निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषी, अभिनंदन राहिलेच आणि मोनालिचे पण.

मोनालि, तूम्ही किती वेळ देऊ शकाल ? उत्पन्नाची अपेक्षा आहे कि नुसती हौस म्हणून ? या सगळ्या बाबी
विचारात घ्या. बळीराजा सारखी काही मासिके याबाबतीत नियमित मार्गदर्शन करत असतात.

कोकण कृषी विद्यापिठ पण माहिती देऊ शकेल. आंब्याची खात्रीची कलमे पण त्यांच्याकडे मिळतील.

शशांकजी, शांकली, मुलीचे व तुमचे पण अभिनंदन! Happy
एक आनंदाची बातमी. आम्ही (मी व नवर्‍याने) पेणच्या पुढे माणगाव जवळ साधारण २.५ एकर शेतजमीन घेतली. परवाच हातात ७/१२ आला.>>>>>>>>>>>>>>अरे व्वा! अभिनंदन!
<<<<शेतातल्या पार्टीचे (चुलीवरली झुणका-भाकर) ठरव आधी - बाकी ते सल्ले वगैरे सर्व नंतर.........>>>>>जोरदार अनुमोदन!!!!!>>>>>>>>>>>>>१०००% अनुमोदन. Wink

मोनाली अभिनंदन!! चला पुढच्या हिवाळ्यात पोपटी नक्की !! स्मित >>>>>>>> अनुमोदन Happy

नाही.

धन्स धन्स. खरे तर काहितरी संशोधन टाईप करायचे नवर्‍याच्या डोक्यात आहे. त्यासाठी त्याने मिटकॉनचा झाडांची लागवड व त्यापासुन उत्पन्न असा कोर्स पण केला.

त्यासाठी घरी अग्रोबन हा पेपर चालु केला व अ‍ॅग्रिकल्चर इन्फॉर्मेशनची मेंबरशीप पण घेतली. आता शांतपणे तेथे नक्की कसले उत्पादन करायचे / तो तेवढा एरिया कोणत्या प्रोडक्टसाठी पुरेसा होईल / त्या उत्पादनासाठी बाजारात मागणी किती आहे / काय किंमत आहे / आम्हाला किती इनकम अपेक्षीत आहे / मनुष्यब़ळ किती लागेल / आम्हाला किती वेळ द्यावा लागेल / किती देउ शकतो हा सर्वच विचार आता चालु आहे. हुश्श पाहु काय काय होतेय ते.

हो हो नक्की करुया पार्टी. जरा ती जागा धड बसण्याच्या तरी स्थितीत आणु दे. एक नि. ग. गटग करुयात. Happy

बळीराजा सारखी काही मासिके याबाबतीत नियमित मार्गदर्शन करत असतात. >>>> हे बघते.

कोकण कृषी विद्यापिठ पण माहिती देऊ शकेल. आंब्याची खात्रीची कलमे पण त्यांच्याकडे मिळतील.>>> हो आता पुढच्या वेळि तेथील कृषी ऑफिसला जायचे योजतोये. जागेतुनच कालवा गेलाय. तरीही विहिरीसंदर्भात पण माहिती गोळा करायची आहे.

मोनालि, लोकसत्ताच्या एका पुरवणीत एक लेख आला होता. त्यात परदेशातून आयात कराव्या लागणार्‍या काही
भाज्या (अ‍ॅस्पारॅगस, ब्रोकोलि वगैरे) कोकणात कशा उत्पादीत करता आल्या, त्यासंबंधी माहिती होती.

बळीराजा, कोल्हापूर मधून प्रसिद्ध होते. त्यात प्रश्नोत्तरे वगैरे असतात. औषधी वनस्पतिंच्या लागवडीचे कोर्सेस पण त्यामधे बघितल्यासारखे आठवताहेत.

स्टीव्हीया चा उल्लेख पण मी त्यातच आधी वाचला. साखरेच्या जागी, मी चहातून सध्या तेच घेतोय.( ही अतिगोड पाने असतात. अगदी एखादे पानच, एका चहाच्या कपासाठी वापरले तरी चहा गोड लागतो.) मुंबईत
पण, बिग बझार मधे (चेंबूरला) मिळाले होते.

धन्स दिनेशदा.

स्टीव्हीया चा उल्लेख पण मी त्यातच आधी वाचला. साखरेच्या जागी, मी चहातून सध्या तेच घेतोय.( ही अतिगोड पाने असतात. >>>> हे तर मस्तच आहे की. अजुन माहिती करते याची गोळा. माझ्या आयुर्वेदीक डॉ असलेल्या एका भावाला पण सांगते यावर अजुन माहिती काढायला. Happy

जागू, तू दिलेला ओळखा पाहू चा फोटो शतावरीचा असावा असं वाटतंय. असो, काल टोमॅटोबद्दल खूप छान माहिती दिलीस गं! एवढे मोठे टोमॅटो असतात हेच माहिती नव्हतं.

