रिकामपणाचे उद्योग १ - छोटुली गिफ्ट पर्स

Submitted by रचना. on 24 May, 2012 - 01:14

लाजो यांचे http://www.maayboli.com/node/25345 येथील उद्योग पाहिल्यावर काही DIY tutorials लिहावं असं मनात होतं. पण वेळेअभावी ते जमलं नाही. आता खरतर मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील. तरीही नंतर उपयोगी पडतील म्हणून ही मालिका परत चालू करते.

मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही भेटवस्तू छान पॅक करून दिलेली आवडते. ही अशीच करायला एकदम सोप्पी आणि पटकन तयार होणारी छोटी पर्स, ज्यामध्ये तुम्ही चॉकलेटस्, छोटसं ग्रीटिंग कार्ड, ज्वेलरी घालून भेट देऊ शकता.
साहित्य :
६" x ६" जाड कागद (फार पातळ नको.)
१" x ३ १/२" x २ पट्ट्या
१/२" x ६" x २ पट्ट्या
वेलक्रो
गोंद

प्रथम ६" x ६" चा कागद घ्या. त्यावर खाली दाखवल्याप्रमाणे घड्या घालून घ्या.

नंतर रेषा मारलेला भाग गोंद लावून चिकटवा.

आता १" x ३ १/२" च्या पट्टीला मध्ये घडी घालून पर्सला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे चिकटवा. दुसरी पट्टी पण अशीच पर्सच्या दुसर्‍या बाजूला चिकटवा.

एक १ १/२" x १/२" किंवा १ १/२" चा गोल किंवा अंडाकृती आकार (याला क्ष म्हणू) कापून मध्ये दुमडून घ्या. त्याची एक बाजू पर्स च्या एका बाजूला चिकटवा. आता वेलक्रो चा एक भाग क्ष ला तर दुसरा भाग पर्सच्या दुसर्‍या बाजूला चिकटवा. नीट कळण्यासाठी खालचा फोटो पहा. मला लिहायला नीट जमलं नाहीये.

इथे माझाकडचे वेलक्रो संपल्यामुळे मी double sided faom tape लावलेली आहे.

नंतर १/२" x ६" च्या पट्ट्या हॅडल सारख्या दोन्ही बाजूनां चिकटवा.

झाली पर्स तयार. आता आपल्या आवडीनुसार सजवा.

या अजून काही बनवलेल्या पर्सेस्

गुलमोहर: 

छान दिसताहेत.

फोटो अपलोड करताना, हाईड लिंक च्या बॉक्स मधे चेक करायचे, म्हणजे अल्बम ची नावे दिसणार नाहीत.

रच्नाशिल्प, घड्या घालण्याचा सिक्वेन्स लक्षात येत नाही. त्या त्या लाईनवर १,२... आकडे घालून कोण्ती घडी पहिली, कोण्ती दुसरी ... असं दाखवता येईल का ?

प्रतिसादाबद्दल सर्वांचे आभार !
दिनेशदा,
आधी मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे केलं होतं. पण त्याने प्रचि दिसत नव्हते. आता परत प्रयत्न करून पाहते.
निवेदिता वाळिंबे,
नक्की कोणती स्टेप कळतं नाहीये ते सांगितलं तर समजावयाला सोप्पं होइल.
शुगोल ,
घड्या घालण्याचा सिक्वेन्स वगैरे असं काही नाहीये यात. सगळ्या घड्या valley fold घालायच्या. तिरक्या घड्या घालणं जरा tricky आहे. पण प्रयत्न केल्यावर जमेल.

Pages

Back to top