आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
काल मी वानखेडेला मॅच बघितली.
काल मी वानखेडेला मॅच बघितली. जबरी धमाल आली. मॅच मुंबई जिंकली असती तर पब्लिक ने आणखी कल्ला केला असता पण एकूण प्रत्येक फोर,सिक्स, विकेट, चांगली फिल्डिंग सगळ्यालाच दाद मिळत होती. नंतर नंतर तर असे वाटले की पब्लिक ला कोण जिंकतय वगैरेंशी जास्त मतलब नव्हता.
भाऊ, वरच्या सचिन-फिरकी पोस्टशी सहमत. गेले अनेक महिने तो चांगले स्पिनर्स पूर्वीएवढ्या आत्मविश्वासाने खेळत नाही. सईद अजमल विरूद्धही हाच अनुभव आला होता.
पण काल तो स्वतः फार संथ खेळत नव्हता. गिब्जने त्याला फारसा स्ट्राईक दिला नाही. एका वेळेस सचिन २० बॉल्स मधे २६ वर होता. त्याने स्पिनर्स विरूद्ध काहीतरी अॅप्रोच बदलला पाहिजे- तो जे काय करायला जातोय ते जमत नाहीये.
काल १० ओव्हर्समधे ८० रन्स हवे होते आणि सचिन व कार्तिक खेळत होते. तेव्हा सहज शक्य दिसत होते. पण मुख्य प्रॉब्लेम म्हणजे पहिल्या ओव्हर्स फार वाया घालवल्या. गिब्ज तर काल स्पॉट फिक्सिंग केल्यासारखा खेळत होता. शाकिब बे बरेच बॉल अगदी ठरवून नुसते तटवत होता.
भाऊ, शाहरूख वरचे कार्टून महान
भाऊ, शाहरूख वरचे कार्टून महान आहे
>>> कालच्या खेळावरून मला असं
>>> कालच्या खेळावरून मला असं वाटलं कीं आतां सचिन फिरकी खेळताना कांहीसा दबावाखाली येतो
नक्कीच! कालचा सोपा सामना फिरकीविरूद्ध संथ खेळून घालवला. काल गिब्ज, दिनेश कार्तिक व रोहीत शर्मा अत्यंत संथ खेळले. सचिनची २४ चेंडूत २७ ही धावसंख्या बरी वाटली तरी तो बराच काळ चाचपडत खेळत होता व त्याने, गिब्जने व कार्तिकने संथ खेळ करून आवश्यक धावगती वाढवून ठेवली आणि त्यामुळे दबावाखाली रायडू, पोलार्ड वगैरे बाद झाले. मुम्बईने पाठलाग करताना पहिल्या ६ षटकांत जास्तीत जास्त धावा केल्या पाहिजेत. एखादा बळी गेला तरी हरकत नाही. त्यामुळे खालच्यांवर दबाव येत नाही. पण मुम्बई विकेट्स वाचवण्याचा नादात खूप संथ सुरूवात करतात आणि नंतर विकेट्स हातात असूनसुद्धा खालच्यांवर दडपण येते.
काल गिब्ज बाद झाल्यावर रोहीत शर्मा किंवा रायडूला पाठविण्याऐवजी संथ खेळणार्या कार्तिकला कशाला पाठवले?
काल मी वानखेडेला मॅच बघितली.
काल मी वानखेडेला मॅच बघितली. >>> फारएण्ड... कोणत्या स्टॅण्ड मधे होता? मी पण नॉर्थ स्टॅण्डला होतो. आधी कळवायचे ना भेटलो असतो.
भाऊ.. व्यंचि मस्तच
वानखेडेची नविन खेळपट्टी संथ आणि फिरकीला अनुकूल आहे. त्यामुळे उचलून मारणारे खेडाळू अलगद मध्यमगती गोलंदाजांच्या जाळ्यात सापडतात. सचिनला आणि गिब्सला हे अनुभवाने माहित असावे आणि तेच त्यांच्या धीम्या सुरवातीचे कारण असावे. पहिली ६ षटके फुकट गेल्याने मागे दडपण वाढले.
नंतर नंतर तर असे वाटले की पब्लिक ला कोण जिंकतय वगैरेंशी जास्त मतलब नव्हता. >>> खरयं आणि तसही मुंबईचा पब्लिक चांगल्या खेळाला प्रोत्साहन देणारा आहे... मागिल RCBच्या सामन्यात 'गेल'ला डोक्यावर उचलून घेतलं होतं.
