आयपीएल - ५ (२०१२)

Submitted by स्वरुप on 30 March, 2012 - 06:34

आयपीएल चे पाचवे पर्व सुरू झाले आहे.... पेपर्समधून आणि टिव्हीवरुन आयपीएलचे पडघम वाजू लागले आहेत ... यंदा पुण्यात मॅचेस होणार असल्यामुळे पुणेकरांच्यात विशेष उत्साह दिसुन येत आहे.... जिकडे तिकडे नवीन स्टेडिअमच्या आणि कोण कुठल्या मॅचेस बघायला जाणार या चर्चांना रंग चढू लागला आहे.

मग या सगळ्यात आपण का मागे राहायचे.... चला तर मग करुया सुरुवात....

हा धागा आयपीएल-५ वरच्या चर्चांसाठी, आपापल्या टीमच्या समर्थनासाठी, आवडत्या खेळाडूंचे कौतुक करण्यासाठी आणि नावडत्यांना नावे ठेवण्यासाठी, जाणकारांच्या अचूक विश्लेषणासाठी, वादविवादासाठी आणि चिमटे काढणार्‍या व्यंगचित्रांसाठी Happy

या स्पर्धेत सहभागी झालेले संघ खालीलप्रमाणे:
संघ: मुंबई इंडियन्स
कर्णधार: हरभजनसिंग
संघमालक: मुकेश अंबानी
टॅगलाईन: दुनिया हिला देंगे

संघ: पुणे वॉरिअर्स
कर्णधार: सौरव गांगुली
संघमालक: सुब्रतो रॉय
टॅगलाईन: सहारा

संघ: राजस्थान रॉयल्स
कर्णधार: राहुल द्रवीड
संघमालक: मनोज बडळे, सुरेश चेल्लाराम, राज कुन्द्रा, शिल्पा शेट्टी
टॅगलाईन: हल्लाबोल

संघ: रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
कर्णधार: डॅनिअल व्हेटोरी
संघमालक: विजय मल्ल्या
टॅगलाईन: जीतेंगे हम शानसे, गेम फोर मोअर

संघ: चेन्नई सुपर किंग्स
कर्णधार: महेंद्रसिंग धोनी
संघमालक: इंडिया सिमेंट
टॅगलाईन: रोअर विथ प्राइड

संघ: दिल्ली डेअरडेव्हिल्स
कर्णधार: विरेंद्र सहवाग
संघमालक: जी एम आर ग्रुप
टॅगलाईन: खेलो फ्रंट फूट पे

संघ: कोलकता नाईट रायडर्स
कर्णधार: गौतम गंभीर
संघमालक: शहारुख खान, जय मेहता
टॅगलाईन: कोरबो लोरबो जीतबो

संघ: किंग्ज इलेव्हन पंजाब
कर्णधार: अ‍ॅडम गिलख्रिस्ट
संघमालक: नेस वाडिया, प्रिती झिंटा, मोहित बर्मन
टॅगलाईन: बॉर्न टू विन, धूम पंजाबी

संघ: डेक्कन चार्जर्स
कर्णधार: कुमार संगकारा
संघमालक: वेंकटरामा रेड्डी
टॅगलाईन: द अनस्टॉपेबल्स

आता पुढचे दोन महीने या कट्ट्यावर भेटत राहूयात आणि स्पर्धेचा आनंद लुटत राहूया Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज खूप दिवसांनी सचिन नेहमीसारखा खेळताना दिसला. यापूर्वी तो असा खेळला होता तो २०११ च्या विश्वचषकातल्या द. आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात.

मलातर वाटतय की फाजील आत्मविश्वास न दाखवता पटकन एक रन काढून स्मिथला स्ट्राइक दिल्याबद्दल आरपी सिंग ला द्यायला पाहिजेल MoM >>>> अगदी !!! आरपीने एक रन काढून पटकन स्ट्राईक रोटेट केला.. आणि मलिंगा उगीच बॉल वाया न घालवता पहिल्याच बॉल आऊट झाला ते ही चांगलं केलं त्याने.. Happy

फेअर प्ले पॉइंटसच्या क्रमवारीत राजस्थान रॉयल्स प्रथमस्थानी तर पुणे वॉरियर्स तळाला. हाउ अ‍ॅप्रोप्रिएट!

