ अल्पसन्ख्य विस्कळीत ब्राह्मण समाजास टारगेट करण्याचे हे षडयन्त्र आहे.
तुमच्या वरील गैरसमाजुन वा सातत्याने मिडीयातुन आदळवलेल्या गैरमाहितीमुळे तुमच्याच तोन्डून वदल्या जात असलेल्या वरील वाक्याद्वारे तुमचाही अप्रत्यक्ष सहभाग ब्राह्मणनिर्दाळणेमधे होऊ नये या सावधगिरीच्या सुचनेकरता या पोस्टचा प्रपन्च केला असे.
>>>> दादोजी गुरू असले काय अन
>>>> दादोजी गुरू असले काय अन नसले काय, <<<
बेफिकीर, तुमच्याच पोस्टमधिल हे वाक्य.....
जेव्हा, माझ्या पोस्ट मधे, "आम्ही बापास प्रथमगुरु मानुन नन्तर भेटणार्या बिगारी ते माध्यमिकमधिल प्रत्येक शिक्षकास गुरु मानतो ही हिन्दून्ची शिकवण जे विसरलेले आहेत, ते दादोजीस गुरु काय मानणार" या अर्थाने जमले तर ती पोस्ट रिलेट होते की नाही ते बघा.
तुमचे बाकी मुद्दे कळले, पटले.
बाकीच्यान्च्या प्रतिक्रियाही सार्थ.
ओके. लक्षात आले
ओके. लक्षात आले आता!
धन्यवाद!
खुप छान पक्या लिंबुचेही बरोबर
खुप छान पक्या
लिंबुचेही बरोबर असु शकते. आजच्या घाणेरड्या राजकार्ण्यांनी इतिहासच नासवला आहे.
सर्वांच्याच पोस्ट विचार
सर्वांच्याच पोस्ट विचार करायला लावणार्या आहेत.
इथे (म्हणजे मा.बो.वर नव्हे तर महाराष्ट्रात) 'नसलेला' ब्राह्मण्-ब्राह्मणेतर वाद उकरून काढण्याचे काम चालले आहे. कॉग्रेसवाल्यांना पुतळा हलवायची गरज नव्हती आणि युतीला गोंधळ घालायची आवश्यकता नव्हती. पुणे बंदला जो अत्यल्प प्रतिसाद मिळाला त्यावरून लोकांना अशा वादात इंटरेस्ट राहिलेला नाही हे दिसून येते.
लिंबुचेही बरोबर असु
लिंबुचेही बरोबर असु शकते>>>>>>>>>ह्या एका गोष्टीसाठी लिंब्याला १००% पाठींबा
"ब्राह्मणान्नी विद्या(?)
"ब्राह्मणान्नी विद्या(?) अडवुन धरली" या भोन्गळ व मूर्ख आक्षेपाचा आजच्या परिस्थितीतही आढावा घेता असे दिसुन येते की.............
दोन आठवड्यापूर्वी माझी मुलगी कॉलेजतर्फे एनएसएसच्या आठ दिवसान्च्या कसल्यातरी समाजसेवी शिबीरास गेली होती. परत आल्यावर तेथिल एकेक अनुभव हरखुन जाऊन सान्गतानाच ती एक वाक्य सहज उच्चारुन गेली, ते असे की "शिबिरात किनै, बहुतेक सगळ्या ब्राह्मणान्च्याच मुली होत्या, माझ्या एरवीच्या मैत्रिणीन्पैकी कुणीच नव्हते"! यावर काय सान्गावे तिला? की बाकी समाजातल्या मुली "कसल्या त्या भितीने अस्ल्या शिबिरान्ना पाठवतच नाहीत?" हे निखळ सत्य? पचेल तिला?
अन मला सहज प्रश्न पडला की शम्भरवर्षान्पूर्वी कर्वेन्ची हिन्गण्याची सन्स्था असो वा अन्य अनेक ठिकाणि, अगदी कोकणातल्या आडगावी देखिल ब्राह्मणान्च्या मुलि शिकत होत्या, सुरवातीस आज्जीच्या काळी दुसरी पास, नन्तर आईच्या काळापर्यन्त फायनल (सातवी) पास, पुढे म्याट्रिक (अकरावी) आणि हल्ली सर्वच क्षेत्रे मुलिन्द्वारे पादाक्रान्त... हा बदल आपोआप झाला? काहीच त्रास नसेल झाला त्यान्ना? काहीच गमावले गेले नसेल? कसलिच भिती त्यान्च्या आयशीबापसान्ना पडली नसेल? पण तरीही निष्ठेने व कष्टाने त्या त्या पिढ्या आपापल्या मुलिन्ना जमेल तसे शिकवत गेल्या, अन इकडे एकविसाव्या शतकात पुण्यासारख्या शहरात कॉलेजच्या शिबिरात आपल्या मुलिन्ना अजिबात न पाठवण्यामागे कसली भिती असेल? काय कारण असेल? अन या सगळ्यात ब्राह्मणान्नी विद्या अडवुन धरण्याचा सम्बन्ध येतो कुठे? तुम्ही व्हा की पुढे!