अरे मीही नॉर्थ स्टॅण्ड मधेच
अरे मीही नॉर्थ स्टॅण्ड मधेच होतो, दुसर्या मजल्यावर - पिच वरून पाहिले तर त्या डीजे स्टेजच्या डावीकडे. म्हणजे आरपी सिंग बराच वेळ उभा होता साधारण तेथे. तू कोठे होतास?
गिब्ज चे ते बॉल तटवणे मला काल तरी विचित्र वाटले.
म्हणजे माझ्या डोक्यावर होतास
म्हणजे माझ्या डोक्यावर होतास तू :p मी खाली Level 1ला आर पीच्या मागे होतो.
आता पंजाबही हातातील मॅच कठिण करायच्या मागे लागली आहे.
पंजाब जर जिंकले तर मुंबईचे
पंजाब जर जिंकले तर मुंबईचे काम सोपे होईल ना?
झालं सोप्प... पण दोन धावा
झालं सोप्प... पण दोन धावा हव्या असताना स्ट्रॅ.टा.आ. घेणं म्हणजे अतीच झालं.
btw स्टेडियमच्या पार्श्वभुमीवरील धरमशाळेचा नजारा काय सुंदर दिसतोय.
<< ...संथ खेळणार्या
<< ...संथ खेळणार्या कार्तिकला कशाला पाठवले? >> गंभीरने फिरकी गोलंदाज सुरवातीपासूनच वापरायला सुरवात केली होती व कार्तिक फिरकी चांगली खेळतो असा समज प्रचलीत आहे, म्हणून असावं !
<< गिब्ज चे ते बॉल तटवणे मला काल तरी विचित्र वाटले. >> खरंय. शिवाय, बाद झाल्यावर त्याने अंपायरकडे इतक्या तिरसटपणे बघण्याइतका तो निर्णय निश्चितच संशयास्पद नव्हता .
<< अरे मीही नॉर्थ स्टॅण्ड मधेच होतो, दुसर्या मजल्यावर >> यापुढे " मायबोली" हा हातातला बोर्ड स्टेडियममधे उंचावून दाखवणं मायबोलीकराना बंधनकारक करायला हवं !
मनप्रित सिंग संघात येईल का ?
मनप्रित सिंग संघात येईल का ?
गेलचं वादळ घोंघावतंय !
गेलचं वादळ घोंघावतंय ! बन्गलोर १८८-१ [ १७.५ षटकं ], गेल नाबाद १२०- ५९ चेंडूत !!!!!
गेल काय राक्षसी खेळलाय....
गेल काय राक्षसी खेळलाय.... केवळ जबरा!
.
.
काल गेल तुफानच खेळला...
काल गेल तुफानच खेळला... दिल्लीवाल्यांनी पण चांगली लढत दिली... टेलर चांगला मारत होता.. तो बाद झाल्यावर संपली मॅच....
अजून प्ले ऑफ्सच्या ५ मॅचेस बाकी आहेत.. त्यातली पुणे - कलकत्ता ही भाकड आहे.. कोणासाठी काहीही उपयोग नाही... फक्त कलकत्ता जिंकले आणि पंजाब - दिल्ली मध्ये दिल्ली हारले तर कलकत्ता एक नंबर वर आणि दिल्ली दोन नंबर वर..
पंजाब जिंकल्यावर चेन्नैला घरचा रस्ता.. तसे झाले तर शेवतच्या दोन मॅचेस ज्या चेन्नैत होणार त्यांना किती पब्लिक येणार????
राजस्थानच्या दोन मॅचेस बाकी.. दोन्ही जिंकले तर तिसर्या किंवा चवथ्या नंबरने फायनल्स मध्ये खेळू शकतील.. कारण त्यांचा नेट रनरेट जोरात आहे... आणि त्यामुळे मुंबई बाहेर जाऊ शकेल.
बंगलोर - हैद्राबाद मॅच मध्ये बंगलोर जिंकल्यावर मुंबई शेवटची मॅच जिंकली तरच आत नाहीतर बाहेर...
एकूण काय तर शेवटच्या मॅच पर्यंत तिसरी आणि चवथी टीम कोणती ती ठरणारच नाही.... जय हो..
टी-२० बद्दलचे सगळे अंदाज
टी-२० बद्दलचे सगळे अंदाज हवामान खात्याच्या अंदाजासारखेच -
सचिन ची आयपिल मधिल खेळी देखिल
सचिन ची आयपिल मधिल खेळी देखिल आता बघवत नाही बा.......... आणि मुळातच कसलेही मोटीवेशन नसल्यासारखा खेळतो असं वाटतं... ना चांगली सुरुवात करू शकतो, ना गोलंदाजी, अलिकडे तर झेल देखिल सोडतोय.. आणि "पोटा" पुढे खेळाचा पाटा होतोय..
