'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जागू आजचे सुप्रभात बघून
जागू आजचे सुप्रभात बघून 'समईच्या शुभ्र कळ्या' आठवले.>> मस्त सुचले हे.
वा मांजर पुराण पण मस्त चालु आहे. तो लेखातला उतारा अगदी खेळणार्या मांजरीला डोळ्यासमोर उभी करतो.
झाडांवर तंबाखूचे पाणी
झाडांवर तंबाखूचे पाणी फवारण्याचा उपाय इथे अनेकवेळा सांगितलाय. पण ही अक्कल प्राण्यांना पण आहे.
पंखात / केसात शिरणारे किटक त्यांना पण त्रास देतात. त्यासाठी कावळे सिगरेट्स पळवतात आणि ती चावून चावून ते लाळेने पंखाना लावतात. >>>>>> ही अक्कल मनुष्यप्राण्याला जरा जास्तच आहे दिनेशदा - कायम या ना त्या स्वरुपात माणूस तंबाखू जवळ बाळगतो, खातो, त्याचा धूर काढतो - तंबाखू किती उपकारक आहे हे मानवालाच जास्त माहित आहे - म्हणूनच माणूस "अति" बुद्धिमान, "अति" प्रगत....;)
वा मांजर पुराण पण मस्त चालु
वा मांजर पुराण पण मस्त चालु आहे. तो लेखातला उतारा अगदी खेळणार्या मांजरीला डोळ्यासमोर उभी करतो.>>>> इथे आमच्याकडील दोन मांजरांच्या पिल्लांनी सगळ्या बागेत नुसता धुमाकूळ घातलाय - कित्येक झाडावेलींच्या नव्या पालवींची वाट लावलीये पार..... घरात सगळेच मार्जारप्रेमी (मी सोडून) असल्याने या नुकसानकारक गोष्टींचेही कौतुकच होतंय हे विशेषच ...... अशा काही गोष्टी अंजूच्या नजरेस आणल्या तर - अरे पिल्लं आहेत ती, करणारंच जरा दंगा...... तुला त्यांच्या सगळ्या गोष्टी कशा खुपतात रे - असे म्हणून मला पार मोडीत काढतात......
शशांक>>>>+१
शशांक>>>>+१
शशांक मला काल जेवण करत
शशांक
मला काल जेवण करत असताना सहज पडलेला एक प्रश्न तसा खुप दिवसांपासुन डोक्यात रेंगाळत आहे.
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ? बाजारात सगळे टोमॅटोच म्हणतात. आमच्याकडील आग्री लोक तांबाटी, तांबोटी असे उच्चारतात.
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ?
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ? >>>> टमाटर..... किती सोप्प...
टमाटर तर हिंदी नाव आहे ना ?
टमाटर तर हिंदी नाव आहे ना ?
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ?
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ? >>>> टमाटं???
टमाटर तर हिंदी नाव आहे ना
टमाटर तर हिंदी नाव आहे ना ?>>>> जागू - Caught behind the wicket , अगं, गम्मत केली जरा....... टमाटर हा अपभ्रंश आहे टोमॅटोचा...... याला मराठीत नाव नाही - कारण हे आत्ता आत्ता बाहेरुन (परदेशातून) आलेलं आहे...
माझ्या संस्कृतज्ञ लेकीला विचारल्यास - काहीतरी लोहद्रुम किंवा रक्तद्रुम असं काहीतरी सांगेल ती... लाल रंगाचे फळ आहे ना हे म्हणून....;)
अननस या फळाची पण नावाबाबत एक
अननस या फळाची पण नावाबाबत एक गंमत आहे - जरा गुगलून बघा म्हणजे कळेल....
अशी अनेक परदेशस्थ फळे, झाडे आहेत ज्यांना आपल्याकडील वेगळी नावे नाहीत - कधी कधी उगाचच "कायजेलिया पिन्नाटा" ला - ब्रह्मदंड म्हणतात तसेच.... कारण हा मुळातला आफ्रिकेतला वृक्ष आहे. इथे आला तर आपल्याकडील नाव द्यायचा सोस कशाला - अर्थात हे माझे वै. मत - सगळ्यांनाच पटेल असे नाही........
