'ऋ' किंवा ऋतू म्हणजेच फिरता काल. समस्त सृष्टीला कवटाळणारा, हरघटकेला तिला हसवणारा, रडवणारा, नटवणारा आणि तिचा सगळा नखरा, साजशृंगार हातांनी ओढून काढून तिला उन्हात तापवणारा, वार्यात कुकवणारा, भिजवणारा कालाचा अगदी लहान अंश म्हणजेच ऋतू.
ऋतुराजाचे किंवा मधुमासाचे लक्षण ज्ञानेश्वरांनी सुंदर रीतीने वर्णन केले आहे.
जैसे ऋतुपतीचे द्वार / वनश्री निरंतर/
वोळगे फळभार / लावण्येसी //
ऋतुपतीच्या द्वारी वनश्रीचे - म्हणजे नवपल्लवांनी गर्द झाकलेल्या फुलांनी डवरुन गेलेल्या वृक्षलतांचे दर्शन. हे दर्शन तर फाल्गुनातच घडते. मग मधुमासाचे वैशिष्ट्य कशात आहे ? या महिन्यात ते सारे सौंदर्य तर आहेच, पण फळांचेही रूप दृष्ट लागेलसे असते. फुलांतून, फळांतून मधुरस वाहत असतो. माधुर्याची प्रतीती मनामनाला होत असते. पानाफुलांची शोभा उत्कटतेने प्रकट होत असते. पक्षांचे रत्युत्सुक कंठ स्वच्छंद गाणी गात असतात. संयमाची बतावणी निसर्ग झुगारून देतो. उन्मत्त प्रेमाची उकळी जीवजंतूंच्याही अंगातून फुटते. 'कुणास्तव कुणीतरी' या वेळी काहीतरी करण्याच्या खटपटीत असते. नटून-थटून दुसर्याला आकर्षित करायचे आणि परस्परांच्या सहकारातून स्वतःचे चिमुकले क्षुद्र जीवनही विश्वाच्या भव्य नियतीत एकरूप, एकतान होईल असा आनंद निर्माण करण्याचे प्रकृतीचे तंत्र, सारी सजीव सृष्टी या वेळी पाहा कशी मुक्त हस्ताने वापरीत आहे.
दुर्गा भागवत - ऋतूचक्र या पुस्तकातील उतारे.
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू निल ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाशी निगडीत पुस्तके.
१] आपले वृक्ष - श्री. श्री. द. महाजन २] निसर्गपूर्ण - उर्जा प्रकाशन ३] पुण्याचे पक्षीवैभव - श्री. प्रभाकर कुकडोलकर ४] आसमंत - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ५] फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
६] फर्दर फ्लॉवर्स ऑफ सह्याद्री - श्री. श्रीकांत इंगळहळीकर ७] ट्रीज ऑफ पुणे - श्री. श्रीकांत इंगळहळीकर
८] हिरवाई - डॉ. श. डहाणूकर ९] फुलवा - डॉ. श. डहाणूकर १०] कासचे पुष्पपठार - डॉ. संदीप श्रोत्री ११] गोईण - डॉ. राणी बंग १२] कदंब - दुर्गा भागवत १३] रानवाटा - मारूती चितमपल्ली १४] केशराचा पाऊस - मारुती चितमपल्ली १५] वृक्षगान - डॉ. श. डहाणूकर १६] पाखरमाया - मारुती चितमपल्ली १७] आपली सृष्टी आपले धन (३ खंड) - डॉ. मिलिंद वाटवे १८] देशी वृक्ष - श्री. श्री. द. महाजन १९] चकवाचांदण - मारुती चितमपल्ली २०] चैत्रपालवी - मारुती चितमपल्ली २१] पक्षी जाय दिगंतरा - मारुती चितमपल्ली २२] जंगलाचं देणं - मारुती चितमपल्ली २३] रातवा - मारुती चितमपल्ली २४] निसर्गवाचन - मारुती चितमपल्ली २५] निळावंती - मारुती चितमपल्ली २६] पक्षीकोष - मारुती चितमपल्ली २७] ऋतुचक्र - दुर्गा भागवत २८] अरण्यक - डॉ.मिलिंद वाटवे २९) ऋतूचक्र - दुर्गा भागवत ३०) अरण्यवाचन - अतुल धामनकर
निसर्गाशी निगडीत वेबसाईट्सच्या लिंक.
