आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.
मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....
हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्या व्यंगचित्रांसाठी
या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे
संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा
संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल
संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर
संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड
संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे
संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो
संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी
संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स
आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया
>>डेक्कन चार्जर्सनी पैसे
>>डेक्कन चार्जर्सनी पैसे नक्की कुठे खर्च केलेत?
फक्त त्यांना १-२ चांगले बॉलर कमी पडतायत.... बाकी बॅट्समन मस्त कामगिरी करतायत!
>>पण इतर महाराष्ट्रीय स्थानिक खेळाडू मात्र कुजलेले आहेत
खरय....आणि ते ही महाराष्ट्राच्या २-२ टीम्स असताना
>>ही मखलाशी केलीच आहे त्याने आजच्या मुलाखतीत !!!
भाऊ, कुठाय ती मुलाखत?
भाटीयानी शेवट अगदी चेतन शर्मा
भाटीयानी शेवट अगदी चेतन शर्मा केला.. आधीचे पाच बॉल उत्तम टाकून शेवटचा लो फुलटॉस दिला... आणि मॅच घालवली...
मुंबईची आत्ता पुन्हा दाखवत
मुंबईची आत्ता पुन्हा दाखवत आहेत. १० ओव्हर्सच्या पुढची मॅच चालू आहे. माझी काल हुकल्याने आत्ता बघतोय. इच्छुकांनी लाभ घ्यावा
<< भाऊ, कुठाय ती मुलाखत? >>
<< भाऊ, कुठाय ती मुलाखत? >> स्वरुपजी, वाचली एवढं नक्की; मुंबईच्या पेपरात नाही मिळाली पण कोकणातले कांही पेपरही काल चाळले होते. बहुतेक कालच्या ' रत्नागिरी टाईम्स'मधे ह्या मुलाखतीवर आधारित बातमी होती. [ वृत्तसंस्थानी दिलेलीच अशी माहिती स्थानिक पेपर छापतात हा माझा अनुभव आहे . तपासून नक्की सांगतो ].
भाऊ, तुम्ही रत्नागिरी टाईम्स
भाऊ, तुम्ही रत्नागिरी टाईम्स वाचता???
>>> << सचिनचं अपयश बघवत
>>> << सचिनचं अपयश बघवत नाहिय्ये. >> पण दादाने तें नेमकं हेरलंय; 'माझ्या धांवा होत नाहीत हे खरंय पण फक्त माझ्याच नांवाची अशी बोंब कां होतेय. अर्थात, मला गेलीं १५ वर्षं याची संवय झाली आहे', ही मखलाशी केलीच आहे त्याने आजच्या मुलाखतीत !!!
सचिन आणि दादाच्या भूमिकेत फरक आहे. सचिन हा संघाचा कर्णधार नाही. उद्या कर्णधाराने ठरविले तर तो संघाबाहेर बसू शकतो. पण दादा स्वतः कर्णधार असल्याने कोणाला खेळवायचं आणि कोणाला नाही हे तो स्वतःच ठरवतो आणि केवळ अट्टाहासाने आणि पूर्ण फ्लॉप असताना तो संघात जागा अडवून बसला आहे.
सचिन अपयशी ठरत असताना तो संघात असेल तर त्याला संधी देणार्या भज्जीला दोष द्यायला पाहिजे, पण दादा अपयशी असूनसुद्धा खेळत राहतो ही त्याचीच चूक आहे.
दादाने याबाबतीत व्हेटोरी आणि गिलख्रिस्टचा आदर्श ठेवला पाहिजे. दोघेही पूर्ण तंदुरूस्त आहेत, पण आपल्या अनुपस्थितीत सुद्धा संघाची कामगिरी चांगली होत असल्याने दोघे स्वखुषीने स्वतःहून बाहेर बसले आहेत. दादा मात्र आपल्या उपस्थितीत व आपल्या खराब कामगिरीने संघ पराभूत होत असताना अट्टाहासाने चिकटून बसला आहे.
IPL बद्दल एक वाईट बातमी
IPL बद्दल एक वाईट बातमी
बातमी वाचली.
बातमी वाचली.
मुळात आयपीएल हा एक धंदा आहे.