शशांक माझे माहेरचे गाव नागांव
शशांक माझे माहेरचे गाव नागांव हे टोमॅटोच्या लागवडीसाठी प्रसिद्ध आहे आमच्या शहरात. नागावची भाजी किंवा टोमॅटो विचारतच गिर्हाईक खरेदी करत आधी. आमचीही टोमॅटोची ३-४ शेते असत. रोज दोन मोठ्या टोपल्या टोमॅटोच्या निघत. आम्ही शेतावर जाताना जाडे मिठ जरा खरडून नेत असू. मग तिथेच पिकलेले अख्खे टोमॅटो मिठ लावून खायचो. अगदी धुवायचीही गरज नसायची. तो ताजा वास आणि ती ताजी चव आहाहा...
माझे वडील सांगतात त्यांच्या बालपणात-तरूणपणात जे मळे लावायचे त्यात कलिंगडा एवढी मोठी टोमॅटोची फळे यायची. त्यांना तिन-चार वर्षापुर्वी ते जुने बी कुणाकडून तरी मिळाले होते. त्यांनी अर्धे शेत त्याचे लावले होते. आणि खरच जिबूडाएवढी टोमॅटो त्याला लागली होती. तेंव्हा फोटो काढले पण नाहीत बहुतेक मी. कारण कॅमेराच नसेल. पुन्हा ते बी मिळाले नाही. वडीलांनीही करून ठेवले की नाही ते माहीत नाही. पण ते टोमॅटो आतुन खुप रसाळ होते व त्याची साल पातळ होती. आताच्या टोमॅटॉसारखी ती टिकत नव्हते. पिकल्यावर एक-दोन दिवसांत संपवावी लागत होती.
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ?
टोमॅटोला मराठी नाव काय आहे ? >> मांसफल. टोमॅटो हा मांसासारखा दिसतो म्हणून हे नाव दिले असावे.
आपल्याकडील नाव द्यायचा सोस कशाला >> सोस नसतो. पण मूळ नावाचा उच्चार बर्याचदा आपल्या भाषेत करायला कठीण जाते मग आपल्या भाषेत त्याकरता प्रतिशब्द शोधला जातो. कुठलीही भाषा ही अशीच वाढते, समृद्ध होते.
माझे वडील सांगतात त्यांच्या
माझे वडील सांगतात त्यांच्या बालपणात-तरूणपणात जे मळे लावायचे त्यात कलिंगडा एवढी मोठी टोमॅटोची फळे यायची. त्यांना तिन-चार वर्षापुर्वी ते जुने बी कुणाकडून तरी मिळाले होते. त्यांनी अर्धे शेत त्याचे लावले होते. आणि खरच जिबूडाएवढी टोमॅटो त्याला लागली होती.>>>>> ओह - किती नवलपूर्ण गोष्ट - हे वाण (त्याचं बीज) थोडं तरी तुमच्याकडे वा इतर कोणाकडे प्रिझर्व व्हायला हवे होते. माझा एक शास्त्रज्ञ (शेतीतला) मित्र सांगत होता - कधी कधी जंगली (वाईल्ड) वाणं वा उकिरड्यावर उगवलेली वाणं फार उपयुक्त असतात - जास्त गर (फळाबाबत) तर कधी अनेक रोगप्रतिकारक (इतर झाडांवर पडणारे रोग या झाडांना होत नाहीत) शक्ति असलेले..... अशी वाणं निवडून ते नवीन संकरीत जाती तयार करतात... हे पण खूप महत्वाचे व अभ्यासपूर्ण काम आहे - प्लांट जेनेटिक्स.....
माधव मांसफल छान नाव आहे.
माधव मांसफल छान नाव आहे.
शशांक तरीपण वडीलांना आता त्या बियांचा शोध लागतो का ते बघायला सांगते.
अरे वा नारिकेलाख्यान सर्वांना
अरे वा नारिकेलाख्यान सर्वांना आवडले.......आनंद झाला!