१] http://www.flowersofindia.net
२] http://www.flickr.com/photos/dinesh_valke/with/3997204331/
३] http://www.maydreamsgardens.com/
४] http://plantsarethestrangestpeople.blogspot.com/
५] http://indigarden.blogspot.com/
६] http://gardenamateur.blogspot.com
७] http://the-urban-gardener.blogspot.com/
८] http://www.blogcatalog.com/blogs/india-garden.html
९] http://lifeonthebalcony.com
१०] http://balconygarden.wordpress.com/
११] http://www.ubcbotanicalgarden.org/weblog/
१२] http://mrbrownthumb.blogspot.com/
१३] http://the6x8garden.blogspot.com
१४] http://theurbanbalcony.blogspot.com/
१५] http://raanaphule.blogspot.com/ (मायबोलीकर स_सा यांचा ब्लॉग)
१६] http://ranfulanchyaranvatevar.blogspot.com/ (मायबोलीकर जागू यांचा ब्लॉग)
वर्षु, वाह ! पांढरे शुभ्र
वर्षु,
वाह ! पांढरे शुभ्र मोर,कोंबडा ..छान फोटो.
तिकडची भाताची शेती पाहुन वाटलं...हिंदी-चीनी भाई भाईच तर आहेत !
तुमची-आमची,सगळी कडची शेती सारखीच तर असते..
शेती मालाला किमान/योग्य भाव मिळण्यासाठी व्यवस्थे विरुद्ध झगडणं हे मात्र तुमच्या शेतकर्यांकडे कडे नसेल, अशी आशा करतो.
मारुती चितमपल्लींनी सिकाडाचा उल्लेख केला आहे. हा किडा तब्बल १७ वर्षे जमिनीखाली कोषावस्थेत असतो.
दिनेशदा,
जमिनीखाली १७ वर्षे ? खुप आश्चर्य/अजब वाटलं.
एवढी वर्षे जमिनीखाली काढल्यामुळेच त्याचा आवाज इतका कर्कश निघत असेल ना !
रात्री किर्र्र.. असा आवाज काढणार्या किडा देखील आकाराने असाच वाटला
अनिल, जगात काही अपवाद सोडले
अनिल, जगात काही अपवाद सोडले तर सगळेच शेतकरी असेच झगडत असतात.
अपवाद असलाच तो इजिप्त, इस्राईल सारख्या देशातला असेल, किंवा पूर्णपणे यांत्रिक शेती करणार्या देशातील !
पाऊस, पाणी व हवामान यांची अनिश्चितता, निकस जमिनी, हमी भाव नसणे, नाशिवंत माल, वाहतुकीचा
खोळंबा, किडी आणि रोग... सगळीकडे तेच आणि तसेच आहे.
दिनेश आता चायना टूर वरच या
दिनेश आता चायना टूर वरच या एकदा..
या गुहा कितक्या मोठाल्या अहेत कि एकावेळी १०००,१५०० लोकं सहज मावू शकतात.. तरी अजिबात गर्दी वाटत नाही..
अनिल,शेती मालाला किमान/योग्य
अनिल,शेती मालाला किमान/योग्य भाव मिळण्यासाठी व्यवस्थे विरुद्ध झगडणं हे मात्र तुमच्या शेतकर्यांकडे कडे नसेल, अशी आशा करतो.. अगदी नाही करावा लागत्(बहुतेक!!)
या विषयावर इतक्या खोलवर शिरु कोण देणारे !!!
शांकली कसली ग्वाड दिस्तेय
शांकली कसली ग्वाड दिस्तेय वेल..
आणी.. मनीमाऊ,मऊ मऊ दिस्तायेत
वर्षू, पण किती वेळ थांबायचे
वर्षू, पण किती वेळ थांबायचे यावर मर्यादा असेल ना ? आपल्या उच्छवासाने देखील ते खडक काळे पडू
शकतात. निसर्गाला ते तयार करण्यासाठी हजारो, वर्षे लागतात.
आपल्याकडच्या अमरनाथच्या गुहेतील पाण्यात जर ते क्षार असते तर तिथेही कायमचे शिवलिंग तयार झाले असते.