मुळात आयपीएल हा एक धंदा आहे. बीसीसीआय व उद्योगपतींनी संयुक्तपणे सुरू केलेला हा धंदा आहे. धंदा म्हटलं की त्यात नफेखोरी, लांड्यालबाड्या, भ्रष्टाचार, काळाबाजार आलाच. मग आता उगाच कशाला तक्रारी करायच्या? आयपीएल सुरू करतानाच इथे फिक्सिंग होणार हे लक्षात यायला पाहिजे होते. जेव्हा उद्योगपती अब्जावधी रूपये ओतून खेळाडू व संघ विकत घेतात, तेव्हा ते काही क्रीडाप्रेमी असल्याने पैसे उधळत आहेत असे समजणे हा मूर्खपणा आहे. त्याच्यातून त्यांना भरघोस नफा पाहिजे आहे. त्यांच्याप्रमाणे खेळाडूंनी सुद्धा नफा मिळविणे हा त्यांचा हक्क आहे.
बीसीसीआयने यात पडूच नये. हे सामने अधिकृत नसल्याने बीसीसीआयला किंवा आयसीसीला यात पडण्याचे कारणच नाही. फारतर संघमालकांनी फिक्सिंग मध्ये गुंतलेल्या आपल्या संघातल्या खेळाडूंवर कारवाई करावी. एखाद्या खाजगी कंपनीत जर कर्मचार्यांनी पैशांच्या किंवा इतर भानगडी केल्या तर कारवाई करण्याची जबाबदारी ही त्या कंपनीच्या व्यवस्थापनाची आहे, सरकारवर ती जबाबदारी येत नाही. त्याच प्रमाणे आयपीएल मध्ये फिक्सिंग होत असेल तर, त्या त्या मालकांनी कारवाई करावी. बीसीसीआयने यात पडू नये. ज्याप्रमाणे सरकारला त्या कंपनीतून मिळणार्या कराशी मतलब आहे, कंपनी कशी चालते किंवा कंपनीत काय भानगडी होतात याच्याशी कर्तव्य नसते, त्याचप्रमाणे बीसीसीआय ने आयपीएल मधून मिळणारी मलई ओरपावी. फिक्सिंग कडे दुर्लक्ष करावे. संघाचे मालक काय करायचं ते बघून घेतील.
<< सचिन आणि दादाच्या भूमिकेत
<< सचिन आणि दादाच्या भूमिकेत फरक आहे. >> मास्तुरेजी, म्हणूनच 'मखलाशी' शब्द योजलाय मीं !
<< बीसीसीआयने यात पडूच नये. >> वा:, असं कसं ! क्रिकेटमधे कुणी वरचढ झालं तर बीसीसीआय खपवून घेईल पण पैसे कमवायच्या खेळात ? अशक्य !!!
<< भाऊ, तुम्ही रत्नागिरी टाईम्स वाचता??? >> खूप नियमितपणे वाचत नसलो तरी कोकणावरच्या प्रेमामुळे स्थानिक पेपर दिसलाच तर आधाशासारखा वाचून काढतो . [ आणि, नंदिनी, माबोवर धडाक्याने 'लाँचिंग' झाल्यावरही तुमची जहाज मालिका अजून बंदरांतच कां नांगर टाकून आहे, याचंही उत्तर स्थानिक पेपरांत मिळतं कां, हेंही बघत असतो ! ]
मास्तुरेंशी सहमत...... सगळ्या
मास्तुरेंशी सहमत......
सगळ्या धंदे-व्यवसायात जसे काळे-गोरे चालते तसे इथेही होणारच. 'त्या' खेळाडूंना BCCI ने १५ दिवसांसाठी काढले आहे. कडक कारवाई झाली तरी उत्तम.
खेळ बघताना सुद्धा हे ध्यानात ठेवले पाहिजे. जगातला कोणताही खेळ यातून सुटलेला नाही त्यामुळे इथेही खोटेनाटे व्यवहार चालणारच. 'ललित मोदी' प्रकरणाने आयपीएल मधे झलक दाखवली होतीच...
