सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

Submitted by जागोमोहनप्यारे on 14 March, 2012 - 05:47

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च सिनेमा नाटक ( हिंदी, मराठी, इंग्रजी)

हा बीबी खास अशा प्रकारच्या सिनेमांसाठी.. आपल्याला आवडलेले असे सिनेमे असतील तर त्याची चर्चा करा.. सिनेमाचे नाव, त्यातले कलाकार अशी माहिती दिल्यास चित्रपट यु ट्युबवर शोधता येईल.

चकवा मराठी फिल्म.. http://www.youtube.com/watch?v=S9IdqqUGXuM&feature=related
भूमिका अतुल कुलकर्णी... साधारण अर्धा झाला की प्रेडिक्टेबल आहे. साधारणपणे उग्र चेहर्‍याचा आणि क्रुर हसणारा माणुस खलनायक असतो, हा नियम इथे पाळला गेलाय, त्यामुळे तो कोण हे लगेच समजते.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल सकाळी झी क्लासिकवर एक पहेली नावाचा सिनेमा लागला होता.
तनुजा, फिरोज खान, मदनपुरी, अरूणा ईराणी, टुणटुण, राजेंद्रनाथ इ.
चित्रपटाच्या सुरूवातीला तनुजा एका दुकानात जाते ते एक जुन्या वस्तू मिळण्याचं दुकान असतं. तिथे एक पियानो असतो आणि त्याचा लिलाव दुसर्‍या दिवशी असतो. तनुजा दुकान मालकाकडे थोडा वेळ पियानो पाहण्यासाठी परवानगी मागते, तो देतो.. ते वाजवते, काही काळासाठी दुकानदाराची नजर विचलित होते... फिरून तो पियानोकडे पाहतो तर तनुजा गायब. मग फिरोजखान त्याच अँटीक दुकानातून तोच खूप जुना (साधारण २० वर्ष वगैरे) पियानो विकत घेतो. मग तनुजा त्याला गाठते.. भेटत राहते गायब होत राहते... फिरोजखानला तिचे भास होत रहातात. तो तिच्या प्रेमात पडतो... मदनपुरी संपतीसाठी फिरोजखानचा खून करण्यामागे असतो.. तो एक मोटो आहे. पण साईड बाय साईड तनुजा कोण आहे, ति अशी मधूनच कशी येते, गायब कशी होते.. त्याचा सस्पेन्स चांगला ठेवलाय. कथा तशी साधीच आहे, पण तो टिकवण्याचा जो घाट घातलाय तो उत्तम जमलाय. आपला गेस एक सांगतो, शेवट वेगळाच होतो. चांगला सिनेमा आहे. हातातली कामं टाकून मॅटीनी पाहिला.. Proud

मी लहानपणी एक मराठी चित्रपट पाहीला होता...सचिन खेडेकर आनि अजुन बरीच मंड्ळी आहेत आनि ती खजिना शोधायला एका बेटावर जातात आनि अडकुन पडतात...ह्या चित्रपटाच नाव कोणाला माहीत आहे का ????

The Unborn बघितला, खुप असा काहि डरावना नाहि वाटला. Evil Death चे सगळे भाग HOROR category मधे बसतात. Music effect मुळे असेल.

दौलत की जंग .. आमीर खान , जुही http://www.youtube.com/watch?v=4E7OG97PdHw

एवढी तंगडतोड करुन दौलत मिळते.. केवढी? बायका बांगड्या आणि दागिने ठेवायला वापरातात, त्यातली जरा मोठ्या आकाराची एक पेटी..

मी हॉटेल पाहिला यूट्यूबवर.
ज्या काळात बनवला त्यामानाने आणि रामसे बंधुचा असला तरिही बराच बरा आहे.

श्रद्धांजली!?

जामोप्यांचे प्रोफाईल आउट ऑफ बाऊंड्स येत आहे.

नक्की काय प्रकर्ण आहे?

धागा त्यांनी सुरू केलाय.. म्हणून विचारतो आहे, इथे त्यांच्या आय्डीला श्रद्धांजली वाहू का?

मन्दार,
का अन कधी डिलीट झाला, त्या बद्दल काही माहिती आहे का?
मला ठाऊक आहे की तुम्हाला मी डूआय वाटतो, पण अ‍ॅडमिन यांना आयपीवरून ठाऊक असेल सत्य काय ते.

विपूतून कळविलेत तरी चालेल. किंवा संपर्कातून मेल करा.

धन्यवाद.

