'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
जिप्सी, बाप्रे. काळजी घे रे
जिप्सी, बाप्रे. काळजी घे रे स्वत्;ची.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
@ जिप्सी या निमित्ताने सुटी
@ जिप्सी या निमित्ताने सुटी घेउन जरा मस्त आराम करून घे. आपले रस्ते काय चंद्रभूमी सारखे असतातच. तुझ्या ऑटो चा ड्रायव्हर ही कदाचित नासा मधून व्ही आर एस घेतलेला अंतराळवीर असावा !! सुसाट हाणली असेल अन मग हे अस एस्सेलवर्ल्ड स्टाईल पलटी.
मानुषी, कुठल्या गावातले वर्णन
मानुषी, कुठल्या गावातले वर्णन आहे हे ? मालवणला आमच्याकडे असेच होते पण त्या घरी सुके खोबरे, खोबरेल तेल नसायचे.
जिप्स्या, सगळ्यांनी काळजी घ्या. कलीगची तब्येत कशी आहे ? तिलाही शुभेच्छा सांग आम्हा सर्वांच्या.
"ते आणि मी" - लेखिका -
"ते आणि मी" - लेखिका - शकुंतला पुंडे, (पद्मगंधा प्रकाशन, पुणे३८, ०२० २५४४२४५५)
एक खूपच भन्नाट पुस्तक सध्या वाचतोय मी.... - सर्व मार्जार प्रेमींना अगदी अगदी म्हणजे मांजरांइतकेच आवडेल अस्से आहे हे -
"मांजरासारखा दुसरा खेळकर प्राणी कुणी असेल असं मला वाटत नाही. सगळ्या जगाविषयी दाटलेली उत्सुकता आपल्या डोळ्यांत एकवटून तो गोजिरवाणा जीव जेव्हा मोठमोठे डोळे करुन जगाकडे टकामका पाहू लागतो तेव्हा ह्या डोळ्यांइतकं जिवंत व सौंदर्यपूर्ण असं दुसरं काहीच नसावं असं वाटू लागतं. त्याचं चैतन्यानं सळसळणारं, उत्साह व स्फूर्तीने भरलेलं खेळणं बघणं ही एक अत्यंत प्रेक्षणीय गोष्ट होय. त्याला कोणी खेळगडी मिळालेला असला तर सोन्याहून पिवळं. पण नसला तरी याचं काही अडत नाही. हे एकटंच वार्याशीसुद्धा खेळत बसतं. वार्यावर एखादं पान उडालं आणि ते न उडालं तरीसुद्धा, ते पान म्हणजे आपला शत्रू आहे असं समजून त्याच्यावर दबा धरणं, टिपण साधून त्या पानावर उडी मारणं वा ते पान हॉकीच्या चेंडूप्रमाणे दोन्ही पंजांनी टोलवत टोलवत उंच उडवणं, मग भक्ष्य पकडल्याच्या थाटात ते पुन्हा पकडणं असं अनेक प्रकारे ते कितीतरी वेळ खेळत बसतं."
यासारखी अतिशय प्रत्ययकारी वर्णने यात जागोजागी सापडतील व "माझिया जातीचे मज भेटो कोणी...." अशा आनंदात सर्व मार्जार प्रेमी या पुस्तकाच्या वाचनात अगदी डुंबून जातील यात मला तरी शंका वाटत नाही......
तसं हे पुस्तक इतर प्राणी, पक्षी, किटक यांच्याविषयीही माहिती देतंच पण सुमारे दीडशे पानांच्या या पुस्तकात पन्नास पाने फक्त मांजर या विषयाला वाहिली आहेत यावरुन लेखिकेचे मार्जारप्रेम विशेष जाणवते.
अतिशय साधी, घरगुती पण ओघवती भाषा व कोकणची पार्श्वभूमी (बर्याच ठिकाणी) यामुळे हे पुस्तक खूपच वाचनीय झाले असून अंतःकरणात जाऊन बसते.
नि. प्रेमींना हे पुस्तक विशेष आवडेल असे वाटते.