मास्तुरे, भाऊ, निशदे,
मास्तुरे, भाऊ, निशदे, बर्यापैकी सहमत. बीसीसीआयला ही 'कॅश काउ' चालू ठेवायची म्हणजे असले उपाय करणे आवश्यक आहे. हे नाटक आहे असे एकदा लोकांना वाटले तर लोकांचा इंटरेस्ट संपेल - मग ते खरे असो वा नसो.
"भारतात ज्या गोष्टीत एवढा पैसा आहे ती गोष्ट सरळपणे होणे अवघड आहे" असे एका भारत-पाक मॅचबद्दलच माझा एक मित्र म्हणाला होता. ते पटून सुद्धा मी कायम "डिनायल" मधे असतो. २००० च्या मॅच फिक्सिंग पासूनच बर्याच वेळा शंका येतात. पण एकच आशा आहे - सचिन, द्रविड, दादा, कुंबळे, लक्ष्मण हे पाच लोक, ज्यांनी भारतीय क्रिकेटला शिखरावर पोहोचवले - ते स्वच्छ होते/आहेत.
आयपीएल मधे प्रचंड संधी आहेत - पैसा योग्य मार्गाने कमावण्याच्या, आणखी खेळाडूंना चमकण्याच्या. कितीतरी लोकांना यातून व्यवसाय, रोजगार मिळत आहे. त्याचा योग्य फायदा कसे करून घेतात बघू.
पंजाबची दिल्लीविरूद्ध कठीण
पंजाबची दिल्लीविरूद्ध कठीण परिस्थिती आहे (१६.२ मध्ये ६ बाद १०८). आजचा सामना हरले तर पंजाबला जवळपास बाहेरच पडावे लागेल. राजस्थानही जवळपास बाहेर गेल्यातच जमा आहे. शेवटी दिल्ली, कलकत्ता, मुम्बई व मद्रास हे ४ संघच पुढे येतील असे वाटते. बंगळूरला अजूनही थोडीशी संधी आहे. पण राजस्थान व पंजाबला जवळपास काहीच संधी नाही.
>>राजस्थानही जवळपास बाहेर
>>राजस्थानही जवळपास बाहेर गेल्यातच जमा आहे
पुढच्या दोन्ही मॅच जिंकल्या तर राजस्थानला अजुनही संधी आहे मास्तुरे
दिल्लीची हालत खराब.... ३७-४.... पंजाब जोरात आहे!
पण राजस्थान व पंजाबला जवळपास
पण राजस्थान व पंजाबला जवळपास काहीच संधी नाही. >>> बिच्चार्यांचे मालक गरिब असतील म्हणूनच त्यांना संधी नाकारण्यात आली असेल. धंदा है पर गंदा है ये...
चांगला हातातला सामना कसा खराब
चांगला हातातला सामना कसा खराब करायचा याचे चांगले उदाहरण दिल्ली दाखवत आहे आत्ता......
आवाना जबरदस्त.....
भाऊ, व्यंगचित्र नाही आले तुमचे....... येऊ द्या की.....
रायडू आणि पटेल मध्ये काय
रायडू आणि पटेल मध्ये काय बाचाबाची झाली म्हणे काल?.... टीव्हीवर दाखवले का?
द्रविडसाठी राजस्थान यावे, आणि
द्रविडसाठी राजस्थान यावे, आणि त्यांनी जिंकावे असे वाटते. सेहवाग, गंभीर, भज्जी, धोनी व सचिन कडे वर्ल्ड कप आहे. दादा कडे सर्वाधिक कसोटी विजय. निवृत्त होताना द्रविडकडे आयपील विजय असला तर तो "काव्यात्मक न्याय" वगैरे होईल - "बोअर खेळतो" हाच फक्त पूर्ण कारकीर्दीत ज्याच्या वरचा सर्वात मोठा आक्षेप होता, त्याने करमणूक हा सर्वात मोठा उद्देश असलेली स्पर्धा जिंकणे हा
फारएण्डा.. रारॉची एक मॅच
फारएण्डा..
रारॉची एक मॅच डेक्कनबरोबर आहे... आणि दुसरी मुंबई बरोबर.. जर ते दोन्ही मॅच जिंकले तर नक्कीच पुढे जातील..
