निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिरा, छान माहिती सांगितली. प्रज्ञा + १ Happy
साधना, गुहांची माहिती मस्तच. Happy
शशांकजी प्राजक्ताची (फुलाची हां.) कविता छान. Happy
दिनेशदा, सुंदर माहिती. Happy
जागू, ईनमीन तीन, जो_एस, व इतर फोटो झकास. Happy
तो लाल तांदूळ आम्ही पण पूर्वी वापरलाय(कोकणात.) चव खूपच छान असते, व वर तुपासारखा तवंग येतो. तोच ना? Happy

अग तुपासारखा तवंग म्हणजे पेज. नविन तांदूळ असताना असा तवंग येतो.>>>>>>>अग हो. काय छान चव असते त्याची. पण आता.......................................: Uhoh Sad

स्निग्धा, फोटो का नाही डकवला ग इथे, हिरव्या चाफ्याच्या फुलांचा? Angry Proud

शोभे तू कशाला लाल पिवळी होतेस हिरव्या चाफ्याचा फोटो नाही टाकला तर ?

ही पेज आजी लहानपणी नेहमी द्यायची काढून. आजारी असल्यावर तर हमखासच. मला अजून आवडते. अजुनही कधी कधी मुद्दाम जास्त पाणी घालून काढते ती पेज. नवर्‍याला आणि श्रावणीला पण आवडते.

जागू, मालवणला आमच्या घरी तोच नाश्ता असे. पेज, लोणचे आणि खोबर्‍याचा तूकडा.

पक्षी छानच टिपलेत.

जागू, या नारळाच्या फुलांचे सुंदर वर्णन, ऋतूचक्र मधे आहे. मला हे पुस्तक वाचून २८ वर्षे झाली, तरी त्यातले संदर्भ आठवताहेत.

मला हे पुस्तक वाचून २८ वर्षे झाली, तरी त्यातले संदर्भ आठवताहेत.>>>>>>>>>>>भिष्म Wink Lol
अजुनही कधी कधी मुद्दाम जास्त पाणी घालून काढते ती पेज.>>>>>>>>>>मला ते लाल तांदूळ हवे. :हट्ट करणारी शोभा: Lol

स्निग्धा, फोटो का नाही डकवला ग इथे, हिरव्या चाफ्याच्या फुलांचा? >>> माझ्या खिशात (प्रशीत) नसतो ग कॅमेरा नेहमी जागुतै सारखा Wink
तसही जागुतैने आधीच डकवले आहेत की फोटो. Happy

दिनेशदा,
तुम्ही सांगितलेल (डॉग) कारण अगदी रास्त वाटलं,शंका क्लिअर झाली.
(राळेची चव देखील आठवली)

जागु,जो.एस
फोटो खास आलेत.
नारळ्याच्या फुलोर्‍यातली सगळ्याच फुलांच जर फळात रुपांतर होऊ शकलं तर हजारभर नारळ सहज निघतील,अस मला लहानपणी वाटायचं.
हा वरील पक्षी गावाकडे खुप पाहिल्यासारखा वाटतोय...

अनिल, त्या नारळाच्या फुलाच्या तुर्‍यात पहिले फूल मादी आणि पुढची सगळी नर असतात. त्यामूळे एक नारळ आणि पुढे ती काठी, असेच शेवटपर्यंत राहते.

हा गोल्डन ओरीओल नाही. हा चष्मेवाला. इंग्रजी नाव शोधायला हवे. आता आठवत नाहीय.

गोल्डन ओरिओलला मराठीत हळद्या म्हणतात.

सुप्रभात.

शोभे मी घरी पांढर्‍या तांदळाची पेज काढते ग. हल्ली आमच्याइथे पण खुप कमी मिळतो राता तांदूळ. आज जाऊन घेउनच येते आता राता.

जो-एस मस्त पक्षी आहे.

दिनेशदा छान माहीती.

व्वा! मस्त चालल्यात गप्पा(ज्ञानवर्धिनी..........हो ना वर्षू ?)खरंच!
जो एस मस्तच आहे चष्मावाला.

