आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
आयपीएल तमाशातला सर्वात खराब
आयपीएल तमाशातला सर्वात खराब संघ असा असेल -
- गांगुली (कर्णधार), हरभजन (उपकर्णधार), रिचर्ड लेव्ही, मनिष पांडे, उत्तप्पा (यष्टीरक्षक), युसुफ पठाण, मुनाफ पटेल, पार्नेल, अश्विन, रूद्रप्रताप सिंग, राहुल शर्मा, नेहरू
अजून बरीच नावे आहेत. पण पहिल्या १२ नावांवरच थांबतो.
मास्तुरे, पठाण ला आता १२ वा
मास्तुरे, पठाण ला आता १२ वा करा. काल खेळला तो :). बाकी संघ सही आहे.
भाऊ
भाऊ
>>काश मागच्या जून पासून ते
>>काश मागच्या जून पासून ते आयपीएल आधीच्या एकातरी सामन्यात त्याने ते केले असते
अहो ते सामने थोडेच निर्णायक होते
आयपीएल तमाशातला सर्वात खराब
आयपीएल तमाशातला सर्वात खराब संघ असा असेल - >> विजय, पार्थिव पटेल नाहि असे असूच शकत नाहि भाउ
अंतिम सामना दिल्ली वि.
अंतिम सामना दिल्ली वि. कलकत्ता होईल्/व्हावा.. (सेहवाग वि. नरीन... बघायचे आहे.)
चेन्नई नशीबाने आत आले, मुंबई आपल्या कर्माने बाहेर गेले
(स्वतः पेक्षा स्मिथ जास्त चांगला खेळू शकतो म्हणून स्वतः धावचित होणारा सचिन- हे द्रूष्य बघायचे काय ते शिल्लक होते.... नको त्या वेळी चांगुलपणा असे (सचिनच्या) पूर्वीच्या काळी म्हटले असते, आता मात्र काळाची पावले ओळखलीच आहेत तर त्यानुसार भविष्यात पावले टाकावीत असे म्हणावेसे वाटते. ऑसी/ईंग्लंड च्या मालिके नंतर, थोडक्यात २०१२ च्या अखेरीस सचिन निवृत्त होईल असे वाटते. किंबहुना मला या दोन्ही दौर्यात, रहाणे, शर्मा, यांना खेळताना पहायला आवडेल.. "पण" सिनीयर्स नी जागा आडवल्यावर कसचे काय..)
आयपीएल ५ ने क्रिकेट
आयपीएल ५ ने क्रिकेट हॉटेलपर्यंत नेलं ... सोबत चिअरलीडर्स पण होत्या.
आज नाणेफेक जिंकून दिल्ली ने
आज नाणेफेक जिंकून दिल्ली ने पहिली गोलंदाजी घेतलीये... आणि मॉर्कल व पठाण बाहेर? फायनल कलकत्ता वि. चेन्नई "ठरवली" आहे काय?
विजय नेहमीप्रमाणे शेवटच्या
विजय नेहमीप्रमाणे शेवटच्या मॅचमधे खेळून test नि t-20 team मधे येणार
high pressure चांगल्या handle करतो असे म्हणायचे कि काय ? 
आणि मॉर्कल व पठाण बाहेर?
आणि मॉर्कल व पठाण बाहेर? फायनल कलकत्ता वि. चेन्नई "ठरवली" आहे काय? स्मित >> योग TV चा volume वाढव बर जरा. मॅच फिक्सिंगचे भूत जरा बाजूला ठेव खांद्यावरचे काढून
तो जयवर्धने काय सांगत होता ऐकले नाहिस का ?
Mahela on why Morne Morkel is not playing: "It's unlucky because Irfan, we cant play Irfan, it messed up our balance, he is an allrounder who plays at No. 7. So we had to play Andre, who is an allrounder, and Morne had to sit out as a foreign player. It's unfortunate, but horses for courses."