जिप्स्या, काळजी घे रे. (देव
जिप्स्या, काळजी घे रे. (देव तारी, त्याल कोण मारी.)![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जिप्सी - विश्रांती घे - घरीच>>>>>>>अनुमोदन.
रिक्षा पलटी खाताना मात्र एस्सेलवर्ल्डच्या त्या रोलगोल राईडसची आठवण झालेली. फिदीफिदी>>>>>>__________/\________. तुला तेव्हा राईडस घेतोय असं वाट्लं का?
ह.भ.प. मानूषीबाईंच नारळ्पुराण मस्तच. ________/\________.
मालवणला आमच्याकडे असेच होते पण त्या घरी सुके खोबरे, खोबरेल तेल नसायचे.>>>>>>>>>माझे काका मालवणलाच रहातात, त्याच्याकडेच्या काही नारळांच तेल काढतात. आत्ताच आम्ही गेलो होतो, तेव्हा, काकूने एक बाटली भरून तेल खास माझ्या वडीलाना दिलं.
शशांक, ते वर्णन अगदी चपखल
शशांक, ते वर्णन अगदी चपखल !
शोभा, आमचे घर म्हणजे टिपीकल मालवणी नव्हते. आम्ही मूळचे राजापूरचे त्यामूळे भाषा, जेवण सगळ्याच
बाबतीत वेगळे होते. काक्या पण वेगवेगळ्या गावच्या, त्यामूळे घरात मिश्र वातावरण असे.
आजी शेवटपर्यंत राजापुरी भाषाच बोलायची.
आजी शेवटपर्यंत राजापुरी भाषाच
आजी शेवटपर्यंत राजापुरी भाषाच बोलायची.>>>>>>ती कशी असते? जरा नमुना द्या की.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
दिनेशदा ...........हे सांगली
दिनेशदा ...........हे सांगली आहे.
शोभातै......... आपण दिलेल्या पदवीचा अत्यंत आदराने स्वीकार! (हभपच्या जोडीने आपल्या सर्वांनाच
नि.ग. प. ही पदवीही चालेल.
हभपः हरभरे भरडण्यात पटाइत ...(हाहाहाहाहा!!)याच चालीवर निसर्गाच्या गप्पा मारण्यात पटाइत.)
शशांक........ हे पुस्तक "ते आणि मी" वाचायलाच पाहिजे ! पहाते इथल्या वाचनालयात आहे का!
मला वाटतं शांता शेळक्यांनीही मांजरांवर सुरेख लिहिलंय.
शशांक हे पुस्तक "ते आणि मी"
शशांक हे पुस्तक "ते आणि मी" वाचलंच पाहिजे ! पहाते इथल्या वाचनालयात आहे का!>>>> एवढे कशाला - फक्त आमच्या घरी फोन कर - अंजू किंवा दोन्ही मुली हे पुस्तक आपणहून जगाच्या पाठीवर कुठेही पाठवतील - स्वखर्चाने..(शेपटी उडवत, चार पायावर नाचत नाचत...).
आमच्या घरात एकदा का मांजर आले की सर्व घर मांजरमय होते व मी एकदम उपरा....... (मला हाडूत - हुडूत..)
शशांकजी, मस्त उतारा. तो इथे
शशांकजी, मस्त उतारा. तो इथे दिल्याबद्दल तुम्हाला हे बक्षीस.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Copy of DSCN3342.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/Copy%20of%20DSCN3342.jpg)
एवढे कशाला - फक्त आमच्या घरी
एवढे कशाला - फक्त आमच्या घरी फोन कर - अंजू किंवा दोन्ही मुली हे पुस्तक आपणहून जगाच्या पाठीवर कुठेही पाठवतील - स्वखर्चाने..(शेपटी उडवत, चार पायावर नाचत नाचत...).>>>>>>>>चला, ताबडतोब शांकलीला फोन करते.![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
धन्यवाद शशांकजी.