वेटोरी स्वतः सन्मानाने बाहेर बसलाय
"गेल" आला रे...
राजस्थानसाठी आज फार महत्वाची
राजस्थानसाठी आज फार महत्वाची मॅच.... रहाणे लवकर आउट
< < राजस्थानसाठी आज फार
< < राजस्थानसाठी आज फार महत्वाची मॅच.... >> आत्यंतिक महत्वाची !! ओवाईस शाह आहे आज ही समाधानाची बाब रॉयल्ससाठी !!
भाऊ... १० ओव्हर्समध्ये फक्त
भाऊ... १० ओव्हर्समध्ये फक्त ६१ आणि ३ विकेटस.... तरी बरेच कॅचेस सुटलेत!
डेक्कनची बॅटींग बघता १५०+ तरी पाहिजेत राजस्थानकडे
सचिन ची आयपिल मधिल खेळी देखिल
सचिन ची आयपिल मधिल खेळी देखिल आता बघवत नाही बा >> काही कळत नाहि. ज्या बॉलरना एरवी तो डोळे मिटून खेळत असे त्यांना स्लो मोशनमधे पण खेळत नाहि.
आशिया कपच्या वेळेस कोहली म्हणाला होता कि रोहित शर्मा खेळताना त्याचा खेळ बघत राहावेसे वाटते. त्या दिवशी त्याचे शतक बघताना कोहलीचे विधान पुरेपूर पटले.
IPL मधे योग्य तर्हेने पुल खेळू शकणारे देशी खेळाडू कोण कोण आहेत ? रायडू, मनप्रीत सिंग, शिखर धवन (?)
७३-४ [१२ षटकं ] ! द्रविडही
७३-४ [१२ षटकं ] ! द्रविडही बाद ! काळजी करण्याची वेळ आलीय द्रविडवर !! शाहवर आता भिस्त आहे सगळी !!
<< IPL मधे योग्य तर्हेने पुल खेळू शकणारे देशी खेळाडू कोण कोण आहेत ? >> मला वाटतं योग्य तर्हेने 'पुल' करतां येत नसेल, तर टी-२० मधे फलंदाजाची नाकाबंदी करणं कोणत्याही गोलंदाजाला कठीण जाणार नाही. कार्तिकही छान पुल करत होता परवां. कोहलीही करतोच. पण टी-२० मधे खरं वैशिष्ठ्य हें असावं कीं ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू 'अँटिसिपेट' करून फूटवर्कचा उपयोग करून तो 'लेग'ला फटकावून धांवा मिळवणं. असा फटका ' योग्य तर्हेने पुल' या व्याख्येत बसत नसला तरीही टी-२० साठी अत्यावश्यक ठरतो. बरेच देशी खेळाडू आता यात वाकबगार झाले आहेत; सचिन तर यात माहीरच आहे. पटतं ?
पटले. फक्त योग्य पूल मधे मला
पटले. फक्त योग्य पूल मधे मला फाईन लेग ते मिडविकेट पर्यंत पुल करणे अभिप्रेत होते. बरेच देशी खेळाडू front foot वर पूल करताना फटका complete न करता मिडॉन पर्यंतच किंवा फारतर मिडविकेट जाईल एव्हढाच खेळतात. हेच austrialian कसे खेळतात बघितले कि मला काय म्हणायचेय ते लक्षात येईल. ( Devilliars ने त्या दिवशी फस्ट बॉलरला reverse pull करून third man ला फोर मारलेला पहिल्यापासून मी थोडा गंडलोय ) मी अशासाठी विचारत होतो कि अशा खेळाडूंना bouncy track वर खेळणे अधिक सोपे जाणार, त्यांच्यात invest करायला हरकत नसावी.
राहणेला एकंदर IPL छान गेलीये तेंव्हा आतातरी groom करायला हरकत नसावी. (कि CSK मधे जावे लागेल ? )
१२६ फक्त अवघड आहे
१२६ फक्त
अवघड आहे राजस्थानचे.... परवा चंडेलाने टाकला तसा अफलातुन स्पेल हवाय एखाद्याचा!