मी तरीही रसेल च्या ऐवजी मॉर्केलला ठेवले असते. When was the last time Raina, Vijay, Dhoni had handled quality fast short pitched balling comfortably ?
यादव ने खरच चांगली बॉलिंग टाकली. आज DD जिंकले तर सेहवाग and/or Warner पेटलेले असणार, बघायला मजा येईल.
<< आज DD जिंकले 'तर' ....>>
<< आज DD जिंकले 'तर' ....>> खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असून व दिल्लीकडे दणकेबाज फलंदाज असूनही हा 'तर' सीएसकेच्या २२५ धांवांमुळे 'तर' असा झाला आहे ! सेहवागने अफलातून सुरवात करून दिली तर - व तरच - सामना रंगेल असं वाटतंय.
दिल्ली ३६-२. वार्नर व सेहवाग
दिल्ली ३६-२. वार्नर व सेहवाग गेले ! आतां दिल्लीचं कांही खरं नाही !!
हुर्रे.... चेन्नई फायनलला
हुर्रे.... चेन्नई फायनलला
त्या शाहरुखच्या टीमला हरवायला धोनीच पाहिजे!
दिल्ली गेलं बाहेर. चेन्नई
दिल्ली गेलं बाहेर.
चेन्नई जिंकू देत फायनल असं वाटतय पण यंदा बहुतेक कोलकताचा टर्न आहे
खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल
खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असून व दिल्लीकडे दणकेबाज फलंदाज असूनही >> भाऊ माझे असे ठाम मत आहे कि अशा crunch game मधे toss जिंकून बॅटींग घ्यावी. गंभीरला कळवले आहे
CSK जिंकू नये असे मनापासून वाटते कारण परत तेच ते नग शेवटच्या १-२ मॅचेसच्या जोरावर आत येतील. 
परत तेच ते नग शेवटच्या १-२
परत तेच ते नग शेवटच्या १-२ मॅचेसच्या जोरावर आत येतील.
सामना जिंकत असतील तर वाईट काय?
यंदा बहुतेक कोलकताचा टर्न आहे
म्हंजेक्काय? इथे काय असे ठरवले असते? ऐतेन.च! त्यालाच का 'फिक्सिंग' म्हणतात?
म्हणजे मी स्वतः तर तसेच फिक्सिंग केले असते म्हणा. शेवटचा सामना जर चेन्नईला, तर चेन्नईचाच संघ पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त लोक येतील. मग तिकीटाच्या किंमती वाढवायच्या! बघा आजच सगळी तिकीटे संपली असतील. म्हणजे तिकीटे दाबून ठेवून नंतर काळ्या बाजारात अनेक पट किंमतीने विकायची!! पैसाच पैसा!!
<< सामना जिंकत असतील तर वाईट
<< सामना जिंकत असतील तर वाईट काय? >> खरंय; टी-२० त कोणाच्या कोणत्या कोंबड्याच्या आरवण्याने उजाडेल सांगता येत नाही ! काल विजयचं घणाघाती शतक व अश्विनचे तीन बळी !!
कोलकत्ता जिन्कणार अस
कोलकत्ता जिन्कणार अस वाटतय.
ते जिन्कल्याच वाईट नाही.
पण शारुखचा माज उगाच वाढेल याच दुख//
>>मग तिकीटाच्या किंमती
>>मग तिकीटाच्या किंमती वाढवायच्या! बघा आजच सगळी तिकीटे संपली असतील
भारतात अस नसत झक्कीबुवा.... बुकींग ओपन झाल्या झाल्याच इथे तिकीट संपतात.... क्वालिफायर, इलिमिनेटर असतील तर लगेचच बुकींग फुल्ल होते.... नाहीतर पुण्याच्या एव्ह्ढ्या वाईट परफॉर्मन्सनंतर सुद्धा शेवटच्या सामन्यापर्यंत पुणे स्टेडिअम फुल्ल होते कारण पहील्या एक्-दोन चांगल्या परफॉर्मन्सनंतरच लोकांनी तिकिटे काढली होती
सहवाग हुष्षार कर्णधार वगैरे कधीच नव्हता पण तो फिक्सिंग वगैरे करेल अस वाटत नाही..... काल चेन्नई जबरदस्त खेळले आणि त्या दबावाखाली दिल्ली कोसळले.
