'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जागु, मी गेल्या आठवड्यात
जागु,
मी गेल्या आठवड्यात कुर्गला गेले होते. तिथे होमस्टे मध्ये असाच वेल होता. आणी कोवळ्या काकडी सारखी तोंड्ली खाल्ली.
खुप फोटो काढले. जमले तर टाकेन
हो ग जागू. श्या काय पण माझे
हो ग जागू. श्या काय पण माझे अगाध ज्ञाने हे
निकीता नक्की टाक फोटो.
निकीता नक्की टाक फोटो.
निकिता, लहान मुलांनी कच्ची
निकिता, लहान मुलांनी कच्ची तोंडली खायची नसतात जिभ जड होते
मोनालीजी अभिनंदन जवळच्या
मोनालीजी अभिनंदन जवळच्या क्रुषी अधिकार्याचा सल्ला नक्की घ्या, हो महत्वाचे जमिनीत पाणी आहे का याची पडताळणी करुन घ्या.
कळवा स्टेशन सोडले की जराशा अंतरावर एकाच ठिकाणी हे भरपुर झुडुप आहेत >> हो ती झुडप कँडल बुशचीच आहेत. फक्त लींक मध्ये ती जराशी केशरी रंगाची दिसताहेत आणि ठाण्यात पिवळीधम्मक आहेत, लवकरच प्रचि टाकतो.
जागुताई - आता तरी त्या फुलांचे नाव सांग सगळे हरले
आज सगळे गेलेत कुठे ?
शशांक/शांकली, तुमच्या मुलीचं
शशांक/शांकली, तुमच्या मुलीचं मनापासुन कौतुक!!!!
बाप्रे.. १३१ पोस्टी वाचता वाचता वेळेचं भानही राहिलं नाही..इतकी मजेशीर माहिती वाचता वाचता केंव्हा सीप थ्रू होईल कोणास ठाऊक ..
टोमॅटोज बद्दल रंजक आहे माहिती.. आणी सर्व प्राण्यांबद्दलची माहिती ही मस्तच ..दिनेश दा.. वनस्पती,किडेमकोडे,प्राणी सर्वांमधे स्वतःचा जीव वाचवण्याचे इंस्टिंक्ट जबरदस्त असते.. खरच आश्चर्यकारक माहिती!!!
जागु , ती छोट्टुशी फुलं कसली आहेत.. ????
अर्रे मोनाली ..
अर्रे मोनाली .. अभिनंदन!!!!!!!!!
इनमिन तीन ती
इनमिन तीन ती धण्याची-कोथिंबीरीची फुले आहेत. सगळे जवळच होते मला वाटल कोणीतरी सांगेल.
उद्या मी ठाण्याला जाणार आहे. बघते दिसतात का ती फुले कुठे सोबत माझा कॅमेरा असेलच
इनमिन तीन ती
इनमिन तीन ती धण्याची-कोथिंबीरीची फुले आहेत >>> अरेरे मी सांगणारच होतो पण म्हटल....:)
जागू, तुला उत्तर सांगण्याचा
जागू, तुला उत्तर सांगण्याचा आनंद मिळावा म्हणून आम्ही उत्तर फोडले नाही
माधव
माधव
जागू, तुला उत्तर सांगण्याचा
जागू, तुला उत्तर सांगण्याचा आनंद मिळावा म्हणून आम्ही उत्तर फोडले नाही >>>
माझ्याकडे फुट्बॉल लिलिचा कळा
माझ्याकडे फुट्बॉल लिलिचा कळा आला आहे. आता फुलेल काही दिवसात.
माझ्या येण्याजाण्याच्या
माझ्या येण्याजाण्याच्या रस्त्यावरचे काही ताटवे गाडीतून वेड लावतात..एकदा संधी साधून यांना कॅमेरात पण पकडलं...:)
From SpringFlowers
From SpringFlowers
दिनेशदा, मी आणि लेकीने
दिनेशदा,
मी आणि लेकीने दोघींनी खाल्ली
सुप्रभात. माधव वेका सुंदर
सुप्रभात.
माधव
वेका सुंदर फुले आहेत.
जोएस माझ्या आईकडे पण फुललेय फुटबॉल लिली उर्फ मे फ्लॉवर.