चेन्नैची एकच मॅच बाकी आहे आणि ती त्यांना जिंकावीच लागेल. जर हारले तर दुसर्यांवर अवलंबून रहावे लागेल पुढे जाण्यासाठी...
<< व्यंगचित्र नाही आले
<< व्यंगचित्र नाही आले तुमचे....... येऊ द्या की..... >> केलाय एक केविलवाणा प्रयत्न -
मला लिहायचे आहे पण मी लिहिणार
मला लिहायचे आहे पण मी लिहिणार नाही
भाऊ, म्हणजे तुम्ही लेटेस्ट भानगड वाचलेली दिसतेय.
<< लेटेस्ट भानगड >> म्हणजे
<< लेटेस्ट भानगड >> म्हणजे खासदार अझरुद्दीनसाहेब त्या पांच निलंबित खेळाडूंच्या बाजूने आतां उभे राहिलेत का ?
<< लेटेस्ट भानगड >> म्हणजे
<< लेटेस्ट भानगड >> म्हणजे खासदार अझरुद्दीनसाहेब त्या पांच निलंबित खेळाडूंच्या बाजूने आतां उभे राहिलेत का ?
>>> >>राजस्थानही जवळपास बाहेर
>>> >>राजस्थानही जवळपास बाहेर गेल्यातच जमा आहे
पुढच्या दोन्ही मॅच जिंकल्या तर राजस्थानला अजुनही संधी आहे मास्तुरे
राजस्थानला आता खूपच अवघड आहे. जरी ते पूर्ण बाहेर गेले नसले तरी फारशी संधी शिल्लक नाही. त्यांनी आपले उर्वरीत दोन्ही सामने जिंकले तर त्यांचे जास्तीत जास्त १८ गुण होतील. आतापर्यंत दिल्ली २० गुण आहेत व मुम्बई १८ आहेत. कलकत्ता व मद्रासचे १७ आहेत. बंगळूर १५ वर आहे व पंजाब १४ वर.
राजस्थानला दिल्लीला गाठणे शक्य नाही. त्यांना मुम्बई, कलकत्ता, बंगळूर व मद्रासच्या पुढे जायला हवे. राजस्थानने डेक्कन विरूद्धचा सामना जिंकला तरी वरील ६ संघांच्या गुणात काहीच फरक पडत नाही. मुम्बई-कलकत्ता सामन्यानंतर त्यांची गुणसंख्या २०-१७ किंवा १८-१९ अशी होईल. म्हणजे दिल्लीपाठोपाठ या २ पैकी अजून एक संघ राजस्थानच्या आवाक्याबाहेर जाईल. म्हणजे आजच्या सामन्यानंतर दिल्ली व मुम्बई/कलकत्ता पैकी एक संघ अशा दोन संघांना गाठणे राजस्थानला अशक्य आहे (हा सामना अनिर्णित राहिला तरी हेच होईल). त्यामुळे राजस्थानला फक्त ३ र्या किंवा ४ थ्या क्रमांकाचीच आशा धरता येईल. त्यामुळे राजस्थान पुढे जाण्याची ५० टक्के शक्यता आधीच संपलेली आहे.
पंजाब्-मद्रास सामन्यानंतर मद्रास जास्तीत जास्त १९ पर्यंत गुण मिळवू शकेल. त्यामुळे हा सामना पंजाबने जिंकावा अशी राजस्थान प्रार्थना करेल. पण असे झाले तर पंजाब १६ गुण मिळवून स्पर्धेत राहील.
कलकत्ता व बंगळूरला अनुक्रमे पुणे व डेक्कनविरूद्धचे सोपे सामने आहेत. त्यामुळे ते अजून पुढे जाण्याची दाट शक्यता आहे. पंजाबला दिल्ली व मद्रासविरूद्ध लढावे लागेल. हे सामने अवघड असल्याने पंजाबला देखील फारशी आशा नाही. पण त्यामुळे मद्रास पुढे सरकेल.
त्यामुळे मुम्बई व बंगळूर आपले उर्वरी दोन्ही सामने हरावेत (मुम्बई-राजस्थान, मुम्बई-कलकत्ता, बंगळूर-दिल्ली, बंगळूर्-डेक्कन), पंजाबने मद्रासला हरवावे पण दिल्लीविरूद्ध पराभूत व्हावे, कलकत्ता मुम्बईविरूद्ध जिंकावे पण पुण्याविरूद्ध हरावे व आपण आपले दोन्ही सामने जिंकावे अशीच राजस्थानची इच्छा असणार.