नारळावर गप्पा चालल्यात ...
माहेरी संपूर्ण घराभोवती १० नारळाची झाडं होती. व इतर अनेक असंख्य...म्हणजे सर्व भाज्या, फ़ळं...अगदी कॉफ़ीसुद्धा वडीलांनी लावली होती. मग त्या बीया काढून आणून ते स्वता: त्या बीया भाजून त्याची मिक्सरवर पूड करायचे आणि आम्हाला कॉफ़ी करून द्यायचे.
वडीलांना बागेची आवड होती. व्यवसाय सांभाळून ते बागकामात वेळ घालवंत. तेव्हा बंब होता. व तिकडे उन्हाळा सोडल्यास तेव्हा अंघोळीला गरम पाणीच लागायचे. तर नारळाच्या झाडाचे खूपच जळण मिळायचे. एक छोटीशी खोलीच केली होती. खोलीचं नावही जळणाची खोली. एका गड्याची फ़ॅमिली बागेच्या एका कोपऱ्यात रहायची. त्यांची चूल या जळणावर चालायची. थंडीत आम्ही सर्व सकाळी शेकोटीभोवती बसायचो. त्यातच वांगी, कांदे, बटाटे,रताळी भाजायचो. हे झालं जळणाचं.
नारळ झाले की उतरऊन नीट भोकाकडची बाजू वर करून ठेवायचे. नंतर काही दिवसांनी सोलून पुन्हा तसेच ठेवायचे. रोजच्या स्वयंपाकात नारळ असायचाच. उपमा पोह्यांवर जास्त प्रमाणात ओलं खोबरं मिळतं म्हणून मैत्रिणी आनंदाने घरी यायच्या.
हे झालं ओल्या नारळाबद्दल. काही बरेच नारळ सुकवून त्यातले गोटे काढायचे. त्याचे तुकडे करायचे. ते पोत्यात घालून घाणीवर तेल काढायला द्यायचे हे पुढचं काम. गड्याबरोबर आम्ही भावंडेही हे सर्व करायला पुढे असायचो.
आता हे तेल घाणीवरून आणल्या आणल्या आई त्यात कणीक भाजून अप्रतीम लाडू करायची...गूळ, जायफ़ळ, वेलदोडा घालून. बाकी तेल वापरायला. तेव्हा सगळे रोज डोक्याला खोबरेल लावायचे(!)..हे तेलही आत्या वगैरे जवळच्या नातेवाइकांना मिळायचे.
खूप झावळ्या पडायच्या. एक ठरलेला माणूस होता. तो बागेच्या एका कोपऱ्यात बसून त्या झावळ्यांपासून खराटे बनवायचा. खराटे बनवण्याची सिस्टीमही बघायला फार इंतरेस्टिंग असायची.
गावात सगळ्यांना नारळ मिळायचे. शुभ प्रसंगी असोला नारळही.
असं खूप काही आठवतंय. नारळावर आधारित अशी एक संपूर्ण वर्षाची सिस्टिमच होती घरात.
आता इथे माझ्या घरी २ नारळाची झाडं आहेत. त्याचंही इतक जळंण पडतय...पण त्याचं मी मात्र काही करू शकत नाही. इथे उन्हाळा इतका की बराच काळ अंघोळीला पाणी थंडच लागते. आणि दोन माणसात तसा या नारळाचा उतरवून विकण्यापलिकडे, आणि स्वयंपाकात, याव्यतिरिक्त काहीच उपयोग आम्ही करत नाही. मुलं घरात/जवळ होती तेव्हा हे नारळ नव्हते.
नाही म्हणायला हपिसातला नवरोंबाचा एक बंगाली असिस्टंट नारळाचं जळण साठवून ठेवतो व त्याच्या स्कूटीवर अधून मधून घेऊन जातो.
इति नारळ पुराणं प्रथम अध्याय(?) समाप्तम!

वाचत आहे..

मानुषी, नारळपुराण मस्त.. आवडलं Happy

(हे आता ताजं ताजं वाचलं म्हणुन मानुषीच्या पोस्टवर कमेंट, बाकीच्यांचं पण जेव्हा जेव्हा प्रतिसाद येतायेत तेव्हा तेव्हा वाचतच आहे. फक्त दरवेळी प्रतिसाद देत नाहिये इतकच)

काल जिवावर आलं आणि चष्म्यावर निभावलं. Happy
रात्री ऑफिसहुन घरी रिक्षातुन परतत असताना रिक्षाला अपघात झाला दोन पलटी खाउन रिक्षा उलटी झाली. शेअर रिक्षा असल्याने त्यात तीघेजण होतो. मी मध्ये बसलो असल्याने डोळ्याला आणि छातीला थोडा मुका मार लागला पण कोपर्‍यात बसलेल्या माझ्या ऑफिसमधल्याच एका कलिगच्या पायाला मात्र बराच मार लागला. अक्षरशः रिक्षा आडवी करून आम्हा तिघांना बाहेर काढले. तिला ३-४ आठवडे पूर्णपणे बेड रेस्ट सांगितली आहे. आयुष्यातील हा पहिलाच अपघात. नक्की काय करायचे तेच सुचत नव्हते. इतर लोकांनी आम्हाला रीक्षात बसवले आणि आम्ही दोघे हॉस्पिटलमध्ये गेलो. तिच्यावर उपचार झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं कि मलापण थोडे लागलंय. डोळ्याला थोडा मार लागलाय आज आय स्पेशालिस्ट कडे जाण्यास सांगितलंय. छातीला थोडा मुका मार लागलाय पण काळजी करण्याचे कारण नाही म्हणुन सांगितलंय. चष्म्याची मात्र पार वाट लागली.

रिक्षा पलटी खाताना मात्र एस्सेलवर्ल्डच्या त्या रोलगोल राईडसची आठवण झालेली. Proud

ओह - जिप्सी - विश्रांती घे - घरीच (नाहीतर कुठल्यातरी गडावर जाशील....विश्रांतीला....)

रिक्षा पलटी खाताना मात्र एस्सेलवर्ल्डच्या त्या रोलगोल राईडसची आठवण झालेली. फिदीफिदी >>>> डोक्याला नक्कीच मार लागला नाहीये.......;) ;-)......गुड

Pages