मुलीच्या कौतुकाबद्दल सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. तिने आणि तिच्या एका मैत्रिणीने मिळून ती एकांकिका लिहिली होती, शिवाय दिग्दर्शन पण केलं होतं. त्या एकांकिकेला पहिलं बक्षिसही मिळालं होतं. ही ४ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

मोनाली अभिनंदन शेतजमीन खरेदी केल्याबद्दल!! पण दिनेशदा म्हणतात ते खूप महत्वाचं आहे.

दिनेशदा, त्या स्टीव्हियाची पानं वापरता की त्याची पावडर मिळते ती वापरता?

शांकली तू जी दुरंगी बाभूळ सांगोतलीस ना? ती मी दररोज बघते. आणि काल त्याचा सर्वांसाठी फ़ोटो काढला. Happy
RSCN3389.jpgRSCN3390.jpg

ओके दिनेशदा. पूर्वी या पावडरीच्या कागदात गुंडाळलेल्या कांड्या मिळायच्या.

धन्स गं शोभा! आणि फोटो पण छान आलाय.

दिनेशदा, ही मोदी गणपतीच्या आवारात, प्रदक्षिणा मार्गावर मागच्या बाजूला आहे.

मोनाली, शेवगा लावण्या बद्दल विचार करा. अगदी दूरचा म्हणजे शेवग्याच्या शेंगा निर्यात करायचा सुध्दा. मी इथे सौदीत जुबैल मधे एक रियाल (सध्या १४.५ रु )ला एक या दराने कधी कधी विकत घेतो वाळलेल्यां मधून त्यातल्या त्यात बर्‍या निवडून Sad दक्षिण भारतीय लोकांच त्याच्याविना होतच नाही त्या मुळे शेवग्याच्याशेंगा इथे मिळतात (बहुधा गल्फ मधे सगळी कडेच) पण निर्यातीकरता कायकाय कराव लागत ते मला नक्की माहीत नाही.

... अगर सच्चे दिलसे कुछ चाहो तो सारी क क क क्क कायनात आपको मदत करने मे जुट जाती है... Lol

श्रीकांत,
मी गल्फ मधे असताना बघितलेय दाक्षिणात्य लोक त्यांना जे हवे असायचे ते मागवायचेच. गुजराथी लोकांचे पण तसेच असते. आणि शेवग्याचे लॅटीन नाव देखील, तामिळ नावावरुन घेतले आहे. या लोकांच्या कृपेने
तिथे आवळे, केळफूल, आंबाडीची भाजी असे सगळे मिळायचे.

टिनमधे उंधियू, अळूवडी, सरसोंका साग, माखणी पापडी, तूरीचे दाणे मिळत असे.

ताज्या भाज्या पाठवण्यापेक्षा टीनमधे पाठवल्या तर जास्त चांगले.

माझ्यामते आपल्या खास पदार्थांपैकी, आंबाडीची भाजी, वालाचे बिरडे, अळूचे फदफदे, पंचामृत, हिरव्या वाटाण्याची उसळ, पावट्याची उसळ, ओल्या हरभर्‍याची उसळ, कोकम कढी, मटकीची उसळ, काळ्या वाटाण्याची उसळ असे अनेक पदार्थ, टिनमधे पॅक करता येण्यासारखे आहेत. भारतात कदाचित खपणार नाहीत पण परदेशस्थ भारतीय लोकांनी सपोर्ट केले तर नक्कीच निर्यात होऊ शकतील.

अरे वा मस्त माहिती मिळत आहे. खरेच असे हे सर्व वाचले की आपण काहितरी नक्की करु शकु असे वाटते. Happy

हल्ली सोनमोहोर व बहावा सोडले तर अजुन एक पिवळ्या झाडांचे झुडुप दिसत आहे. तो फुलांचा गुच्छ बहाव्यासारखा उलटा लटकत नसुन खाली फुले व वरच्या दिशेने मध्यभागी बंद कळी दिसते ठाण्याकडे येण्यासाठी कळवा स्टेशन सोडले की जराशा अंतरावर एकाच ठिकाणी हे भरपुर झुडुप आहेत. कोणी नाव सांगु शकेल का?

लाल झालेले हे जंगली तोंडले. भाजीचे तोंडले पिकले की त्याचा कापल्यावरचा रंग सुंदर लाल असतो. तोही टाकेन पिकल्यावर कापून.

मोनाली हे आहे का बघ.
http://www.flowersofindia.net/extrapics/Sulphur%20Cassia-1.jpg

मोनाली हे आहे का बघ.
http://www.flowersofindia.net/extrapics/Sulphur%20Cassia-1.jpg>>> आजाबात न्हाय.
मी वर लिंक दिलेय बघ. तसे काहितरी आहे. अगदी म्हणजे अगदी झुडुप आहे. म्हणजे मोगरा कसा असतो तसे पण जरा उंच. २-२.५ फुट उंची असेल फार तर

पण ते असेच आहे. हेच नाही वाटते. अर्थात मी लांबुनच पहातेय त्यामुळे कदाचीत गोंधळ असु शकतो माझाच.

Pages