एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगदी Lol

कालच्या भागातला डायलॉगः
"मानव्,तू आमच्या रेशन कार्डावर आहेस क?"......... भयानक हासलो

मानव आणि त्याच ते बॉलीवूड अक्टिंग अतिशय इरीटेटिंग प्रकार आहे. इतकी नोझी माणस सुधा असतात जगात!!!

मी गंभीरपणाने प्रयत्न केलाय, पण एकूणात हे ज्ञाना-पद्धतीचे झालेय >>> Rofl

पूनम, "नायक-नायिकेच्या देहबोलीत असणारे सेक्शुअल टेन्शन" चे मराठीकरण "देहबोलीमधून जाणवणारे एकमेकांबद्दलचे आकर्षण" असे का? टेन्शन चा अर्थ आकर्षण?? ये कुछ झेप्या नही! Wink

मानव फार डोक्यात जातो आजकाल. राधाने त्याला सगळ्यांसमोर चांगला झापताना दाखवायला पाहीजे.

काय उपयोग नाही. निर्लज्जम सदासुखी आहे तो....परत कुठला तरी शाखाचा डायलोग मारेल

पूनम Lol
रैना, एकदम कर्रेक्ट आहे Wink पण ह्या सिरियल्समधून इतक्यांदा सोयीनुसार पात्रं बदलतात ना ( असंभवच आठव. ) सुरुवातीला अजिबात पटत नाहीत बदल आणि मग त्या नवीन अभिनेत्याला अनुसरुन कॅरॅक्टरच हळूहळू बदलून जाते. इथेही मोहन जोशींच्या जागी लागू आले ते नव्हतं झेपलं पण आता जोशी आठवतही नाहीत.

>>मवा, आपण रांगेत आहात . कृपया प्रतीक्षा करा. राधाच्या आत्याला आधीच कुणीतरी मारलेले आहे. त्यांचा हात बरा होईतो वाट पहा.

भरत Proud

मानव हा प्राणी सुरुवातीपासूनच डोक्यात जातोय. असल्या नमुन्यांना अगदी सुरुवातीलाच जोरदार झापायचं असतं म्हणजे प्रकरण हाताबाहेर जात नाही पुढे. मग मैत्री तुटली तरी बेहत्तर. आपण लोकांना आपल्या व्यक्तिगत आयुष्यात शिरूच द्यायचं नाही कारण नाहीतर त्यांना हाताला धरून बाहेर काढणं कठिण जातं हा स्वानुभव आहे.

आजच्या भागात एकदाचं त्या घनाने निदान काय वाटतं ते तरी सांगितलं. आता तरी राधेनं काहीतरी चपळाई (संवादातली) दाखवून एवीतेवी लग्न झालेच आहे तर राहू दे म्हणायला हवे. नाहीतर पुन्हा आपले रडगाणे सुरु. कोणत्याही मुलीला/बाईला लाळघोटेपणा करणारे मुलगे/पुरुष लगेच लक्षात येतात. अमानवाला फाटकारत का नाही ही राधा? आत्याबाईचं खरंतर सध्या काही काम नाहीये. जा बाई जा एकदाची तुझ्या घरी! Wink

<<<<आत्याबाईचं खरंतर सध्या काही काम नाहीये. >>>>
कमीतकमी इतकेइतके तरी एपिसोड काम मिळेल ......असं काही असतं का कलाकारांशी केलेल्या काँट्रॅक्ट मधे ?

>>>>>कोणत्याही मुलीला/बाईला लाळघोटेपणा करणारे मुलगे/पुरुष लगेच लक्षात येतात. अमानवाला फाटकारत का नाही ही राधा?>>>>> अगदी Lol
H R Policies, harassment Policies आहेत की नाहीत राधाच्या office मधे? का तेसुद्धा माबोकरांनीच सुचवायच? Happy

>>अमानवाला फाटकारत का नाही ही राधा?
फटकारलं तर तो विषय संपला की. त्याची बकवास सुरु रहायला हवी; त्याशिवाय का मालिका 'वाढता वाढता वाढे' अशा होतात? Wink

उ. का. च्या बाबतीत माधव+१००००००००
उ.का. हा बहुतेक राधाच्या आयुष्यात येणारा (माईआजी,उल्का आत्या आणि तिचा नवरा यांच्या संयुक्त विद्यमाने आणला जाणारा) भावी परपुरूष असावा. Proud हेमावैम. आणि त्याच्याशी राधुकलीची वाढती जवळीक पाहून घनाचा तिळपापड वगैरे दाखवतील. आणि कालांतराने राधाघनाला त्यांच्या प्रेमाची किंमत बिम्मत कळेल अन मग पुन्हा उ.का. ला डच्चू देण्यात येइल. Happy

पण घनाने काल कबूलीच दिली की राधेवरच्या प्रेमाची, त्यासाठी उमेश कामत अथवा कोणा तिसर्‍याची आवश्यकता नाहीये. काय मस्त सीन होता तो! वावा. स्वप्निल!!! Happy राधाचे संवाद मस्त आहेत. ती तिच्या संवादांमधूनच तिला घना आणि काळे कुटुंबाला सोडायचं नाहीये हे सांगतेय, पण वरवर घनाचं ऐकतेय असं भासवत आहे. ह्यासाठी मनस्विनीला फुल्ल मार्क.
घनाच लूझर असल्यामुळे त्याच्या अमेरिकन ड्रीम्समुळे गाडी अडकलेली आहे. ती हलली की मालिका सुफळ संपूर्ण!

