आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

तरी ५० बॉल्स मधे ७० आणि ६ विकेट्स शिल्लक यातून बाकी कोणत्याही संघाने सहज मॅच जिंकली असती. >> फारेंडा , येवढ सोप नव्हत. विकेट बेकार होती हे खरे आहे. मुंबईला सुद्धा धावगती वाढवता येत नव्हती. रोहित शर्माला म्हणून धोका पत्करायला लागला.
क्लार्क बाद नव्हता असे वाटले पण नंतर गांगुली बाद होता पण दिला नाही. चालायचेच.
असद राउफ एक सर्वोत्कृष्ट पंच आहेत. पण होतात चुका कधी कधी.

क्लार्क मारतो पण जास्त क्लासिकल, द्रविड प्रमाणे.
>> हो पण यंदाच्या IPL मधील द्रविड टोटली वेगळा आहे. तो खूपच मस्त खेळतोय त्यामुळेच तो जास्त आवडतोय.

पहिल्या विकेटच्या भागीदारी मध्ये राजस्थान खूप पुढे आहे. द्रविडला आणखी एक चांगला बॉलर मिळाला असता तर नक्कीच त्याची टीम पहिल्या चार मध्ये असती.

सचिनला IPL मध्ये सहन करणे थोडे अवघड होते आहे. (कालचे तिन फोर्स सोडून) तो नेहमी वन डे मुड मध्ये खेळतो, टि २० मध्ये नाही असे वाटत राहते.

पुढच्या आयपिल मध्ये रहाणेला २ मिलियन मिळणार हे नक्की. (जय हो!) जडेजा पेक्षा हि डीझर्वस. पुण्याने त्याला घ्यावे.

रहाणेला वनडे अन टेस्ट मध्ये जास्त संधी मिळने आवश्यक आहे. सारखे आपले घोणीचे पिद्दू खेळविण्यापेक्षा बोर्डाने रहाणे, रायडू ह्यांना संधी द्यावी.

>>> पण त्याचबरोबर हे ही लक्षात घ्यायला हवे की पुण्याचा संघ मुळात खूप मर्यादित कौशल्य असलेला आहे. युवी, क्लार्क आणि काही प्रमाणात दिंडा सोडला तर बाकीचे लोक त्यांच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवू न शकलेले आहेत.

पुण्याकडे स्टीव्हन स्मिथ, जेसी रायडर, कॅलम फर्ग्युसन, नेथन मॅकलम्, कारकून, मॅथ्यू वेड, तमीम इक्बाल, हापूस थॉमस, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज, ल्यूक राईट, मिशेल मार्श, जेम्स होप्स, मरलॉन सॅम्युअल्स, पार्नेल हे चांगले परदेशी खेळाडू आहेत. यातल्या फर्ग्युसन, मॅकलम्, वेड, तमीम, ल्यूक राईट, मिशेल मार्श, जेम्स होप्स यांना अजून एकही सामना खेळविलेला नाही.

भारतीय खेळाडूंपैकी धीरज जाधव, कामरान खान (पहिल्या २ आयपीएल मध्ये याने रारॉ कडून चांगली गोलंदाजी केली होती), हर्षद खडीवाले यांना अजून एकदाही संधी दिलेली नाही.

दादा स्वतः एक निरूपयोगी खेळाडू आहे. त्याच्या बरोबरीने नेहरू, उत्तप्पा, राहुल शर्मा, मनिष पांडे हे बहुतेक सर्व सामन्यात अपयशी ठरलेले आहेत.

पुण्याचे ११ सामन्यात फक्त ८ गुण आहेत. उपांत्य फेरीत प्रवेशासाठी किमान १६ गुण मिळवावे लागतील. उर्वरीत ५ सामन्यातले किमान ४ सामने पुण्याला जिंकावे लागतील. निदान उरलेल्या सामन्यासाठी तरी कारकूनला कर्णधार करून दादा, नेहरू, उत्तप्पा, राहुल शर्मा, मनिष पांडे, रायडर इ. ना बसवावे व कारकून, स्टीव्हन स्मिथ, वेड (यष्टीरक्षक आणि सलामीचा फलंदाज) व नेथन मॅकलम या परदेशी खेळाडूंना व धीरज जाधव, कामरान खान, खडीवाले इ. ना संधी द्यावी.

