'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
सोनाली, उजू, मस्त
सोनाली, उजू, मस्त फोटो.
शांकली, तुला खूप खूप धन्यवाद. (कशाबद्दल ओळख :डोमा:)
मी आणि स्निग्धाने एक 'कट' केलाय. तो तुझ्याशी संबंधीत आहे.
वि. सू. - मी इथे ज्या ज्या
वि. सू. - मी इथे ज्या ज्या माहितीपटांचा उल्लेख करतोय ते माझ्याकडे आहेत असे समजायचे...(म्हणजे काय ते समजले असेलच !!)
-----------
माझ्या लहानपणी अॅटलास म्हणजे एक अप्रूप होते. जगातील अनेक देशांचे नकाशे एवढेच त्याचे रुप.
पण ती देशांची नावे, त्यांच्या राजधान्या, क्षेत्रफळ, झेंडे वगैरे बघायला फार म्हणजे फारच आवडायचे.
एखादा नकाशा समोर पसरून, त्यातले एखादे विचित्र नावाचे गाव शोधायचे, हा आमचा एक बैठा खेळ
असायचा.
ते नकाशे द्विमितीच असायचे. चित्रही नसायचीच. पण तरीही त्यांच्याकडे बघत मनात खुप कल्पना यायच्या.
तेव्हा रुजलेली भूगोलाची आवड, मी आजही जपलीय. आमच्या प्राध्यापिका, सुनंदा नाथन यांनी तर आम्हाला
भूगोलाचे वेडच लावले.
पण आजवर कल्पनाही केली नव्हती, असा एक सुंदर माहितीपट, अॅटलास ऑफ द नॅचरल वर्ल्ड, चार भागात यू ट्यूबवर बघितला.
दक्षिण अमेरिकेच्या संपुर्ण पश्चिम किनार्याला लागूण, अँडीज ही पर्वतमाला आहे. या संपूर्ण पर्वतमालेचाच
नव्हे तर त्या भागात असलेल्या अॅमेझॉन नदीच्या खोर्याचा, सुंदर आढावा या माहितीपटात घेतलेला आहे.
अँडीज हि साधारण ५००० किमी पसरलेली पर्वतमाला. तो भाग अतिउंचावर असला तरी फार रुक्ष आणि
थंडही आहे. तिथल्या हवेत प्राणवायूचे प्रमाण कमी आहे. दिवसाच्या आणि रात्रीच्या तपमानात खुप फरक
असतो. त्यामूळे एकंदरच तिथले जीवन फार कठीण आहे. पण तिथले अनोखे प्राणी आणि पक्षी, या
सगळ्याला इतके सरावले आहेत कि त्यांनी आपल्या शरीरात योग्य ते बदल करुन घेतले आहेत.
तिथला हमिंग बर्ड, उडण्याचे कष्ट न घेता, चक्क फूलावर बसून साखरपाणी पितो आणि चक्क दररात्री
शीतनिद्रा घेतो.
तिथले ससे, उंट, फ्लेमिंगोज सगळेच खास. बारा ते पंधरा फूट पंखाचा विस्तार असणारा आणि जवळ जवळ
१५ किलो वजन असणारा, कोंडोर पक्षी पण इथे बघायला मिळतो.
याउलट अॅमेझॉन. जगातील पहिल्या क्रमांकाची हि नदी. तिच्याखालच्या आठ नद्यांचे पाणी (त्यात ब्रम्हपुत्र पण आली) एकत्र केले तरी, तेवढे पाणी एकत्र होणार नाही. समुद्रालाच गोड करणारा तो महानद आहे.
तिला पूर येतो (तसा तो दरवर्षीच येतो ) त्यावेळी तिच्या पाण्याची पातळी चक्क सहा ते आठ मीटर्स पर्यंत
वाढते. त्यामूळे त्या पातळीपर्यंतचे जंगलही पाण्याखालीच असते. त्यावेळी तिच्यातले मासे चक्क झाडांच्या
फांद्यामधून विहरत असतात. एवढा पालापाचोळा पाण्यात कूजल्याने, त्यातला प्राणवायू खुपच कमी
झालेला असतो. त्यामूळे श्वास घेण्यासाठी ते मासे पृष्ठभागावर येत असतात.
हे त्या झाडांनाही कळतं, त्यामूळे या झांडाच्या बिया, याच दिवसात तयार होतात आणि फळासकट पाण्यात
पडतात. त्या बीयांचा प्रसार, ते मासेच करतात.. सगळेच अनोखे.