उगाच सगळीकडे संशयाच्या चष्म्यातुन बघण्यात अर्थ नाही
>>http://timesofindia.indiati
>>http://timesofindia.indiatimes.com/sports/cricket/ipl-2012/news/Delhi-pu...
सेहवाग चा कॉमन सेंस काल कमी पडला असे क्षणभर मानले तरी- मालिकेतील सर्वात जास्त विकेट्स घेणारा गोलंदाज बसवणे, नाणेफेक जिंकून अशा मह्त्वाच्या सामन्यात प्रथम गोलंदाजी करणे, आणि स्वतः क्र. ३ वर खेळायला येणे (अर्थात याने काही विशेष फरक पडला नाहीच.. तरिही!)
सनी गुप्ता चे नाव आधी कुणी ऐकले आहे काय..? (संघनिवड हे फिक्सींग म्हणून सिध्ध करणे अवघड आहे.. त्यामूळे त्याबद्दल काहीच बोलता येत नाही. नेमकी हीच खरी गोम आहे..)
सेहवागच्या कॉमन सेंस ला भज्जी ने या मालिकेत जोरदार टशन दिली हेही खरे..
असो... "एंटरटेनमेंट"..
धोनी आपले मास्टरस्ट्रोक
धोनी आपले मास्टरस्ट्रोक निर्णायक मॅचेससाठी राखून ठेवतो असे दिसतेय..... आख्खी मालिकाभर टीकाकार टीका करुन करुन थकले की हा एका फटक्यात सगळ्यांना गप्प करतो! >>
हो वल्डकपला पण आख्खी सिरीज काहीच केले नाही पण शेवटी एकदम ९५ मग धोणीचा उदो उदो. (अर्थात कॅप्टन म्हणून तोच चांगला आहे ह्यात वादच नाही, पण बॅटसमन म्हणून अतर्क्य आहे तो)
आता पहिला जावाई मुरल्या पुढच्या दौर्यात येणार हे नक्की.
१ ली क्वालिफायर मी पाहिली. प्रत्यक्ष मैदानात कोलकत्तापेक्षा दिल्लीला जास्त सपोर्ट होता. अनाकलनीय निर्णयामुळे त्यांनी मॅच घातली. अन कालही पहिले बॅटिंग घ्यायला हवी होती. असो. दिल्ली जिंकेल असे वाटले होते.
शाहरुख मुळे कोलकत्ता नको अन धोणीमुळे चेन्नई नको असे काहीसे माझे झाले आहे.
मॅच होईल तेंव्हा मी बघायला नसेल हा आनंद मात्र आहे. 
सचिनला आयपिएल झेपत नाहीये. पुढच्या वर्षी खेळू नये. नाहीतर त्याचाही "दादा" व्हायचा. पण वनडे अन टेस्ट मध्ये तो हवाच
भजीने ज्या चुका केल्या अगदी
भजीने ज्या चुका केल्या अगदी त्याच चुका सेहवागने करून सामना घालविला. नाणेफेक जिंकूनसुद्धा गोलंदाजी घेण्याचा सेहवागचा निर्णय चुकीचाच होता. कॉमेंटेटर सुद्धा हा निर्णय खूपच धाडसी आहे असे सांगत होते. भज्जीने हीच चूक केली होती. मॉर्केलसारख्या सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजाला बाहेर ठेवणे हा मूर्खपणाचा कळस होता. भज्जीने सुद्धा गिब्जला बाहेर ठेवून घोडचूक केली होती. इरफानसारख्या अष्टपैलूऐवजी सनी गुप्तासारख्या नवोदीत व पहिलाच सामना खेळणार्या सामान्य फिरकी गोलंदाजाला घेणे आणि त्याला पहिले षटक देणे ही अजून एक चूक. भज्जीने सुद्धा स्वतःला व रूद्र प्रताप सिंगला खेळवून चूक केली होती. एकंदरीत मुम्बई वि चेन्नई या सामन्यातून सेहवागने कोणताच धडा घेतला नाही आणि स्वतःच्याच पायावर कुर्हाड मारून घेतली.