व्हॉट अ फिनिश बाय डिव्हिलीअर्स!
जवळजवळ हरलेली मॅच खेचुन आणली.... जबरदस्त खेळी Happy

डेक्कनचा संघ एकदम भंगार खेळतोय. रारॉ विरूद्ध १९६ धावा करून सुद्धा हरले आणि काल बंगळूरविरूद्ध १८१ धावा वाचवता आल्या नाहीत. आणि या भंगार संघाविरूद्ध पुणे दोन्ही सामने हरले!

They are consolidating their bottom position. : एक अनाम ट्विट.
आयपीएलच्या पहिल्या मोसमातही त्यांची कामगिरी अशीच होती.
मुंबईने चेन्नई आणि चार्जर्सविरुद्ध दोन्ही सामने जिंकले. दिल्लीविरुद्ध दोन्ही हरले.
पंजाब , पुणे प्रत्येकी एक जिंकला, एक गमावला.
कोलकत्ता आणि बंगलोरशी अजून सामना व्हायचा आहे.
राजस्थानला घरच्या मैदानावर मारले. दुसरा सामना बाकी.

कालच्या दोन्ही मॅचेस जबरी झाल्या... धुंवाधार फटकेबाजी... काही अप्रतिम कॅचेस.. अप्रतिम गोलंदाजी... एकूण काय तर फुल्ल टू एंटरटेनमेन्ट...

कालची सचिनची खेळी पाहून भारी वाटलं. तसही सोप वाटणार आव्हान अवसानघातकी फलंदाजीमुळे अवघड होऊन बसलं. पण शेवटी स्मिथनं विजयश्री खेचुन आणली.
अंत भला तो सब भला Happy

छ्या! काल स्मिथने सगळा घोटाळा केला! चक्क फिनिश केली मॅच. बाकीचे कसे जुन्या फॉर्म्युल्याला जागून सचिन आउट झाल्यावर आपापल्या विकेट्स फेकून परत आले? स्मिथ ला अजून भारतीय क्रिकेट संस्कृतीची पूर्ण ओळख झालेली नाही. सचिन आउट झाल्यावर बाकी २५ रन्स मधे आणखी ६! आरपी सिंगने गांजा घेउन खेळत असल्यासारखी एक सिंगल काढून दिली स्मिथला. अशा वेळेस कोठेतरी प्रेक्षकांत बघत बॉल च्या लाईनच्या जवळपास सुद्धा जाणार नाही अशी बॅट फिरवून आउट होऊन निघून जायचे असते हे त्याला माहीत नाही काय?

त्यामुळे काल "संघ जिंकला नाही तर त्या ४३ बॉल्समधल्या ७४ रन्स चा काय उपयोग?" किंवा "सचिन खेळतो तेव्हा संघ हमखास हरतो" वाल्यांना काही संधीच दिली नाही. फारच निराशाजनक कामगिरी!

<< "सचिन खेळतो तेव्हा संघ हमखास हरतो" वाल्यांना काही संधीच दिली नाही. >> सचिन ऐवजी स्मिथला ' मॅन ऑफ द मॅच ' करून त्याना नाचायला संधी दिली ना !! Wink
पण, तो येडपट स्मिथ मात्र स्वतःच्या खेळीचं आणि विजयाचं बरचसं श्रेय सचिनलाच देतोय- Wink -
Smith also credited Tendulkar for giving him confidence when he set off to bat at no. 6 at the fall of Ambati Rayudu's wicket at 148 in the 18th over.
"He (Tendulkar) said the wicket was good. He told me to back myself and he was true, it paid off. It's a big win and we really deserved it as well. [ रिडीफ.कॉम (स्पोर्टस) ].

आज यंदाच्या आयपीएलमधला सगळ्यात खास सामना आहे
राजस्थान वि. पुणे
द्रवीड वि. गांगुली

पण नेमका दुपारी असल्यामुळे कामातुन वेळ काढुन कॅफेटेरियात चकरा माराव्या लागणार Wink

बेस्ट ऑफ लक द्रवीड.... यु अ‍ॅन्ड युवर टीम रॉक्स Happy

हो आजची मॅच इंटरेस्टिंग आहे खरी, पण आता वॉरियर्समधला इंटरेस्ट गेला. त्यांनी वरती बर्‍याच जणांनी लिहील्याप्रमाणे संघबदल केला तर पाहू.