एक नक्की, की ब्राह्मण समाजात हळूहळू का होईना पण गेल्या शे-दिडशे वर्षातच स्त्रीस महत्व दिले जाऊ लागुन, सतीप्रथा/बोडकी लाल आलवणातील विधवा स्त्री ते समर्थपणे दोन्ही कुटुम्ब (माहेर व सासर या अर्थाने) साम्भाळणारी स्त्री इथवर ब्राह्मण समाजाने मजल मारली, वरील शिबिराच्या उदाहरणावरुन मात्र हेच लक्षात येते की त्याचे अनुकरण करण्यास गेल्या शेदिडशे वर्षातच नव्हे तर आजही इतर समाज इथे धजावत नाही पण स्वतःचे अपयश्/स्वतःची भिती लपविण्याकरता, ब्राह्मणान्विरुद्ध बोम्बा मात्र मारु शकतो. नक्कीच!
हा विरोधाभास् , चान्गल्याच्या अनुकरणासाठी त्यान्च्या जेव्हा लक्षात येईल तेव्हा तो त्यान्च्या पुढील पिढ्यान्करता सुदिन ठरावा.
मात्र एक आहे, की शिकायला पाठवलेल्या मुलिने "जातीबाह्य" वा "धर्मबाह्य" विवाह करुन "घराण्याच्या लौकिकास बट्टा" लागण्याची भिती, अगदी ब्राह्मण समाजही या वस्तुस्थितीपासुन वेगळा कधिच राहिला नाहिये, उलट "लव्ह जिहाद" चे सर्वाधिक बळी ब्राह्मण मुलिच होउ शकतात हे वास्तव ब्राह्मणान्नी कधी नाकारलेही नाहीये, पण त्या भितीमुळे त्यान्ना जर कोन्डून घरातच अडकवले, तर आम्हा "हिन्दु ब्राह्मणात" अन काळ्या बुरख्यात तरी कितीसा फरक राहिला हे समजण्याचे तारतम्य ब्राह्मणात आहे, अन त्यामुळेच एकन्दरित सन्ख्येपैकी, व पुन्हा व्यक्ति/कुन्डली सापेक्ष, काही मोजके टक्के मुली जरी "बळी" पडल्या तरी त्याकारणे बाकी अठ्ठ्याण्णव-नव्व्याण्णव टक्के मुलिन्चे शिक्षणाबद्दलचे स्वातन्त्र्य हिरावुन घेण्याची घोडचूक ब्राह्मण समाजाने गेल्या शेदिडशे वर्षात सहसा केली नाहीये व परिस्थितीत सुधारणाच होत जाईल यावर त्याचा विश्वास आहे.
परभणीसम्मेलनामधे, वरील बाबी समजुन न घेता, ब्राह्मणसमाजास हतोत्साह करुन केवळ हिटाई करण्याकरता व "जातिभेद - धर्मभेद" पाळू नका याची भलामण करण्याकरता, म्हणून केतकर महाशय जेव्हा ब्राह्मणीमुलिन्च्या आन्तरजातिय/धर्मिय विवाहान्बद्दल कुजकट बोलले तेव्हा त्याचा निषेध होणे क्रमप्राप्तच होते. प्रश्न केतकर काय बोलला याचा नव्हता, तर केतकर सारख्या उच्चपदि विराजमान ब्राह्मण जेव्हा हे असले अक्कलेचे तारे तोडतो तेव्हा, बाकी समाजात त्याचा काय सन्देश जातो हा होता. साधे शिबिराला देखिल मुलिन्ना न पाठविणे हे देखिल या अशा केतकरी अप्र्त्यक्ष सन्देशाचेच परिणाम अस्तात.
असो.
लोक प्रतिनिधीना लोकल लेवलच्या
लोक प्रतिनिधीना लोकल लेवलच्या म्युन्सिपल काउन्सिल मध्ये पाच पन्नास लोकांच्या बहुमताचा वापर करुन इतिहासात ढवलाढवळ करता येते का? आता एखाद्या ठिकाणी ग्रामप्म्चायतीत २० च डोकी असतील तर त्याम्च्यापैकी ११ लोकाना मान्य नाही म्हणून एखादा पुतळा पाड, एखादे धर्मस्थळ पाड, एखादे पुस्तक जाळ ..असले ध्म्दे करता येतात का?
आठवीच्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकात होते. नगरसेवकांची कर्तव्ये..... १. गावात पाण्याची व्यवस्था करणे.. २. गावात दिवाबत्तीची सोय करणे... ३. गावातल्या गटारी साफ करणे... इ. इ.
यात पुतळे पाडणे, पुतळे हलवणे... असले काही वाचल्याचे स्मरत नाही...
