Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
man udhan varyache madhe hoti
man udhan varyache madhe hoti ti.>> हो बरोबर
योगा योगाने मी देवोंके देव
योगा योगाने मी देवोंके देव महादेव ही सिरियल पण पहातो. मला संगितातले काही कळत नाही, पण मला वाटते की उंच माझा झोका मधे बर्याच प्रसंगी त्या सिरियलमधले संगीत वापरले आहे.
बाकी आजकाल जरा कंटाळा येऊ लागला आहे, दोन्ही सिरियल्सचा. गाडी पुढे सरकतच नाहीये. किती वेळ त्या मुलीचे कौतुक? एखादे आजोबासुद्धा एव्हढे कौतुक करत नसतील आपल्या पहिल्या नातीचे! नि त्यातले काही विचार अक्षरशः लज्जास्पद आहेत, कशाला पुनः पुनः उकरून काढायचे? त्या दोन जावांच्या भांडणाचाहि कंटाळा आला.
आता जरा तू तिथे मी बघतो. आजकालची मराठी शिकायची आहे मला. भारतात रहायचे आहे ऑक्टोबरमधे, पुण्या मुंबईत तीन आठवडे! आमच्या अमेरिकन नातेवाईकांनाहि आजकालचे मराठी बरेच कळू लागले आहे, बहुतेक शब्द काही फारसे वेगळे नाहीत त्यांच्या भाषेपेक्षा.
गाडी पुढे सरकतच नाहीये. किती
गाडी पुढे सरकतच नाहीये. किती वेळ त्या मुलीचे कौतुक? >> खरे आहे झक्की काका.
आणि जुन्या काळातल्या स्त्रिया अगदी घराच्या मध्यभागी येऊन "इथे कळशी कुणी ठवली, राssssssssssssमू राssssssssssमू" करून घर डोक्यावर घ्यायच्या?...
त्या ताईसासूबाईची आरडा-ओरड अतिरेकी वाटते आहे... माधवाचा अभिनय शांत छान... रमेला मोठ दाखवलं पाहिजे आता.. टीन एज... म्हणजे पुढे जाईल सिरिअल
पाटी पेन्सिल असे तेव्हा? ऐ ते
पाटी पेन्सिल असे तेव्हा? ऐ ते न च...
>>त्या बायका मारामारी का करत
>>त्या बायका मारामारी का करत आहेत?
चार बायका एकत्र जमल्या की काय करणार मग आणखी? त्या काव्यशास्त्रविनोद करताना दाखवल्या तर टीआरपीचं काय?
आज आम्ही ज्यांच्याकडे
आज आम्ही ज्यांच्याकडे कंडोलन्स साठी गेलो होतो, त्यांनी ही सिरियल संपेपर्यंत आमच्याकडे दुर्लक्षच केलं त्यामुळे आज याचा एक भाग पहिल्यांदाच पाह्यला मिळाला.
क्षमा करा, पण ती लहान मुलगी खरंच गोड वाटते का सगळ्यांना? का लहान मुलांना शक्यतो गोड म्हणावं असे मॅनर्स असतात. माझ्याकडे कमी आहे त्याची बहुतेक. मला ती मुलगी (किंवा ती भुमिका म्हणते) नाही आवडली. मुलगी करत असेल चागलं काम पण मला नाही आवडलं. तिच्या चेहर्यावर ते वेडसर हसु बाळगायला सांगितलं असेल का दिग्दर्शकाने? सतत ते हसु चेहर्यावर बाळगत बोजड संवाद म्हणते त्यामुळे ती निरागस कमी आणि इरिटेटिंग जास्त वाटली मला.
हे वर कोणी लिहिलं आहे का? कि त्यातल्या विधवा अशा चकचकीत, फ्रेश कशा दिसतात. विधवेच्या ( त्याही जुन्या काळातल्या विधवेची कोणतीही लक्षणं - डार्क सर्कल्स, उदास, दु:खी, कामं करुन दमलेल्या) भाव नाहीत त्यांच्या चेहर्यावर. घर सुद्धा काय चकचकीत आहे. टाइल्स लावल्यासारखी गुळगुळीत जमीन, भरपुर प्रकाश इ इ असलेली आहेत. सगळे रंग अगदी ब्राइट आणि चिअरफुल वाटतात त्यामुळे जुन्या काळातलं वातावरण वाटतच नाही. फक्त भाषा, तीही का कोणास ठावुक फार आर्टिफिशियली शुद्ध बोलल्यासारखी वाटते.
ओवरऑल बंडु मालिका. एका भागात मी न आवडलेल्या मालिकांमधे टाकल्यामुळे कदाचित मी चुकही असु शकते.
मलाही काल झलक पाहायला मिळाली.
मलाही काल झलक पाहायला मिळाली. मनिमाऊ त्या वेडगळ स्माईलबद्दल अनुमोदन.