एखादा नकाशा समोर पसरून,
एखादा नकाशा समोर पसरून, त्यातले एखादे विचित्र नावाचे गाव शोधायचे, हा आमचा एक बैठा खेळ
असायचा.>>>आमचाही
दिनेशदा, खूपच आवडली ही
दिनेशदा, खूपच आवडली ही माहिती. नॅ.जि.किंवा डिस्क.किंवा अ.प्लॅ.वर अॅमेझॉन हा माहितीपट बघितला आहे. त्यात तुम्ही वर सांगितलेले सगळे उल्लेख आहेत. तुम्ही वर्णन केलेलं अगदी डोळ्यांसमोर उभं राहिलं. खूप खूप धन्यवाद.
प्रज्ञा, अहोंनी कविता केलीये आणि ती इथे बालकवितेत दिली पण आहे.
शोभा आणि स्निग्धाने कोणता कट केलाय? माझ्याशी संबंधीत म्हणजे, घरी येऊन बाग बघायची आहे की आमची गोंडस पिल्लं? (की कुठलंसं रोप पळवायचंय?) लवकर सांगा गं बायांनो...........
आणि कर्टन क्रीपर बद्दल असेल तर ती वेल माझ्याकडे नाहीये.
दिनेशदा, खूप छान माहिती
दिनेशदा, खूप छान माहिती !
शांकली, कविता केलेय .... हो हो मला आत्ता आठवलं. पण मला त्यावेळी हा संदर्भ माहित नव्हता. छान आहे ती कविता !
<<<<आणि कर्टन क्रीपर बद्दल असेल तर ती वेल माझ्याकडे नाहीये.>>>
अगं वाईट विचार का करतेय्स>??
अगं वाईट विचार का करतेय्स>?? मस्त पुरणपोळ्या केल्या असतील, त्याचा कट काढुन त्याची आमटी केली असेल, सोबत आमरस.. चांदीच्या ताटात सगळे वाढुन तुला पेश करायचे असेल....... घे ओरपुन कटाची आमटी
सुदुपार.
सुदुपार.
साधना... जागू, तुझ्याकडची
साधना...:हाहा:
जागू, तुझ्याकडची सगळीच फुलझाडं सुंदर आहेत हं!
अरे मस्त
अरे मस्त चाललंय...वाचतेय!
दिनेशदांची अॅटलसची माहिती मस्त.
साधना आज आंबोली घाटातून येताना तुझी आठवण झाली.
मी एका ठिकाणी हे झुडुप
मी एका ठिकाणी हे झुडुप बघितले. त्याचं नाव तिथल्या लोकांना विचारल्यावर त्यांनी 'लिया' असं सांगितलं. खूप छोटी छोटी फुलं होती, आणि कोवळी पालवी कुसुंबी रंगाची होती. पानांच्या कडा दातेरी होत्या. पण मला याचे नक्की नाव माहीत नाही. कुणाला माहीत असल्यास किंवा कळाल्यास प्लीज सांगा.
ही पानं............
आणि ही अगदी छोटी फुलं........
फुलं इतकी छोटी होती, की मला त्यांचा क्लोजअप नीट घेता आला नाही.
शांकली, अगदी नाजूक फुले असतील
शांकली, अगदी नाजूक फुले असतील तर हातावर ठेवून फोटो काढला तर चांगला येतो. झाडावर असली
तर नीट फोकस होत नाही.
आज माझ्यातर्फे काही फोटो !!
हे फूल तसे साधे आहे. पण फार तलम पोताचे असते.
पण याची खासियत म्हणजे ते उमलते त्यावेळी निळे असते, मग आकाशी होते आणि शेवटी पांढरे.
याचे छोटेखानी झाड असते पण एकाचवेळी झाडावर तिन्ही रंगाची फुले असतात.
आपल्याकडे आहेत हि झाडे पण एवढी फुलत नाही. गायत्री आणि वांगीवृक्ष यात पण असेच रंग असतात.
आणि हे आमचं, सुप्रभात !!
नारळाच्या वर्गातील झाडांची फुले सहसा तीन पाकळ्यांचीच असतात पण फार कडक असतात त्या
पाकळ्या. मागच्या पानावरच्या पामची हि फुले. व्यास ८ मीमी एवढाच होता.