आता माझा पाठिंबा चेन्नईला. कलकत्ता हरलेच पाहिजे. तसं पाहिलं तर कलकत्ता जिंकल्याचं दु:ख नाही पण शाहरूखसारखा माजोरडा सोकावेल, म्हणून कलकत्ता हरलेच पाहिजेत.
दिल्लीनं मॉर्केलला विश्रांती
दिल्लीनं मॉर्केलला विश्रांती का दिली?
आयपीएलच्या अंतिम फेरीचं दार कोणासाठी उघडणार ?, याचा फैसला करणा-या अत्यंत महत्त्वपूर्ण सामन्यात दिल्ली डेअरडेविल्सनं आपलं प्रमुख अस्त्र असलेल्या धडाकेबाज मॉर्ने मॉर्केलला विश्रांती का दिली, यावरून क्रिकेटवर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलं आहे. चेन्नईला सलग तिस-यांदा आयपीएल फायनलमध्ये पाठवण्यासाठी हा सामना ' फिक्स ' केला गेला होता, इथपर्यंत तर्कवितर्क क्रिकेटप्रेमी लढवत आहेत. वीरेंद्र सेहवाग सलामीला न आल्यानंही अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
मॉर्ने मॉर्केल... वीरूसेनेच्या गोलंदाजीचा कणा... आयपीएल- 5 मध्ये सर्वाधिक २५ विकेट्स त्याच्या नावावर आहेत आणि डोक्यावर मानाची ' पर्पल कॅप ' अगदी घट्ट बसलेय. हाच मॉर्ने मॉर्केल काल सकाळी चेन्नईविरुद्धच्या दुस-या क्वालिफायरसाठी अत्यंत उत्सुक होता. आत्तापर्यंत या स्पर्धेत मी उत्तम कामगिरी केली आहे आणि आता उरलेले दोन सामने जिंकून जेतेपदावर नाव कोरण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत, असा इरादा त्यानं ' टाइम्स ऑफ इंडिया ' शी बोलताना व्यक्त केला होता. पण, संध्याकाळी दिल्लीचा संघ मॉर्ने मॉर्केलशिवायच मैदानात उतरला आणि सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
चेन्नईविरुद्धच्या आजच्या सामन्यात मॉर्ने मॉर्केलला विश्रांती देत असल्याचं वीरेंद्र सेहवागनं टॉस जिंकल्यानंतर सांगितलं तेव्हा अनेकजण ' उडालेच ' . ' करो या मरो ' च्या सामन्यात सर्वात भरवशाच्या खेळाडूशिवाय उतरण्याचा दिल्लीचा निर्णय अनाकलनीय होतो. त्यामागचं त्यांचं ' लॉजिक ' तर त्याहून भन्नाट होतं. बोटाच्या दुखापतीमुळे इरफान पठाण खेळू शकणार नव्हता. एक ' ऑल राउंडर ' खेळाडू नसेल तर संघाचा समतोल बिघडेल, म्हणून त्यांनी अँड्रे रसेलला संघात स्थान दिलं. त्याच्यासाठी मॉर्केलला वगळलं आणि इरफानऐवजी ऑफ स्पिनर सनी गुप्ताला खेळवण्याचा निर्णय घेतला. हे संघातील ' अदलाबदली ' चं समीकरण महेला जयवर्धनेनं सामन्यादरम्यान माइकवरून मांडलं, त्यावर रवी शास्त्रींची प्रतिक्रिया होती, "it was ridiculous logic".