आपण द्रविडपेक्षा दादाचे जास्त फॅन असलो तरी आज सपोर्ट द्रविडला. द्रविडबद्दल कधीच वाद नव्हता. फक्त वेगवेगळ्या कारणामुळे सचिन व दादा जास्त आवडतात. पण हे सगळे त्यांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीबद्दल. सध्या द्रविड फारच सुरेख खेळतोय, कप्तानपदही चांगले सांभाळतोय. फिटनेसही चांगला वाटतोय त्याचा (वजन बहुधा कमी झाले असावे).

सेहवाग आणि गंभीरच्या आयपीएलमधल्या बॅटिंगला माझ्या दृष्टीने शून्य किंमत आहे. जेव्हा टेस्ट्स मधे गेले वर्षभर संघाला गरज होती तेव्हा त्यांनी काही केले नाही. द्रविडबद्दल आदर कायमच होता, तो इंग्लंड सिरीज मधे दुप्पट झाला.

>>> सेहवाग आणि गंभीरच्या आयपीएलमधल्या बॅटिंगला माझ्या दृष्टीने शून्य किंमत आहे. जेव्हा टेस्ट्स मधे गेले वर्षभर संघाला गरज होती तेव्हा त्यांनी काही केले नाही.

+१

डेक्कन व पुण्याला आता उपांत्य फेरीत जायची जवळपास अजिबातच संधी नाही. राजस्थान व पंजाबला अजून थोडीशी संधी आहे. आता डेक्कन व पुण्याने आपले सामने जिंकून इतरांसाठी स्पॉइलर बनू नये हीच इच्छा आहे.

<< सेहवाग आणि गंभीरच्या आयपीएलमधल्या बॅटिंगला माझ्या दृष्टीने शून्य किंमत आहे. >> असं वाटणं अगदीं स्वभाविक असलं तरीही आयपीएलची मजा घेताना कसोटी सामन्यातल्या त्यांच्या हल्लीच्या कामगिरीची अशी तुलना करून रसभंग कां करा, असाही विचार मनात येतोच ! शिवाय, आयपीएलमधल्या कामगिरीमुळे राष्ट्रीय संघातले हे दोन महत्वाचे फलंदाज जर 'फॉर्मा'त येणार असतील, तर बरंच आहे कीं !!
<< आता डेक्कन व पुण्याने आपले सामने जिंकून इतरांसाठी स्पॉइलर बनू नये हीच इच्छा आहे. >> मास्तुरेजी, इथं माझं मत जरा वेगळं आहे; प्रत्येक संघाने स्पर्धेतला प्रत्येक सामना जिंकण्याचा कसोशीने प्रयत्न करणं ही त्याची नैतिक जबाबदारीच आहे व तसं करताना त्याना पहाणं हा प्रेक्षक म्हणून प्रत्येकाचा अधिकार आहे. कुणीही कुणाच्या मेहेरबानीवर अंतिम फेरीत येणं हें कोणत्याही स्पर्धेला किंवा अशा तर्‍हेने अंतिम फेरीत येणार्‍या संघाला शोभा देत नाही. डेक्कन व पुण्याने यापुढचाही आपला प्रत्येक सामना जिंकण्याचा आटोकाट प्रयत्न केलाच पाहिजे व अंतिम फेरीत येऊं इच्छिणार्‍या संघांनी हें आव्हान स्विकारलेच पाहिजे. [ अर्थात, या दोन संघानीं एखाद्या संघालाच मदत करण्यासाठी बरा- वाईट खेळ केला तर तें मात्र अक्षम्य आहे ]

आजही पुण्याच्या संघात एकही स्थानिक खेळाडू नाही. खडीवाले, धीरज जाधव, श्रीकांत वाघ हे स्थानिक खेळाडू संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न खेळता बाकावर माश्या मारत बसलेले आहेत. ल्यूक राईट, तमीम इक्बाल, नेथन मॅकलम्, कॅलम फर्ग्युसन इ. परदेशी खेळाडूंची तीच अवस्था आहे. नेहरू, उत्तप्पा, गांगुली, पार्नेल हे नेहमीचेच "अयशस्वी" कलाकार पुन्हा एकदा संघात आहेत. जर व्हेटोरी, संगक्कारा इ. कर्णधार स्वतःहून १-२ सामन्यात स्वतःला बाहेर ठेवू शकतात, तर नेतृत्व व फलंदाजी या दोन्ही क्षेत्रात अपयशी असलेल्या गांगुलीला तसे करायला काय हरकत आहे? त्याच्याऐवजी कारकून चांगले नेतृत्व करू शकेल. कारकूनला सलामीला पाठविणे हा अत्यंत विचित्र निर्णय होता. या आणि मागच्याही सामन्यात त्याला सलामीला पाठवून गांगुलीने तोंड फोडून घेतले आहे. उत्तप्पाऐवजी मिथुन मन्हासला यष्टीरक्षक ठेवून कोणता तरी नवीन खेळाडू संघात घ्यायचा प्रयोग करता आला असता. आता गोलंदाजांनाच पुण्याची लाज राखावी लागणार. पण दिंडा आज बाहेर आहे, त्यामुळे तेही अवघडच आहे.