आपण दिलेल्या पदवीचा अत्यंत
आपण दिलेल्या पदवीचा अत्यंत आदराने स्वीकार! (हभपच्या जोडीने आपल्या सर्वांनाच![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
नि.ग. प. ही पदवीही चालेल.>>>>>>>>>.खरं तर ना.भ.प. अशी पदवी द्यायला पाहिजे ना?
हा पहा माझ्या "बोक्या मनी आणि
हा पहा माझ्या "बोक्या मनी आणि मॉस्किटो नेट" या लेखाचा हीरो
चला, ताबडतोब शांकलीला फोन
चला, ताबडतोब शांकलीला फोन करते.
>>>>>> शोभा माझाही निरोप सांग!
शोभा, बरेच छोटे छोटे फरक
शोभा, बरेच छोटे छोटे फरक असतात.
उदा : मालवणीत, माका कित्याक ईच्यारतंस चे राजापुरीत : मज काय ठाऊक.. असे होते.
पण आमच्या जीभेवर त्यापैकी कुठलीच भाषा चढली नाही !
हा पहा माझ्या "बोक्या मनी आणि
हा पहा माझ्या "बोक्या मनी आणि मॉस्किटो नेट" या लेखाचा हीरो>>>>>>हिरोच अभिनंदन.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
ना.भ.प. मानुषीबाई, सांगते हो निरोप.
मज काय ठाऊक.. असे
मज काय ठाऊक.. असे होते>>>>>>>>>>असे, होय, हे मज माहित आहे हों.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पण आमच्या जीभेवर त्यापैकी कुठलीच भाषा चढली नाही !>>>>>>>>>आमच्याकडे खिचडी झालेय.
ना.भ.प.>>>>> शोभा घाबरत च
ना.भ.प.>>>>> शोभा घाबरत च विचारते ये नाभप क्या हय?
हभपः हरभरे भरडण्यात पटाइत
हभपः हरभरे भरडण्यात पटाइत .>>>>>>>>>>तसच ना.भ.प. फ़क्त भ.च्या(इथल्या) अर्थातला ’ड’ काढून टाक .:डोमा:![Light 1](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/light1.png)
.
शोभा, माझ्या बोक्याचा फोटो
शोभा, माझ्या बोक्याचा फोटो तुला कुठे सापडला????????????????
मांजरासारखी सदा क्युरिअस जात दुसरी कुठे नसेल.. मी दहादा लाथ मारुन उडवल्यावरही आमचा बोका अकराव्यांदा परत वॉशिंग मशिनच्या मागे जाऊन तीचे चाक कसे गोल फिरते ते डोके घालुन पाहतो. इन्फॅक्ट मी लाथ मारुन उडवते म्हणुन त्याची उत्सुकता अजुनच चळते. मी त्याला करायला देत नाहीय म्हणजे ते काम काहीतरी महत्वाचे आहे आणि त्याला ते कळणे त्याहीपेक्षा महत्वाचे आहे. curiosity killed the cat अशी एक म्हण आहे ती पुर्णपणे खरी आणि मार्जारनिरिक्शणावर आधारीत आहे हा अनुभव मी हल्ली रोज घेतेय.
शोभा, माझ्या बोक्याचा फोटो
शोभा, माझ्या बोक्याचा फोटो तुला कुठे सापडला????????????????>>>>>>>>>>>>साधने, आमच्या सोसायटीत, लहानपणी आलेल्या हिचे पिल्लू आहे ते.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![DSCN0099.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/DSCN0099.jpg)
आमचा एस फेसबुकावर पसरला असेल.
आमचा एस फेसबुकावर पसरला असेल. संध्याकाळी टाकेन इथे त्याचे फोटो.. अगदी वरच्या फोटोतल्यासारखाच पण तो भुरा रंग नाहीय, त्याच्या जागी काळा आहे
आमचा एस फेसबुकावर पसरला असेल.
आमचा एस फेसबुकावर पसरला असेल. संध्याकाळी टाकेन इथे त्याचे फोटो.. अगदी वरच्या फोटोतल्यासारखाच पण तो भुरा रंग नाहीय, त्याच्या जागी काळा आहे
अर्रे..जिप्सी..कसाहेस आता???