माधव ........धन्यवाद! सध्या चालू असलेल्या विषयाला अनुसरून पूर्वी दिलेली लिंक परत देतीये. ज्यांनी वाचलं नसेल त्यांच्यासाठी.
असंच आपलं मार्जाराख्यानः
http://www.maayboli.com/node/4355
लहान (चेरी) टोमॅटोला खानदेशात
लहान (चेरी) टोमॅटोला खानदेशात 'भेद्रं' म्हणतात.
टोमॅटो आपल्याकडे बाहेरून आले. पण टोमॅटोचा रस रक्तासारख्या रंगाचा दिसतो म्हणून पूर्वी टोमॅटो खात नसत, भाज्यांच्या टोपल्यात विकायला टोमॅटो ठेवलेलेसुद्धा चालत नसत असं वाचलं कुठेतरी.
मागचं पान आत्ता वाचलं ...
मागचं पान आत्ता वाचलं ... माऊ, आमरस, संध्याकाळचे ढग, गुलाब, समईच्या शुभ्र कळ्या ... काय सुंदर फोटो आहेत! वेका, मी चितमपल्लींचं चकवाचांदण वाचलंय फक्त. तिथे त्यांची भरपूर पुस्तकं होती, काय घ्यावं हे सुचत नव्हतं.
जिप्सी, आता डोळा बरा आहे का? काळजी घे.
आपल्याकडील नाव द्यायचा सोस
आपल्याकडील नाव द्यायचा सोस कशाला >> सोस नसतो. पण मूळ नावाचा उच्चार बर्याचदा आपल्या भाषेत करायला कठीण जाते मग आपल्या भाषेत त्याकरता प्रतिशब्द शोधला जातो. कुठलीही भाषा ही अशीच वाढते, समृद्ध होते.>>>> एकदम मान्य....
अवांतर - माझ्या मोठ्या मुलीने (एम. ए. संस्कृत) "मूकं करोति वाचालं"- हे संस्कृत नाटक (बहुतेक एकांकिका) तिच्या मित्रमैत्रिणींनी मिळून लिहिले होते - "मोबाईलवर" - ज्यात सिम कार्ड सोडले तर मोबाईलसंबंधीत सर्व गोष्टींना (मोबाईल, की पॅड, मोड्स, वेगवेगळी ऑपरेशन्स, इ.) त्यांनी पर्यायी संस्कृत शब्द शोधले होते - सर्व स्तरावर या नाटकाचा गौरव झाला व आकाशवाणीनेही त्याचे रेकॉर्डिंग करुन ठेवले आहे.....
(माझी व अंजूची कॉलर निष्कारण ताठ....)
शशांक तुमच्या मुलीचे खुप खुप
शशांक तुमच्या मुलीचे खुप खुप अभिनंदन.
मी चकवा चांदण अर्धवटच ठेवल. का कोणास ठाऊक पण काहीतरी अंधश्रद्धा माझ्या मनात तेंव्हा निर्माण झाली होती. (तस काही नसत हे माहीत असुन सुद्धा.) त्या पुस्तक वाचनाच्या काळात मी अस्वस्थ होते. आमच्या घरावरच संकट आणि इतर काहीकिरकोळ संकट तेव्हाच आली होती.
जागू, त्या मोठ्याल्या
जागू, त्या मोठ्याल्या टोमॅटोला बीफ टोमॅटो असे नाव आहे. अगदी कलिंगडाएवढे नाही पण साधारण पाच इंच व्यासाचे फळ, बघितलेय. त्याचा स्वाद किंचीत वेगळा असतो. म्हणून कदाचित आपल्याकडे लोकप्रिय
झाले नसेल.
आजकाल, स्थानिक पिके अशी फारशी राहिलीच नाहीत. संत्री, केळी, अननस, पपया, बटाटे. कांदे असे जगभर एकाच प्रकारचे मिळतात. काही धान्ये (उदा. किन्वा) स्थानिक राहिली कारण ती विशिष्ठ हवामानातच पिकू शकतात.
ACKEE नावाचे एक फळ असते. ते सध्या जमैका देशाचे राष्ट्रीय फळ आहे. त्याची खासियत म्हणजे नीट पिकेपर्यंत ते फळ चक्क विषारी असते. पिकल्यावर देखील त्यातला वेचक भागच खाण्याजोगा असतो.