<< .... गांगुलीला तसे करायला काय हरकत आहे? >> मास्तुरेजी, इतकीं वर्षं त्याला पहात असूनही गांगुलीकडून अशी अपेक्षा ठेवणं कठीणच आहे ! Let us accept that he is a very bad loser !!

आज लवकर घरी आल्याचे चीज झाले... मस्त झाली मॅच
वॉटसन सोल्लिड खेळला... त्याच्या समावेशामुळे राजस्थानचा संघ समतोल झालाय
द्रवीडचे बॉलिंग चेंजेसही गेल्या दोन मॅच मध्ये छान काम करतायत
टेट पण जबरी

स्मिथ एक अफलातुन हुषार खेळाडू आहे... आज वॉटसनचा सीमारेषेवर कॅच घेण्याचा त्याचा प्रयत्न काबिल्-ए-तारीफ होता

>>आजही पुण्याच्या संघात एकही स्थानिक खेळाडू नाही
आता उरलेल्या सामन्यात तरी बेंच उबवत बसलेल्या सगळ्यांना संधी द्या म्हणाव.... गांगुली बाहेर बसण्याची शक्यता कमीच आहे त्यामुळे तो सोडून बाकीचा सगळा संघ बदलायला हरकत नाही... कदाचित एखादा विजय पदरात पडेल

>>मास्तुरेजी, इतकीं वर्षं त्याला पहात असूनही गांगुलीकडून अशी अपेक्षा ठेवणं कठीणच आहे ! Let us accept that he is a very bad loser !!
Proud

सचिन आऊट झाल्यावर मुंबईची परिस्थिती हलाखीची होती पण शेवटी १४१-६ हा अगदींच वाईट स्कोअर नाही. पण, रॉयल चॅलेंजर्स हा सामना जिंकण्याचे निकराचे प्रयत्न करणार ,हें निश्चित. मजा आयेगा !

तुम्ही सगळे दादावर इतके तोंडसुख का घेताय?
जसे काय त्याच्या एकट्यामुळेच पुणे हारतेय. उद्या उठुन क्लार्कला कॅप्टन केले तर काय उथाप्पा गेलसारखा खेळणार आहे का?
दादाने ५व्या नंबरवर पण खेळायला येउन बघितले, वरच्यांनी काय दिवे लावले?
तो एकटा काय करणार इतक्या भंगार टीमला घेउन तो कसा काय जिंकू शकणार?

<< तुम्ही सगळे दादावर इतके तोंडसुख का घेताय? >> लोकप्रियजी, तसं कांहीसं होतंय माझ्याकडूनही हे मलाही जाणवतंय . सॉरी.
कल मुंबईको बुरी तरहसे पिटा रॉयल चॅलेंजर्सने ! परवां म्हणे द्रविडने आपल्या खेळाडूना गुणांच्या तक्त्याकडे बघूं नका, प्रत्येक मॅचवर लक्ष केंद्रीत करा, असं सांगितलं. पण तक्त्यामधे आतां रॉयल चॅलेंजर्स त्यांच्यावर गेलेत व पंजाब पुढे घुसूं पहाताहेत याचं भानही ठेवायला लागणार आहे द्रविडसाहेबाला !!

हरलो... झालं 'गेलं' RCBला मिळालं. :p

रॉयल चॅलेंजर्स हा सामना जिंकण्याचे निकराचे प्रयत्न करणार ,हें निश्चित. मजा आयेगा >>> मजा आला असता जर 'गेल'चा 'झेल' घेतला असता Sad

गेल ठोकत असताना खर तर वाईट वाटत होतं... तरी पण त्याने मारलेल्या सुपर सिक्सर्सना टाळ्या वाजवून प्रेक्षक दाद देत होते.