गिरी, आशु आणि मंदार.... तुम्ही इतक्या सहजतेने ह्या मालिकेवर बोलता आहे ...म्हणजे रोज बघता तुम्ही ही मालिका Uhoh Lol

पौर्णिमा +१
या संपूर्ण आठवड्यातले संवाद फार सुंदर होते. (राधाच्या आत्याबाई सोडून). घनाचा कावळा आणि पंचरंगी पोपट हा संवादही मस्त होता. तो ज्यांना ऐकवला ते विनोद (घनाच्या आत्याचे माजी पती) बहुतेक मार्ग काढतील असे वाटतेय.

जर उमेश कामतला आणले तर ही सरळ सरळ सगेंफूची कॉपी ठरेल. त्यात इशानची मैत्रीण सोनाली आली होती सुहानाला मत्सराग्नीत जाळायला.

आज उ.का. ची एंट्री आहे वाटते ( इति फेबू) :), कॄपया इकडे लिहा , मला आजचा भाग उद्या रात्रीशिवाय बघता येणार नाहीये Sad

राधाचं कानातलं घनाच्या खांद्यावर सापडलं म्हणून ते एकत्र आलेत आणि ती प्रेग्नंट आहे असा तर्क घनाच्या आईने काढला आहे. ह्याला म्हणतात सुतावरून स्वर्ग गाठणे आणि वर ही चर्चा ती, घनाचे बाबा, सुप्रियाकाकू आणि तिचा नवरा ह्यांच्यात चालू आहे. ही काय अशी चारचौघात चर्चा करायची गोष्ट आहे? नशीब कुठे हत्तीवरून साखर वाटत नाहियेत. आचरट लोक!

ह्यांच्या मुलाला धड उदरनिर्वाहाचं साधन नाही आणि मूल होऊ देऊन त्याचं भविष्य काय?

पण राजवाडेंचे आभार मानले पाहिजेत. ही सिरियल पाहिल्यापासून 'मला एकत्र कुटुंबातला मुलगा नको' ह्या माझ्या मताला कधी नव्हे ते आईसाहेबांचा बिनशर्त पाठिंबा मिळालाय. धन्यवाद राजवाडे!

ह्यांच्या मुलाला धड उदरनिर्वाहाचं साधन नाही आणि मूल होऊ देऊन त्याचं भविष्य काय?
>>>>>>>>>>>>>>>>

स्वप्ना आता काय मालिका एकदम २५ वर्षं पुढे नेऊन घना आणि राधाचा मुलगा म्हणून उमेश कामत येणार की काय Rofl Lol नाव काय तर "राधेश्याम" Wink

तेरे नाम....... हमने किया है Proud राधेश्याम राधेश्याम.

अरे, ह्या आत्याला कोणीतरी सांगा रे - म्हणावं एक तर 'जमाईराजा' तरी म्हण नाहीतर 'जावईबापू' म्हण. 'जमाईबापू' हे म्हणजे रबडी आणि श्रीखंड मिक्स केल्यासारखं वाटतंय. Uhoh

बाकी मुक्ताने आत्याला 'हवा भरलेल्या फुग्याची' दिलेली उपमा चपखल आहे. Proud

भुंग्या Proud अशक्य आहेस!

आज उ. का . ची एन्ट्री झाली नाही....अजून थोडे दिवस असाच वेळ काढतील....आणि नन्तर उ. का. ची एन्ट्री होईल.........

मला आज कळल कि राधाच्या आत्याच नाव प्राची आहे.. त्याऐवजी ते 'गच्ची' असायला हव होत.
आणि तो घनाच्या बाबांचा डायलॉग काय होता...
'अफवा अशानेच पसरतात.. एकमेकांना गाठा थेट प्रश्न विचारा.. माहिती करून घ्या आणि मग चारचौघात काय ते बोला..'
या वाक्याचा शेवट 'कारण तुम्हालाही टीबी असू शकतो' अस असल्यासारखं वाटलं.
पण It is a serial which I love to hate.

या वाक्याचा शेवट 'कारण तुम्हालाही टीबी असू शकतो' अस असल्यासारखं वाटलं. Rofl

>>या वाक्याचा शेवट 'कारण तुम्हालाही टीबी असू शकतो' अस असल्यासारखं वाटलं.
पण It is a serial which I love to hate.

Rofl

सद्ध्या एका विशिष्ठ कारणाने घरी ही मालिका लागत नाही. त्यामुळे मी अत्यंत खूष आहे Happy

कालचा भाग छान होता, कारण राधाच्या आत्याला बराच वेळ संवाद नव्हते.
लोक उकाची एवढ्या आतुरतेने वाट का पाहताहेत? छान चाललीय की मालिका.

आज सं. ६:५५ चा डंका पिटला जातोय. ७ वाजता उत्सव २०१२ हा कार्यक्रम लोकांनी पहावा म्हणून का?

Pages