आणि, या दिवसात आमच्याकडे क्वचितच दिसणारा सूर्योदय !!
सुप्रभात. जंगली
सुप्रभात.
जंगली तोंडले.
शांकली धन्स.
दिनेशदा खुप सुंदर आहेत फोटो.
मानुषी मल आंबोली नाव काढताच साधना आठवते.
शांकली कळत नाही ग कसले झाड
शांकली कळत नाही ग कसले झाड आहे ते. फुले दिंड्या सारखी आहेत.
जागू, हे तोंडले वेलावर फुलते
जागू, हे तोंडले वेलावर फुलते त्यावेळी मस्त लालभडक दिसते. संस्कृत मधे त्याला बिंबा म्हणतात आणि तसेच लाल ओठ असणार्या स्त्रीला, बिंबाधरा !
कधी ते दिसले तर अवश्य फोटो काढ.
हो नक्कीच. आता काही दिवसात
हो नक्कीच. आता काही दिवसात पिकतीलच.
आमच्या कडे बुलबुलच अजुन घरट बांधणच चालू आहे. रोज चोचीत जोडप गवताच्या काड्या आणून घरट विणत असत.
हुश्श!!! वाचुन झाल्या सगळ्या
हुश्श!!! वाचुन झाल्या सगळ्या पोस्ट (एक आठवडा फुल्ला बिझी होतो. :-()
परीची छत्री मस्तच
वर्षू तो शेवटचा पक्षी खरा आहे??? >>>>>माधव, राणीबागेत आहे ना हा पक्षी.
सगळेच फोटो मस्त
दिनेशदा तुम्हाला ईमेल करतो आज.
संस्कृत मधे त्याला बिंबा म्हणतात>>>>रच्याकने, "बिंबा" म्हणजे "पाल" ना?
बिंबा, म्हणजे पाल ! कुठे
बिंबा, म्हणजे पाल ! कुठे वाचलस तू.
कानडीत पाल, म्हणजे दूध कि रे !
लोला गुलाब आणि स्ट्रॉबेरी
लोला गुलाब आणि स्ट्रॉबेरी खाणारी कुत्री मस्तच. ती स्ट्रॉबेरी महाबळेश्वरच्या स्वीट चार्ली प्रकारासारखी दिसतेय.
सोनाली Laurel Caverns चे फोटो मस्तच. अशाच Howe Caverns पण मस्त आहेत - अपस्टेट न्यूयॉर्कमध्ये अल्बेनीजवळ. ऐन उन्हाळ्यात त्या गुहांत थंडीने कुडकुडायला होते.
दिनेश सुप्रभात मस्तच आणि पामची फुले तर त्याहून खास.
जागू तू मागे (याच भागात) वडासारख्या दिसणार्या झाडाच्या फळांचा फोटो दिला होतास. तशीच फळे या विकांताला ठाण्याला कोपिनेश्वराजवळच्या बाजारात विकायला होती. पुढच्या वेळेस दिसली तर त्यांचे नाव विचारून घेईन.
कोण कटाची आमटी करतय? एक पातेलीभर मला पण पाठवून द्या
कानडीत पाल, म्हणजे दूध कि रे
कानडीत पाल, म्हणजे दूध कि रे ! >>>> मला वाटतं बहुतेक हालु म्हणजे दूध (कानडीत)..
दिनेश, बिंबाधरा वरून एक
दिनेश, बिंबाधरा वरून एक नाट्यगीत पण आहे ना एक? पण बहुतेक तो शब्द शंकराला उद्देशून पण वापरतात - चंद्रबिंब धारण करणारा असा तो.
जिप्स्या कुठे होतास इतके दिवस
जिप्स्या कुठे होतास इतके दिवस ? भटकत होतास की लग्न वगैरे केलेस ?
ह्या मातीच्या खापर्या म्हणजे मातीचे तवे भाकरी करण्यासाठी. ह्यात भाकरी छान होते. पुर्वी चुलीवर भाकरी करण्यासाठी खास ह्या खापर्यांचा उपयोग होत असे. आता गॅसवर ठेवण्यासाठीही कुंभार करतात खपर्या. गॅसवर ठेवण्यासाठी जरा जाड करतात तर चुलीवर ठेवण्यासाठी जरा पातळ करतात. पातळ खापरी गॅसवर गॅसच्या प्रखर ज्वालेमुळे फुटते. मी पण आणली आहे चुलीवरची खापरी तसेच तवी. तवी म्हणजे ज्यात कालवण करतात ते मातीचे भांडे. मी त्यात कधी कधी म्हणजे एखाद्या संडेला मज्जा म्हणून भात करते. तिचे फोटो उद्या टाकते. खापरीत मात्र कधीतरी कामवालीला भाकरी करायला लावते.