येवढ सोप नव्हत. विकेट बेकार होती हे खरे आहे. मुंबईला सुद्धा धावगती वाढवता येत नव्हती. >>> पण मुंबई किमान १६० च्या टारगेट ने खेळत असणार. गावसकर म्हणतो तसे कधी कधी पहिल्यांदा बॅटिंग करताना नक्की किती आवश्यक आहेत ते न कळाल्याने गडबड होते. याउलट पुण्याला माहीत होते नक्की किती करायचे आहेत. गेल्या काही मॅचेस मधे हे पाहिले आहे - जो १५-२० धावांचा फरक मॅचच्या मध्यावर असतो तो तसाच राहतो शेवटपर्यंत. त्यामानाने काल बरेच जवळ गेले. विकेट अवघड होती म्हणून एकदम ३० बॉल्स मधे ७० करता येणार नाहीत एखाद्याला हे मी समजू शकतो. पण आपल्याकडे काल हिटर्सच शिल्लक नव्हते. शेवटच्या पाच ओव्हर्समधे किमान ३-४ सिक्स न मारता येणे म्हणजे काहीतरी हॉरिबल प्रॉब्लेम आहे. आणि हे फक्त कालच्या मॅच मधले नाही.

क्लार्क बाद नव्हता असे वाटले पण नंतर गांगुली बाद होता पण दिला नाही. चालायचेच.>>> अरे एलबी ला न देणे हे एकदम कॉमन आहे. अंपायरला जोपर्यंत पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत देतच नाहीत. त्यामुळे ते नगास नग "ईव्हन" झाले असे कसे म्हणता येइल? त्यात तो बॉल लेगस्टंपवर पिच झालेला. त्याला एलबी मिळण्याचे चान्सेस थोडे कमीच असतात.

पुण्याकडे स्टीव्हन स्मिथ, जेसी रायडर, कॅलम फर्ग्युसन, नेथन मॅकलम्, कारकून, मॅथ्यू वेड, तमीम इक्बाल, हापूस थॉमस, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज, ल्यूक राईट, मिशेल मार्श, जेम्स होप्स, मरलॉन सॅम्युअल्स, पार्नेल हे चांगले परदेशी खेळाडू आहेत. यातल्या फर्ग्युसन, मॅकलम्, वेड, तमीम, ल्यूक राईट, मिशेल मार्श, जेम्स होप्स यांना अजून एकही सामना खेळविलेला नाही.>>> मास्तुरे यातील एक दोन अपवाद सोडले तर त्या त्या देशाच्या टीम्समधे सिलेक्ट होत नाहीत.

निदान उरलेल्या सामन्यासाठी तरी कारकूनला कर्णधार करून दादा, नेहरू, उत्तप्पा, राहुल शर्मा, मनिष पांडे, रायडर इ. ना बसवावे व कारकून, स्टीव्हन स्मिथ, वेड (यष्टीरक्षक आणि सलामीचा फलंदाज) व नेथन मॅकलम या परदेशी खेळाडूंना व धीरज जाधव, कामरान खान, खडीवाले इ. ना संधी द्यावी.>>> याच्याशी बराचसा सहमत.

पण पुढची मॅच आहे इडन वर. तेथे गांगुलीला बसवायचा असेल तर त्याने स्वत:ला "अनफिट" घोषित करावे नाहीतर किमान मुंबईवाले सचिनबद्दल करत होते तसे मॅच चालू होईपर्यंत तो खेळणार नाही याचा पत्ता लागू देउ नये Happy

<त्याच्या बरोबरीने नेहरू, उत्तप्पा, राहुल शर्मा, मनिष पांडे हे बहुतेक सर्व सामन्यात अपयशी ठरलेले आहे>
आयपीएल २०१२ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा काढणार्‍यांच्या यादीत उथप्पा सातव्या स्थानी आहे.
स्टीव्ह स्मिथ या यादीत सोळाव्या स्थानी आहे. त्याचा स्ट्राइक रेट दीडशेपेक्षा जास्त आहे. (सेहवागचा १६३).

रेडिफवरच्या काही फनी कॉमेंट्स:
"इतका रटाळ खेळ करुन पण हा दादा म्हणतो की माझी विकेट टर्निंग पॉइंट होती... किती हा निर्लज्जपणा"
त्याच्यावरची एकाची कॉमेंट होती की चुकुनमाकुन पुणे जिंकले असते तर भज्जीची पण हीच कॉमेंट असती Happy

असद रौफचे दोन निर्णय मुंबईच्या पथ्थ्यावर पडले... एक म्हणजे क्लार्क आउट नसताना त्याला आउट देणे आणि गांगुली आउट असुन त्याला आउट न देणे Proud

कालचा सामना म्हणजे यंदाच्या आयपीएल मधल्या दोन सर्वात इडियट कर्णधारांमधला सामना होता आणि तो दोघातल्या जास्त इडियटने हरला!

>>> आयपीएल २०१२ मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावा काढणार्‍यांच्या यादीत उथप्पा सातव्या स्थानी आहे.

धावगती किती आहे त्याची?