अर्रे..जिप्सी..कसाहेस आता???
काळजी घेतोयेस ना नीट????![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषी.. नारळ पुराण फार्फार आवडलं.. शेकोटीत भाजलेले बटाटे,रताळी.. शेंगा,ओला हरबरा ..काय चविष्ट लागतो ना.. जर्रासा काळपट,जळकट वास... हा!!!!
म्याऊबद्दल छान माहिती ,फोटोज...
शशांक उतारा वाचताना खूप मजा आली... मांजरीची किंवा कुत्र्यांनी पिल्लं इतकी मजा मजा करत असतात आपसात खेळताना, ते पाहण्यात तासनतास घालवू शकते मी ..
मांजरीबद्दल, माझ्या लेकीचा
मांजरीबद्दल, माझ्या लेकीचा किस्सा सांगितला का ?
तिची मांजर एकदा हरवली. तिने आणि मम्मीने शोध घेतला पण सापडली नाही. तिची मम्मी म्हणाली, अग्गबाई, गेली वाटतं पळून ही (हो, त्या दोघी असेच मराठी बोलतात.)
तर त्यावर लेकिचा शेरा,
ते दोन ब्लॉक सोडून लोक राहतात त्यांना विचारते का ? कारण का तर त्यांच्याकडे खुपच कॅट्स आहेत.
मम्मी, का गं, त्यांना का विचारू ?
लेक म्हणाली, मम्मी आपली सोनू पळून गेली असेल तर कुणाबरोबर तरी पळून गेली असेल ना ! एकटी कशी जाणार ?
दिनेशदा, तुमची लेक खरच भारी
दिनेशदा, तुमची लेक खरच भारी आहे. तिला, _____/\_______.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तुमचीच लेक ना. डोकं बरोबर चालवल.
आमचा एस फेसबुकावर पसरला असेल.
आमचा एस फेसबुकावर पसरला असेल. संध्याकाळी टाकेन इथे त्याचे फोटो.. अगदी वरच्या फोटोतल्यासारखाच पण तो भुरा रंग नाहीय, त्याच्या जागी काळा आहे>>>>>>
![Copy of DSCN0100.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31938/Copy%20of%20DSCN0100.jpg)
साधने असा का?
जिप्सी..........गेट वेल सून.
जिप्सी..........गेट वेल सून. एस्सेल्वर्डच्या राईडची आठवण झाली! (इथे पण तुला विनोद कसा काय सुचला?) आणि तुझी कलीग कशी आहे आता?
मार्जारपुराण मस्त चाललंय.
साधना.....:हहगलो: (मला साधनाच्या कॉमेंट्स खूप आवडतात.सटल सेन्स ऑफ ह्युमर मुळे!!)
मानुषी, तुझंही नारळपुरण मस्त!!
शोभे, मांजरांचे फोटो भारीयेत. आमची भुरी साधरण अशीच होती.
दिनेशदा...:हाहा:
मांजरीची किंवा कुत्र्यांनी पिल्लं इतकी मजा मजा करत असतात आपसात खेळताना, ते पाहण्यात तासनतास घालवू शकते मी .. >>>>>>+१०
जागुताई नारळाच्या प्रचि मस्तच
जागुताई नारळाच्या प्रचि मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
हिरो रागावलेला दिसतोय ![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मानुषीजी - नारळ पुराण छानच
शशांकजी - मस्त आहे लेख मांजराच छानच वर्णन केलय शकुंतला पुंडे यांणी
जिप्या - कसा आहेस आता, तुला राइड मध्ये बसायच असल्यास आपण जावु रे एस्सेलवल्ड मध्ये पण अश्या राइड नकोरे बाबा. काळजी घे![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मम्मी आपली सोनू पळून गेली
मम्मी आपली सोनू पळून गेली असेल तर कुणाबरोबर तरी पळून गेली असेल ना ! एकटी कशी जाणार ?![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
Pages