ह्या तयार खापर्या उलट्या सुकण्यासाठी ठेवल्या आहेत कुंभाराकडे.
"भटकत होतास की लग्न वगैरे
"भटकत होतास की लग्न वगैरे केलेस "".. जागु मलापण हीच शंका आलेली!!
जिप्स्या.. आम्हाला आमंत्रण न देता असलं काही कर्णार नाही.. हो नारे ??
आहाहा..या खापर्यांवरच्या भाकर्या मस्त लागत असतील ना..
ह्या मातीच्या खापर्या म्हणजे
ह्या मातीच्या खापर्या म्हणजे मातीचे तवे भाकरी करण्यासाठी. ह्यात भाकरी छान होते. पुर्वी चुलीवर भाकरी करण्यासाठी खास ह्या खापर्यांचा उपयोग होत असे.>>>>> याच्याच शोधात होत्या बहुतेक "मुक्ताबाई" - सगळ्या भावंडांना मांडे खाउ घालण्यासाठी - मला वाटतं बहुतेक ज्ञानोबांनी ही फर्माईश केली होती - मांड्यांची - पण संन्याशाची पोरं म्हणून ही खापरही मिळू शकली नाही तेव्हा मुक्ताईला - मग पुढे ते - "ताटी उघडा ज्ञानेश्वरा.....", वगैरे....
शांकली,दिनेशदा..कय ती नाजुक
शांकली,दिनेशदा..कय ती नाजुक नाजुक फुलं,सूर्यास्त.. एक से बढक एक
हो शशांक त्याकाळी मातीच्याच
हो शशांक त्याकाळी मातीच्याच खापर्या मिळत ना.
जिप्स्या.. आम्हाला आमंत्रण न
जिप्स्या.. आम्हाला आमंत्रण न देता असलं काही कर्णार नाही.. हो नारे ?? >>>>वर्षूदी, तुमाखमै
बिंबा, म्हणजे पाल ! कुठे वाचलस तू.>>>>>>खूप वर्षाआधी दूरदर्शनवर (मराठी) एक मालिका पाहिलेली याच नावाची (बहुतेक विनी परांजपे जोगळेकर नायिका होती) त्यात उल्लेख होता.
आता गॅसवर ठेवण्यासाठीही
आता गॅसवर ठेवण्यासाठीही कुंभार करतात खपर्या. गॅसवर ठेवण्यासाठी जरा जाड करतात तर चुलीवर ठेवण्यासाठी जरा पातळ करतात.>> आता तर मा.वे. मधे ठेवण्यासाठीपण मिळतात ही भांडी. तीच गॅसवर पण चालतात.
जागू कुठे घेतलास तो खापरांचा फोटो?
शांकली,दिनेशदा..कय ती नाजुक
शांकली,दिनेशदा..कय ती नाजुक नाजुक फुलं,सूर्यास्त.. एक से बढक एक
>>>>>>> वर्षू +१००
अरे काय चाललंय इकडे आपल्या जिप्सीभौंचं लग्न ठरलं की काय?
दिनेशदा "बिंबाधरा मधुरा" एक नाट्यगीत अगदी चालीसकट तोंडात (नाही हो तोंडल्यात नव्हे!!!) आहे पण पुढचे शब्द आठवत नाहीत.
आणि चाल कशी म्हणून दाखवू?
हो मानुषी, ते आहेच
हो मानुषी, ते आहेच गाणे.
पुर्वी सौंदर्याचे सगळे मापदंड निसर्गातलेच होते.
हरणासारखे डोळे, हळदी, केतकीचा रंग, केतकीसारखे हात, चाफ्यासारखे गोरेपण, चाफेकळीसारखे नाक,
हरणाची चाल, सिंहाची कटी,केळीच्या गाभ्यासारखे पाय...
मानुषी चाल इथे लिहून दाखव
मानुषी चाल इथे लिहून दाखव
मोनाली अग आमच्या उरण मध्ये चिरनेर म्हणून एक गाव आहे. महागणपतीचे प्रसिद्ध स्थान तिथे बनतात ह्या वस्तू.
Pages