दिल्लीच्या या अजब लॉजिकवर आता क्रिकेटप्रेमीही ' भरभरून ' बोलताहेत. मॉर्ने मॉर्केलला का ' बसवलं '? , हा त्यांचा थेट सवाल आहे. त्याचं समाधानकारक उत्तर मिळत नसल्यानं या प्रकरणात पाणी मुरत असल्याची दाट शंका व्यक्त होतेय. इरफानऐवजी तुम्ही सनी गुप्ता किंवा इतर कुणालाही खेळवा, ऑल राउंडर म्हणून रसेलला घ्या, पण मॉर्केलला बाहेर बसवण्याचं काहीच कारण नव्हतं. एक परदेशी खेळाडूच वगळायचा होता, तर फॉर्ममध्ये नसलेल्या रॉस टेलरला वगळता आलं असतं, असं विश्लेषण क्रिकेटचे जाणकार करताहेत. पण, मॉर्केलला थोडा ताप असल्याचं सांगत दिल्लीचे अधिकारी या विषयावर पडदा टाकतात.
काही मंडळींना यात ' फिक्सिंग ' चा वास येतोय. बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन हे चेन्नई संघाचे मालक आहेत. त्यांचा संघ फायनलमध्ये पोहोचवण्यासाठी हा सारा ' खटाटोप ' केला गेल्याचा त्यांचा तर्क आहे. वीरेंद्र सेहवागनं टॉस जिंकून फिल्डिंग घेणं, डेव्हीड वॉर्नरसोबत सलामीला न येणं, वॉर्नरकडून झालेलं गचाळ क्षेत्ररक्षण, याकडेही ही मंडळी लक्ष वेधतात. अर्थात, चेन्नईचे समर्थक ढोणी ब्रिगेडच्या विजयाचं श्रेय ढोणीच्या निर्णयक्षमतेला आणि मुरली विजयच्या तडाखेबंद शतकी खेळीला देतात.
आयपीएलची सगळीच ' गणितं ' वेगळी असल्यानं हे प्रकरण फारसं पुढे जाईलसं वाटत नाही. त्यामुळे मनातली सगळी किल्मिषं बाजूला सारून क्रिकेटप्रेमींनी रविवारच्या ' मेगा फायनल ' चा आनंद घेण्यासाठी सज्ज झालेलंच बरं !
संदर्भ - http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/13513502.cms
सेहवागच्या कॉमन सेंस ला भज्जी
सेहवागच्या कॉमन सेंस ला भज्जी ने या मालिकेत जोरदार टशन दिली हेही खरे.. >> संघाचे कप्तान संघनिवडीचा वगैरे निर्णय एकटे बसून घेतात असे तुम्हाला खरोखर वाटते का ?
परत तेच ते नग शेवटच्या १-२ मॅचेसच्या जोरावर आत येतील.
सामना जिंकत असतील तर वाईट काय?>> म्हातारी मेल्याचे दु:ख नाहि काळ सोकावतो हो.
>>सेहवागच्या कॉमन सेंस ला
>>सेहवागच्या कॉमन सेंस ला भज्जी ने या मालिकेत जोरदार टशन दिली हेही खरे.. >> संघाचे कप्तान संघनिवडीचा वगैरे निर्णय एकटे बसून घेतात असे तुम्हाला खरोखर वाटते का
छे छे.... भलतेच कुणितरी निर्णय घेत होते अशी शंका आहे..
.. शेवटी ते बोली लावून, खरेदी करून विकत घेतलेले खेळाडू/कॅप्टन आहेत यातच काय ते आलं ना..