रात्री किर्र्र.. असा आवाज
रात्री किर्र्र.. असा आवाज काढणार्या किडा देखील आकाराने असाच वाटला>>>>> रातकिडे आपले पंख (का मागील पाय ?) एकमेकांवर घासून असला इरिटेटिंग किर्रर्र ..... आवाज काढतात हे मी ऐकून होतो पण विश्वास बसत नव्हता, पण एकदा प्रत्यक्ष पाहिले डोळ्यांनी (आवाज कानांनीच ऐकला पण पंख घासताना पाहिले);)
तेव्हा खात्री पटली. फक्त नर रातकिडेच असा आवाज काढतात - म्हणे ??
बिनिवालेंनी, पूर्वाचल मधले
बिनिवालेंनी, पूर्वाचल मधले रातकिडे घरातील देवाच्या घंटेसारखा नाजूक किणकिण आवाज करतात असे लिहिले आहे. ते किडे आणायला पाहिजेत, आपल्याकडे.
मुख्य पानावर दुर्गा भागवतांचा
मुख्य पानावर दुर्गा भागवतांचा ऋतुचक्र मधील उतारा टाकला आहे.>>> अरेरे हे आधीच सांगायचेस ना. अजुन कसा वाचला नव्हता म्हणुन मगाशीच वाचुन वर स्वतःला मी वेंधळी म्हणुन घेतले. फिदीफिदी>>>>>>>मी पण
वर्षू, शांकली, जागू, फ़ोटो
वर्षू, शांकली, जागू, फ़ोटो सुंदर.
दिनेशदा.शशांकजी अनुमोदन
दिनेशदा.शशांकजी
अनुमोदन !
आमच्या एका कलीगने काढलेल्या पक्ष्यांच्या फोटोंचे प्रदर्शन कंपनी शेजारीच,एका आर्ट गैलरीत आहे,मला एक निसर्गप्रेमी/पक्षीमित्र मिळाल्याचा आनंद झाला.
कसला वेगाने धावतोय सद्ध्या हा
कसला वेगाने धावतोय सद्ध्या हा धागा!
वर्षूतै, चिनी शेतीची प्रचि बघून आठवलं ... वर्षभरापूर्वी मला जर्मनीतली शेती बघायची संधी मिळाली होती. युरोपातली छोटी छोटी टुमदार गावं, नजरेच्या टप्प्यापर्यंत शेतं पसरलेली, आणि शेतात चुकूनही कुणी काम करताना दिसणार नाही. गावातली २ - ४ माणसं शेती करतात. शेतीमधलं यांत्रिकीकरण इतकं वाढलेलं आहे, की दोन पिढ्यांपूर्वी जे काम करायला आठवडा लागायचा, ते आता काही तासात होतं. अंगमेहनतीचा भागही खूप कमी झालाय.
खेड्यातले बाकीचे लोक रोज / दर आठवड्याला शहरात जाऊन नोकर्या करतात / अन्य उधोगधंदे करतात. जे शहरात कामाला जातात, त्यांचीही घरं मात्र आपल्या गावातच. त्यामुळे खेड्यातही पैसा आहे, सर्व सुखसोयी आहेत. गावांचं गावपण टिकून आहे, बकालपणा आलेला नाही (तो शहरात दिसतो.)
क्रौंच पक्षी फक्त संस्कृत काव्यातच आहे का? 'बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स, कोंकण अँड मलबार' मध्ये सापडला नाही.
शांकली / शशांक, कसली गोड पिल्लं आहेत मांजराची!
त्यामुळे खेड्यातही पैसा आहे,
त्यामुळे खेड्यातही पैसा आहे, सर्व सुखसोयी आहेत. गावांचं गावपण टिकून आहे, बकालपणा आलेला नाही (तो शहरात दिसतो.)
आपल्याकडे देखील परिस्थिती बदलत आहेच, खेड्यात देखील पैसा येत आहे, पण त्यासाठी शिकलेली तरुण पिढी आणखी शेतीत आली पाहिजे,शेती नक्की सुधारेल्.त्यात आधुनिकता येईल, व्यावसायिक पणा येइल. शेतीबद्दल काहीही वाचलं कि प्रतिसाद द्यावासा वाटतोच.
