ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?

Submitted by सेनापती... on 30 December, 2010 - 21:08

सध्या ह्या ओळींचा दुरुपयोग करून शिवाजी महाराज ब्राह्मण विरोधी होते असा आरडाओरडा केला जातोय. जर ते ब्राह्मण विरोधी असते तर त्यांनी त्यांच्या अष्टप्रधानात आणि कार्यात ब्राह्मणांना स्थान दिले असते का? स्वतः:ची वाक्ये चुकीच्या पद्धतीने राजांच्या तोंडात कोंबून ब्रिगेडी लोक अप्रत्यक्षपणे नव्हे तर आता थेट प्रत्यक्षपणे राजांचा अपमान करीत आहेत... जे लोक राजांबरोबर फक्त राजकारणात नाही तर युद्धात देखील खांद्याला खांदा लावून लढले त्यांच्याविरुद्ध हा मुर्खासारखा अपप्रचार सुरू केला आहे. हे थेट राजांच्या राज्यकार्याचा आणि युद्धनितीचा अपमानच आहे. ह्याचा निषेध करावा तितका कमीच.

'शिवाजी राजांचे खरे शत्रू कोण?' हे पुस्तक जेंव्हा माझ्या वाचनात आले तेंव्हा त्यावरील मुखपृष्ठ (शिवाजीराजे कृष्णाजी भास्करला मारताना) आणि 'ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो' या खालील ओळींनी विचारचक्र सुरू केले. राजांनी हे एका पत्रात लिहिले आहे खरे पण ते कृष्णाजी भास्करला नव्हे. कुठल्याही एका जातीची मक्तेदारी समाजावर नसून हे श्रींचे राज्य अशी धारणा राजांची होती. हे वाक्य राजांनी ज्या पत्रात वापरले आहे ते संपूर्ण पत्र मी येथे देत आहे. ह्यावरून समजून येईल की चुकीचे वाक्य चुकीच्या ठिकाणी वापरून लोकांची कशी दिशाभूल केली जात आहे...

शिवाजी महाराजांनी मुरुड-जंजिरा समोर कांसा उर्फ़ पद्मदुर्ग उभा करून सिद्दीला थेट आवाहन दिले होते. त्या जलदुर्गाचे काम लवकरात लवकर व्हावे म्हणुन प्रभावळीचा सुभेदार जिवाजी विनायक याला आरमारास रसद पोचवायचे काम दिले होते. या कामात हयगय केल्याबद्दल शिवरायांनी १८ जानेवारी १६७५ रोजी जिवाजी विनायक याला कडक शब्दात ताकिद देणारे पत्र लिहिले. त्यात ते म्हणतात,"ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो?"

****************************************************************************************************************************
मशहुरुल हजरत राजश्री जिवाजी विनायक सुभेदार व कारकून सुभे मामले प्रभावळी प्रती राजश्री शिवाजी राजे दंडवत. सुहुरसन खमस सबैर व अलफ. दौलतखान व दरिया सारंग यांसी ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत पेशवे यांणी वराता सुभे मजकुरावरी दिधल्या. त्यांस तुम्ही काही पावविले नाही म्हणोन कळो आले. त्यावरून अजब वाटले की ऐसे नादान थोडे असतील! तुम्हास समजले असेल की याला ऐवज कोठेतरी देवविला पाहिजे. तो न पावविता ऐवज खजाना रसद पाठीविलीया माजरा होईल म्हणत असाल. तरी पद्मदुर्ग वसवून राजपुरीच्या उरावर दुसरी राजपुरी केली आहे. त्याची मदत व्हावी. पाणी फाटी आदि करून सामान पावावे. या कामास आरमार बेगीने पावावे. ते होत नाही तर पद्मदुर्ग हबशी फौजा चौफेर जेर करीत असतील. आणि तुम्ही ऐवज न पाठवून आरमार खोळंबून पाडाल. एवढी हरामखोरी तुम्ही कराल आणि रसद पाठवून मजरा करू म्हणाल. त्यावरी साहेब (शिवाजी राजे) रीझतील की काय? ही गोष्ट घडायची तरी होय, न काळे की हबशियांनी काही देऊन आपले चाकर तुम्हास केले असतील! त्याकरिता ऐसी बुद्धी केली असेल! तरी ऐश्या चाकरास ठिकेठिक केली पाहिजेत. ब्राह्मण म्हणुन कोण मुलाहिजा धरु पाहतो? या उपरी त्याला ऐवज व गल्ला राजश्री मोरोपंत देविला असे तो देवितील. तो खजाना रसद पाविलीयाहून अधिक तेणेप्रमाणे आदा करणे की जे तुमची फिर्याद न करीत व त्यांचे पोटास पावून आरमार घेऊन पद्मदुर्गाच्या मदतीस राहात ते करणे. या उपरी बोभाट आलिया उपरी तुमचा मुलाहिजा करणार नाही, गनिमाचे चाकर गनीम जालेस ऐसे जाणून बरा नतिजा तुम्हाला पावेल. ताकीद असे.