याचा उगम पश्चिम आफ्रिका मानतात पण नायजेरीयात तरी मी हे फळ कधी बघितले नव्हते.
नायजेरीयात काही स्थानिक फळे होतो. एकाचे नाव उदारा. पिवळ्या रंगाचे चिकाळ फळ असायचे. फळ कडवट आंबट गोड असायचे. तिथेही फार लोक ते खात नसत. (पण मी मात्र आवडीने खायचो.) दुसरे असायचे, त्याचे नाव, अचीचा. केशरी रंगाचे, मेणाचे वाटावे असे हे फळ. वर पातळ पापुद्रासारखी साल. आणि याची चव, ऊसासारखी. पण हे फळ, नायजेरीयाच्याही विशिष्ठ भागातच मिळायचे.
तिथल्या कोला नट, बद्दल मी लिहिले होते का ? हे फळ जंगली बदामाएवढे आणि रंगाने पिवळे असायचे.
त्याचा नखभर भाग तिथले लोक चघळत असतात. मी सहज एकदा तो तुकडा तोंडात टाकला, तर माझ्या
सेक्रेटरीने तो मला थुकायला लावला. त्याचे कारण असे, कि त्याचे व्यसन लागते आणि मग रोज ते खावेच
लागते. चव तुरट कडवट होती.
आपल्याकडे जे सुपारीचे स्थान आहे, तेच त्यांच्याकडे कोला नटचे. मोठ्या माणसाला भेटायला जाताना,
कुठलाही समझौता करताना ते द्यावे लागते.
त्याचे व्यसन लागते हे वर लिहिलेच आहे.... आणि कोका कोला सारख्या पेयात, त्यांचा अंश असतो. खरे तर कोला हा शब्द, त्यासाठीच वापरतात.
आता पुढचे मी लिहीत नाही.
दिनेशदा मस्त माहीती.
दिनेशदा मस्त माहीती.
आता पुढचे मी लिहीत नाही. ???
आता पुढचे मी लिहीत नाही.
???
मांसफळ नाव मी डहाणुकरांच्या लेखातही वाचलेय. त्यांची आजी मांसफळ म्हणायची.
मी चकवा चांदण अर्धवटच ठेवल
असं काही नसतं. सगळे आपल्या मनाचे खेळ.. जिथे नुकसान होईल असे वाटते तिथे मन रिस्क घ्यायला तयार होत नाही.
त्याचे व्यसन लागते हे वर
त्याचे व्यसन लागते हे वर लिहिलेच आहे.... आणि कोका कोला सारख्या पेयात, त्यांचा अंश असतो. खरे तर कोला हा शब्द, त्यासाठीच वापरतात. >>>>> अशा वैशिष्ट्यपूर्ण पाना-फुला-फळांची यादी करुन ठेवली पाहिजे... बहुधा कोणा वैशिष्ट्यपूर्ण लोकांकडे असेलही - कारण उपयोग फारच नामी/भारी आहे नं.......
मला वाटतं कोको का चहाची पानेही स्थानिक लोक ताजेतवाने होण्यासाठी चघळतात - याच शोधातून जगप्रसिद्ध झाली ना........
खरं तर माणूस कशाला अॅडिक्ट होईल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळेच अशा "वैशिष्ट्यपूर्ण पाना-फुला-फळांच्या" शोधातच असतो बहुतेक ......
शशांक. दक्षिण अमेरिकेतील
शशांक. दक्षिण अमेरिकेतील बहुतांश देश हे समुद्रपातळीपासून बर्याच उंचावर आहेत. तिथे ऑक्सिजन विरळ
असल्याने, आपल्यासारख्या (त्या वातावरणाची सवय नसलेल्या ) माणसांना तिथे अल्टीट्यूड सिकनेस चा त्रास होतो. त्यासाठी तिथे "मातें द कोला" नावाचे पेय प्यावे लागते. स्थानिक लोक तिच पाने चघळत असतात.
