निसर्गाच्या गप्पा (भाग - ८)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 8 May, 2012 - 15:17

'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्‍यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.

ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.

जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //

ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्‍याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014

निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर

निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.

१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जागू - काय सुरेख टिपलेस हे फूल...........

अंगकांती धवलशी
परि देठासी पोवळे
प्राजक्ताच्या फुलातून
उन हासते कोवळे..........

मानुषी मुळांबद्दल मला माहीत नाही. दिनेशदा सांगतील. पण सगळीच मोठी झाडे घरापासुन थोड्या अंतरावर लावावीत नाहीतर त्यांची मुळे घरांना नुकसानकारक ठरू शकतात. सहसा ही झाडे कोणाच्या घराजवळ दिसत नाहीत. समुद्रकिनारी भरपूर लागवड झालेली दिसते सुरुच्या झाडांची.

राळे ऐकलय पण पाहील नाही कधी दिनेशदा.

मानुषी, मोठी वाढणारी झाडे घरापासून जरा दूरच लावलेली बरी. सुरुचा उपयोग समुद्राकाठचे वारे थोपवण्यासाठी
चांगला होतो. सावली वगैरे फार नसते.

ओक्के मंडळी मग बहुतेक गेटपाशीच लावायला लागेल. सध्या सिटाउटात सगळ्या झाडाझुडपात निवांत बसायला मजा येते. ब्रेकफास्ट, जेवणं सगळं तिथच.

:).. प्राजक्ताच्या प्राजक्ताचा श्वास भरून सुगंध घेतला!!! आहाहा!!!

वरच्या गप्पा मस्त इंटरेस्टिंग चालल्यात.. ज्ञानवर्धिनी चर्चा.. Happy

दिनेशदा, राळ्याच्या पिठालाच तंबीट म्हणतात ना ! आमच्याकडे शाकंभरीच्या नवरात्रात तंबीटाचे लाडू/दामट्या लागतातच ! ( मलापण काहीतरी सांगायची संधी मिळाली तर Happy )

वर्षू Happy

मानु.. न्हाय गं फोटो उघडतच नाहीये हा वाला.. परत पाठव प्लीज..
प्रज्ञा ने सांगितलेले एकही पदार्थाचं नाव ही माहीत नाही मला.. Uhoh

माझी एक मैत्रिण सांगत होती की त्यांच्या घरच्या कदंबाच्या मुळ्या जमिनीखाली बांधलेल्या पाण्याच्या टाकीत घुसायला लागल्या. शेवटी ते झाड तोडावे लागले. सो, केअरफुल. सुरूचे माहित नाही पण आंब्याच्या मुळ्या दुरवर पसरतात. वरच्या झाडाचा जेवढा पसारा तेवढाच खाली मुळांचा.

जागुचा कुत्रा ग्रेट डेन जातीचा आहे.

वरच्या झाडाचा जेवढा पसारा तेवढाच खाली मुळांचा.>>>>> सर्वच मोठ्या झाडांचा हा प्रॉब्लेम असतो - घराशेजारी झाडे लावताना फार मोठी झाडे (आंबा, फणस, नारळ, इ.) लावणे घराला धोकादायकच ठरते. घराचे आंगण, परसदार खूप मोठे असेल तर घरापासून जरा लांब ही झाडे लावल्यास ही अडचण येत नाही.

हं..........साधना तसं गेटपासून घरापर्यंत अंतर आहे. पण आमच्या सिटाउटाची शोभा जाइल. असो...तरी आता ते खालीच गेटजवळ लावायला लागणारच.
वर्षू तुला लिंक मेलते. मग बघ उघडतात का.

काल संध्याकाळी घरी गेल्यावर हिरव्या चाफ्याच्या झाडाजवळ थोडी रेंगाळले आणि फुल दिसताहेत का म्हणुन पाहात होते. आणि काय आर्श्चय चक्क २ - ३ फुल दिसली. मग पिवळ्या झालेल्या फुलाचा शोध सुरु झाला कारण सुगंध येत होता. पिवळी झालेली २ फुल दिसली आणि मी माझ्यावरच खुश झाले, रेंगाळण सत्कारणी लागलं म्हणुन.

याचं श्रेय मात्र सगळ्या निगकरांना. इथे झालेल्या चर्चेमुळे, डकवलेल्या फोटोमुळेच मी ते झाड ओळखु शकले, हिरव्या चाफ्याचा सुगंध घेऊ शकले. तेव्हा निगकरांनो खुप खुप धन्यवाद.