वेका फुलांचा गालीचा सुंदरच
वेका फुलांचा गालीचा सुंदरच
सुप्रभात जागुताई प्रचि रात्रीचा काढ्लाय का आणि याच नाव काहीतरी मदण असे आहे ना
याच नाव काहीतरी मदण असे आहे
याच नाव काहीतरी मदण असे आहे ना > मदनबाण का ? मस्त वास असतो याचा.
मला ओल्या मातीच्या वासाचं एक अत्तर मिळालं बाजीराव रोड वरच्या दुकानात. मस्तच. आत्ता तेच लावून नि. ग. वाचत्येय.
मला ओल्या मातीच्या वासाचं एक
मला ओल्या मातीच्या वासाचं एक अत्तर मिळालं बाजीराव रोड वरच्या दुकानात. मस्तच. आत्ता तेच लावून नि. ग. वाचत्येय. >>> कुठे मिळाले नक्की? कंपनी नाव व डिटेल देणार का?
वेका आणि जागू, सुंदर
वेका आणि जागू, सुंदर फुले.
मोनालि, मातीचे अत्तर मी भुलेश्वरला विकत घेतले होते. तिथे एक जूने दुकान आहे. दगडी खलात फुले घोळून
तिथेच अत्तर करतात. ५ नंबरच्या रुटवर आहे. (अजून असावे)
बाप्रे...वेका! एवढा फुलांनी
बाप्रे...वेका! एवढा फुलांनी भरलेला रोड पाहुन किती हरखुन जातं ना! दिवसभर फ्रेश रहात असशील तु.
मोनाली, विश्राम्बाग
मोनाली, विश्राम्बाग वाड्यापासून सारसबागेच्या दिशेने निघाल्यावर ३/४ चौक सोडून उजव्या बाजूला एक छोट अत्तर, पर्फ्युम्स चं दुकान आहे. (`सृष्टी गंध' किंवा असंच काहीतरी नाव आहे. नक्की आठवत नाहीये गं ). छोटी अत्तराची बाटली आहे. कंपनी नाव वगैरे काहीच नाहीये त्यावर. पण सुगंध मस्त आहे. (पण फार वेळ टिकत नाहीये )
आज नि.ग. वर भारतबंदचा प्रभाव
आज नि.ग. वर भारतबंदचा प्रभाव दिसतोय
मोनाली अभिनंदन! जागू,
मोनाली अभिनंदन!
जागू, तोंडल्याचा वेल घरात लावून घरच्या तोंडल्याची भाजी करायचा माझाही मनसुबा आहे. सध्या कारल्याची वेल आली आहे आणि आतापर्यंत ५-६ कारली आलीयेत. बाल्कनीवाल्या लोकांना तेवढ्यातच समाधान मानावं लागतं. पण लहानपणी वेलीवरची कोवळी कोवळी तोंडली चिक्कार खाल्ल्येत.
दिनेशदा, तुम्ही सांगितलेत तशी तोंडलीची भाजी करते मी. फारच चविष्ट लागते.
मामी, कारल्याचा वेल असा एक
मामी, कारल्याचा वेल असा एक दागिना असायचा पुर्वी. कानातून मागे केसात घालत असत. कारल्याच्या
पानासारखीच सोन्याची छोटी पाने असतात, त्यात. पण तरीही, कारल्याचा वेल त्यापेक्षा सुंदर दिसतो, नाही का ?
इथे रानटी कारली रस्त्याच्या कडेने दिसतात. खुप दाट वेल असते ती. कारली छोटी लागतात, आणि कुणी खात
नाहीत मग ती पिवळी होऊन तीन भागात ऊकलतात आणि आतल्या लालभडक बिया उधळतात. अशी ऊकललेली कारली, फुलांपेक्षा देखणी दिसतात.
इथे रानात घोसाळ्याचे आणि शिराळ्याचे पण वेल दिसतात. हे लोक ते खात नाहीत, पण ती सुकल्यावर अंग साफ करण्यासाठी मात्र त्यांचा वापर करतात.