<< कालचा सामना म्हणजे यंदाच्या आयपीएल मधल्या दोन सर्वात इडियट कर्णधारांमधला सामना होता आणि तो दोघातल्या जास्त इडियटने हरला! >> तरीच गांगुलीने भज्जी हा राष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्याच्या लायकीचा आहे, असं विधान हल्लीच केलं होतं; त्या दोघांमधला ' आप पहेले, पहेले आप ' असाच प्रकार असावा तो !! Wink
[ पण सिरीयसली, कर्णधार म्हणून मला गांगुली खास आवडत नसला, तरीही त्याबाबतीत भज्जीशी त्याची तुलना करणं हास्यास्पद आहे; सध्यां त्याच्याकडून शिकार होत नसली, तरी गांगुली हा वाघच आहे ! ]

उत्तप्पाची एकूण ११ सामन्यात ११८.३१ ची धावगती वाईट नाही, पण फारशी चांगलीही नाही. उत्तप्पा सलामीचा फलंदाज असल्याने इतरांच्या तुलनेत त्याला पहिल्या ६ षटकांत जास्त वेगाने धावा करायची संधी असते, तसेच इतरांच्या तुलनेत त्याला जास्त चेंडूही खेळायला मिळतात. त्या दृष्टीने त्याची धावगती जास्त असायला हवी.

पुण्याच्या एकूण ११ सामन्यांपैकी शेवटच्या ६ सामन्यात उत्तप्पाने १३९ चेंडूत १५१ धावा केल्या आहेत (धावगती - १०८.६३) व पुण्याचा संघ या ६ पैकी ५ सामने हरलेला आहे. अर्थात पुण्याच्या पराभवाला तो एकटाच अजिबात जबाबदार नाही. नेहरू, राहुल शर्मा यांची खराब गोलंदाजी आणि उत्तप्पाच्या बरोबरीने दादा, मनिष पांडे इ. ची खराब फलंदाजी आणि खराब क्षेत्ररक्षण हे सुद्धा पुण्याच्या पराभवाला तितकेच जबाबदार आहे.

निदान पुढच्या ५ सामन्यांसाठी तरी पुण्याने संघात बरेच बदल करावे असे वाटते.

<< रायडर अनफिट आहे की काढलाय आज? >> २० षटकांच्या सामन्यासाठी रायडर हा वास्तविक हुकमी एक्का आहे पण तो 'क्लिक' होत नाहीय ही पुण्यासाठी डोकेदुखी ठरतेय ; कदाचित एखादा सामना त्याला बसवून पहावं असा विचार असूं शकतो.
आयपीएलच्या या सत्रात गंभीर खूपच सातत्याने खेळतोय हे मात्र खरं.

यापुढे पुण्याच्या मॅचेस मधे वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. त्यांचे तेवढे कौशल्यच नाही. आज इडन वरच्या मॅचच्या हाईपमुळे बघितली. आता निदान यापुढे तरी क्लार्क ला कप्तानपद देऊन जेवढे पॉईंट्स मिळवता येतील तेवढे बघावे. खालून किती वरचा नं येतो ते बघावे.

स्मिथ ला ढापला आज. तो एक लांज चा नोबॉलही द्यायला हवा होता.

आता यापुढे आपली टीम मुंबई.

नेहमीचेच "अयशस्वी" कलाकार घेऊन पुणे कसे जिंकणार होते? दादाने बरेच चेंडू वाया घालविले. ३५ चेंडूत ३६ हा फारच संथ खेळ होता. मॅथ्यूजने ज्या षटकात पहिल्या ३ चेंडूंवर ३ षटकार मारून ४ थ्या चेंडूवर १ धाव घेतल्यावर दादाने पुढचे दोन्ही चेंडू वाया घालविले.

द्रवीड या आयपीएलमध्ये फारच सुंदर खेळतोय... आज परत एकदा त्याच्या सुंदर खेळीभोवती राजस्थानची इनिंग उभी राहिली Happy

पंजाबची तिसरी विकेट गेली.... हॉजने फार सही कॅच घेतला.... त्यानंतरचे द्रवीडचे एक्सप्रेशन्स खुप रेअर होते Happy

द्रविडचे शैलीदार फटके, प्रविण कुमार व अझर चे यॉर्कर्स फुलटॉस करून मारायचं फलंदाजांचं कसब व मार्शचे दोन अप्रतिम झेल हीं राराच्या डावाचीं वैशिष्ठ्यं. छान डाव उभारलाय राराने. बघूं पंजाब कसं उत्तर देतो .