रवाना छ २ जिल्काद.
****************************************************************************************************************************

तर हे १८ जानेवारी १६७५ रोजी लिहिलेले पत्र १६ वर्षे आधी घडलेल्या 'कृष्णाजी भास्कर' बरोबर जोडून अपप्रचार आणि गैरसमज पसरविला जात आहे... हे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवणार आहोत का???

मायबोलीवर पूर्वप्रकाशित इतर ऐतिहासिक पत्रे :
तुर्काचा जवाब तुर्कितच दिला पाहिजे..
हे राज्य व्हावे हे श्रींचे मनात फार आहे
सर्व ज्ञातीने कस्त करून शत्रु पराभवाते न्यावा...
बदअमलाबद्दल कड़क शासन...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात कृष्णाजी भास्करचा शिवरायानी एका फटक्यात वध केला असे लिहिलेले आहे.. त्यामुळे तो मेला कि नाही हा वाद उठवायचे काही कारण नाही.

http://3.bp.blogspot.com/_hrgE3emTGYk/TRxhmrhboHI/AAAAAAAAAeo/74RHh0tO2q...

चंद्रगुप्त,

>> चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकात कृष्णाजी भास्करचा शिवरायानी एका फटक्यात वध केला असे
>> लिहिलेले आहे.. त्यामुळे तो मेला कि नाही हा वाद उठवायचे काही कारण नाही.

सरकारी पुस्तके म्हणजे इतिहासाचे अस्सल दस्तऐवज नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

>>सरकारी पुस्तके म्हणजे इतिहासाचे अस्सल दस्तऐवज नाहीत.
अनुमोदन.

रच्याकने, उत्खननात सापडलेलंच खरं असतं Light 1 Wink Proud
(हलके घ्या)

सरकारी पुस्तके म्हणजे इतिहासाचे अस्सल दस्तऐवज नाहीत.

अस्सल दस्तावेज बघूनच सरकारी पुस्तकातील ओळ अन ओळ लिहिली जाते. जर कृष्णाजीबद्दल तुमच्याकडे अधिक अस्सल माहिती असेल, तर तुम्ही ती सरकारला पटवून देऊन पुस्तकात छापून आणा, मग तीही लोक मान्य करतील.. पण तोवर तरी सरकारचीच माहिती ग्राह्य मानायला हवी.

अर्थात, तुमच्यावर बंधनकारक नाही.. कृष्णाजीला शिवाजीनी अज्ञातवासात पाठवले , त्यानंतर हाच कृष्णाजी गागा भट्ट म्हणून प्रकटला, असेही तुम्ही म्हणु शकता.. Proud तुमचे तोंड कोण धरणार?

सेन्या, लेख छानच.
लिंबुटिंबुंच्या प्रतिक्रिया ही पटल्या.

>>अस्सल दस्तावेज बघूनच सरकारी पुस्तकातील ओळ अन ओळ लिहिली जाते.

यात हसण्यासारखे काय आहे? पाठ्यपुस्तक मंडळ सगळे संदर्भ जपुन ठेवते. त्याना विचारु शकता.

>>> सरकारी पुस्तके म्हणजे इतिहासाचे अस्सल दस्तऐवज नाहीत.

+१००

सरकारी इतिहासाची पाठ्यपुस्तके म्हणजे तद्दन रद्दीमाल. त्यात पोलिटिकली करेक्ट (याला योग्य मराठी प्रतिशब्द माहित नाही) असा सुधारित सरकारी आणि गाळीव इतिहास लिहिलेला असतो. इतिहासात खर्‍याखुर्‍या घडलेल्या पण पोलिटिकली अडचणीत आणू शकणार्‍या खर्‍या घटना त्यात गाळलेल्या असतात. पण त्यातून सुद्धा लेखकांचे दुर्लक्ष होऊन एखादी अशी गोष्ट लिहिली जाते की त्यामुळे सरकारची अत्यंत अडचणीची परिस्थिती होउन त्या एखाद्या पोलिटिकली-नॉट्-सो-करेक्ट ओळीमुळे आख्खे पुस्तक रद्द करावे लागते.