हो गौरी, खूपच गोड आहेत
हो गौरी, खूपच गोड आहेत पिल्लं. अगं आता सध्या त्यांच्या खोड्या, खेळणं बघण्यात वेळ कसा जातो तेच कळत नाहीये. त्या दोघांमधली कपाळावर पांढरी खूण असलेली भाटी आहे आणि खालचा बोका आहे. त्याने लुटुपुटीच्या मारामारीत तिच्या डोळ्यावर पंजा मारला आणि तिचा उजवा डोळा थोडा दुखावला गेलाय.
५ दिवस कोकणांत गेलो तर
५ दिवस कोकणांत गेलो तर सव्वादोनशे पोष्टी?????
हेम, तुम्ही या भागातल्या २ र्या पानावर एका फळांचा फोटो टाकलाय त्याला रामराखी म्हणतात. त्याची पानं गोलसर असतात. (त्यामुळे त्या वेलीला 'वाटोळी' असं पण गमतीशीर नाव आहे.) याचं शास्त्रीय नांव मिळेल?
यावेळी कोकणांत कडावल या गांवी गेलो होतो, तिथे अभ्रकाच्या डोंगरावर जाऊन आलो. अभ्रकाच्या खाणी आहेत तिथे. फोटो डकवतो लवकरच.
हॉर्नबील्स बरेच दिसले. (यंदा पाऊस लवकर येतोय की कांय??)
वर्षू, शांकली, जागू
वर्षू, शांकली, जागू ...सगळ्यांचे फोटो मस्त.

ईथे Shenandoah Valley, Virginia मधे Luray Caverns ला मी अशीच गुहा पाहिली. तिथ ले काही फोटो....
Dream Lake....
Frozen Waterfall

Drapery formation

Fried Egg Formation

आपल्या ईथे नगरला या सारखी (ईतकी सुरेख नाही) गुहा पाहिली पण ती त्यामानाने खुप लहान आहे. तेथुन जवळच निघोजला घोड नदीचे खननकार्य पहायला मिळाले. रांजन खळगे आणि पाण्याच्या प्रवाहामुळे त्या डोंगरा/दगडा ला आलेला आकार अप्रतिम दिसतो.
अरे वा! लुरेचे फोटो. मस्त आहे
अरे वा! लुरेचे फोटो. मस्त आहे ती गुहा..
या घरच्या स्ट्रॉबेरीज. एकदा लावल्यावर दरवर्षी आपोआपच येतात. आकाराने लहान पण गोड आहेत.
ही स्ट्रॉबेरीज आणि गुलाबाची फुले खाते.
सुप्रभात. वा लोला मस्त
सुप्रभात.
वा लोला मस्त स्ट्रॉबेरीज. आणि फुले आणि स्ट्रॉबेरी खाणारी पण.
शांकली वेल आणि मनीमाऊ (तुम्ही दोघ शशांक म्हणतात त्या प्रमाणे) खुप छान.
दिनेशदा मी पण भराभर करते हे कदंबे. आमच्याकडे जूईच्या कळ्या पुर्वी वाडग भरून निघायच्या. एका वेळी अगदी १० फुटही कदंबा करायचे. ह्या मे महिन्यात मी मामे सासर्यांच्या मुलाच्या लग्नासाठी मांडवासाठी ३ मिडीयम साईझच्या टोपल्यांतील झेंडूचे तोरण एकटीनेच केले. एका तासात झाले. मी करताना कोणाला कळत नाही कसे करते. कोणाला शिकवायचे असेल तर माझीच पंचाईत असते. कारण खुपच स्लो करून दाखवावे लागते.
अनिल आमच्या कडच्या बर्याच शेतकर्यांनी परवडत नाही म्हणून शेती करणेच सोडले आहे. मजूरी, खते, मनुष्यबळ, बाधक हवामान, अवेळी पाऊस ह्या सगळ्यामुळे काही व्रर्षे नुकसान होत होते त्यामुळे शेतीच बंद केली आहे. क्वचीत लोक करतात. पण असे झाले तर धान्याचा पुरवठा कसा व्हायचा ? शेतकरी शेते विकू लागली आहेत. शेतात आता सिमेंटच्या बिल्डींगची शेते तयार होत आहेत. खुप खराब वाटत हे पाहताना. कारण लहानपणी ह्याच शेतांना हिरवेगार पाहण्याची सवय होती.