प्राजक्ताच्या प्राजक्ताचा श्वास भरून सुगंध घेतला!!>> +१
राळे ऐकलय पण पाहील नाही कधी दिनेशदा.>>> चिमण्या / लवबर्ड साठी पांढरे पिवळसर राजगीर्‍यासाठी मिळते तेच म्हणायचे आहे का दिनेशदा? ते माणसे पण खातात का Uhoh

चिमणीपेक्षाही आकाराने लहान. फोटो काढायला सहसा वाव देतच नाही. कारण नुसते तुरु तुरु इथून तिथे उडत असतो. परवा झाडांना पाणी घातल तेंव्हा झाडावच्या पाण्यात स्वतःच अंग ओल करताना दिसला. आम्ही असच चिरबूट म्हणतो. खर नाव काय आहे ? हाच प्रश्न मी हा पक्षी कोणता इथे टाकला आहे.

जागू - तो काळा-पांढरा - मॅगपाय रॉबिन - खूप गोड आवाज आहे याचा.
तो दुसरा बाकदार चोचीचा - सनबर्ड - स्निग्धा इज राईट.....

फुलचुख्या नाव परीणामकारक वाटत. कारण आमच्या शेवंगेच्या झाडावर हे पक्षी शेवंगांच्या फुलांना टोचे मारत असतात.
धन्स शशांक, स्निग्धा.

प्राजक्ताचा प्राजक्त मस्तच.

काळे राळे गोरे राळे - एक मस्त टंग ट्विस्टर आहे.

नितीन सह्याद्रीत झीज होऊन घडलेली पर्वत शिल्पे नाहीयेत. दिनेश म्हणतात तसे जे आहे ते बर्‍याच अंशी तसेच आहे.

चारच दिवसांपुर्वी ब्रिटीश म्यूझियमने यू ट्यूवर, म्यूझियम ऑफ लाईफ हि मालिका ६ भागात टाकलीय.
एकेक वस्तूसाठी तिथले क्यूरेटर काय कष्ट घेतात, ते बघितले तर दाद द्यावीशी वाटते. इतकेच नव्हे तर,
जीवाष्म कसे शोधायचे, याबद्दल पण रोचक माहिती आहे.

सध्या आपल्याकडे डिजीटल कॅमेरा आहेत त्यामूळे नवीन वस्तू दिसली कि फोटो काढून मोकळे होतो,
पण शतकापुर्वी वनस्पतींचे नमुने काळजीपुर्वक कागदावर प्रेस करुन जतन करत असत. असे जतन केलेले
लाखो नमुने त्यांच्याकडे आहेत. बरेचसे संशोधन या नमुन्यांमूळेच शक्य झाले.

लहानपणी ते तंत्र, आम्हाला शाळेत शिकवले होते. एक कलाप्रकार म्हणूनही हे तंत्र जोपासता येईल.
पण त्याची पूर्ण माहिती मात्र कुणीतरी, इथे लिहा.

एक अगदी छोटीशी बाब. त्या म्यूझियमच्या छतावर छोट्या चौकोनात चित्रे काढली आहेत. त्या चित्रात
चित्रकाराने, त्याकाळात ब्रिटनमधे न दिसणारी पण त्यांच्या जगभरच्या वसाहतीत दिसणारी पाने फुले
रेखाटली आहेत. आणि त्या चित्रात, चित्रकाराने आपली "प्रतिभा" पण वापरलीय. उदा. मिरीला जी
फुले येतात ती अगदीच सूक्ष्म असतात. मिरीचे तयार घोस, लाल, हिरव, काळे दिसतात पण फुले लक्षातही
येत नाहीत. त्या चित्रकाराने मात्र, त्या वेलीला फुले आलेली दाखवली आहेत. आणि हि बाब, केवळ बारीक
निरिक्षणानेच लक्षात येते, असे तिथले संशोधक सांगतात.

जसजसे ज्ञान मिळत जाते, तसतसे आपल्या समजुतीत बदल करणे पण महत्वाचे असते. तिथे डायनासोर चा जो सांगाडा ठेवलाय त्याचे डोके आधी खाली ठेवले होते. पण नंतर ज्यावेळी असे लक्षात आले, कि तो टी रेक्स, झाडाची पाने खात होता, त्यावेळी ते डोके, योग्य त्या उंचीवर ठेवले गेले !

Pages