एका लग्नाची दुसरी गोष्ट!

Submitted by आशूडी on 23 January, 2012 - 05:28

कालच या मालिकेचे भाग पाहिले. त्याच त्या रटाळ मालिकांपेक्षा बरी वाटते आहे. शेवट अर्थातच फुसका होईल. राजवाडे-मांडलेकार ब्रँड. बँड म्हटले तरी चालेल; कारण बरेचसे कलाकार त्यांच्या आधीच्या मालिकांमधलेच आहेत. मोहन जोशी, विनय आपटे, आसावरी जोशी असा एकंदर चढा भाव आहे खरा. पण आधीच्या मालिकांमधले गूढ, गंभीर, रहस्यमय वातावरणाची जळमटे काढताना चटकदार विनोदाचा चाट मसाला सुरुवातीलाच संपून जाण्याची भीती वाटते आहे. मुक्ता बर्वे आणि स्वप्नील जोशी बद्दल आता निवांत बोलूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला तर ह्या सिरिअल मध्ये काही आवडले तर तो म्हणजे ज्ञाना>> Lol काय शोधून पात्र निवडलेस तायो Biggrin
पण सही "पकाऊ" कसा असावा ह्याचं अत्यंत, सुंदर आणि दुर्मिळ उदाहरण आहे हे पात्र!

बागे Happy
ज्ञाना ला सुद्धा जाणावतं आहे की आपण किती पकावतो आहे ,पण काय करणार बिचारा ,रोल करावा लागतो आहे त्याला Happy

मंदार Rofl

आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा.
>>
+१००००००००००
पण तरी काहीतरी मिंसींग होत राव काल त्यांच्या हावभावामधे Sad
काल तर मला कुहु प्रंचड आवडली Happy

झटकून टाक जीवा, दुबळेपणा मनाचा
>>>
मंद्या मला सहज अस वाटलं की बर झालं दुबळेपणा मनाचा ऐवजी घनाचा नाही लिहिलस ते Lol

Rofl

काल तर मला कुहु प्रंचड आवडली>> अगदी अगदी! खूप्पच निरागस गोड वगैरे वाटली कालच्या भागात!

तिची कविता प्रथमच आवडली!!! >>> +१०
ज्ञाना आणि सॉन्या तर मस्तच! पकाऊ पणाचा अर्क आहेत!

सॉन्या म्हटल्यावर राधाचं ते वाक्य आठवलं, घनश्याम, तुझी सॉन्या येतेय रे बाबा तुला दातखिळीचं चाटण चाटवायला...

रिया Rofl

मानव

बाप्रे तो सहन होण्या पलिकडचा आहे रे देवा... मी राधा सारखी मुळेच नाही कारण एवढ्या अर्कांना संयमीमणे सहन करण्या इतकी ताकद आणि शांतपणा माझ्यात मुळीच नाही Happy

आजच्या भागातली कुहूची कविता फारच आवडली. शब्द न शब्द चपखल होता, त्याबरोबर घना आणि राधाची एक्सप्रेश्न्स सुद्धा. विशेषतः राधाची.>>>> हो, अगदी अगदी. Happy
स्वप्नील जोशीने सुद्धा मनातला गोन्धळ चेहर्यावर चान्गला दाखवला..पण मुक्ता बर्वेच्या अभिनयाला तोड नाही.. Happy

मानव नॉर्मल का नाही दाखवलाय? तो शारुख मिमिक्रीतही आता डोक्यात जातोय.. अजिबात सहन होत नाहीये शारुख.. तो मानव ओव्हरअ‍ॅक्टींगही चांगलीच करतोय राग येण्यासारखी.. पण शारुख नकोसा होतो. :रागः

"जो हाल दिलका.." ऐकतांना मला आमिर-सोनालीच दिसतात, >>>
'जो हाल दिलका' कुठे आहे गाणे? 'दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला? Uhoh

दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला?>हो हे गाण मस्त बसल आहे ..
तेरे लिए ही ठेहरा हो जैसे...
पण मला काहीतरी मिंसींग वाटल...:(

Rofl

'जो हाल दिलका' कुठे आहे गाणे?

मागच्या कुठल्यातरी पानावर लिहीलेलं वाचलं की 'जो हाल दिलका' ऐवजी 'दो दिल मिल रहे है' हे गाणं पाहिजे होतं म्हणून.
मी तो एपिसोड पाहिलेला नाही, मला कल्पना नाही.

'दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला?
ते आताच्या भागात.
ते गाणेही सॅड साँग आहे, आणि कालच्या सीनला सूट झाले नाही, हे माझे वैयक्तिक मत.

@ज्ञानेश, ते सॅड साँग असलं तरी, त्या गाण्याचा मूड, शान चा चपखल आवाज आणि सुदिंग म्युझिक एक पर्फेक्ट मिश्रण/कॉम्बो आहे.. त्या प्रसंगाला त्या गाण्याची साथ छान वाटली
"थमसा गया है, ये वक्त ऐसे, तेरे लिए ही ठहरा हो जैसे- क्यु मेरी सास भी कुछ भिगीसी है, दुरीयों से हुई नजदीकीसी है..." व्वा!! Happy
हेहीवैम...

ते सॅड साँग चित्रपटात तस दाखवल्यामुळे त्याचा तसा इफेक्ट वाटत असेन पन त्याचे शब्द खरच मस्त बसले आहेत त्या प्रंसगाला
बागेश्री +१

ते सॅड साँग चित्रपटात तस दाखवल्यामुळे त्याचा तसा इफेक्ट वाटत असेन पन त्याचे शब्द खरच मस्त बसले आहेत त्या प्रंसगाला >>>>>>>>>>>>>. अरे लोकांनो दोस्ताना परत बघा............. सॅड साँग म्हणुन नाही आहे ते.......आठवणीचे गाणे म्हणुन आहे ते.......कैच्याकै

जो हाल दिलका' कुठे आहे गाणे? 'दोस्ताना' मधलं 'कुछ कम रोशन है रोशनी' आहे ना बॅकग्राउंडला? >>>>> धन्स प्राची मला गाणं डाउनलोड करायचं होत ते पण शब्दच आठवत नव्हते

अगदी अगदी! खूप्पच निरागस गोड वगैरे वाटली कालच्या भागात!
>>>>>>>>>>>>>>
+१००००००००००००००००००००००००००००००००००००० Wink

राधा घनाच्या जवळ ( एकदाची ) झोपते त्या प्रसंगी पार्श्वसंगीत म्हणून मराठी गाण कोणत बर दिसेल असा प्रश्न वाचला अन एकदम 'ये रे घना , ये रे घना ' आठवल Lol

Pages