खरे तर याच पानांवर काही प्रक्रिया करुन, कोकेन हे मादक द्रव्य तयार करतात. अल जाझिरा या वाहिनीने,
Risking it all - Bolivia या माहितीपटात, त्या देशातील लोकांचे जीवन दाखवले आहे. त्यात या पानांची
निवड, साठवण आणि विक्री कशी करतात ते दाखवले आहे. त्यांच्या मते ती पाने तशी धोकादायक नाहीत.
त्या लोकांना हि पाने, केवळ त्या देशाची राजधानी, ला पाझ, इथेच विकता येतात. अन्यत्र नाहीत. पण
त्या बाजारपेठेतील जवळ जवळ एक तृतीयांश पाने, कोकेनसाठीच वापरली जातात.
इथे केनयात, जांभळासारखी पाने असणारे एक झाड असते. त्याला मिरा असे नाव आहे. त्याची कोवळी
पाने चघळल्यास झोप येत नाही. इथले बहुतेक सगळे नाईट वॉचमन, तिच पाने चघळत असतात.
तसे कॉफी पण उत्तेजकच पेय आहे. इथिओपिया येथील, काफ्का प्रांतात त्याच्या उगम झाला. एका विशिष्ठ झाडाची पाने फळे खाऊन, बकर्या जरा जास्तच टणाटण उड्या मारताना बघितल्यावर, या झाडाचा शोध लागला.
नामिबिया च्या जंगलात, मरुला नावाचे एक पिवळे फळ मुबलक मिळते. तिथल्या सर्व प्राण्यांचे ते आवडते
फळ, कारण ते खाल्ल्यावर त्यांना नशा चढते. या फळापासून मादक पेयही बनवतात.
आपल्याकडे मोहाची फुले, धायटीची फुले, काजूची बोंडे... अशीच सुप्रसिद्ध आहेत.
लेक म्हणाली, मम्मी आपली सोनू
लेक म्हणाली, मम्मी आपली सोनू पळून गेली असेल तर कुणाबरोबर तरी पळून गेली असेल ना ! एकटी कशी जाणार ? >>>>>> भारीये किस्सा.
चहा / कॉफीने खरेच उत्तेजना
चहा / कॉफीने खरेच उत्तेजना मिळते की तो तल्लफ भागल्यानंतर मिळणारा क्षणभराचा आनंद असतो? मला तर चहा/कॉफी पिऊन दुसर्या क्षणीपण झोप लागते.
दिनेश काजूची ताजी बोंडे खाऊन नशा येते?
आपल्याकडे मोहाची फुले,
आपल्याकडे मोहाची फुले, धायटीची फुले, काजूची बोंडे... अशीच सुप्रसिद्ध आहेत. >>>> हे आपल्याला माहित असलेलं झालं, पण यातील "जाणकार" मंडळी बसल्याजागी शे-दोनशे नावं सहज सांगतील....
साध्या देशी दारुत टर्पेंटाईन, फ्रेंच पॉलिश किंवा टिक ट्वेंटी घालणारी मंडळी आहेत - किक बसावी म्हणून...
चहा / कॉफीने खरेच उत्तेजना
चहा / कॉफीने खरेच उत्तेजना मिळते की तो तल्लफ भागल्यानंतर मिळणारा क्षणभराचा आनंद असतो? मला तर चहा/कॉफी पिऊन दुसर्या क्षणीपण झोप लागते.>>>> मला वाटतं ही उत्तेजना आणणारी कॉफी किंवा चहा जरा वेगळेच असतात (जास्त स्ट्राँग) व ते ही दूध व साखरेशिवाय. आपल्याकडील चहा व कॉफीत बरीच साखर असल्याने - झोप लागणे हा प्रकार असावा....
दिनेशदा केवढा साठा आहे
दिनेशदा केवढा साठा आहे माहितीचा तुमच्याकडे आणि किती इंटरेस्टिंग!
आमच्याकडील आग्री लोक तांबाटी,
आमच्याकडील आग्री लोक तांबाटी, तांबोटी असे उच्चारतात.>>>>.
टंबाटू , टाम्याटो असाही उच्चार ऐकलाय!
Pages