<< मी अशासाठी विचारत होतो कि
<< मी अशासाठी विचारत होतो कि अशा खेळाडूंना bouncy track वर खेळणे अधिक सोपे जाणार, त्यांच्यात invest करायला हरकत नसावी. >> पूर्ण सहमत. आयपीएलचा [टी-२०] उल्लेख केला म्हणून मीं पुस्ती जोडली एवढंच.
राजस्थानची १२६ पर्यंतच मजल ! कठीण आहे आतां राजस्थानसाठी !!
आयपीएलचा [टी-२०] उल्लेख
आयपीएलचा [टी-२०] उल्लेख केला>>त्यावरूनच, R.P. singh, munaf वगैरे मंडळी जास्त फिट नाहि वाटत का आता ? RP च्या काही बॉल्सचा स्पीड १३५+ etc पाहून धक्का बसलेला. मुनफ उड्या वगैरे मारून बॉल पकडतो.
नरैनचा हातभर वळणारा off break संशयास्पद वाटतो का ? त्याच्या इतर कुठल्याच बॉलला एव्हढा turn मिळत नाहि.
<< नरैनचा हातभर वळणारा off
<< नरैनचा हातभर वळणारा off break संशयास्पद वाटतो का ? त्याच्या इतर कुठल्याच बॉलला एव्हढा turn मिळत नाहि. >> असामीजी, तुम्ही नेमका मुद्दा मांडलाय; मला वाटतं तो वळणारा चेंडू हाताचा पंजा मनगटाशी काटकोनात ठेऊन तो टाकतो, कांहीसा मुरलीसारखा. सचिनला त्रिफळाचित केलं तेंव्हा 'रिप्ले'मधे हें स्पष्ट दिसत होतं. त्यामुळे तो चेंडू कांहीसा संशयास्पद वाटला तरी तसा नसावा. चेंडूला उंची न देताही इतक्या झपकन तो चेंडू वळतो कीं भल्याभल्यानाही तो खेळताना अडचणीत टाकूं शकतो, असं मला वाटलं. शिवाय, नरैनचा आत्मविश्वासही एखाद्या कसलेल्या गोलंदाजासारखा वाटला. Worth keeping an eye on him; He has sting in his spin which is pathetically lacking in our present spin attack ! [ सालं मधूनच इंग्रजी नाही फेकलं तर लोक सिरीयसली घेतच नाहीत ना आपल्याला ! ]
डेक्कनकडून राजस्थान हरावं ? द्रविडचं खूप वाईट वाटलं !
खुद्द ललित मोदीच आयपीएलमधल्या 'स्पॉट फिक्सींग' व भ्र्ष्टाचाराची कारणमींमांसा करताना व त्यावर उपाययोजना सुचवताना पाहून मात्र खूपच मनोरंजन झालं !!!!
डेक्कन चार्जर्सनी राजस्थान
डेक्कन चार्जर्सनी राजस्थान रॉयल्सना हरवून मुंबई इंडियन्सवर उपार केलेत. आज दिल्लीकरही करतील का?
He has sting in his spin
He has sting in his spin which is pathetically lacking in our present spin attack ! >> हे बाकी खरय. मिश्रा, पियुष, भज्जीचे काही सुरू आहे ते बघवत नाहि. भज्जी ओझाला ज्या तर्हेने हाताळतोय ते पाहून दया येते. गंभीर is revelation in that aspect. Spot on fielding positions for spinners. अगदी युसुफ पठाण पण भेदक वाटतो :). अपन्ना promising वाटतोय.
खुद्द ललित मोदीच आयपीएलमधल्या 'स्पॉट फिक्सींग' व भ्र्ष्टाचाराची कारणमींमांसा करताना व त्यावर उपाययोजना सुचवताना पाहून मात्र खूपच मनोरंजन झालं !!! >> जेंव्हा सिद्धू fast balling कशी खेळायचे हे सांगू लागला तेंव्हापासून आश्चर्य वाटत नाहि
आतां क्र. १ व २ वर येण्याला
आतां क्र. १ व २ वर येण्याला कांहीसं महत्व येईल; कारण त्या क्रमांकावरच्या संघाना फायनलला येण्यासाठी दोन संधी मिळणार आहेत.
मला पुणे वॉरियर्सचे खेळाडू
मला पुणे वॉरियर्सचे खेळाडू आपलेच वाटत होते पण त्यांनी जाम निराश केले. अगदी थोड्या धावसंख्येचा सुध्दा पाठलाग करता आला नाही. चला ठीक आहे. भेटू पुढच्या वर्षी...! तोपर्यँत " सहारा प्रणाम "
Pages