Submitted by सानी on 13 March, 2012 - 05:59
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ह्या मालिकेविषयीची चर्चा ह्या धाग्यावर करूया.
हिरा, योग्य माहिती.
हिरा, योग्य माहिती.
>>>(अवांतर: या विधवा स्त्रिया म्हणजे कर्त्या पुरुषांच्या हक्काच्या 'रां*' असत. त्यांना उपभोगणे सोयीचे व्हावे म्हणून ही नेसण्याची पद्धत असावी असे मी कुठेतरी वाचलेले आहे.)<<<
हे संपूर्ण सत्य म्हणता येणार नाही. खूप मोठ्या प्रमाणात विधवा स्त्रियांना 'वापरले' जाई हे खरेच पण सगळीकडे नाही. आणि त्यासाठी सोयीचे म्हणून एकोडती किंवा उभे नेसण्याचा संदर्भ मला तरी अजून वाचायला मिळाला नाहीये पण संदर्भ महत्वाचा आहे त्यामुळे प्लीज आठवून सांगणार का कुठे वाचलाय ते? आवडेल वाचायला.
ते उंच माझा बोका फार हिलॅरिअस
ते उंच माझा बोका फार हिलॅरिअस आहे. लै हसले.
काल तो भानामतीचा उल्लेख वाचून
काल तो भानामतीचा उल्लेख वाचून दचकायलाच झाले. विरेंद्र प्रधान त्याच्या आवडत्या विषयाकडे वळू लागला का?
तेंव्हा वाड्याच्या माडीला patio असायचा? काल शरद पोंक्षे patio मधे उभे असलेले दाखवले होते.
त्या वाड्याच्या पायर्या चक्क सिमेंटच्या आहेत. रमा अंगणात अक्षरे काढतानाच्या प्रसंगात व्यवस्थीत दिसत होत्या.
उंच माझा बोका >> हो मी पण लई
उंच माझा बोका >> हो मी पण लई हसले.
"लोणी...त्याच्यामुळे त्याला
"लोणी...त्याच्यामुळे त्याला आयुष्याचा अर्थ समजला" अशी काहीतरी टॅगलाईनही टाका त्यावर
तेंव्हा वाड्याच्या माडीला
तेंव्हा वाड्याच्या माडीला patio असायचा? <<< हो असायचा. आमच्या जुन्या घराला होता.
patio >> म्हणजे छ्ज्जा का?
patio >> म्हणजे छ्ज्जा का?
हो असायचा. आमच्या जुन्या
हो असायचा. आमच्या जुन्या घराला होता. >> धन्यवाद प्रॅडी. माझ्या पहाण्यातल्या जून्या घरांना कधीच नव्हता पाहिला.
कालच्या भागातला बालनाट्यात
कालच्या भागातला बालनाट्यात शोभेलसा "पाण्यावरून घसरण्याचा" कार्यक्रम पाहिला का?
हो काय तो बावळ्टपणा चालू होता
हो काय तो बावळ्टपणा चालू होता
कालच्या की परवाच्या भागात
कालच्या की परवाच्या भागात महादेवरावांचा 'आम्ही असे obsereve केले आहे' असा डायलॉग होता (आश्चर्यचकीत बाहुली)
अपर्णा... महादेवराव सबजज्ज
अपर्णा... महादेवराव सबजज्ज होते ना.. त्यामुळे तसे शब्द वापरायची सूट घेतली असेल..
मराठी मालिकांचा ‘उंच झोका’
मराठी मालिकांचा ‘उंच झोका’ लटकणार?
हिराताई छान माहीती... मालिका
हिराताई छान माहीती...
मालिका ऐतिहासिक असल्याचं दावा करत असल्यामुळे, काही किमान अभ्यास, संशोधन, होमवर्क याची अपेक्षा आहे. पण बहुतेक ऐतिहासिक मालीकांसारखे इथेही वाटोळे करणार हे नक्की.>> अतुल अनुमोदन!