दिल्ली वि चेन्नई हा कालचा
दिल्ली वि चेन्नई हा कालचा सामना संशयास्पद होता अशी आंतरजालावर व दूरदर्शनवर जोरदार चर्चा सुरू आहे. एकंदरीत चेन्नईचा अंतिम सामन्यातला प्रवेश बघितला तर संशय अधिकच बळावतो.
चेन्नईचे सर्व १६ सामने संपले तेव्हा त्यांचे १७ गुण होते. मुम्बई (१८), कलकत्ता (१९) आणि दिल्ली (२०) यांना गाठणे चेन्नईला अशक्य होते. ४ थे स्थान मिळविण्यासाठी त्यांना पंजाब (१४ गुण व २ सामने शिल्लक), बंगळूर (१५ गुण व २ सामने शिल्लक) आणि राजस्थान (१४ गुण व २ सामने शिल्लक) यांना मागे टाकणे आवश्यक होते. पंजाब १ सामना जिंकून १६ वर पोचले व नंतर बंगळूरशी हारल्यामुळे शेवटी १६ गुण मिळून चेन्नईच्या मागे पडले. त्यामुळे एक प्रतिस्पर्धी आपोआप कमी झाला. आता बंगळूर (१७ गुण व १ सामना शिल्लक) व राजस्थान (१४ गुण व २ सामने शिल्लक) यांना मागे टाकणे आवश्यक होते.
राजस्थान व बंगळूर यांचे गुणतक्त्यात तळाशी असलेल्या डेक्कनशी सामने शिल्लक होते. अचानक आश्चर्यचा धक्का देत तळाच्या डेक्कनने राजस्थान व बंगळूर या दोघांनाही हरवले. संपूर्ण स्पर्धेत डेक्कनची फलंदाजी चांगली झाली होती (त्यांनी १७३, १८७, १९०, १९६ अशा मोठ्या धावसंख्या रचल्या होत्या), पण अत्यंत सुमार गोलंदाजीमुळे मोठी धावसंख्या हातात असूनसुद्धा त्यांना सामने गमवावे लागले होते. आपल्या शेवटच्या २ सामन्यात त्यांनी सुमार गोलंदाजी असूनसुद्धा राजस्थानला फक्त १२० धावात रोखून सामना जिंकला हे एक मोठे आश्चर्यच होते. त्यावर कडी म्हणजे बंगळूरविरूद्ध डेक्कनच्या फक्त १३२ धावा झाल्या असताना व बंगळूरकडे गेल, आगरवाल, तिवारी, दिलशान, डीव्हिलिअर्स असे अत्यंत भक्कम फलंदाज असताना बंगळूरला फक्त १०९ धावा करता आल्या. डेक्कनच्या या २ संपूर्ण अनपेक्षित विजयांमुळेच चेन्नईला ४ थे स्थान मिळविता आले हे लक्षात घेतले पाहिजे. डेक्कनचे हे अनपेक्षित विजय व राजस्थान आणि विशेषतः बंगळूरचा डेक्कनविरूद्धचा पराभव हा अत्यंत अनपेक्षित वाटतो.
कालच्या सामन्यात अनेक संशयास्पद गोष्टी घडलेल्या आहेत. मुम्बईच्या सामन्याचा इतिहास माहित असूनसुद्धा सेहवागने नाणेफेक जिंकल्यावर फलंदाजी न घेता गोलंदाजी घेतली, मॉर्ने मॉर्केल सारख्या स्पर्धेत सर्वाधिक बळी घेणार्या गोलंदाजाला बाहेर बसवून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला, सनी गुप्ता सारख्या अत्यंत सुमार व नवोदीत गोलंदाजाला या महत्त्वाच्या सामन्यात खेळवून त्याला थेट पहिले षटक टाकायला दिले (सनी गुप्ताचे पृथक्करण आहे ३-०-४७-०), २२३ इतके मोठे आव्हान असताना सेहवाग सलामीला आला नाही, वॉर्नरसारक्या अत्यंत चपळ क्षेत्ररक्षकाने झेल सोडला आणि सर्व संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत सामान्य होते. या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार केला तर या सर्व गोष्टी म्हणजे नक्कीच योगायोग नव्हता असे वाटते. विशेषतः प्लेऑफ मध्ये येण्याची अत्यंत अंधुक शक्यता असताना इतर ३ प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना मागे सारून केवळ नशिबाच्या जोरावर चेन्नई पुढे येणे हा योगायोग नक्कीच नाही. चेन्नई वि मुम्बई हा सामनासुद्धा आता संशयास्पद वाटतो.