दादोजी गुरु होते का नव्हते हे अजुन न्यायालयानेच सिद्ध केलेले नाही, मग केवळ बहुमताचा अधार घेऊन लोकल लेवलच्या चार टाऴक्याना असे काही करण्याचा अधिकार तरी आहे का? हे आधी तपासायला नको का?
( जाता जाता, एक विनोद : नागरिक शास्य्ताच्या पेपरात पहिला प्रश्न होता.. नगरसेवकाची कर्तव्ये लिहा.. वर लिहिल्याप्रमाणे एका मुलाने कर्तव्ये लिहिली.... दुसरा प्रश्न होता : राष्ट्रपतीची कर्तव्ये लिहा.. लगेच त्याने उत्तर लिहिले : १. दिल्लीमध्ये पाण्याची व्यवस्था करणे.. २. दिल्लीमध्ये दिवाबत्तीची सोय करणे... ३. दिल्लीतल्या गटारी साफ करणे... इ. इ. )
चांगला लेख ! आजकाल
चांगला लेख !
आजकाल चांगल्या,जुन्या लोकांच ऐकुण शांत होणारे,मान देणारे खुप कमी झालेत, माथी भडकवुन दंगा घातल जाणं आणि द्वेष पसरणं सोपं झालयं !
आणि नेमकं यात याचे नक्की पुरावे,अभ्यास खुप कमी जणांना माहित असेल,नुसता गोंधळ दिसतोय !
छान लेख. राजांचा फोटो कस्सला
छान लेख. राजांचा फोटो कस्सला तेजस्वी आहे !
लिम्बूटिम्बूच्या पोस्टी १००% पटल्या.
जामोप्या, राष्ट्रपतीची कर्तव्ये
मूळ लेखाबरोबरच, माझ्यापोस्ट्स
मूळ लेखाबरोबरच, माझ्यापोस्ट्स आवडल्याचे सान्गितल्याबद्दल धन्यवाद
लिंबु लिहिले ते पटले,
लिंबु
लिहिले ते पटले,
चांगला लेख !
चांगला लेख !
रोहन.. फार आवडला तुझा
रोहन.. फार आवडला तुझा लेख..
लिंबु. -यांच्ञा पोस्ट्स पण खूप आवडल्या.थॉट प्रोविकिंग!!
धन्स रे
लिंब्याभाऊ, सादर दंडवत!
लिंब्याभाऊ, सादर दंडवत!
मूळ लेख अतिशय माहिती पूर्ण
मूळ लेख अतिशय माहिती पूर्ण आणि विचार प्रवर्तक आहे आणि त्याच बरोबर लिं.टीं. आणि इतरांच्या प्रतिक्रिया पण ! सर्वांना धन्यवाद..! पण पूढे काय? Plan of Action काय? की चर्चा करून, संपलं सगळं? नेहेमीप्रमाणे?
(No subject)
@ पक्का भटक्या .......कारण
@ पक्का भटक्या
.......कारण माझ्याकडे असलेल्या अजून एका पत्रात कृष्णाजी भास्करचा उल्लेख येतो. ते पत्र १६७१ चे आहे. (इथे टाकतो लवकरच) ....
कधी टाकताय पत्र ???
>>>>> Plan of Action
>>>>> Plan of Action काय?
प्लॅन ऑफ अॅक्शन खूऽऽऽप नन्तर हो, आत्ताशीक पन्चवीस वर्षांनन्तर रोगाचि बाह्य लक्षणे दिसू लागलीहेत, पण हा क्यान्सरसदृश रोग तर खूप आत खोलवर मुरलाय.
तेव्हा आधी सीटी स्कॅनिन्ग तर होऊदे थ्रुली ! रोगाची सगळी लक्षणे बाहेर दिसायला लागुदेत.
मग रोग निदान, मग रोग्याला त्याची जाणिव करुन देणे, अन मग रोग्याची अन त्याच्या देशी/परदेशी/परधर्मी नातेवाईकान्ची परवानगी असेल, तरच उपचार ठरवणे इत्यादिक बाबी. नै का?
चांगला लेख आणि तितक्याच
चांगला लेख आणि तितक्याच चांगल्या प्रतिक्रिया....
पाशा ऑन "चक्क सगळ्या पोस्टी एकाच विचाराच्या " पाशा ऑफ
इथले लिखाण उडवले आहे. उगाच
इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.
इथले लिखाण उडवले आहे. उगाच
इथले लिखाण उडवले आहे. उगाच कुणाच्या भावना दुखावल्या तर माझ्याबरोबर मायबोलीला गोत्यात आणायचे नाहीये, म्हणून.
धन्यवाद.
ही काय तुम्ही सिग्नेचर केली आहे काय? जाईल तिथे दर्शन घडते.
मि हा लेख आज वाचाला मला "
मि हा लेख आज वाचाला मला " ब्रिगेदि " चा आर्थ समजला नाहि.काय ते स्प्श्त करावे.
Pages