मला आधी रमाचे व तिच्या आईचे डायलॉग्ज खूप आवडायचे म्हणून ही मालिका बघायला सुरूवात केलेली.. पण बोजड भाषा, रमाचे अती लाजणे व सतत स्वतः असा उल्लेख करणे (तरी सासूने तंबी दिल्यापासून आता कमी केलंय!) याने एकसूरीपणा जाणवतोय...
आज स्वतः करेक्ट म्हणले. जज्ज
आज स्वतः करेक्ट म्हणले. जज्ज आहेत वाट्या क्या !
उरलेला अर्धा भाग चिंटूच्या प्रेक्षकवर्गा साठी होता बहुतेक..
उरलेला अर्धा भाग चिंटूच्या
उरलेला अर्धा भाग चिंटूच्या प्रेक्षकवर्गा साठी होता बहुतेक..>>> मग नक्कीच पाहणार मी तो अ.मा
यातली आलवण नेसायच्या
यातली आलवण नेसायच्या पद्धतीबद्दल पण शंकाच आहे जरा, आलवण कानाच्या मागुन जावुन पुढुन खोचले जायचे पण यात गालावरुन बर्याच प्रमाणात अरेबिक बायका रुमाल्,बुरखा बांधतात तसे आलेले दिसते.ही सोय बहुतेक पात्रांचे केस दिसु नयेत म्हणून केलेली दिसते.
'आम्ही असे obsereve केले
'आम्ही असे obsereve केले आहे'
अहो मग काय झाले? 'स्वतः' एक द्रष्टे पुरुष होते. पुढे पुण्यातील सर्व लोक अशीच भाषा (म्हणजे लॅन्ग्वेज) बोलणार हे त्यांना आधीच कळले होते. आजहि ते 'परिणाम' ऐवजी रिझल्ट म्हणाले.
त्या दृष्टीने तुम्ही आज जेव्हढे सुसंस्कृत व शिकलेले आहात (म्हणजे कल्चर्ड अँड एज्युकेटेड) तेव्हढे ते तेंव्हाच होते! हे सर्वांना कळावे म्हणून मुद्दाम तसे दा़खवले आहे.
आजकालच्या मराठी प्रेक्षकांना (म्हणजे 'ऑड्यन्स' ला) कळले तर पाहिजेत ना संवाद, (म्हणजे डायलॉग हो).
शिवाय मी असेहि ऐकले की बर्याच लोकांनी तक्रार (म्हणजे कंप्लेंट) केली की या मालिकेतले (म्हणजे सिरियल मधले) डायलॉग्ज मराठी लँग्वेजमधले वाटत नाहीत. म्हणून आता ताईकाकू, माई, रमाबाई, सोमणवहिनीहि असेच इंग्लिश वर्ड्स बोलू लागतील लवकरच. कन्विनिअंट वाटते ना ऐकायला. - म्हणजे त्या पण आजकालच्या सारख्या मराठी कम्युनिटी मधल्या, अपर क्लास च्या, ओल्ड कल्चरल ट्रॅडिशन प्रिझर्व्ह करणार्या बायका (लेडीज) होत्या हे पटेल ऑड्यन्सला.
इतकेच काय पुढे आबा, बाबा क्रिकेट खेळणारे, रेव्ह पार्टीला जाणारे, बिझनेस साठीअधून मधून यूरोप, अमेरिका, सिंगापूर दुबई इथे ट्रिप्स करणारे , दोन चार फोर व्हीलर्स बाळगून असलेले, बार मधे जाणारे, नि भरपूर दारू पिणारे,असेहि दाखवतील. म्हणजे कसे अगदी आजकालच्या अप्पर मिडल क्लास च्या मराठी कम्युनिटीतल्या यंग लोकांसारखे.
म्हणजे मग उगीच महागाईचे स्टुडियो, त्याकाळचे ड्रेसेस, त्याकाळचे घर दाखवायला नको. पैसे वाचतील नि पुण्यात कुठेहि, काहीहि शूटींग करता येईल, बायकांच्या कपड्यांचा खर्च वाचेल, आय्टेम साँग्ज, (कोंबडी पळाली सारखी) घातली की सिरियल एकदम पॉप्प्युलर!! कुणिहि टीका करणार नाहीत! जो तो फेसबूकवर लाईक च करेल.