बाकी तो मोठा उंच नवरा, व त्याच्या समोर इतकी बुटकीशी नऊवारी व सगळ्या साजासकटची बायको पाहायला खरंच कसंतरी झाले. :|
मूळ पुस्तकाशी ही सिरियल किती
मूळ पुस्तकाशी ही सिरियल किती प्रामाणिक आहे हे लिहिणार का कुणी ? अशी कुणी चुलती त्यांच्याकडे मुक्काम ठोकून राहिल्याचे लिहिले आहे का रमाबाईंनी ? मध्ये त्या दोघांनी सहभोजन केलेले दाखवले त्या प्रसंगाचा निदान उल्लेख तरी आहे का ? ताईसासूबाईंबद्दल, माईंच्या स्वभावाबद्दल काय लिहिले आहे ? मध्ये कुठल्याशा वैद्यांनी येऊन रमाला नमस्कार घातला तो प्रसंग आहे का पुस्तकात ?
ह्यातले काहीही पुस्तकात नसेल तर अधूनमधून तरी थोडा ट्रॅक ठेवतेय मालिकेचा तोही ठेवण्यात हशील नाही !
अगो ! हे मूळ पुस्तक कुठले ?
अगो ! हे मूळ पुस्तक कुठले ? काय नाव ? कोणी लिहीले ? थोडा प्रकाश टाकणार का ?
अश्विनीमामी | 9 May, 2012 -
अश्विनीमामी | 9 May, 2012 - 12:58 नवीन
ती बारकी पोर लाजत लाजत स्वतःनी माझं नाव ठेवलंय वगैरे म्हणते ते तर जाम वैताग. का लाजायचे ते कळत नाही बिचारीला अन स्वतः अन काय कौतूक. ये जीना भी कोई जीना है? मराठीतला बालिका वधू फॉर्म्युला वाट्तो आहे.
<<<
मामीसाहेब
त्या पोरीला ते खांदे उडवत अस लाजल्यासारखं हसून दाखविणे हा एवढाच 'अबिनै' येत अस्नारे.
मग काय करेल बिच्चारी?
ते केळ्याचा क समल्यावर 'मला कळले!!!' ऐकून अम खांदे उडवणं पाहून मला जाम कलायला झालं होतं
शुगोल, हा धागा नाही वाचला का
शुगोल, हा धागा नाही वाचला का पहिल्यापासून. आमच्या आयुष्यातील आठवणी असे काहीतरी नाव आहे.
हे पुस्तक म्हणजे ' आमच्या
हे पुस्तक म्हणजे ' आमच्या आयुष्यातील काही आठवणी'.
रमाबाई रानडे यांचं चरित्र सरोजिनी वैद्य यांच्या मदतीने मा. श्री. विद्वांस यांनी लिहिलं आहे. शीर्षक आहे 'श्रीमती रमाबाई रानडे - व्यक्ती आणि कार्य'. तेही वाचनीय आहे.
पुस्तक नक्कीच खूप छान आहे पण
पुस्तक नक्कीच खूप छान आहे पण मालिकेचा बट्ट्याबोळ आहे. कशाला असल्या विषयाला हात घालतात कुणास ठाऊक?? सरळ एखादी डॉक्युमेंटरी बनवावी अगदीच वाटलं तर. पण नको ती पात्रं घुसडून, जुनी भांडी मांडून अशी काय मालिका बनते काय!!! :रागः
आलवणातल्या बायकांना घरातली
आलवणातल्या बायकांना घरातली पक्वान्नं खायला मिळत होती?
एकभुक्त आणि केवळ साधा/ सात्विक आहार असायचा ना?
आलवणातल्या बायकांना घरातली
आलवणातल्या बायकांना घरातली पक्वान्नं खायला मिळत होती?
एकभुक्त आणि केवळ साधा/ सात्विक आहार असायचा ना?<<<<<<<<< हो ना ग. आणि इकडे तर पाकातल्या पुर्या काय आणि पुरण्पोळ्या काय. मज्जाच चाल्लीये की .
मलाही ती मुलगी जे सारख सारख " स्वतः " असं म्हणते ते इरिटेटीगच होतं,
मलाही ती मुलगी जे सारख सारख "
मलाही ती मुलगी जे सारख सारख " स्वतः " असं म्हणते ते इरिटेटीगच होतं,>>>> अगदी १०० %़।ख्रर. जाम वैताग आला सारख "स्वतः " एइकुन
स्वतः हा शब्द तोंडी बोलतांना
स्वतः हा शब्द तोंडी बोलतांना वापरत होते की नाही, याची शंका माझ्याही मनात आहे. पण नवऱ्याचे नाव अजिबात घेत नसतं. 'अहो' ही सुद्धा खूप नंतर आलेली प्रथा आहे.
रमाबाईंच्या पुस्तकात मात्र तृतीय पुरुषी उल्लेख प्रत्येक वेळी 'स्वतः' असाच येतो. तो वेगळा लक्षात यावा म्हणून पुस्तकात बोल्ड छापला आहे. आज ऐकायला कितीही विचित्र, इरिटेट करणारं वाटलं, तरी त्या काळात नवर्याचा उल्लेख हा असा आडवळणानीच होत होता.
