लाजो यांचे http://www.maayboli.com/node/25345 येथील उद्योग पाहिल्यावर काही DIY tutorials लिहावं असं मनात होतं. पण वेळेअभावी ते जमलं नाही. आता खरतर मुलांच्या सुट्ट्या संपत आल्या असतील. तरीही नंतर उपयोगी पडतील म्हणून ही मालिका परत चालू करते.
मुलांनाच नाही तर मोठ्यांनाही भेटवस्तू छान पॅक करून दिलेली आवडते. ही अशीच करायला एकदम सोप्पी आणि पटकन तयार होणारी छोटी पर्स, ज्यामध्ये तुम्ही चॉकलेटस्, छोटसं ग्रीटिंग कार्ड, ज्वेलरी घालून भेट देऊ शकता.
साहित्य :
६" x ६" जाड कागद (फार पातळ नको.)
१" x ३ १/२" x २ पट्ट्या
१/२" x ६" x २ पट्ट्या
वेलक्रो
गोंद
प्रथम ६" x ६" चा कागद घ्या. त्यावर खाली दाखवल्याप्रमाणे घड्या घालून घ्या.
नंतर रेषा मारलेला भाग गोंद लावून चिकटवा.
आता १" x ३ १/२" च्या पट्टीला मध्ये घडी घालून पर्सला चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे चिकटवा. दुसरी पट्टी पण अशीच पर्सच्या दुसर्या बाजूला चिकटवा.
एक १ १/२" x १/२" किंवा १ १/२" चा गोल किंवा अंडाकृती आकार (याला क्ष म्हणू) कापून मध्ये दुमडून घ्या. त्याची एक बाजू पर्स च्या एका बाजूला चिकटवा. आता वेलक्रो चा एक भाग क्ष ला तर दुसरा भाग पर्सच्या दुसर्या बाजूला चिकटवा. नीट कळण्यासाठी खालचा फोटो पहा. मला लिहायला नीट जमलं नाहीये.
इथे माझाकडचे वेलक्रो संपल्यामुळे मी double sided faom tape लावलेली आहे.
नंतर १/२" x ६" च्या पट्ट्या हॅडल सारख्या दोन्ही बाजूनां चिकटवा.
झाली पर्स तयार. आता आपल्या आवडीनुसार सजवा.
या अजून काही बनवलेल्या पर्सेस्
कित्ती सुंदर पण थोडी कठिण
कित्ती सुंदर पण थोडी कठिण वाट्टे
टोकूरिका, अगं फार सोप्पी आहे
टोकूरिका,
अगं फार सोप्पी आहे करायला. मुख्य रचनेत तर फक्त ४ घड्या घालून तयार होणारे ४ कोपरे चिकटवणे इतकच आहे. मेहनत आहे ती हॅन्डल, वेल्क्रो आणि सजवणे ह्यांत. तुला कदाचित १ १/४" , ३ १/२" असल्या मापांमुळे कठिण वाटत असेल. एक बनवल्यावर पुढच्या पटापट (५-६ मिनीटात एक) तयार होतात.
रचनाशिल्प, आताच archies मधून
रचनाशिल्प, आताच archies मधून डिझाईनचा पेपर घेवून आली. उद्या नक्की बनवेन. हॅन्डल आणि वेल्क्रो आणायच आहे. धन्यवाद ईथे शेअर केल्याबद्द्ल.
कस्ल् मस्त आहे... भाचीला
कस्ल् मस्त आहे...
भाचीला लिक द्यायला हवी .. तिला नक्की आवडेल..:)
आर, नक्की करून बघ आणि इथे
आर,
नक्की करून बघ आणि इथे फोटो टाक.
Mast!!!!
Mast!!!!
वॉव, मस्तच आहेत पर्सेस
वॉव, मस्तच आहेत पर्सेस
वॉव.. फारच सुंदर.. मलाही थोडी
वॉव.. फारच सुंदर.. मलाही थोडी कठीण वाटतीये.. पण प्रयत्न करून पाहीन नक्की..
सुंदर आहेत पर्सेस. मस्त! करून
सुंदर आहेत पर्सेस. मस्त! करून बघायला पाहिजे. जे जमणार नाही ते तुम्हाला विचारीनच!!
अरे वा ! सुरेखच ! फारच छान
अरे वा ! सुरेखच ! फारच छान आहे ही
जबरदस्त !!!!!!!!!!!!
जबरदस्त !!!!!!!!!!!!
खरोखर खूपच छान आयडिया आहे
खरोखर खूपच छान आयडिया आहे
प्रतिसादाबद्द्ल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्द्ल सगळ्यांचे धन्यवाद !
वर्षू नील, शांकली नक्की करून पहा. आणि अडलं तरी विचारा.
कोणी करून पाहिली असेल तर फोटो टाका ना. म्हणजे करायला सोप्पी आहे अशी इतरांनाही खात्री वाटेल.
खूप छान आहेत....नक्की करून
खूप छान आहेत....नक्की करून पाहीन....
एकदम मस्त सर्वच पर्स सुन्दर
एकदम मस्त सर्वच पर्स सुन्दर आहेत भेटवस्तु भरुन देण्याची कल्पना फार आवडली
सुबक आणी सुंदर! कागदाची आहे
सुबक आणी सुंदर! कागदाची आहे म्हणून ..नाहितर खांद्याला अडकवली असती..
एकदम भारी आहेत या पर्स. अगदी
एकदम भारी आहेत या पर्स. अगदी नजर ठरत नाही ही घेवु की ती असे वाटते.
वा सुंदर! मस्त आहेत सर्वच
वा सुंदर! मस्त आहेत सर्वच पर्सेस.
कसल्या सुंदर दिसतायेत...
कसल्या सुंदर दिसतायेत...
कित्ती सुरेख
कित्ती सुरेख
ऑसम .
ऑसम .
खुपच सुंदर... एकदम क्युट...
खुपच सुंदर... एकदम क्युट...
यामधे साधारण पाव किलो पेढे
यामधे साधारण पाव किलो पेढे मावू शकतील का? वजनाने आणि आकाराने?
'साखरपुडा' म्हणून देण्यासाठी कशी वाटेल ही पर्स?
किंवा साखरपुडा देण्यासाठी अजून काही नवीन कल्पना शेअर करू शकाल का?
मंजूडी, ६, ६ च्या ऐवजी १२, १२
मंजूडी,
६, ६ च्या ऐवजी १२, १२ चा कागद घेतला तर पर्स मोठी होईल पण पाव किलो वजन नाही घेऊ शकणार. आणि मला वाटतं साखरपुडा म्हणून शोभणार ही नाही.
काही बॉक्स किंवा परडी टाईप्स हवे. बघते. १-२ दिवसात फोटो टाकेन. कधी आहे साखरपुडा ?
वेळ आहे अजून, महिनाभर तरी
वेळ आहे अजून, महिनाभर तरी
थँक्स!!
हा माझा झब्बू... भावाच्या
हा माझा झब्बू...
भावाच्या लग्नात माझ्या वहिन्या आणि भावजयींना यात ज्वेलरी घालून गिफ्ट दिले.
मस्त आहेत.
मस्त आहेत.
Pages