मुंबईने आता सलामीला सचिनबरोबर हर्षल गिब्जला पाठवावे. लेव्ही, ब्लिझार्ड, फ्रँकलीन असे खूप प्रयोग करून झालेत. गिब्ज सलामीला आल्यावर या तिघांपेक्षा वाईट तर खेळणार नाही ना?

भारतीय गोलंदाजांची फुल्टॉस टाकण्याची घाणेरडी सवय अजून कायम आहे. काल ओझाने गेलसारख्या हातोड्याला फुल्टॉस टाकून षटकार मारायला दिला. लगेचच पुढचा चेंडू लेगच्या बाहेर फुल्टॉस टाकून अजून एक षटकार दिला आणि चेंडू कंबरेच्या वर असल्याने नोबॉलची पण धाव दिली. त्यामुळे टाकाव्या लागलेल्या जास्तीच्या चेंडूवर पण गेलने षटकार मारला.

>>> तुम्ही सगळे दादावर इतके तोंडसुख का घेताय?
जसे काय त्याच्या एकट्यामुळेच पुणे हारतेय. उद्या उठुन क्लार्कला कॅप्टन केले तर काय उथाप्पा गेलसारखा खेळणार आहे का?

दादा कर्णधार असल्याने सर्वात जास्त दोषाचा धनी तोच होणार. तो स्वतः फलंदाजी, नेतृत्व आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात संपूर्ण अपयशी ठरलेला आहे. तो अत्यंत संथ फलंदाजी करतो. गिलख्रिस्ट, व्हिटोरी, संगक्कारा इ. इतर कर्णधारांप्रमाणे त्याने स्वतःहून १-२ सामने बाहेर बसायला पाहिजे होते. पण तो अट्टाहासाने सर्व सामने खेळत आहे. क्लार्कला सलामीला पाठविणे, उत्तप्पा-नेहरू-पार्नेल्-पांडे-राहुल शर्मा इ. अनेक सामन्यात अपयशी ठरलेल्यांना पुन्हा पुन्हा संधी देणे, स्टीव्हन स्मिथ्-क्लार्क इ. गोलंदाजांना अजिबात गोलंदाजी न देणे, बाकावर बसलेल्या इतर अनेक स्थानिक व विदेशी गुणी खेळाडूंना एकदाही संधी न देता नेहमीचेच अयशस्वी खेळाडू पुन्हापुन्हा खेळविणे या सर्व चुकीच्या निर्णयांची जबाबदारी त्याचीच आहे. त्यामुळे त्यालाच सर्वजण दोष देणार.

<< भारतीय गोलंदाजांची फुल्टॉस टाकण्याची घाणेरडी सवय अजून कायम आहे. >> 'यॉर्कर' टाकायची प्रॅक्टीस ते बहुधा नेटमधे न करतां फक्त सामना खेळतानाच करत असावेत ! Wink
<< गिब्ज सलामीला आल्यावर या तिघांपेक्षा वाईट तर खेळणार नाही ना? >> आयपीएलमधे कोणाच्या कोंबड्याने कधी उजाडेल सांगणं खरंच कठीण आहे. सचिनने जर सलामीला तीन-चार भिडू आतांपर्यंत निवडले असतील, तर कदाचित त्यातलाच एखादा यापुढे कशावरून नाही चमकणार ? आणखी गिब्जलाही बदनाम व्हायची शक्यता कां अजमवायची ? मला वाटतं फ्रँकलीनवर सचिनचा अधिक भरवसा असावा !
<< मजा आला असता जर 'गेल'चा 'झेल' घेतला असता >> मजा आली असती हे खरं असलं तरी तो झेल सोडल्यामुळेच आपण सामना हरलो हें भज्जीचं म्हणणं नाही पटत; तो झेल घेतला असता तरीही १४१ ही धांवसंख्या पार करणं कोहली, व्हिलीयर्स, तिवारी इ.ना फार कठीण नव्हतं. मुंबईची धांवसंख्या १५.५ षटकं झालीं असताना १००- ६ अशी होती. ज्या पोलार्डला खेळवणार कीं नाही अशी चर्चा होती त्याने व भज्जीने शेवटच्या ४ षटकांत ४० धांवा काढल्याच ना ! मुंबई रॉयल्ससमोर आव्हानात्मक धांवसंख्या उभी करून ठेऊं शकली नाही, हेंच त्यांच्या हरण्याचं मुख्य कारण होतं, असं मला वाटतं.

Pages