अर्थात या एका बाबतीत इतिहासाशी, पुस्तकाशी इमान राखणारे पटकथा लेखक, इतरत्र मात्र हवी तेवढी सुट घेताना दिसतात.
मनिमाऊ > लहान मुलांना शक्यतो
मनिमाऊ > लहान मुलांना शक्यतो गोड म्हणावं असे मॅनर्स असतात. माझ्याकडे कमी आहे त्याची बहुतेक. मला ती मुलगी (किंवा ती भुमिका म्हणते) नाही आवडली. मुलगी करत असेल चागलं काम पण मला नाही आवडलं. तिच्या चेहर्यावर ते वेडसर हसु बाळगायला सांगितलं असेल का दिग्दर्शकाने? सतत ते हसु चेहर्यावर बाळगत बोजड संवाद म्हणते त्यामुळे ती निरागस कमी आणि इरिटेटिंग जास्त वाटली मला. > आणि +१ .
आज एक घरातील भांडण दाखवले
आज एक घरातील भांडण दाखवले रमेच्या माहेरचे. जाम भीतिदायक वाटले मला ते. सर्वांनी कामे चांगली केलीत त्या प्रसंगात. असे प्रसंग होत असत पूर्वी एकत्र कुटुंबात. स्वतः बाळासाठी बांगडया घेतात तोपरेन्त ताई मुलीचे हात डागते कि काय अशीच भीती वाटली मला तर. पण मुलीने लेप बनविला आहे. बांगड्यांचे दुकान अगदी स्टुडिओतलेच वाटते. घरी कासार येत असत ना?
ह्या मालिकेचे कलाकार,
ह्या मालिकेचे कलाकार, संवादलेखक आणि तो विरेन म्हणून कोण आहे ते प्रेक्षकांच्या भेटीला कर्जत का असंच कुठेतरी येणार असल्याचं आज टिकर झी मराठीवर येतंय.
जायचं का सगळ्यांनी त्याची
जायचं का सगळ्यांनी त्याची चंपी करायला??
पण आता मालिका खरच डोक्यात जायला लागलीये. रमेच लाजणं, सततची भांडण आता बघवत नाहियेत. मलाही अगोसारखेच प्रश्न पडलेत. हे जे काही दाखवतायत ते पुस्तकात आहे का?
रमाबाई रानड्यांचं आत्मचरित्र
रमाबाई रानड्यांचं आत्मचरित्र मायबोलीच्या खरेदीविभागातून विकत घेता येईल -
http://kharedi.maayboli.com/shop/Aamchya-Aayushyatil-Kahi-Aathavani.html
शिवाय त्यांचं चरित्रही खरेदीविभागात उपलब्ध आहे -
http://kharedi.maayboli.com/shop/Shrimati-Ramabai-Ranade-Vyakti-Aani-Kar...
मने, ते उमांझो मधल्या रमेच्या
मने, ते उमांझो मधल्या रमेच्या चेहर्यावरच्या वेडगळ हास्याबद्दल तुला अनुमोदन. भयानक चिडचिड होते तिचं ते येडचाप हसु बघून.
दुर्गाक्का माधवरावांच्या
दुर्गाक्का माधवरावांच्या मित्रावर धडकते तो प्रसंग अगदी सुरज बडजात्याच्या सिनेमात शोभावा असा होता.
आणि बाबाचे पोट बिघडणे बालनट्याला शोभावेसे.
सर्वांना प्रचंड अनुमोदन...
सर्वांना प्रचंड अनुमोदन...
अरे त्या रमाला मोठं तरी करा ना! बालविवाहाचं उदात्तीकरणंच चाललंय जणू...
आणि असली सामान्य घर घरकी कहानीच दाखवायची होती, तर अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचा आधार का घेतलात? एखादी काल्पनिक कथाही चालली असती.
आणि असली सामान्य घर घरकी
आणि असली सामान्य घर घरकी कहानीच दाखवायची होती, तर अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचा आधार का घेतलात? एखादी काल्पनिक कथाही चालली असती. >>>>> सानी, प्रचंड अनुमोदन. खरं तर त्या रमाबाई आहेत म्हणुनच जास्त टोचते आहे कथानक.
...तर अशा थोर
...तर अशा थोर व्यक्तिमत्त्वांच्या चरित्राचा आधार का घेतलात?...>>सहमत!!
सानी, अनुमोदन.
सानी, अनुमोदन.
ताई सासुबाईने दुर्गाक्काला
ताई सासुबाईने दुर्गाक्काला विहिरीमधे ढकलण्याचा scene फारच भयानक होता. अंगावर काटा आला.
रमाबाईंचे चरीत्र वाचलेले कोणी
रमाबाईंचे चरीत्र वाचलेले कोणी इथे आहे का? दुर्गाक्काच घटना खरोखर घडली होती का हे मालिकेच्या लेखकाने / दिग्दर्शकाने घेतलेले स्वातंत्र्य आहे?
Pages