जागू............ तू दिलेली
जागू............ तू दिलेली तोंडली माझ्या हातुन मारली गेली
माझ्याकडे आधीही एक होता तोंडलीचा वेल. पण मला नस्ती दुर्बुद्धी होऊन मी तो खाली जमिनीत लावला. बिचारा धीर धरुन राहिला आणि हळूहळू पहिल्या मजल्यावरच्या माझ्या घरी पोचलाही... पण अचानक उंदरांचा काय मुड आला देव जाणे, त्याला मुळातुनच खाल्ला..
तूम्ही लोक आंबाडीची लागवड का
तूम्ही लोक आंबाडीची लागवड का करत नाही, झाडाला इजा न करता फक्त जून पाने तोडून घ्यायची, मग त्याला
छान पिवळी फूले येतात आणि मस्त लाल बोंडे येतात, त्यांचे सरबत करता येते.
बाजारात मिळणार्या जुडीतील मूळासकट काड्या रोवल्या, तरी तग धरतात (पावसात लावायच्या) हा प्रयोग मूळ असणार्या सर्व पालेभाज्यांसाठी करता येतो.
अख्खी करडई, मुंबईत क्वचितच मिळते, पण तिची फुले आणि बोंडे पण खुप सुंदर दिसतात. पण हि पालेभाजी मात्र विपुल आणि मूळासकट मिळते.
कारळ्याचे झाड आणि पिवळी फुले, तसेच अळशीचे झाड आणि निळी फूले, राजगिर्याचे झाड आणि किरमिजी तूरा सर्व शोभा देण्याचे आणि बिया देण्याचे काम छान करतात.
ही फुले म्हण्जे दोन
ही फुले म्हण्जे दोन वेगवेगळ्या माळ्यांची मेहनत आहे....पिवळी एक पब्लिक पार्क आहे त्याचा भाग आणि दुसरी एका अपार्ट्मेंट कॉम्प्लेक्स चा दर्शनी भाग.. मुलांना सोडुन परत येताना ही फुले पाहूण मी पूर्ण फ्रेश झालेली अस्ते ( जाताना त्यांनी किती डोकं खाऊन ठेवलं असेल तरी ..;) )
आभार्स लोक्स..:)
जागु,वेका,माधव छान फोटो
जागु,वेका,माधव
छान फोटो !
तोंडलीची वेल पहिल्यांदाच पाहिली..
दिनेशदा,शशांकजी,
नवीन ,रंजक माहिती मिळाली..
श्रीकांत,
गावाकडे प्रत्येक पानमळ्यात शेवग्याची शेकडो झाडे असतातच,तरीही २ वर्षापुर्वी आमच्या शेजारील शेतकर्यांनी भरपुर (१० एकर) लावला होता पण दर त्यावेळी इतके कोसळले कि नंतर हे पाहिलेल्यांनी कुणी लावण्याच नाव घेत नाही, लोकल (तालुका/जिल्हा) मार्केट मध्ये आवक खुप होते, त्यामुळे दर कमी मिळतो (होलसेल दर -१ रुपयाला २/३ शेंगा) त्यामुळे बाहेर विकण्याचा प्रयत्न करावा लागेल्,पण यामध्ये वाहतुक खर्च विचार करावा लागतो.
पण दराचा भरवसा नसतो हे जरी खरं असल तरी चांगला दर ही मिळतो, पण त्याची नियमित लागवड करायला हवी,एकदा करुन ती बंद करुन परवडणार नाही.
मी कॉलेजमध्ये असताना या शेवग्याच्या शेंगा १०-१२ रु. शेकडा विकल्या आहेत.पण तो दरही खुप वाटायचा, १ एकर पानमळ्यातुन साधारण आठवड्यातुन ८०००-१०००० शेंगा निघायच्या,सध्या अर्धा पानमळा कमी केला आहे.
शेतीमाल आहे,शेतीमालाची निर्यात करावी ही खुप जुनी इच्छा आहे,पण विकत कोण घेणार, तिथंपर्यत पोहोचायच कस हा प्रष्न आहे .पण प्रयत्न चालु आहे
इथले सर्व निसर्गप्रेमी,तुमच्या सारखे (बाहेर देशात असणारे) माहिती सांगणारे भेटले कि आणखी बळ येतं
या धाग्याबरोबर धावतांना दमछाक
या धाग्याबरोबर धावतांना दमछाक होतेय.. यापेक्षा किल्ले चढणं परवडलं..!
Pages