>>जामोप्याचा आय डी डिलिट झालेला आहे. पण ते कुठे ना कुठे असणारच. <<
डिलीट झाला? कमाल आहे! अरे जामोप्यांना कोणितरी शोधा आणि अक्षता वगैरे देउन आमंत्रण ध्या. नाहितर मायबोलीचा बॅलंस बिघडेल... Happy

'सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च' या धाग्याकर्त्याच्या आयडीचा मर्डर कसा झाला हा सस्पेन्स कोणाला माहित आहे का? त्यांचा पुनर्जन्म झाला आहे का? नसेल तर भुतपिशाच्च बनुन तरी ते नक्कीच परतणार. त्यांचा माबोवर दिवसरात्र वावर असायचा. ते असे सोडुन जावुच शकणार नाहीत.

अरे जामोप्यांना कोणितरी शोधा आणि अक्षता वगैरे देउन आमंत्रण ध्या. नाहितर मायबोलीचा बॅलंस बिघडेल... >>>> राज Lol आजच याचा प्रत्यय आला सुद्धा. Happy

सस्पेन्स, मर्डर्,थ्रिलर, पुनर्जन्म, भूतपिशाच्च...

जामोप्यांच्या आय्डीचा मर्डर करून त्यांना भूतपिशाच्च होण्यास भाग कुणी पाडले हा सस्पेन्स असला तरी त्यांचा पुनर्जन्म झालेला पहाण्यात थ्रिल असेल हे नक्कीच....

हो मन्दार_जोशी म्हनजेच जामोप्या. माझी खात्री पटलेली आहे. त्यांच्या पोस्ट काळजीपूर्वक वाचा. पण त्यांचा आय डी बन्द करण्याचे काहीच कारण नव्हते . त्यांच्यापेक्षा अधिक आक्षेपार्ह लेखन करणारे इथे आहेतच.

खालील पोस्ट आधी जामोप्यांच्या आय डी वरुन वाचल्याचे स्मरते.

मन्दार_जोशी | 19 May, 2012 - 18:02
http://www.youtube.com/watch?v=vfvt_yOhONg जिंदा...

संजय दत्त

मूळ सिनेमा परदेशी : ओल्डबॉय http://www.youtube.com/watch?v=o43LWkkCpWc

मन्दार्_जोशी म्हणजेच जामोप्या उर्फ मंदार कागलकर.

सप्सेन्स ओळखलेल्यांचे हार्दिक अभिनंदन. Proud

'मोहन'ला कुणी नाही ओळखले तरी 'मिरे'ने मात्र अचूक ओळखले... Biggrin

>>हो मन्दार_जोशी म्हनजेच जामोप्या. माझी खात्री पटलेली आहे. त्यांच्या पोस्ट काळजीपूर्वक वाचा. पण त्यांचा आय डी बन्द करण्याचे काहीच कारण नव्हते . त्यांच्यापेक्षा अधिक आक्षेपार्ह लेखन करणारे इथे आहेतच. <<
अगदि सहमत. ++१

आपुन तो जामोप्या, डॉ. इब्लिस का फॅन होरेला है. फक्त दोघांनी एका मर्यादित पातळीखाली उतरु नये हा विनंतीवजा आग्रह.

हम कौन है .. अमिताभ डिंपल ओरिजिनल - द अदर्स दोन्ही षिणेमे अगदी सेम आहेत. संवादही सेम टू सेम. . पात्रेही तीच आहेत.

याचाच आणखी एक रिमेक अंजाने .. मनिषा कोईराला. इथे बराच बदल आहे.

आज सकाळीच ओपन वॉटर नावाचा सिनेमा पाहिला. सत्यघटनेवर आधारीत एक ओळीची गोष्ट आहे.

एक जोडपं डाईव्हिंगला जातं आणि त्यांची बोट चुकून त्यांना समुद्रातच विसरून येते. केवळ दोन पात्रं पण त्यांच्याबरोबर आणखी एक महत्त्वाचं पात्रं म्हणजे समुद्र. याची असंख्य रूपं दाखवली आहेत. सिनेमा अंगावर येतो आणि त्यातला समुद्रही. त्यात मध्ये मध्ये बर्‍याच फ्रेम्समध्ये फक्त पाणी वेगवेगळ्या स्वरूपात दाखवलंय. पण अनेक शब्दांनी न साधला जाणारा परिमाण त्यामुळे साधला जातो. बघाच.

http://www.imdb.com/title/tt0374102/

त्यांची बोट चुकून त्यांना समुद्रातच विसरून येते.>>
बोट त्यांना विसरून येते म्हणजे? Uhoh बोटीतले लोक म्हणायचंय का?

हो, गं तेच. तुला काय वाटलं बोटीचं भूत आहे असा काही प्लॉट आहे की काय? Happy

वीसजणं डायव्हिंगकरता गेले असतात. त्यांचा हेडकाऊंट चुकतो आणि त्यामुळे दोघेजण मागे समुद्रातच राहिले आहेत हे कोणाच्या लक्षात येत नाही.

Pages