मिशेल जॉन्सन ऐवजी ड्वेन स्मिथ मुंबईकडून खेळणार.
मुंबईने सोडलेला अजिंक्य रहाणे यंदा अप्रतिम खेळतोय याला काय म्हणावे? मुंबई इंडियन्सनी त्याला चार वर्षे 'इदम् आसनम् अलंक्रियताम्! एवढेच ऐकवले. सतीश आणि असेच कधी न ऐकलेले खेळाडू अकरात असायचे. पाचवा सीझन आला तरी मुंबईकडे धड आघाडीची जोडी नाही. शिखर धवनही चार्जर्सकडून बरा खेळतोय.
आतापर्यंत मुंबईच्या यशात ६० टक्के वाटा स्लिंगा मलिंगाचा आहे. तो बाहेर होता तेव्हा रडकुंडीला आले होते.
यंदा मुंबईचे नशीबही जोरावर आहे . आधीच्या सीझनमध्ये अटीतटीचे सामने हमखास हरायचे.

<< मुंबई इंडियन्सनी त्याला चार वर्षे 'इदम् आसनम् अलंक्रियताम्! >> मला वाटतं रहाणेच्या गुणवत्तेबद्दल शंकाच नव्हती, निदान सचिनला तरी . पण आता करतोय तशी सातत्यपूर्ण व भरीव कामगिरी मुंबईतर्फे खेळताना त्याच्याकडून होत नव्हती, असं आठवतं. शिवाय, 'गॉडफादर' नसणं हा भाग आहेच ! मलिंगाच्याबाबतीतही, त्याचे यॉर्कर निष्प्रभ झालेत असंच वाटायचं पण आतां तो खूपच प्रभावी ठरतोय . कदाचित, टी-२०तला एखाद्याचा फॉर्म 'प्रेडीक्ट' करणं हें क्रिकेटच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक कठीण असावं.

चेन्नई १७३ -८ [ २० षटकं] . मलिन्गा व आरपी सिंग प्रत्येकीं ३ बळी. रैना, ब्राव्हो व धोनी यांच्या खेळी अपेक्षित पण एम. विजय २९ चेंडूत ४१ [ ४चौकार, ३ षटकार ] ! << टी-२०तला एखाद्याचा फॉर्म 'प्रेडीक्ट' करणं हें क्रिकेटच्या इतर प्रकारांपेक्षा अधिक कठीण असावं.>> !!!
सचिनचा सलामीचा आज पार्टनर कोण व सलामीची जोडी कशी सुरवात करते ह्यावर बरचसं अवलंबून !

सचिन! सचिन!! सचिन!!!

जबरी सामना झाला.

- शेवटच्या चेंडूपर्यंत कमालीचा रंगलेला सामना
- मुम्बई सहज जिंकेल असे १५ षटके पूर्ण होईपर्यंत वाटत होते तोच सामना पुढच्या ४ षटकात मद्रासच्या बाजूने फिरला
- शेवटच्या ३ चेंडूवर १४ धावा करण्याचे अशक्यप्राय आव्हान स्मिथने यशस्वीरित्या पेलले. शेवटच्या ३ चेंडूवर ६, ४, ४ अशा धावा करून त्याने सामना जिंकून दिला.
- मुम्बईचा शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय
- सचिनची तडाखेबंद फलंदाजी . . . फक्त ४४ चेंडूत ७४ धावा

अजून काय पाहिजे!

आश्चर्य म्हणजे मुम्बईचे तब्बल ४ फलंदाज ० धावा करून बाद झाले तर दोघांनी प्रत्येकी १ धाव केली, तरीसुद्धा मुम्बईने सामना जिंकला.

ड्वेन स्मिथला "सामनावीरा"चा किताब मिळाला. तो सचिनला मिळायला हवा होता एवढीच किंचितशी रूखरूख आहे.

सचिन आज जिद्दीनेच खेळायला उतरला होता, असं जाणवलं. रोहित शर्मा धांवून धांवां काढताना घाई करतो आहे म्हटल्यावर त्याने दोनदा त्याला समज दिली. आजची दोघांचीही खेळी मस्तच झाली. स्मिथच्या ९चेंडूत २४ धांवाना आगळंच ' परिस्थिती'जन्य महत्व होतं हेंही नाकारतां येणार नाही. मुंबईचं अभिनंदन.

खुपच सही झाली मॅच.... मलातर वाटतय की फाजील आत्मविश्वास न दाखवता पटकन एक रन काढून स्मिथला स्ट्राइक दिल्याबद्दल आरपी सिंग ला द्यायला पाहिजेल MoM Proud

बाकी काही म्हणा भज्जीचे लक जोरावर आहे.... खुप क्लोज मॅचेस शेवटच्या क्षणी मुंबईच्या बाजुने फिरल्या आहेत!

सचिनच्या खेळीचे चीज झाले Happy

Pages