नंतर मग ज्ञानदेवांवरहि अशी एक सिरियल करता येईल! मराठी असे आमुची मदरटंग! असे त्याचे टायटल!
त्याचे काय आहे कमर्शियल सक्सेस हवे असेल तर ऑड्यन्स ला आवडेल तेच द्यायला पाहिजे ना?
त्या बायका मारामारी का करत
त्या बायका मारामारी का करत आहेत?
रमा ज्ञानेश्वरीवर निरुपण करते
रमा ज्ञानेश्वरीवर निरुपण करते तरी तिला ज्ञ हे अक्षर म्हणताना इतका प्रयत्न का करावा लगला?
अतुल आणि हिरा यांच्याशी सहमत.
अतुल आणि हिरा यांच्याशी सहमत. तरिही मला असे वाटते, ज्या प्रमाणे ईतिहास हा नेहमी जेत्यांच्या बाजुने लिहीला जातो तशी मालिका/सिनेमा हे नेहमी 'हिरो' च्याच बाजुने असतात.
ज्या गोष्टी हिरा, अतुल ने मांडल्यात त्या जर या मालिके मधुन दाखवल्या तर 'रानडे' कुटुंबा विषयी थोडी निगेटिव्हिटी मांडल्या सारखे होईल, कारण त्या काळात जरी त्या गोष्टी 'सहाजिकच' असल्या तरी आजच्या लोकांना त्या पाहतान चिड येऊ शकते.
विधवांचे होणारे हाल, स्त्रियांना दिली जणारी दुय्यम वागणुक, शिवता-शिवत वगैरे आजकाल 'पाहताना' सुध्दा तितकेसे स्विकार्य नसावे.
हे. मा. वै. म.
अर्थात अतुन यांनी लिहिलेली पागोट्याची गोष्ट लक्षात यायला आणि दाखवायला हरकत नसायला हवी होती.
झक्की एकूणात मालिका वहावत
झक्की
एकूणात मालिका वहावत चालली आहे. कालचा भाग म्हणजे खरंच कमाल होता! काहीतरी फालतू दाखवत वेळ वाया घालवायचा! गाडी पुढे सरकतच नाही.
पाण्यावरुन घसरणार्या बायका
पाण्यावरुन घसरणार्या बायका दाखवल्या एका भागात
बर्याच दिवसांपासून विचारायचं
बर्याच दिवसांपासून विचारायचं होतं. ताईसासूबाईंची भूमिका कुणी केली आहे ? सुजाता जोशी का ? सुजाता जोशी नसेल तर ह्या अभिनेत्रीने अजून कुठल्या सिरीयलमध्ये काम केले होते ? असंभवमध्ये सुलेखाच्या मैत्रिणीचे काम करणारी ( जिचा नंतर खून होतो ) सुजाता जोशीच होती ना ?
मला पण ती मधुनच सुजाता
मला पण ती मधुनच सुजाता वाटते....तिच्या acting style मुळे.
पण ती दुसरीच कोणीतरी असावी.
हो ना, मलाही ती मधूनच सुजाता
हो ना, मलाही ती मधूनच सुजाता जोशी वाटते, मधूनच नाही. गोंधळ उडतोय. इथे उत्तर देईल कुणीतरी
ती ताईसासू म्हणजे शर्मिष्ठा
ती ताईसासू म्हणजे शर्मिष्ठा राऊत आहे .
man udhan varyache madhe hoti
man udhan varyache madhe hoti ti.
हेकानितेका आणि दीप्स धन्यवाद.
हेकानितेका आणि दीप्स धन्यवाद. 'मन उधाण वार्याचे' म्हणजे ती वर्षा उसगावकरची सिरियल ना ? आठवली, आठवली
आजच्या भागात काय झालं?? मी
आजच्या भागात काय झालं??
मी मिसले आजचा भाग.
दिप्या तू पाह्यलं असशील तर सांग बरं
Pages