नुकतेच सीबीएसईचे राज्यशास्त्रावरील आख्खे पुस्तक अर्कचित्रामुळे रद्द करावे लागले. यापूर्वी महाराष्ट्रात एक इतिहासाचे पुस्तक महंमदाचे चित्र असल्याने तर दुसरे पुस्तक महंमदाविषयी एक वेगळ्या तर्‍हेचे वाक्य पुस्तकात असल्याने रद्द करावे लागते. अजून एक पुस्तक शाहू महाराजांबद्दलच्या एका उल्लेखाबद्दल आक्षेप आल्याने रद्द करावे लागले होते. ८-९ वर्षांपूर्वी अजून एका इतिहासाच्या पुस्तकात शीख लोकांच्या एका पूर्वीच्या राजाविषयी केलेल्या उल्लेखांबद्दल आक्षेप आल्याने रद्द करावे लागले होते. बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना "शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला" अशा स्वरूपाचे एक वाक्य इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले होते.

सरकारी इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेल्या इतिहासावर विश्वास ठेवून त्याचे दाखले देणार्‍यांची कीव कराविशी वाटते.

>>> अस्सल दस्तावेज बघूनच सरकारी पुस्तकातील ओळ अन ओळ लिहिली जाते.

त्याच पुस्तकात,

अफझलखानाला शिवाजीनी मारले
दादोजी पुण्यातील कारभार उत्तम रीतीने पहात होते. पुण्यात लांडगे शेताचे नुकसान करत होते. ( लांडगे शाकाहारी होते का? Proud ) त्यांचा त्यानी बंदोबस्त केला.

असेही बरेच काही आहे..

म्हणजे बाकी लोक काही का दंगा करेनात, सरकार जवळ जे संदर्भ असतील त्यानुसार त्यानी पुस्तके छापली आहेत... कृष्णाजीबाबत सरकारचा मजकूर खोटा असेल, तर हा वरचा इतर मजकूर सुद्धा खोटा म्हणायच का? Proud का स्वतःच्या सोयीनुसार एकाच पुस्तकातील दोन ओळी खर्‍या, दोन ओळी खोट्या ठरवायच्या?

बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री असताना "शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला" अशा स्वरूपाचे एक वाक्य इतिहासाच्या पुस्तकातून काढून टाकण्यात आले होते.

या पुस्तकात खानाच्या पोटात वाघनखे व बिचवा खुपसला, त्याची आतडी बाहेर आली, असा स्पष्ट उल्लेख आहे.

पोलिटिकली-नॉट्-सो-करेक्ट ओळीमुळे आख्खे पुस्तक रद्द करावे लागते.

चूक निघाली की अख्खे पुस्तकच रद्द करावे लागते. त्यात गैर काय आहे? का सरकारने व्हाइटर घेऊन सगळ्या पुस्तकाना फासत बसावे असे तुमचे मत आहे का? चुकीचा मजकूर गाळून पुन्हा पेज सेट अप करुन नवीन पुस्तक काढावे लागणार ना? Proud

<<यात हसण्यासारखे काय आहे?

एका पुस्तकात भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांना अतिरेकी म्हटलं होतं.

समजलं आता हसण्यासारखं काय आहे?

Proud Rofl Biggrin Lol

>>> अस्सल दस्तावेज बघूनच सरकारी पुस्तकातील ओळ अन ओळ लिहिली जाते.

>>> चूक निघाली की अख्खे पुस्तकच रद्द करावे लागते. त्यात गैर काय आहे?

Biggrin Lol Rofl

यास्तव
>>> अस्सल दस्तावेज बघूनच सरकारी पुस्तकातील ओळ अन ओळ लिहिली जाते.

हे वाक्य हास्यास्पद आणि चुकीचे ठरते Happy

हो. पण नंतर ते बदलले ना? तसा कृष्णाजी मेलाच नव्हता, असा तुम्ही दाखला द्या, तेही बदलतील. अजुन अखेर या वाक्याला तुआक्षे/ कुणी आक्षेप का नाही घेतला?

हे वाक्य हास्यास्पद, बालीश, आणि चुकीचे ठरते

दहा वर्षात घडलेल्या एखाद्या घटनेने असे काही सिद्ध होत नाही.. ( असेच म्हणायचे तर तुम्ही तुमचे कितीतरी पोस्ट एडिट करत असता, -*- असे काहीतरी लिहित असता.. त्याची फ्रिक्वेन्सी तर नक्कीच या प्रकरणांपेक्षा जास्त असते. ) Proud

>>> हे वाक्य हास्यास्पद, बालीश, आणि चुकीचे ठरते

सरकारी इतिहासाचे आख्खे पाठ्यपुस्तकच हास्यास्पद, बालीश आणि चुकीचे आहे.