मुम्बई व बंगळूर आपले उर्वरीत दोन्ही सामने हरायची शक्यता खूपच कमी आहे (मुम्बई-राजस्थान, मुम्बई-कलकत्ता, बंगळूर-दिल्ली, बंगळूर्-डेक्कन). दोघेही १ विजय व १ पराभव मिळवू शकतील, पण दोन्ही हरणे कारच अवघड वाटते. तसेच कलकत्ता पुण्याविरूद्ध हरण्याची शक्यता देखील खूप कमी आहे. त्यामुळे संख्याशास्त्राच्या नियमानुसार या सामन्यांचे राजस्थानला अनुकूल निर्णय लागण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.
एकंदरीत राजस्तानला पुढे जायची शक्यता अत्यंत अल्प आहे.
वा: ! मुंबईने जोर केलाय.
वा: ! मुंबईने जोर केलाय. कोलकत्ता १००-६ [१५ षटकं] !!
>>द्रविडसाठी राजस्थान यावे,
>>द्रविडसाठी राजस्थान यावे, आणि त्यांनी जिंकावे असे वाटते
फारेंडा अगदी अगदी
>>एकंदरीत राजस्तानला पुढे जायची शक्यता अत्यंत अल्प आहे
ती सगळी गणिते माहित असुनसुद्धा फार मनापासून वाटतय की राजस्थान प्लेऑफ्स मध्ये यावे
अॅन्ड दे से.... किसी चीज को अगर पुरे दिलसे चाहो तो सारी कायनात.... वगैरे वगैरे
आता तरी घ्या त्या धवल
आता तरी घ्या त्या धवल कुलकर्णी ला...
मुम्बई मूर्खासारखे सोपा सामना
मुम्बई मूर्खासारखे सोपा सामना हरले. या स्पर्धेचे एक वैशिष्ट्य आहे. मुम्बई पाठलाग करताना कितीही आवाक्यातले लक्ष्य असले तरी अत्यंत हळू खेळून तोंडाला फेस आणतात आणि नंतर तो सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन सामना जिंकतात. याआधी डेक्कनविरूद्ध, बंगळूरविरूद्ध, मद्रासविरूद्ध सामने शेवटच्या चेंडूपर्यंत गेले होते. आज हे धोरण फसले. आज काहीही कारण नसताना गिब्ज व सचिनने संथ खेळून दडपण वाढवले. नंतर कार्तिक व शर्माने त्यांचीच री ओढली. दडपणामुळे रायडू, पोलार्ड व स्मिथ बाद झाले व शेवटी १४० धावांचे सोप लक्ष्य गाठता आले नाही.
आता शेवटचा राजस्थानविरूद्धचा सामना मुम्बईला जिंकावाच लागेल. पुढच्या सामन्यात बहुतेक स्मिथच्या जागी फ्रॅन्कलीन आत येईल. मुनाफऐवजी धवलला खेळवावे.
कालच्या खेळावरून मला असं
कालच्या खेळावरून मला असं वाटलं कीं आतां सचिन फिरकी खेळताना कांहीसा दबावाखाली येतो; गंभीरने म्हणूनच मध्यमगती गोलंदाजीला अनुकूल परिस्थिती असूनही सुरवातीलाच फिरकी गोलंदाजांकडे सूत्र सोपवली असावी. सचिन शून्यावर असतानाच एक जोरदार एलबीडब्ल्यू अपील झालं होतं व तो आऊट झाला तो चेंडू अप्रतिम असला तरी सचिन त्याने साफ फसवला जाणं जरा आश्चर्यकारकच होतं. त्या उलट, कालीसला तो खूपच सहजपणे खेळत होता . [ इतर कुणाला असं जाणवलं का ? कीं मीच उगीचच 'एक्सपर्टगिरी' करायला बघतोय!]
काल म्हणे शाहरुख खानने दारू
काल म्हणे शाहरुख खानने दारू पिऊन वानखेडेवर धुमाकूळ घातला. -
Pages