..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ३)

Submitted by मामी on 18 October, 2011 - 08:42

मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?

हा या धाग्याचा तिसरा भाग. अजूनही असाच अखंड विणत राहिला आहात.....

नेहमीच्या खेळाडूंकरता जोरदार टाळ्या!!!!!!!!!!

पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

OK. Happy

कोडं क्र. ०३/०६२: एका प्राणी संग्रहालयात एका विभागात सगळे नर मगर असतात. एका संध्याकाळी संग्रहालयाचे मालक त्या विभागात मादी मगर आणतात. तिला बघून ते नर मगर कुठले गाणे म्हणतील?

क्लू १: आशा भोसले

कोडं क्र. ०३/०६३

एक हाऊस-हसबंड असतो. त्याची पत्नी एका कारखान्यात काम करत असते. पण त्याचं खरं प्रेम दुसर्‍या एका पुरूषावर - विश्वनाथवर असतं. लाडानं तो त्याच्याकरता विश्वच्या अर्थी एक कोडनेम ठेवतो, जेणेकरून त्याच्या पत्नीला सुगावा लागू नये. एकदा त्याची पत्नी खूप आजारी पडते. जवळ जवळ दोनेक महिने ती कामावर जाऊ शकत नाही त्यामुळे यालाही विश्वला भेटता येत नाही. शेवटी एकदाची ती बरी होते आणि कामावर जाते. आता घर मोकळे मिळाल्याने तो इतका खुश होतो की जणू विश्व भेटलाच असं त्याला वाटायला लागतं. अशा आनंदविभोर अवस्थेत तो कोणतं गाणं म्हणेल?

वॉव स्निग्धा, लग्गेच ओळखलंस की!

कोडं क्र. ०३/०६३

एक हाऊस-हसबंड असतो. त्याची पत्नी एका कारखान्यात काम करत असते. पण त्याचं खरं प्रेम दुसर्‍या एका पुरूषावर - विश्वनाथवर असतं. लाडानं तो त्याच्याकरता विश्वच्या अर्थी एक कोडनेम ठेवतो, जेणेकरून त्याच्या पत्नीला सुगावा लागू नये. एकदा त्याची पत्नी खूप आजारी पडते. जवळ जवळ दोनेक महिने ती कामावर जाऊ शकत नाही त्यामुळे यालाही विश्वला भेटता येत नाही. शेवटी एकदाची ती बरी होते आणि कामावर जाते. आता घर मोकळे मिळाल्याने तो इतका खुश होतो की जणू विश्व भेटलाच असं त्याला वाटायला लागतं. अशा आनंदविभोर अवस्थेत तो कोणतं गाणं म्हणेल?

उत्तरः
तुम जो ''मिल'' गये हो, तो ये लगता है
के ''जहाँ" मिल गया

मामी मस्तच कोडी Happy

कोडं क्र. ०३/०६३
आजच्या दिवसातले हे शेवटचे चित्रकोडं. सोप्प्य Wink
(आजच्या चित्रकोड्यातील सगळी चित्रे (एक "लडी"चे सोडुन ;-)) गुगलहुन साभार)

मामी एक्दम बरोबर Happy
कालच्या पण शेवटच्या "सुरमई" चे उत्तर दिले होतेस. Happy

कोडं क्र. ०३/०६३
डफ ली वाले डफली बजा
मेरे घुंगरू बुलाते है आ
मै नाचू तु नचा

सगळी कोडी धमाल. मला एकही सुटलं नाही.
माधव, शर्मिलाताई अभिनेत्रीही होती हो. सत्यजित रेंचे फाइंड ना ती?

मी आहे.

दिल, परवाने, राज इतकं कळतंय. बाकी??? ममता, वादीयां (कुमार रीसॉर्ट), चेहरा / भाव / बुढापा / झुर्रीयां .... ?????? Uhoh

जिया बेकरार है छायी बहार है
आजा मोरे बालमा (बाल मां) तेरा इंतजार है Happy

आजा- सिनियर सिटिझन. तुझं बरोबर आहे बहुधा.

स्वप्ना, श्रद्धा आणि जिप्सी साष्टांग _/\_
हे गाणं माहिती असूनही ओळखता नै आलं Sad

मामी,
तू आणि इथली टीप एक्स्पर्ट आहे यार, मला एकही कोडं येत नाही गं सोडवता, पण आहे बघ धाग्यावर मधे मधे गेसवर्क सुरू आहे Happy

स्वप्ना बरोबर Happy
तुला गरमागरम कचोरी आणि जिलेबी बक्षिस Happy (पण आज दुकान बंद असल्याने पुन्हा केंव्हा तरी Happy )

श्रद्धा एकदम बरोबर Happy
सिनियर सिटिजन = आजा

००३/६३
आजा आयी बहार दिल है बेकरार,
ओ मेरे राज कुमार तेरे बिन रहा ना जाय

कोडं क्र. ०३/०६४

घनश्याम आणि संध्याचं प्रेम कॉलेजपासूनचं. दोघं लग्न करणार असं जवळजवळ सगळेच धरून चालले होते. पण कुठेतरी काहीतरी बिनसलं आणि दोघे विभक्त झाले. घनश्याम परदेशात निघून गेला आणि संध्याने दक्षिण भारतातल्या एका छोट्यश्या खेड्यात एनजीओसाठी काम सुरु केलं. निलगिरीच्या कुशीत वसलेलं ते गावं तिला इतकं आवडलं की तिथेच तिने आपलं एक घरकुल उभारलं आणि त्याला नाव दिलं ते निलगिरीच. तिचं काम लोकांना इतकं आवडलं की पंचक्रोशीत लोक तिला ओळखू लागले. दिवसा गर्द झाडीतून उतरणारी, जमिनीवरच्या सावलीशी खेळणारी उन्हं, खळाळत वाहणारा झरा, डोंगरमाथ्याशी उतरलेले ढग ह्यांच्या सोबतीनेच तिने उरलेलं आयुष्य काढायचं ठरवलं.

आणि घनश्याम? काही वर्ष परदेशात काढल्यावर त्याने भारतात परतायचा निश्चय केला. आल्या आल्या त्याने संध्याचा पत्ता शोधला. काही कॉमन मित्रांच्या मदतीने त्याला ती दक्षिण भारतात असल्याचं कळलं. विमान, कार असा प्रवास करर करत तो जवळच्या शहरात पोचला. आता त्याला त्या गावाचा ठिकाणा शोधायचा होता. पण मधल्या प्रवासाच्या शिणाने आणि संध्या भेटेल की नाही ह्या काळजीने तो गावाच नाव विसरला. पण संध्या त्या भागात प्रसिध्द असल्याचं त्याला ठाऊक होतं म्हणून त्याने तिचाच पत्ता विचारला. एका गावकर्‍याने चक्क हिंदी गाणं म्हणून त्याला तो पत्ता सांगितला तो इतका अचूक की काही मिनिटातच घनश्याम संध्याच्या घरी जाऊन पोचला.

मग पुढे? अहो, मी काय रोमॅन्टिक सिनेमाची गोष्ट सांगतेय का? कोडं आहे हे. समजून घ्या ना राव. हिंदी पिक्चरप्रमाणे सगळं गोडच झालं शेवटी. पण तुम्ही त्या गावकर्‍याने म्हटलेलं हिंदी गाणं ओळखताय ना?

Pages