संदर्भ सोडून वाक्य निवडली कि अर्थाचा अनर्थ होतो. इंटरनेटच्या युगात कोणीही परदेशात बसून काहीतरी बरळतो, त्यावर आपण भारतात दंग्गल करणे हा निव्वळ मूर्खपणा आहे.
इतिहासातील अनेक व्यक्तीरेखांवर उलटसुलट दाखले मिळतात. मग मागच्या पुढच्या २० वर्षाचा इतिहास तपासला कि सत्य उजेडात येते.
मूर्ख जेम्स लेनला आंतरराष्ट्रीय न्यायालयात खेचून ऐतिहासिक व्यक्तीची बदनामी केल्याबद्दल चांगले शासन केले पाहिजे. आपापसात भांडून बसच्या काचा फोडून काय मिळणार? तो जेम्स लेन अमेरिकेत हसत बसला असेल.
भारतात जातीभेद पुराणकाळापासून होते. बहुतौशी जाती किवा आडनावे हि व्यवसायामुळे पडलेली दिसतात. उच्च-नीच असा भेद व्यवसायाने मिळणाऱ्या उत्पन्नाच्या पातळीने जे आर्थिक भेद निर्माण झाले त्यामुळे पडला. अगदी DNA जरी तपासला तरी ९८% genes सारख्या आढळतात.. समाजातील जातीभेद हे पूर्वीच्या काळी गावाच्या अर्थव्यवस्थेशी निगडीत होते. आता कोणीही कोणताही व्यवसाय करत असल्याने जातीभेद निरर्थक आहेत.

आणखी एक महत्वाचा भाग असा कि अनेक आंतरराष्ट्रीय शक्तींना भारताची ६० वर्षात झालेली प्रगती डोळ्यात भरते. अश्या मूर्ख वादाला फोडणी देऊन सामाजिक तेढ निर्माण करणे हा त्यांचा कुटील डाव आपण वेळीच ओळखला पाहिजे.

छान

पाटील ब्राह्मणांच्या विरोधात बोलण्याचे कारण नाही या मुद्द्याबाबत,
कोणत्या ब्राह्मणाने शिवाजी चारित्र्यसंपन्न नव्हता असे म्हणले आहे ते दाखवून द्या.
उलट सन्मानाने परत पाठवले असेच सांगितले आहे ना. आणि सुंदर दिसण्याबद्दलचे विधान खरे असले आणि नसले तरी त्यामुळे पराक्रमाचे, कर्तृत्वाचे महत्व कमी होत नाही.

क्रुश्नाजी भास्करला छत्रपतीन्नी कंठस्नान घातले हे सर्वांना ठाउक आहे. ब्राम्हनान्नी नेहमीच जाती-धर्माचे संकुचीत राजकारण केले. जातीच्या पलिकडे त्यांची झेप गेलीच नाही त्यामुळे उशीराने का होईना ही जमात कालबाह्य झाली. समाजाने बामनान्चे नेत्रुत्व अमान्य केले व आज बामन्नानाच मुख्य प्रवाहातून बाजुला फेकले आहे. गुजराती मारवाडी समाजाने धन कमावले तथापि ज्या लोकांच्या बळावर आपण हे धन कमावले आहे ते कधीही विसरले नाहीत. त्या समाजाने अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. सामाजीक बांधीलकी सोडली नाही. तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे समाजात तेढ निर्माण होईल असे वर्तण कोणी गुजराती मारवाड्याने केलेले नाही. तेच दुसर्‍या बाजूस बामन आजही १२बलोते विसरत नाही, विसरु पाहणार्‍यासही वारंवार जाणीवपूर्वक आठवण करुन दिली जाते.
खोडसाळपणा करायचा व रट्टे बसले की परत उलट्या बोंबा मारायच्या ही बामनांची जूणी सवय (खोड) आहे.
ज्यांच्या कष्टावर आपण जगतो त्यांनाच पशूपेक्षाही हीन दर्जाची वागणूक द्यायची वरुन टेचात मीशीला तूप लावून फिरायचे दिवस केव्हाच संपलेत हे काही कप्पाळकरंट्यांना ज्या दिवशी उमजेल तो सुदीन.
फुले-शाहू-आंबेडकरांनी आपले जीवन मातीत घातले म्हणून सर्वसामान्यांना आज हे दिवस पहायला मिळताहेत. अन्यथा आजही वर्णश्रेष्टत्वाच्या बेगडी तोर्‍याने समाजात गुलामीच असती.

वरती कोणीतरी शिक्षणाचा मुद्दा घेतला आहे. शिक्षणाचे दूरच राहूद्या. नुसते पूजा कोणत्या प्रकारे सांगायची, ह्यावरुन दस्तुरखुद्द राजालाच शुद्र बनवले गेले. तो वाद घेवून एक राष्ट्रीय (?)नेता न्यायालयात जातो. ह्यावरुन वाचकांनी बोध घ्यावा.

टिळक

Pages