सोनाली मस्त आहेत फोटो. लोला,
सोनाली मस्त आहेत फोटो.
लोला, कुत्रीला छान वळण लावलय. अगदी रसिक दिसतेय.
शांकली, मांजर किंवा तत्सम प्राण्यांचे (त्यांच्या पिल्लांचे) असे खेळणे म्हणजे त्यांच्या पुढील आयूष्यात
करायच्या शिकारीची प्रॅक्टीस असते. आता ते प्राणी, काही शिकार करत नाहीत, ते सोडा.
जागू, आईपण तेच म्हणते. तूला शिकवण्यापेक्षा मीच करुन टाकते म्हणून. या पद्धतीचा एक फायदा म्हणजे पूर्ण
फूल नसले, नुसत्या पाकळ्या असल्या, तरी गुंफता येतात.
सुप्रभात! शांकली, लोला,
सुप्रभात!


शांकली, लोला, सोनाली,जागु वर्षू नील छान प्रचि!
उजू, सोनाली छान आहेत
उजू, सोनाली छान आहेत फोटो.
जिप्सि कुठे गेला आहे का ? बरेच दिवस येत नाही.
खरे तर दिनेशदा कळ्या किंवा अर्धवट उमललेल्या फुलांचा कदंबा अगदी भराभर होतो.
जिप्स्या, वीकेंडला कुठला
जिप्स्या, वीकेंडला कुठला जागेवर सापडायला ?
तो तूम्हा सगळ्यांना एक मोठी इमेल पाठवणार आहे (मी काम दिलय त्याला ते) त्याची आठवण करुन द्या त्याला.
उजू, कुठला फोटो हा ? पक्ष्यांची तब्येत उत्तम दिसतेय आणि स्वच्छ पण आहेत, पक्षी.
दा,हा फोटो नेरळच्या
दा,हा फोटो नेरळच्या सगुणाबागेतला आहे. त्यांनी चांगली काळजी घेतलीये पक्षांची, झाडांची.(अॅग्रो टूरीझम)
आमच्या अंगावर धावून आला होता तो टर्की तेव्हा.जणू काही तो बाकी सगळ्यांचा बॉडीगार्ड्च आहे अशी वागणूक होती त्याची. चांगलीच पळापळ झाली होती आमची.
हे उजू कुठे आहे ही सगुणा बाग
हे उजू कुठे आहे ही सगुणा बाग नेरूळमध्ये ? झाडे वगैरे आहेत का भरपूर ? नेरूळला माझ्या बर्याचदा फेर्या होतात. एक दिवस जाईन.
जागु, त्यांची वेबसाईट चेक कर
जागु, त्यांची वेबसाईट चेक कर www.sagunabaug.com.

छान जागा आहे, मूलांना खूप मजा येते. फार्महाऊसला लागूनच नदि पण आहे.पॉण्ड हाऊस पण छान आहे तिथले.
हा बघ त्याचा फोटो.
सुप्र. मंडळी
सुप्र. मंडळी
उजु अग ते नेरूळ नाही नेरळ
उजु अग ते नेरूळ नाही नेरळ आहे. छान वाटतय. मागे विशाल कुलकर्णीने त्याचा धागा टाकला होता तेंव्हापासून जायच मनात आहे. बघू आता कधी जमत ते.
ओह! अगं ती टायपो होती, मला
ओह! अगं ती टायपो होती, मला नेरळच म्हणायच होत.
आता बदल केलाय.
सोनालिस.. सुंदर आहेत या
सोनालिस.. सुंदर आहेत या केव्ज!!!
लोला.. स्ट्रॉबेरीज आणी गुलाबाची फुलं आवडणारी रसिक दिसतीये की
उजु..काय सुरेख पक्षी आहेत.. रिसॉर्ट पण शांत आणी सुंदर आहे..
आता ह्या धाग्याने बराच वेग
आता ह्या धाग्याने बराच वेग घेतला आहे !
शाकली तुझ्या 'अहों' ना काही कविता वगैरे सुचली नाही का मनीमाऊच्या एवढ्या गोड पिलांना पाहून!
वरिल सर्वच फोटो सुंदर !
Pages