<< इतर ३ प्रबळ
<< इतर ३ प्रबळ प्रतिस्पर्ध्यांना मागे सारून केवळ नशिबाच्या जोरावर चेन्नई पुढे येणे हा योगायोग नक्कीच नाही. >> संशयकल्लोळ असला तरी त्यालाही दुसरी बाजू आहेच. ओडीआयच्या विश्वचषकातही जवळ जवळ बाहेर फेकले गेलेले संघ त्याच स्पर्धेत विश्वविजेते होऊन गेले आहेत [ ठळक उदाहरण- पाकिस्तान ]. मर्यादित षटकांच्या सामन्यांत कोणता खेळाडू, कोणता संघ केंव्हा फॉर्मात येऊन उलथापालथ करेल हें सांगणं तसंही कठीणच असतं, आणि टी-२०त तर अधिकच . सामना बघताना तो 'फिक्सड' आहे असं समजून बघण्यापेक्षां तो तसा नाही असं समजून बघावा, ही माझी भुमिका; 'फिक्सड' आहे अशी पाल तरीही मनात चुकचुकतच रहात असेल तर मी सामना पहाणंच बंद करीन. [ सामना/ने 'फिक्सड' आहेत कीं नाहीत याबाबत मात्र मी छातीठोकपणे कांहीही सांगूं शकत नाही ].
>>सामना बघताना तो 'फिक्सड'
>>सामना बघताना तो 'फिक्सड' आहे असं समजून बघण्यापेक्षां तो तसा नाही असं समजून बघावा, ही माझी भुमिका; 'फिक्सड' आहे अशी पाल तरीही मनात चुकचुकतच रहात असेल तर मी सामना पहाणंच बंद करीन.
अगदी अगदी भाऊ.... न पेक्षा सामना न पाहणेच योग्य!
मास्तुरेंच्या दोन्ही
मास्तुरेंच्या दोन्ही पोष्टींना पुर्ण अनुमोदन.
प्रत्येक वेळी योगायोग हे काही केल्या पटत नाही.
>>> षटकांच्या सामन्यांत कोणता
>>> षटकांच्या सामन्यांत कोणता खेळाडू, कोणता संघ केंव्हा फॉर्मात येऊन उलथापालथ करेल हें सांगणं तसंही कठीणच असतं, आणि टी-२०त तर अधिकच .
बरोबर आहे. पण या विशिष्ट सामन्यात कोणता खेळाडू व कोणता संघ फॉर्मात आला हा दुय्यम मुद्दा असून इतरच मुद्दे महत्त्वाचे आहेत. अत्यंत फॉर्मात असलेल्या खेळाडूला महत्त्वाच्या सामन्यात न खेळविणे, अत्यंत सुमार खेळाडूला त्याच्याऐवजी खेळविणे, कसलेल्या क्षेत्ररक्षकांनी अत्यंत गलथान क्षेत्ररक्षण करणे, नावाजलेल्या सलामीच्या फलंदाजाने गरजेच्या वेळी सलामीला न येणे, नाणेफेक जिंकूनसुद्धा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेणे या सर्व संशयास्पद निर्णयांचा आणि अचानक एखादा खेळाडू किंवा संघ फॉर्मात येण्याचा संबंध नाही.
Pages